Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

महाराष्ट्र सरकार का बड़ा फैसला: शराब-अपवाद छोड़कर सभी दुकानें 24x7 खुली रहेंगी

PPPRANAV POLEKAR
Oct 01, 2025 17:30:15
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी - महाराष्ट्र एक प्रगतशील राष्ट्र है उद्योग क्षेत्राची राजधानी मुंबई आहे मध्यविक्री आणि मद्यपानाची ठिकाण बंद ठेवून इतर दुकान 24 तास चालू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला हा निर्णय ऐच्छिक आहे कुणाला कंपल्सरी नाही या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल.. व्यापाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यामुळेच हा निर्णय सरकारने घेतलेला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Oct 01, 2025 15:02:41
Dhule, Maharashtra:मराठीत, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने धुळे तहसील कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला. या उलगुलान मोर्चा मध्ये आदिवासी शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे अद्याप कृषी विभाग तसेच महसूल यंत्रणा पंचनामा करायला शेतकऱ्यांच्या बांधावर आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी. तसेच वनहक्क कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी व आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा उतारा द्यावा. यासह विविध मागण्या यावेळी सत्यशोधक कष्टकरी सभेच्या वतीने करण्यात आल्या.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 01, 2025 14:46:02
Dhule, Maharashtra:धुळे शहरा सहज जिल्ह्यात अनेक ठिकाणी रावण दहनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये गेल्या 28 वर्षांपासून अखंडित रावण दहनाची परंपरा आहे. या ठिकाणी 35 फूट उंचीचा रावण दहन केला जाणार आहे. याही वर्षी आपली कलाकुसर जपत तब्बल ३५ फुटांच्या रावणाची भव्य प्रतिकृती साकारली आहे. येत्या दसऱ्याच्या दिवशी या भव्य रावणाच्या दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून धुळ्याचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल उपस्थित राहणार असून, त्यांच्या शुभहस्ते रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न होईल. या परंपरेमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे आणि सर्वजण या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Oct 01, 2025 14:03:25
7
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 01, 2025 13:32:35
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या तुलशेत पाडा परिसरातील पाटकर कंपाउंड मधील एका सार्वजनिक शौचालयात नुकतच जन्मलेला स्त्री जातीचा अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली. महिलांच्या शौचालयामध्ये एका कमोड मध्ये या अर्भकाला टाकण्यात आलं होतं त्यानंतर परिसरातील महिलांनी स्थानिकांच्या मदतीने या अर्भकाला भांडुप पोलीस ठाणे येथे निल आणि त्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी अर्भकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात सध्या या हरभराची प्रकृती स्थिर आहे त्याच्या डोक्याला थोडीशी दुखापत झाली होती परंतु हे अर्भक नेमकं कोणी या शौचालयात आणून टाकलं याचा शोध सध्या भांडुप पोलीस घेत आहेत स्थानिकांच्या समयमा सूचकतेमुळे या चिमुकल्याचा जीव मात्र वाचला आहे
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 01, 2025 13:32:18
Thane, Maharashtra:भिवंडी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना अटक य़ां एक कारमध्ये काही इसम हे बनावट नोटा बदली करण्यासाठी अग्निशस्त्रासह मिल्लतनगर, भिवंडी येथे येणार आहेत" अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळाली त्याअनुषंगाने जनार्दन सोनवणे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सापळा कारवाईबाबत मार्गदर्शन केल्याप्रमाणे पोलीस पथकाने भिवंडी फरहान हॉलकडे जाणाऱ्या रोडवर, मिल्लतनगर, ममता हॉस्पीटलच्या बाजुला, चाविंद्रा रोड, या ठिकाणी सापळा रचुन आरोपी १) शिवानंद ज्ञानेश्वर कोळी वय २४ वर्षे, व २) राहुल रामदास शेजवळ, वय २४ वर्षे, दोघे यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले. आरोपी व त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील ५०० रू. दराच्या नोटांचे ४८ बंडल, एका आरोपीच्या ताब्यात ०१ माऊझर/पिस्टल व ०१ जिवंत काडतुस असे मिळुन आले. सदर पिस्टल, काडतुस, नोटांचे ४८ बंडल व इको स्पोर्ट कार असा एकुण ६,३३,४५०/- रू. किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यांच्याविरुद्ध निजामपुरा पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउनि / रविंद्र बी. पाटील, गुन्हे शाखा, घटक - २ भिवंडी हे करीत आहेत. गुन्हयाच्या प्राथमिक तपासात आरोपी हे जप्त नोटा या खऱ्या भासवुन बदली करण्याच्या प्रयत्नात होते, त्यामुळे याद्वारे आवाहन करण्यात येते की, कोणीही अशा प्रकारच्या बनावट नोटा बदली करण्याच्या आमिषाला बळी पडु नये, याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधीत पोलीस ठाण्यास किंवा गुन्हे शाखेस माहिती द्यावी.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 01, 2025 12:34:54
6
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 01, 2025 12:34:45
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - भाजपा इशारा सभेच्या आधी भाजप नेत्यांकडून राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटलांना अभिवादन .. अँकर - सांगली भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गडाच्या विरोधात ऑनलाईन इशारा सभा पार पडणार आहे.या सभेच्या आधी भाजपच्या नेत्यांकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि राजरामबापू पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील,आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील भाजप आमदारांकडुन वसंतदादा पाटलांच्या बरोबर जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांच्या स्मारकाला देखील अभिवादन केलं आहे. राष्ट्रवादीकडून विराट मोर्चा काढण्यात आला होता आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पडळकर यांवर जोरदार टीका करण्यात आली होती आणि याला उत्तर देण्यासाठी भाजपाची आज ऑनलाईन इशारा सभा पार पडते सांगलीमध्ये आणि त्या सभेच्या पूर्वी भाजपाकडून जयंत पाटील यांच्या वडील राजारामबापू पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलंय.
7
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 01, 2025 12:15:59
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधात सांगलीमध्ये भाजपाची आज ऑनलाईन इशारा सभा पार पडत आहे. भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही ऑनलाईन सभा पार पडत आहे. राजमती भवन येथे ही ऑनलाइन इशारा सभेचे आयोजन करण्यात आलं असून या ऑनलाइन सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कडून काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. या ऑनलाइन सभेमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे आमदार, पदाधिकारी देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटावर भाजपा कशा पद्धतीने आगपाखड करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 01, 2025 12:15:47
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 01, 2025 12:02:25
Akola, Maharashtra:अकोल्यातील बाळापूर येथे आज धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे समाज बांधवांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून, शेळ्या-मेंढ्यांसह महामार्गावर उतरत राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवला. धनगर समाजाची प्रमुख मागणी म्हणजे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मतदान करणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 01, 2025 11:49:09
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटा तर्फे चारा वाटप, उपक्रमावेळी उडाली झुंबड - राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे चारा वाटप उपक्रमावेळी शेतकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली - उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव मध्ये अजित पवार गटाच्या वतीने चारा वाटप सुरु होते - मात्र नागरिकांनी चारा वाटपावेळी एकच झुंबड करत चाऱ्याने भरलेला संपूर्ण ट्रॅक्टर पाच मिनिटात रिकामा केल्याचे पाहायला मिळाले - मिळेल त्या पद्धतीने नागरिकांनी चाऱ्याची पेंडी ओरबाडत घेऊन जाणे पसंत केले - आम्हाला जेवणाचं किट नाही दिले तरी चालेल मात्र जनावरांना चाऱ्याची नितांत गरज आहे - अनेकजण जीवनावश्यक वस्तूचे किट देत आहेत मात्र जनावरांना चाराच मिळत नाही. - शेतकऱ्यांची गरज ओळखून आम्ही हा चारा शेतकऱ्यांसाठी आणला आहे.
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 01, 2025 11:48:31
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आज वाशिमला आले. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन राज्य सरकारवर तीव्र टीका केली. ठाकरे म्हणाले की, सरकारने मदतीचा जीआर बदलून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १३,६०० रुपयांऐवजी फक्त ८,५०० रुपये व २ हेक्टरपर्यंतच दिलासा ठेवला आहे, जी शेतकऱ्यांची पिळवणूक आहे. शेतकऱ्यांना तातडीची व योग्य मदत न दिल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल,असा इशाराही त्यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये, तर पूर्णपणे नुकसान झालेल्यांना १ ते ५ लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा अति पाऊस होऊनही शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळत नाही.उलट पहिल्यांदाच बघितले दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन घेऊन जाण्याचं नाटक करावं लागले ही राज्याच्या राजकारणातील पहिलीच वेळ असल्याची टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.नुकसानीबाबत काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बाईट:माणिकराव ठाकरे,माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
4
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top