Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415621

राजगुरुनगर में पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृति साहित्य संमेलन का समापन

HCHEMANT CHAPUDE
Feb 17, 2026 05:06:07
Khed, Maharashtra
राजगुरुनगर येथे पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती संमेलन संपन्न. राजगुरुनगर येथे कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात करण्यात आली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Feb 17, 2026 07:20:08
Pandharpur, Maharashtra:Anchor - जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दारुण पराभव ,सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या हकालपट्टीची मागणी, अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केली हकालपट्टीची मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्ष नेस्तनाबूत केला. स्वतःला आणि भावाला सुद्धा निवडणून आणू शकले नाहीत. उमेश पाटील यांचा डीएनए भाजपचा आहे की शिवसेनेचा आहे हे आता तपासण्याची गरज आहे अशी टीका करून राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 17, 2026 07:11:45
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपाऱ्यात लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग नालासोपारा पश्चिम सोपरा गावात सोनार आली परिसरामध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली ची घटना घडली आहे ही आग रात्रीच्या साडेनऊच्या سुमारास लागली आहे आग एवढी भीषण होती ka लाकड्याचा गोडाऊन जळून खाक झाला आहे मात्र आग कशामुळे लागली समजू शकले नाही मात्र स्थानिक नागरिकांनी तत्काल माहिती देत वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानाला तात्काळ माहिती मिळतात घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना दोन तास लागेल आहे मात्र हे गोडाऊन कोणाचा आहे आणि आग कशामुळे लागली आहे ते समजू शकले नाही मात्र आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 17, 2026 06:48:25
Yavatmal, Maharashtra:विवाहाचे स्वप्न दाखवून शेतकरी तरुणाची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी सिमरन पाटीलसह तिची आई, भाऊ व अन्य दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नाशिक च्या बानगाव येथील शेतकरी युवकाचे लग्न जुळवण्यासाठी घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन पाटील हिचा प्रस्ताव पुढे आला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगत विवाहाचा खर्च मुलाकडच्यांनी उचलावा, अशी अट घालून मुलाकडून दोन लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. पैसे मिळताच सिमरन, तिची आई, भाऊ व इतर दोघे साथीदारही वेळ साधून तेथून निसटले. यानंतर घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून दुचाकी हिसकावून नेल्याच्या घटनेत ती व तिचा भाऊ आरोपी होते. या अपमानानंतर संबंधित शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्या आत्महत्या prकरणातही घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सिमरन नुकतीच कारागृहातून बाहेर आली होती. या टोळीने महाराष्ट्रासह इतरही राज्यात कोणाची फसवणूक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 17, 2026 06:19:46
Nanded, Maharashtra:एका महिलेच्या घरी घरफोडी झाली. या घरफोडीमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांडीचे दागिने आणि इतर ऐवज लंपास केला. सोन्या चांदीच्या ऐवजासह साडेबारा लाख रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेल्याची फिर्याद महिलेने दिली. पण घरफोडी मध्ये केवळ सोन्या-चांदीचे दागिने लंपास झाले असले तरी रोख एक्कम लंपास झाल्याचा बनाव फिर्यादी महिलेने केल्याचे पोलीसांनी उघड केले. नांदेड शहरातील ही घटना. 15 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर मधील रहिवासी मंगल जंगलोड यांच्या घरी घरफोडी झाली होती. सोन्या चांदीचे दागिने घड्याळ आणि रोख 12 लाख 50 हजार रुपये गेल्याची फिर्याद देण्यात आली. चोरटे तुळजापूर येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. दोन पुरुष आणि तीन महिला असे एकूण पाच चोरट्यांना पोलिसांनी तुळजापूर मधून अटक केली. सोन्या चांदीचे दागिने आणि इतर ऐवज चोरल्याचे चोरट्यांनी कबूल केले. पण रोख रकमेबाबत माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी अखेर फिर्यादी महिलेचीच उलट तपासणी केली. या महिलेने काही दिवसांपूर्वी रोख रक्कम आपल्या आईकडे ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. भाग्यनगर पोलिसांनी फिर्यादी महिलेवर गुन्हा दाखल करून ती साडेबारा लाख रुपयांची रक्कमही जप्त केली. महिलेने ही रक्कम अशा प्रकारे लपवण्याचा प्रयत्न का केला याचा तपास पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 17, 2026 06:01:50
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 17, 2026 05:19:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगरमधील मोकाट कुत्र्यांचा लहान मुलांवर हल्ला केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही हृदयद्रावक आणि भयावह घटना शहरातील बायजीपुरा प्रभाग क्रमांक १३/१४ मधील कुरैशी हॉलच्या जवळ घडली आहे. लहान मुलं खेळत असताना, अचानक आलेल्या मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये एका लहान मुलाला कुत्र्यांनी घेरले आणि त्याचे अक्षरशः लचके तोडले. हा हल्ला इतका हिंसक होता की, मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. या संपूर्ण घटनेची भयावह दृश्ये जवळच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कशा प्रकारे कुत्री मुलाच्या मागे लागतात आणि हल्ला करतात. या घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले असून, महापालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 17, 2026 05:16:24
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रथमच भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे अभिनंदन करत भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. चंद्रपूरच्या सर्वांगीण, नियोजित व शाश्वत विकासासाठी राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असा विश्वास त्यांनी दिला. जीएसटी भरपाई रक्कम वाढविण्यात यावी आणि १५ वित्त आयोगाचा निधी वितरीत करण्यात यावा, यासोबत चंद्रपूर शहराच्या प्रगतीसाठी अनेक मागण्या आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्याकडे केल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रपूर शहरातील सर्वांगीण विकासासाठी चंद्रपूर महानगरपालिकेला सर्वतोपरी राज्य शासनाचे सहकार्य मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 17, 2026 05:15:24
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 04:20:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : खरबूज पिकाचे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील खरबूज उत्पादक शेतकरी आक्रमक - सोलापूर जिल्ह्यातील खरबूज उत्पादक शेतकरी आक्रमक - खरबूज बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीने बोगस बियाणे विक्री केल्यामुळे खरबुजाचे पीक वाया गेल्याची शेतकऱ्यांची तक्रार - खरबूज पीकाचे बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची कृषी अधीक्षकांकडे मागणी. - खरबूज पीक बियाणे अनुवंशिक पद्धतीने न आल्यामुळे अनेक एकरावरील खरबूज पीक वाया गेले. - महागडे बियाणे खरेदी करूनही पीक फसल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. - खरबूज पीक उत्पादक शेतकऱ्यांना एकरी दीड लाख रुपयांचा खर्च आला मात्र खरबूज पिकातून केवळ 8 ते 10 हजाराचे उत्पन्न - सध्या बाजारात खरबुजाची 40 रुपये किंमत असतानाही या शेतकऱ्यांच्या खरबबूजाला केवळ 2 ते 5 रुपये भाव मिळत आहे - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित बियाणे उत्पादकावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. Byte : लखन माने (शेतकरी)
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 04:17:51
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथीला वीस वर्षांची सक्तमजुरी, सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल - 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथीला वीस वर्षांची सक्त मजुरी तर दहा हजार रुपयांचा दंड - अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथीला मोठी शिक्षा करत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय - आठ एप्रिल 2020 रोजी मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रसाद देण्याच्या बहाण्याने तृतीयपंथीने 14 वर्षीय मुलावर केला होता लैंगिक अत्याचार - उशीर झाला तरी मुलगा घरी येत नसल्याने आईने पाहणे केल्यानंतर आरोपी नग्न अवस्थेत तर मुलगा विचित्र स्थितीत दिसून आला - घटनेचे गांभीर्य ओळखताच मुलाच्या आईने मंद्रूप पोलीस ठाणे गाठात केला होता गुन्हा नोंद - अखेर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृतीयपंथीला कडक शिक्षा सुनावलीय
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 17, 2026 04:01:39
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये बेकायदेशीर वास्तव्याच्या आरोपांवरून भाजप आक्रमक; खडकपाडा पोलीस ठाणे येथे निवेदन. अनधिकृत वास्तव्य आढळल्यास कायदेशीर कारवाईचे पोलिसांकडून आश्वासन. कल्याण पश्चिमेतील काही हायप्रोफाइल परिसरात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या राहतात व चिकन-मटण विक्री, फेरीवाला तसेच घरेलू कामगार म्हणून कार्यरत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने खडकपाडा पोलीस ठाणे येथे जाऊन पोलिसांना निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित व्यक्तींची कागदपत्रे तपासून बेकायदेशीर वास्तव्य आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील विविध गृहनिर्माण सोसायट्यांची बैठक घेऊन घरेलू कामगारांची संपूर्ण माहिती पोलिसांना देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी निवेदनाची दखल घेतली असून, शहरात अनधिकृतरीत्या राहणारे किंवा बनावट कागदपत्रांद्वारे वास्तव्य करणारे आढळल्यास कायदेकारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून शहरात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top