Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

शेखाप ने अलिबाग-वडखळ मार्ग पर रास्तारोको किया; दिवाली से पहले दुरुस्त करने का आश्वासन

PPPRAFULLA PAWAR
Oct 07, 2025 07:36:21
Chendhare, Alibag, Maharashtra
बांधकाम विभागाकडून दिवाळीपूर्वी रस्ते सुस्थितीत करण्याचे लेखी आश्वासन..... आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा... आंदोलकामुळे अलिबाग वडखळ मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प ....... अँकर - अलिबाग शहराकडे येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने आज शेतकरी कामगार पक्षाने राज्याच्या महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे व राज्यप्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग वडखळ मार्गावरील पेझारी चेकपोस्ट येथे रास्तारोको आंदोलन केले. संबंधित प्रशासन जो पर्यंत योग्य दखल घेत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी आक्रमक भूमिका शेकाप ने घेतल्याने हे आंदोलन तब्बल दोन तास सुरू राहिले परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. नॅशनल हायवेच्या अधिकार्‍यांनी अखेर आंदोलन स्थळी भेट देऊन दिवाळी पूर्वी रस्ता सुस्थितीत करण्याचे लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कृती झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Oct 07, 2025 09:40:18
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात खुनाच्या गुन्ह्यातील वाढत्या आकडेवारीमुळे गुन्हेगाराची राजधानी ठरली आहे. एकूण झालेल्या 45 खुनापैकी निम्मे पेक्षा अधिक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळला आहे. त्यामुळे नाशिककर धास्तावले आहेत. सातपूर परिसरात मध्यरात्री भटकणारी अल्पवयीन मुले.. नोकरीवरून परतणाऱ्या दोन तरुण मुलाच्या दुचाकीला त्यांनी थांबविले... मित्राला चापट मारल्याने मागील मित्र खाली उतरून जाब विचारू लागतच सर्व जण त्याच्या अंगावर धावून गेली...आणि जागीच त्याला ठार मारले .. तर दुसऱ्या बाजूला एका अल्पवयीन विधीसंघर्षित मुलाने ठक्कर बजार परिसरात चक्क खून करत नृत्य केले.. त्याला रिमांड होममधे पाठविले असता तिथून पळून येत त्याने पुन्हा एकदा खून केला. अशा किरकोळ शरीर यष्टीचा माथेफिरू मुलाची वाढती दादागिरीने नाशिकमध्ये नाशिककर दहशतीत आहेत, रिमांड होममधील शिक्षेच्या आकलनावर चर्चा आणि शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 09:40:03
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 09:30:53
Baramati, Maharashtra:पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी सुप्रिया सुळे यांनी इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. इंदापूर पोलीस ठाण्यातूनच पोलीस अधीक्षकांना फोन केला गेला. इंदापूर पोलीस निरीक्षकाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे. इंदापूर मध्ये आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने 22 सप्टेंबरपासून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत यासह इतर तक्रारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर आंदोलकांनी मांडल्या. कार्यकर्त्यांची गाऱ्हाणं ऐकून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातूनच खासदार सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना फोन लावला. कार्यकर्त्यांनी माझ्यापुढे तक्रारी मांडल्या आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांचं बरोबर असेल पण तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच एकदा ऐकून घ्या, त्यांच्याशी बोला, त्यांना भेटीचा वेळ द्या आणि मग तुम्हाला योग्य वाटतोय तो निर्णय करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. या वादावर पुढे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या कार्यकर्त्यांना भेटीची वेळ दिली. इंदापूर पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, वाळू उपसा, गुटखा विक्री असे विविध बेकायदा धंदे सुरू आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काल सेवेतून निलंबित करावे अशी मागणी या आंदोलकांची आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 07, 2025 08:49:01
Nagpur, Maharashtra:नागपुर में Acute Encephalitis Syndrome और कफ सिरप के कारण मरने वालों की संख्या अगस्त से लेकर अब तक कुल 19 है, जिनमें 13 लोग मध्य प्रदेश के और महाराष्ट्र के 6 लोग हैं। इनका आयु वर्ग 0 से 16 वर्ष है. आज नागपूर के विविध अस्पतालों में कुल 12 मरीज भर्ती हैं. इस वर्ष अगस्त से ये मरीज आना शुरू हुए. मध्य प्रदेश के 13 मरीजों के बारे में कफ सिरप से होने वाली मौत का शक है, क्योंकि सभी में मूत्र-समस्या, किडनी फेल्योर और मस्तिष्क में सूजन के लक्षण थे. महाराष्ट्र के मरीजों में ये लक्षण नहीं थे, यह विशेष बात है. कुल मिलाकर 36 मरीज... 19 मौतें... इनमें 13 मौतें मध्य प्रदेश की हैं... छिंदवाड़ा में 12 मौतें और सिवनी में एक मौत. बाइट -- नागपूर महानगर पालिका के चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 07, 2025 08:39:45
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव जाधव on न्यायमूर्ती गवई चप्पलफेक या घटनेचा मी निषेध करतो, देशात जाती-जातीत, धर्माधर्मातलं विष किती भिनलं गेलं आहे, त्याचं हे प्रतीक आहे सर्वोच्च पदी गवई बसले आहेत हे काही लोकांना किती खुपतं आहे, पोटात किती दुखत आहे त्याचं हे प्रतीक हा देशातल्या संविधानाचा, न्यायव्यवस्थेचा अपमान आहे, बाबासाहेबांच्या विचारांना दिलेलं हे आव्हान असून त्यांचा देखील हा अपमान आहे देशातल्या प्रमुखांना काही लोक विष्णूचा अवतार समजतात, ही जी भावना वाढलेली आहे, त्या भावनेचा हा परिपाक आहे On प्रबोधनकार पुस्तक भिरकवणे प्रकरण हे पुस्तक भिरकवत असताना, त्यांनी ही पुस्तिका भिरकावली नाही, तर प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार भिरकावले प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार, कार्यप्रणाली, त्यांनी हिंदुत्ववादाची व्याख्या जी देशाला सांगितली आताचे जे ढोंगी, बोगस हिंदुत्ववादी आहेत, अंधभक्त आहेत त्यांना ते विचार पचनी पडणार नाहीत, त्याचीच ही परिणीती आहे On पूरग्रस्त मदत बिहारमध्ये 75 लाख महिलांच्या खात्यात 10 हजार न मागता भरलेत, तिथे आता कुठलं नैसर्गिक संकट आहे इथे तर शेतकरी, जनता पाण्यात बुडाली आहे, त्यांच्या नुकसानीचा प्रस्ताव मागण्याचं नाटक दिल्लीतली सत्ताधारी करत , यातून महाराष्ट्राने जागं व्हावं निवडणुकीपूर्वी जसे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे भरलेत तसेच पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात भरा, कर्जमाफी करा, आणि मग आकडेवारी गोळा करा निवडणुका असल्या की सरकारी पैसा वाटून मतं विकत घेण्याचा प्रकार सुरू आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीची सरकारची मानसिकता नाही On दिवाळी आनंदाचा शिधा बंद कसं पाहायचं ते महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं पाहिजे निवडणुकीपूर्वी आनंदाचा शिधा वाटण्याचं नाटक केलं, फोटो छापले निवडणुकपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात सरसकट 1500 रुपये भरले आता केवायसीच्या, चौकशीच्या नावाखाली 46 लाख महिला कमी झाल्या आहेत शिवभोजन थाळी यांनी बंद केली निवडणूक संपली की आम्ही केलेल्या घोषणेशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही मराठ्यांना फसवण्याचं काम सुरू आहे अशा पद्धतीने प्रत्येकाला फसवण्याचं काम या सरकारने केलं आहे हे काय चाललं आहे याचा लोकांनी विचार करण्याची गरज आहे निवडणुकीपूर्वी घोषणा करायच्या आणि निवडणूक झाल्यावर त्याला हरताळ फासायचा, लोकांना फसवून निवडणूका जिंकता येतात ही धारणा sत्ताधार्यांची झाली आहे, तिला छेद देण्याचं काम जनतेने केलं आहे On भाजप शिवसेना, राष्ट्रवादी फोडून झाली आणि आता हे मतदार चोरी देशासमोर आली आहे हे असंच चालवायचं की नाही चालवायचं याचा विचार जनतेने करायचा वेळ आली आहे म्हणून या पक्षाला 60 ते 70 वर्ष देशात सत्तेवर का येऊ दिलं नाही ते आता समोर आलं आहे On रामदास कदम संपूर्ण राजकारणात त्यांची छि थू होतेय स्वतः बोलून संपूर्ण राज्यात त्यांनीचं हसं झालेलं आहे On एकनाथ शिंदे शिंदेंच्या आमदारांची गरज संपलेली आहे गरज सरो वैद्य मरो ही भाजपची नेहमीची नीती शिंदेंचे आमदार आणि मंत्री कितीही ओरडले तरी त्यांची दखल घेतली जाणार नाही शिंदेंचे जास्तीत जास्त लोक नाराज कसे होतील आणि शिंदेंपासून दूर कसे जातील हा कुटील डाव भाजपकडून खेळला जाईल
2
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 07, 2025 08:06:06
Beed, Maharashtra:बीड: "मी तुझा काका आहे.. घाबरू नकोस, तुझ्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो" माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मराठा आरक्षणा दरम्यान मृत्यू पावलेल्या कुटुंबातील मुलाला धीर..! "मी तुझा काका आहे.. घाबरू नकोस, तुझ्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो" असे आश्वासित करत माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणा दरम्यान मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना धीर दिला.. बीडच्या घोसापुरी येथील संजय पवार मागील महिन्यात मुंबई येथे झालेल्या मराठा आंदोलनात सक्रिय होते. समाजासाठी लढताना ते अचानक आजारी पडले आणि उपचारादरम्यान त्यांच्याDurduurdai निधन झालं. या घटनेनंतर पवार कुटुंब उघड्यावर पडले होते. आणि याच कुटुंबाला माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मदतीचा हात देत तीन लाखाची आर्थिक मदत देत संजय पवार यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ही स्वीकारण्यात आली आहे. यापूर्वी तानाजी सावंत यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील चार कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. आता त्यानंतर पवार कुटुंबाचे देखील पालकत्व स्वीकारण्यात आले आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 07, 2025 07:36:59
Parbhani, Maharashtra:परभणी जिल्ह्यात अतिमूसळधार पावसाने सर्वच्या सर्व महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालीय, त्यातच वेगवेगळ्या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी काठची पीक अक्षरशहा मातीमोल झालीयेत, हजारो रुपये टाकून कष्टाने लाखो रुपयांचे पिकवलेलं पीक डोळ्या देखत सडून गेलंय, यामुळे शेतकरी हवालदिलं झालीयेत. पूर ओसरल्या नंतर गोदावरी पट्यात पिकांची झालेली दयनीय अवस्था झी २४ तास ड्रोनच्या माध्यमातून सरकार समोर मांडत आहे,किमान ही दृश्य बघून तरी सरकाला शेतकर्यांबद्दल पाझर फुटेल आणि आज होऊ घातलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय होईल असे म्हणण्यास हरकत उरणार नाही. शेतकर्यांची दुःख जाणून घेतलीयेत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 07, 2025 07:35:48
Akola, Maharashtra:मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात सेवानिवृत्त होत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिले. मात्र हे पुस्तक काही महिला कर्मचाऱ्यांनी फेकून देत या कर्मचाऱ्याला माफी मागायला भाग पाडलं. तर पुस्तक फेकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिवसेना (UBT) चे नेते अरविंद सावंत चांगलेच संतापले आहेत. 'बुद्धी गहाणी ठेवली असेल तर आणून हे पुस्तक वाचा' असा खोचक सल्ला त्यांनी दिलाय. सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याचं स्वागत व्हायला हवं होतं, पण त्यांच्या sन्मानचिन्ह असलेलं पुस्तक न वाचता फेकून देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर शिवसेना चे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना शिस्त शिकवून मेमो द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. आमदारांना निधी मिळत नाही, हा सगळ्यात मोठा विनोद आहे असं ते म्हणाले. सत्ताधारी आमदारांनाच निधी मिळत नसेल, तर विरोधी पक्षातील आमदारांची काय अवस्था असेल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या चिन्हाबाबत उद्या होणाऱ्या निर्णयावर भाष्य करताना त्यांनी शिवसेना न्यायासाठी तडफडत आहे, पण न्यायालयाने संविधानाच हसू उडवली असायची टीका त्यांनी केली आहे. तसंच खासदार नवनीत राणा यांना उद्देशून सावंत यांनी प्रतिक्रिया देत अनेक वर्ष प्रकरणे न्यायप्रविष्ट ठेवून सत्तेचा उपभोग घेणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला. घाणेरडा माणूस है, अशा नालायक लोकांबद्दल काय बोलावं?” याचबरोबर, बापाचं नाव पुसणारी ही माणसं आहेत, असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांच्यावरही हल्लाबोल केला.
3
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 07, 2025 07:35:12
Chendhare, Alibag, Maharashtra:शेकाप की चित्रलेखा पाटील ने आमदार महेंद्र दळवी यांच्यावर जोरदार टीका की. दळवी यांना महेंद्र फेल्युअर दळवी म्हणण्यात आले. अलिबाग वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेचे खापर त्यांनी महेंद्र दळवी यांच्या माथी फोडले. दळवी यांना चिखलात लोळायला आवडतं, त्यामुळे त्यांना खड्डा खोल करायचा आहे. अँकर- पेझारी नाका इथं झालेल्या रास्तारोको आंदोलनादरम्यान शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर जोरदार टीका केली. दळवी यांचा उल्लेख त्यांनी महेंद्र फेल्युअर दळवी असा केला. अलिबाग वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेचे खापर त्यांनी महेंद्र दळवी यांच्यावर फोडले. दळवी यांना चिखलात लोळायला आवडतं. त्यामुळे त्यांना खड्डा आणखी खोल करायचा आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 07, 2025 06:48:10
0
comment0
Report
Advertisement
Back to top