Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133
सुप्रिया सुळे की इंदापुर थाने पर धरणे, पुलिस अधिकारी से मुलाकात
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 09:30:53
Baramati, Maharashtra
पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी सुप्रिया सुळे यांनी इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. इंदापूर पोलीस ठाण्यातूनच पोलीस अधीक्षकांना फोन केला गेला. इंदापूर पोलीस निरीक्षकाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे. इंदापूर मध्ये आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने 22 सप्टेंबरपासून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत यासह इतर तक्रारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर आंदोलकांनी मांडल्या. कार्यकर्त्यांची गाऱ्हाणं ऐकून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातूनच खासदार सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना फोन लावला. कार्यकर्त्यांनी माझ्यापुढे तक्रारी मांडल्या आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांचं बरोबर असेल पण तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच एकदा ऐकून घ्या, त्यांच्याशी बोला, त्यांना भेटीचा वेळ द्या आणि मग तुम्हाला योग्य वाटतोय तो निर्णय करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. या वादावर पुढे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या कार्यकर्त्यांना भेटीची वेळ दिली. इंदापूर पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, वाळू उपसा, गुटखा विक्री असे विविध बेकायदा धंदे सुरू आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काल सेवेतून निलंबित करावे अशी मागणी या आंदोलकांची आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Oct 07, 2025 12:31:35
Pune, Maharashtra:अहिल्या नगरच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे वंजारी समाजाच्या ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं... या मोर्चासाठी वंजारी समाजातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते... या मोर्चात वंजारी समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली... वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील वडगाव थाटे या ठिकाणी तीन तरुण एक ऑक्टोबरपासून उपोषण करत आहेत त्याच उपोषणाला पाठिंबा देत हा मोर्चा आणि रास्ता रोको करण्यात आला असून हैद्राबाद गॅजेट नुसार ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी करण्यात आली आहे...दरम्यान वडगाव थाटे या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 07, 2025 11:50:00
Amravati, Maharashtra:सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेज वर बच्चू कडू असमाधानी; बच्चू कडूंचा अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू समाधानी नाही त्यामुळे अमरावतीच्या तिवसा येथे बच्चू कडू यांचे नेतृत्वात अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ हजारो शेतकरी तिवसा शहरामध्ये रस्त्यावर उतरलो असून संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ही बच्चू कडू यांची मागणी आहे. राज्य सरकार विरोधात बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. हे पॅकेज बनवाबनवीच आहे का की अजून कायच हे निष्पन्न होत नाही, आमच आंदोलन कर्जमुक्तीचं होतं आमचा एमएसपीच्या 20% बोनस देण्याचं होतं दिव्यांगांचे होतं, मच्छीमारांच होत, मेळ मेंढपाळांचा होत, आज मार्केटमध्ये सोयाबीन तीन हजार रुपये, कापूस सहा हजार रुपये आहे, अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाही. 11000 रुपयाचा कापूस सहा हजार रुपये मार्केटमध्ये विकावा लागते, सोयाबीन तीन हजार रुपयाला विका लागते मग याची नुकसान भरपाई देणार कोण?शासकीय खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार? या सर्व मुद्द्यासाठी आम्ही नागपूरला 28 तारखेला मोठा मोर्चा काढणार आहे. आम्ही नागपूर चारही बाजूने घेतल्या शिवायराहाणार नाही, कर्जमुक्ती शिवाय आमचे पाय परतणार नाही,जेवढे दिवस थांबायचे आम्ही तेवढे दिवस नागपूरात थांबू असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 07, 2025 11:46:33
Nanded, Maharashtra:घरगुती वादातून एका पत्नीने आपल्या पतीला लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहानीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. नांदेड शहरातील ही घटना आहे. नाईक नगर येथील रहिवाशी विक्रम दाडगे याचे त्याच्या पत्नीसोबत वाद सुरु आहे. यातून एकमेकांविरोधात तक्रारी देणे गुन्हे दाखल करणे असे प्रकार सुरु आहेत. त्यातच रविवारी विक्रम दाडगे याची पत्नी आपल्या भावासोबत आली. दोघांनी घरात शिरून विक्रमला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. विक्रमच्या पत्नीने एका मोठ्या लाकडाने पतीच्या हातावर पायावर बेदम मारहान केली. विक्रम ची आई सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कांताबाई दाडगे यांनाही मारहाण करण्यात आली. मराहिनीची ही सर्व घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली. विक्रम दाडगे याचा हात आणि पाय मराहिणीमुळे फ्रॅक्चर झालाय. या घटनेनंतर कांताबाई यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण पोलिसांनी या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल केला नाही. घरगुती विवाद असला तरी पोलीसांनी मारहिणीचे cctv फुटेज उपलब्ध असताना गुन्हा का दाखल केला नाही हा प्रश्न उपस्थित झालाय.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 11:37:43
Baramati, Maharashtra:तहसीलदारांच्या दालनातच वृद्ध आजीला आली भोवळ.... खासदार सुळेंकडे तक्रार घेऊन आलेल्या आजी तहसीलदाराच्या दालनातच चक्कर येऊन पडल्या..... संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मागण्यासाठी वृद्ध आजी आजोबांचे चार वर्षे शासन दरबारी खेटे.... तीन ते चार वर्षापासून संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचा वडापुरे दांपत्याचा आरोप इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथून जाणाऱ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम पालखी महामार्गात सोपान भिवा वडापुरे यांची काही जमीन संपादित झाली आहे. या घटनेला आता तीन ते चार वर्षे झाली मात्र अद्याप पर्यंत वडापुरे यांना शासनाकडून कोणताही जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचा वडापुरे कुटुंबाचा आरोप आहे. सोपान वडापुरे हे मूकबधिर असल्याने त्यांना बोलता येत नाही तर त्यांच्या पत्नी रुक्मिणी या वृद्ध आहेत. या दोन्ही आई-वडिलांना घेऊन नागपूर या ठिकाणी स्थायिक असलेली त्यांची मुलगी मीना जाठार गेल्या तीन चार वर्षापासून शासन दरबारी जमिनीच्या मोबदल्यासाठी खेटे घालत आहेत. आजही याच कामासाठी त्या इंदापूर मध्ये तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या दालनात आल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या तहसीलदारांच्या दालनात असल्याची माहिती या कुटुंबाला मिळाली. आपली तक्रार घेऊन हे कुटुंब थेट तहसीलदारांच्या दालनात सुप्रिया सुळे यांच्या समोर आलं. त्यांनी त्यांची तक्रार ऐकून घेत त्यांना धीर दिला. याच दरम्यान माघारी फिरत असताना रुक्मिणी वडापुरी यांना भोवळ आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या त्यामुळे एकच गोंधळ उडाला....
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 07, 2025 11:26:45
Kalyan, Maharashtra:डोंबिवली सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर!. केडीएमसीविरोधात ठिय्या आंदोलन — भीक मागून अनोखा निषेध!. आठवड्याभरापूर्वी डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात सर्पदंशाने चार वर्षांची प्राणवी भोईर आणि तिची मावशी श्रुती ठाकूर यांचा मृत्यू झाला होता. दोघींनाही केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रुग्णालय प्रशासनाने योग्य उपचार न दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. “रुग्णालयात गेलो तेव्हा डॉक्टरांनी आधी ब्लड टेस्ट सांगितली, नंतर म्हणाले प्रकृती ठीक आहे, पण अचानक गंभीर झाली...दुसरीकडे हलवताना पोलिस परवानगी सांगून थांбवले, ऑक्सिजनही दिला नाही! या निषेाळजीपणामुळे आमच्या दोघींचा जीव गेला. असे आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील सेवा सुधाराव्यात आणि जबाबदार डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली मात्र दोघांचा जीव गेल्यानंतरही रुग्णालय जशास तसे असून यापुढे अजून कोणाचेही जीव जाऊ नये यासाठी संतप्त नातेवाईक डोंबिवलीकर त्याचबरोबर विरोधी पक्षात असलेले राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव ठाकरे गट मनसे या सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरत भीक मागून आणि ठिय्या आंदोलन करत अनोखा निषेध करत सरकारला धारावर धरले या मुळे डोंबिवलीतील आरोग्य व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे —“निष्काळजी रुग्णालयं आणि ढिसाळ प्रशासन... अजून किती जीव घेणार?” असा सवाल संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत डोंबिवलीकरांनी उपस्थित होत आहे जाहीर निवेदनात बरोबरच हॉस्पिटल प्रशासनाने तपासणी करून सगळे चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 07, 2025 11:25:31
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग:नवनाथ वाघमारे बाईट ऑन हायकोर्ट निकाल 2 सप्टेंबर च्या जीआर मध्ये राज्य सरकारकडून कोर्टाने शपथपत्र मागितलंय असून, तो राज्य सरकारने लवकर द्यावा.. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी निकाल लागला पाहिजे.. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने झुलवत ठेवू नये.. राज्य सरकारने शपथपत्र दिल्यानंतर 2 सप्टेंबर चा जीआर रद्द होणार. आमची न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई सुरूच राहणार.. *ऑन जरांगे* *जरांगेंचा बाप जरी राष्ट्रपती झाला तरी 1994 चा जीआर रद्द करता येणार नाही.* मागासवर्गीय आयोग आणि मंडल आयोगाने 1994 चा जीआर लागू केलाय.. मराठा समाज राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या मागास नाही,त्यामुळे राजकीय आरक्षण देता येत नाही.. मराठा समाजाला नोकरीतला आरक्षण देण्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे.. जरांगेना इ डब्ल्यू एस, ए सी बीसी, ओबीसीत आरक्षण यांना पाहिजे, sc चे जरी आरक्षण दिलं तरी जरांगे नाही म्हणणार नाही..जरांगे हापापलेला आहेत.. मराठा समाजातील विद्वान लोकांनी समोर येऊन बोललं पाहिजे, बाईट - नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 11:19:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनोज जरांगे PC भरभरून कशी झाली पाहावी लागेल, काय दिले हे पाहावे लागेल, यावर उद्या सविस्तर बोलता येईल. जर शेतकऱ्याच्या म्हणयानुसार झाले नाही तर मोठं आंदोलन उभं करू यात....50 हजार नाही तर मान्य नाही... 100 टक्के नुकसानभरपाई पाहिजे, आता किती ऐकले पाहिजे, 70 हजार नुकसानभरपाई, संपूर्ण कर्जमाफी और 100 टक्के नुकसानभरपाई मिळली पाहिजे, शेतकरीला आंदोलन केल्यावर द्यावे लागेल,,,, आमचं आणि शेतकरी जमणार नाही.... सर्व शेतकरी संघटना बोलवावे लागेल, सविस्तर चर्चा करू, दिवाळीनंतर बैठक बोलवावी लागणार आहे, सरकार मदतीचे दोन तीन टप्पे करेल असे वाटत आहे, पण हा पहिला किंवा शेवटचा टप्पा आहे का हा पहावे लागेल,,, सरकारला दयायचे म्हटल्यावर काहीही करता येते, अन्यथा कारणे दिले जाते.... शेतकरी तुटला असून त्याला आधाराची गरज आहे..... आपल्यावर विनाकारण कर्ज झाले आहे, एकदा शेतकरी कर्ज झाल्यास काही नाही, अन्यथा टोकाचा आंदोलन उभं करावे लागणार आहे, सर्व जातीचा शेतकरी आहे,,,, तू कुठेही जाय, तुझी इच्छा पूर्ण होऊ देणार नाही, तुझा मोर्चा देखील काँग्रेस मोर्चा आहे, ओबीसी नाही... राहुल गांधी कोण आहे, त्याने भर पुस्तके वापरले म्हणजे मोठा झाला का? त्याच लग्न झालं नाही ते काय करतोय.... लय फडफड करू नको, भुजबळसाठी काँग्रेस पणाला लावू नको... तू एकदा चडीत हात घालून बघ.... तुला काहीच माहिती नाही, तुला काहीच कळत नाही,याला राहुल गांधी द्वेष आहे, तू परळीच्या टोळीमुळे नाचायला लागला आहे, हाताने काँग्रेस आणि राहुल गांधींचा बळी कशाला देतो, ओबीसी नेते बनवण्यासाठी खटपोट सुरू आहे, आधी सुरवात तू केली, जातीवाद कुणी सांगितले... आम्ही महाराष्ट्रच नाही उत्तर प्रदेश वैगरे काडी लावणार आहे, देशभरात क्षत्रिय मराठे आहे....राहुल गांधी म्हणजे काँग्रेस त्यांचा वाटोळे होणार आहे... आमच्या लेकरांच्या आड आल्यावर मह
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 07, 2025 11:12:08
Latur, Maharashtra:लातूर स्टोरी...\n\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही बँकेकडून शेतकऱ्याला नोटीस.... औसा तालुक्यातील शेतकऱ्याला नोटीस..... मनसे आक्रमक... अधिकाऱ्यांनी बँकेतून काढला पळ.....\n\nधाराशिव जिल्हा नंतर पुन्हा लातूर जिल्ह्यात बँकांच्या मनमानीचा प्रकार समोर आलाय. राज्याचे मुख्यमत्रींयांनी यांनी स्पष्ट सांगूनही बँका शेतकऱ्यांना नोटीसा देणं थांबवत नाहीत. औसा तालुक्यातील वरवडा गावातील शेतकरी विशाल करंडे यांना बँकेने वसुलीची नोटीस पाठवल्याने संताप व्यक्त केला जातोय. अतिवृष्टीने आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना अशा नोटीसा येणं म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखं असल्याचं शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या पाहुयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट\n\nमराठवाड्यातील लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्यातही औसा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं. हे पाहण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री औसा तालुक्यात आले होते. त्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असं आश्वासन दिलं. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनीही कोणत्याही शेतकऱ्याला बँका नोटिस देणार नाहीत, असं जाहीर केलं होतं. पण तरीही औसा तालुक्यातील वरवडा गावातील शेतकरी विशाल करंडे यांना बँकेकडून नोटीस पाठवली गेली. त्यामुळे या बँका सरकारचंही ऐकत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बँकांचा हा मुजोरपणा पाहता शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागलाय.\n\nमोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना बँकांकडून वसुलीचा अजब कारभार सुरू असल्याने संताप व्यक्त केला जातोय. शेतकऱ्यांना नोटीस दिल्याचं कळतच मनसेचे जिल्हाप्रमुख आक्रमक झाले आणि त्या शेतकऱ्याला घेऊन बँकेत गेले. बँकेत संबंधित अधिकाऱ्याला नोटीची संदर्भात जाब विचारत असताना त्याच्याकडनं मात्र उडवा उडवी चे उत्तर पाहायला मिळाले त्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचं पाहून अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना नोटीसा पाठवून बँका मनमानी करत असल्याचा आरोप आता केला जातोय.\nमुख्यमंत्र्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून बँका आपली मर्जी चालवत असल्याचं चित्र दिसतंय. म्हणूनच अशा बँकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.\n\nबाईट ::– शिवकुमार नागराळे (मनसे जिल्हाध्यक्ष)\n\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सामना करत असलेले शेतकरी विशाल करंडे आणि त्यांच्यासारखे अनेक शेतकरी आज हवालदिल झाले आहेत. त्यांच्या पदरात काहीच नाही, मग ते देणार कुठून ? एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलासा देत असताना, दुसरीकडे बँकांची अशीच मुजोरी सुरू राहिल्यास शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे — हा खरा प्रश्न आज लातूर जिल्ह्यात उभा राहिलाय.....\n\nवैभव बालकुंदे रिपोर्टर\n\n.......................... स्टोरी पुर्ण....................\n\nवैभव बालकुंदे\nZEE 24 TAAS | Latur
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 07, 2025 11:11:19
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 07, 2025 11:10:38
Akola, Maharashtra:प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाला फेकून देण्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा अपमान असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प ) चे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्राच्या विचारप्रवर्तक परंपरेचे प्रतीक आहेत. त्यांचं पुस्तक फेकण्याचं कृत्य म्हणजे फक्त त्यांचा नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी विचारांचा अपमान आहे आल्याचं मिटकरी म्हणाले. तर केलेल्या कृत्यावर नर्स संघटना अजूनही ठाम असून हा प्रबोधनकारांचा नव्हे तर पुरोगामी चळवळीचा अपमान असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अमोल मिटकरी यांनी या घटनेत सामील परिचारिकेचे निलंबन करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, नर्सवर कारवाई न झाल्यास आगामी अधिवेशनात नर्स संघटनेला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही मिटकरींनी दिला आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 07, 2025 11:09:26
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान मदत मात्र तोकडी, पॅकेज नको कर्जमाफी करा. राज्य सरकारच्या पॅकेजवर शेतकरी नाराज धाराशिव — राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल 32 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असं सरकारकडून सांगितलं जातंय. मात्र, शेतकरी मात्र या पॅकेजवर समाधानी नाहीत. कारण, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान अतोनात असून मदत तुटपुंजी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकरी वर्गाची प्रमुख मागणी म्हणजे — संपूर्ण कर्जमाफीचं पॅकेज जाहीर करण्याची. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे पाहूयात
0
comment0
Report
Advertisement
Back to top