Back
रायगड किनाऱ्यावर नववर्ष उत्सव: रिकॉर्ड पर्यटक जमावाने उडवला बझ
PPPRAFULLA PAWAR
Dec 30, 2025 02:17:15
Chendhare, Alibag, Maharashtra
पर्यटकांच्या गर्दीनं रायगड हाउसफुल झाले. नववर्ष स्वागतासाठी सारेच सज्ज, काउंटडाऊन सुरू. किनाऱ्यावरती सर्वांचीच मौजमस्ती. पोलिस यंत्रणाही सतर्क, टवाळखोरांची खैर नाही.
निसर्गाचं वरदान लाभलेलं कोकणही आता पर्यटकांच्या पसंतीस उतरलंय. सरतं वर्षाला निरोप देण्यानंच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाऱयांची निवड केलीय. काउंटडावून सुरू झालं असून पर्यटकांची गर्दीनं रायगडचे किनारे हाउसफुल झालेत.
व्हिओ 1 – अथांग निळाशार समुद्र, नारळी पोफळीच्या बागा, रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांचे फेवरीट डेस्टिनेशन ठरलंय. नाताळसारखी सुटी म्हटली की मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडतील या किनाऱ्यांकडे पर्यटकांची पावले आपोआप वळतात. अलिबाग, काशिद, नागाव, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वरचे किनारे सध्या गर्दीने फुलून गेले आहेत. मागील पाच दिवसात तब्बल चार लाखांहून अधिक पर्यटकांनी रायगडचं किनाऱ्यांना भेटी दिल्यात.
बाइट 1 – पर्यटक
व्हिओ 2 – नवे वर्ष उजाडायला अवघे काही तासच उरले आहेत. त्यामुळे नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने रायगडात दाखल झाले आहेत. इथल्या निसर्गरम्य वातावरणात समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्ट्सचा आनंद पर्यटक घेत आहेत. घोडा आणि उंटांची सवारीमुळे बच्चे कंपनी तर साहसी खेळांची रेलचेल यामुळे बडी मंडळीही खुश आहे. नवीन वर्षात नव्या सुरुवातीसाठी रायगडचे किनारे म्हणजे फेवरेट डेस्टिनेशन आहे. चमचमीत शाकाहारी बरोबरच जीभेचे चोचले पुरवण्यासाठी ताज्या मासळ्याचा आस्वाद पर्यटक घेत आहेत.
बाइट 2 – पर्यटक
बाइट 3 – पर्यटक
व्हिओ 3 – पर्यटकांच्या आगमनानं इथले छोटेमोठे व्यावसायिक सुखावले आहेत. किनारपट्टीवरील सर्वच हॉटेल लॉजेस फुल झाले आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स बरोबरच पाटर्या, डीजे मनोरंजनाच्य खेळांचं आयोजन व्यावसायिकांकडून केलं जातंय. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किनारपट्टीवरील नगरपालिकाांनी पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलंय. पर्यटकांच्या आगमनानं इथल्या छोट्या व्यावसायिकांमधंयेही समाधानाचं वातावरण आहे. दुसरीकडे यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही विशेष काळजी घेतली आहे.
बाइट 4 – वैभव सुर्वे, हॉटेल व्यवस्थापक
बाइट 5 – आंचल दलाल, पोलीस अधिकारी
व्हिओ 4 – सरत्या वर्षातील आठवणींना उजाळा देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता सारं जग सज्ज झालंय.
क्लोजींग वॉक थ्रू – प्रफुल्ल पवार
प्रफुल्ल पवार झी २४ तास रायगड
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowDec 30, 2025 04:05:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 30, 2025 04:02:570
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 30, 2025 03:50:060
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 30, 2025 03:34:440
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 30, 2025 03:34:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 30, 2025 03:32:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 30, 2025 03:31:160
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 30, 2025 03:21:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 30, 2025 03:21:370
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 30, 2025 03:17:490
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 30, 2025 03:17:340
Report
PNPratap Naik1
FollowDec 30, 2025 03:06:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 30, 2025 03:05:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 30, 2025 03:04:280
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 30, 2025 02:49:570
Report