Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

जिले की परिषद चुनाव से पहले शिवसेना में भारी इनकमिंग, नेता सहित सैकड़ों कार्यकर्ता शामिल

PPPRAFULLA PAWAR
Oct 25, 2025 04:03:44
Chendhare, Alibag, Maharashtra
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू है। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगाव तालुक्यातील उणेगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर शिंदे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केलाय. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे.
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Oct 25, 2025 16:23:24
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. वाशीम येथील रहिवासी असलेल्या राहुल चव्हाण या क्रूर बापाने, प्रवासादरम्यान पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून संतापून आपल्याच दोन निष्पाप जुळ्या मुलींचा गळा कापून निर्घृण खून केला आहे. पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर रागाच्या भरात त्याने अंढेरा फाटा परिसरातील जंगलात हे अमानुष कृत्य केले. दोन लहान जीवांचा बळी घेतल्यानंतर, या नराधम बापाने स्वतः वाशीम पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 25, 2025 15:18:18
Bhandara, Maharashtra:*ऑन परिणय फुके 20% कमिशन आरोप* भंडारा नगरपरिषदेवर यांच्याच पक्षाचे खासदार नगराध्यक्ष म्हणून होते... त्यानंतर तिथं प्रशासक राज असताना शिवसेनेचे आमदार आहेत. कोण कमिशन खातोय कोणाला वाटा भेटत नाही...?? त्याची जंत्री (कागदपत्र) आम्ही काढून ठेवली आहे... भ्रष्टाचारामध्ये लुप्त असलेले हे महायुती सरकार आहे... महाराष्ट्राच्या जनतेची लूट कशी करायची याच्यावर यांचं काम चाललं आहे.. *ऑन चंद्रशेखर बावनकुळे..* चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाल्यानंतर त्यांना सिंग फुटली असतील तर मला माहित नाही... सरदार वल्लभभाई पटेल यांनी देखील आरएसएस वर बंदी घातली पाहिजे असं म्हटलं होतं.... तर मग हे सरदार वल्लभाई पटेल यांना देसद्रोही जाहीर करणार आहेत का...? उचलली जीभ लावली टाळ्याला असं काही बोललं तर चालणार नाही... कायदा सगळ्यांसाठी असतो आणि कायद्याप्रमाणे सगळ्या संघटनांनी वागलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे... *ऑन महाविकास आघाडी...* जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने निवडणुका लढू.... स्थानिक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विश्वासात घेऊनच युतीचा निर्णय घेतला जाईल... *ऑन अजित पवार कर्जमाफी आश्वासन..* निवडणुका आल्या की यांच्या जिभा पलटतात... या सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही... यांनी आपल्या जाहीरनामा स्पष्ट केलं होतं की आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा कर्ज माफ करू... तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करत आहात का... अदाणीला पैसा देताय त्याच्यामुळे यांच्या तिजोरीत पैसे नाहीत... शेतकऱ्यांची थट्टा करू नका कर्जमाफी द्यायची असेल तर द्या... शेतकऱ्यांनी अंधारात दिवाळी साजरी केली...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 25, 2025 14:19:16
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाने सुरू केले 73 वे सार्वजनिक वाचनालय, “एक गाव, एक वाचनालय” उपक्रमाअंतर्गत सुरू केले।वाचनालय, ग्रंथदिंडीत सहभागी झाले अतिदुर्गम भागातील विद्यार्थी आणि नागरिक अँकर:-- गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागात “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आलााय. या उपक्रमांतर्गत एटापल्ली तालुक्यातील  वांगेतुरी या अतिदुर्गम गावात 73 व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.  पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते वरिष्ठ अधिकारी व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मौजा वांगेतुरी येथे सर्व सुविधांनी सुसज्ज अशा सार्वजनिक वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ चे अधिकारी व अंमलदार तसेच वांगेतुरी परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने श्रमदानातून व लोकवर्गणीतून मौजा वांगेतुरी येथे सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. यानिमित्ताने  सार्वजनिक वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. गावातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीकांनी पारंपारिक वेशभूषा करून व पारंपारिक वाद्य वाजवून उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या वाचनालयामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी व नागरिकांना फायदा होत स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. 2023 पासून सुरु करण्यात आलेल्या एक गाव एक वाचनालय उपक्रमाच्या माध्यंमातून यापुर्वी स्थापन करण्यात आलेल्या 72 वाचनालयांचा लाभ अतिदुर्गम भागातील 8500 पेक्षा जास्त युवक-युवती व नागरिकांना होत असून या माध्यमातून एकूण 205 विद्यार्थी शासनाच्या विविध विभांगामध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 25, 2025 13:04:10
Beed, Maharashtra:बीड: डॉ.संपदा मुंडे व्यवस्थेचा बळी, दोषींवर कठोरात-कठोर कारवाई करावी- प्रा.मिलींद आव्हाड यांची मागणी..! Anc- रोहित वेमुल्ला, डॉ. पायल तडवी आणि आता बीडच्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची कारणं वेगळी असली, तरी या तिन्ही घटना व्यवस्थेच्या अन्यायकारक आणि असंवेदनशील रचनेचं द्योतक असल्याचं मत विचारवंत प्रा. मिलिंद आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. डॉ. मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रा. आव्हाड म्हणाले की, “या सर्व विद्यार्थी व्यवस्थेचे बळी आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मानसिक छळ आणि जातीय भेदभाव अजूनही सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. बाईट: प्रा. मिलिंद आव्हाड, ज्येष्ठ विचारवंत
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 25, 2025 12:48:34
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील कास तलावात नगर पालिकेच्या वतीने नव्याने नौकाविहार सुरु करण्यात आला आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नौकाविहार चा शुभारंभ करण्यात आला .यावेळी मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते.कास पठार आणि कास तलाव या भागात पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात मात्र कास तलाव भागात नौकाविहार सुरु नव्हते मात्र आता ते सुरू झाल्याने पर्यटकांना साताऱ्याच्या जवळच नौकाविहार चा आनंद घेता येणार आहे.नौकाविहार सोबत झिप लाईन , पॅरासिंग अशा वेगवेगळ्या साहसी खेळ देखील कास भागात सुरू केले जाणार आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यात पर्यटनाला अजून वाव मिळणार आहे.
3
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 25, 2025 12:42:39
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 25, 2025 12:39:58
Baramati, Maharashtra:दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा.....मतदार यादीतील नावे पूर्वसूचना न देता दुसरा प्रभागात टाकल्यावरून वीरधवल जगदाळे,वैशाली नागवडेंनी मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब..... मतदार यादीतील नावे कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात का टाकली याचा जाब त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारला आहे. या मतदार यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन याचा जाब विचारला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मतदार यादीतील नावे दुसऱ्या प्रभागात टाकल्यामुळे याचा जाब या कार्यकर्त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांना विचारला आहे.
2
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 25, 2025 11:53:23
Beed, Maharashtra:बीड ब्रेकिंग पीडित डॉक्टरच्या वडिलांचा धक्कादायक दावा.. मुलीला भेटायला गेल्यावर धष्टपुष्ट व्यक्ती भेटला तो कोण..! तुम्ही मॅडमच्या वडील का? काही लागलं तर मला सांगा. दुर्योधन, दूशासन झाले पण एकही इथे कृष्ण होऊन पावला नाही.. मुलीच्या वडिलांचा संताप.. Ac - पीडित महिला डॉक्टरच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे.. मी भेटायला गेलो त्यावेळी माझ्या अनोळखी असलेला धुष्टपुष्ट माणूस भेटला.. तुम्ही मॅडमच्या वडील का? काही लागलं तर मला सांगा. असे मला विचारले होते तेवढ्यात माझ्या मुलीने बघितल. माझ्या हाताला धरून घेतलं बाजूला घेतलं. आणि कोणालाही असं बोलत जाऊ नका असं मुलीने सांगितलं होतं असं पिढी त्याच्या वडिलांनी सांगितलं.. त्यामुळे पीडितेच्या वडिलांना भेटणारा आणि काही लागलं तर सांगा म्हणणारा तो धृष्टपुष्ट व्यक्ती कोण प्रश्न उपस्थित होत आहे. पीडितेचे वडील काय म्हणालेत पाहूया.. बाईट- पीडीतेचे वडील पुँ.. पुढे बोलताना.. @ दिवाळीला मला सुट्या नाहीत म्हणाली.. नंतर येते म्हणाली..मी एकदा तिच्याकडे भेटायला गेलो होतो जेवण करायला घरी नको आपले बांधून त्यांची माणसं नको म्हणले. माझ्या तर्फे जेवू घालते म्हणाले.. @त्या ठिकाणी माझ्या अनोळखी असलेला धष्टपुष्ट माणूस होता सर तुम्ही मॅडमच्या वडील का म्हटलं हो मग काही लागलं तर मला सांगा.. माझ्या मनात काही नव्हतं तेवढ्यात माझ्या मुलीने बघितल.. माझ्या हाताला धरून घेतलं बाजूला घेतलं..त्यावेळी माझ्या मुलीने मला सांगितलं होतं कोणालाही असं बोलत जाऊ नका.. लोक माझ्यावर दबाव आणायला बघत आहे त्याच्यामुळे बोलत जाऊ नका त्यामुळे मी बोललो नाही.. @ आमचं मागणं एकच आहे जे गुन्हेगार आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे दुसरं काही मागणं नाही.. @ माझ्या मुलीच्या बाबतीत घडला आहे.. इथून पुढे कुठलाही मुलीवर अत्याचार झाला नाहीपाहिजे यासाठीच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.. @इथून पुढे असं दुष्कृत्य करणाऱ्यांना भीती वाटली पाहिजे त्यामुळे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.. ही माजी मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे.. *मुख्यमंत्र्याकडे कळकळीची विनंती आहे माझ्या मुलीवर जो अन्याय झाला आहे हे सगळी लोक निस्ती बघायची भूमिका घेतली दुर्योधन, दूशासन झाले पण एकही इथे कृष्ण होऊन पावला नाही.. इथून पुढे एकदा तरी कृष्ण व्हावा आणि अत्याचार थांबवावा.*
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 25, 2025 11:46:57
Akola, Maharashtra:बेपत्ता अक्षय नागलकर प्रकरणातील रहस्य अखेर उघड झाले आहे. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला अक्षय नागलकरला त्याच्याच आठ मित्रांनी निर्दयपणे जाळून ठार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा तपशील: अक्षय नागलकर २२ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस यंत्रणा गेल्या तीन दिवसांपासून त्याचा शोध घेत होती. दरम्यान, काल रात्री अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे परिसरात अक्षयला मारून जाळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. या घटनेमुळे अकोला शहरात मोठा संताप उफानला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी अक्षयला एका धाब्यावर जेवणासाठी बोलावलं आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. त्यानंतर आरोपींनी अक्षयचा मृतदेह शेतशिवारातील एका टीनच्या खोलीत नेऊन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने जाळून टाकला. इतकंच नव्हे तर आरोपी मृतदेहाची राख पूर्णतः नष्ट होईपर्यंत तिथेच थांबले आणि नंतर ती राख गायब करून संपूर्ण टीनची खोली रंगवून टाकली. या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे. या भीषण घटनेमुळे अकोला शहर हादरून गेलं आहे. रहस्यमय आणि क्रूर अशा दोन्ही शब्दांचा प्रत्यय देणाऱ्या या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र या घटनेत सापडलेला मृतदेह अक्षयचाच आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह कायम आहे. अक्षयच्या कुटुंबीयांनी हा मृतदेह अक्षयचा नसल्याचं सांगितलं आहे तर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा कुटुंबीयांनी केली आहे. या भीषण हत्याकांडानंतर पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आरोपींचा हेतू, खुनामागचं कारण आणि मृतदेहाशी संबंधित सत्य हे सर्व उघड करण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 25, 2025 11:38:59
Shirdi, Maharashtra:संगमनेरमें आमदार अमोल खताळ यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन... बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यानंतर खताळ यांनी पहिल्यांदाच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन... जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम... आमदार खताळ यांनी विखेंना जिलेदारी भरवत केली दिवाळी साजरी... संगमनेरमध्ये विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही परिवर्तन बघायला मिळणार... विखे पाटलांचे वक्तव्य... मंत्री विखे पाटील बाईट मुद्दे - ऑन महिला डॉक्टर आत्महत्या - घटना che निषेध... ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तेच आरोपी होताय... मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले... पोलिस अधिकारीाला निलंबित करण्यात आले... राज्य सरकारने या घटनेला अतिशय गांभीर्याने घेतले आहे... आरोपींवर कारवाई होणारच... ज्या अधिकारींच्या हलगर्जीपणामुळे या भगिनीचा जीव गेला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे... ऑन गडकरी जुने कार्यकर्ते विधान - नितीन गडकरी जेष्ठ नेते, मात्र त्यांच्या मताशी मी सहमत नाही... जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलाय... नव्या जुन्याच्या समन्वयानेच भाजपला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळाले... नव्या जुन्याचा मेळ घालूनच राज्यात पक्षाचा विस्तार होतोय... ऑन मुंबई भाजप 150 पार - महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय... मुंबई महापालिकेत भाजपची ताकद आहेच... जो अनेक वर्षे मित्रपक्ष होता त्याने पाठीत खंजीर खुपसला... त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ... विखे पाटलांची ठाकरेंवर टीका... ऑन संजय ठाकरेंचा महापौर वक्तव्य - संजय राऊतांना कोंबड्यासारखी बाग देण्याचे काम दिलंय... सकाळ झाली की बाग देतात... ऑन अहिल्यानगर ऑपरेशन लोटस? - पक्षाची क्षमता वाढवू शकणाऱ्या लोकांना सोबत घेण्याचे धोरण... त्या दृष्टीने पक्षाच्या विस्ताराची कारवाई सुरू... ऑन शरद पवार गट भांगरे कुटुुंबीय भेट - सुनीता भांगरे यांची आणि माझी चर्चा झाली आहे... भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या समोरच चर्चा झाली... लवकरच निर्णय होईल... ऑन सोनई मातंग तरुण हल्ला - या प्रकरणी IG आणि SP दोघांशीही एकत्रित चर्चा झाली आहे... मानवतेला काळिमा फासणारी घटना... आरोपींना राजकीय संरक्षण मिळणार नाही... कारवाई होणारच... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया... ऑन RSS कार्यकर्त्यांवर आरोप - संघाच्या कार्यकर्त्यांचा घटनेशी संबंध नाही... संघाचे नाव घेऊन कुणी स्वतःचा बचाव करू पहात असेल तर शक्य होणार नाही... संघ किंवा महायुती अशा घटना पुरस्कृत करत नाही.. ऑन हल्लेखोर आणि पिडीत पूर्वीचे गंभीर गुन्हे - पोलिस चौकशी करताय... जिल्हा पोलिस अधिक्षक दोन तीन दिवसात अहवाल सादर करतील... मात्र पार्श्वभूमी काय हे महत्त्वाचं नाही... कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत... ऑन संगमनेर आगामी निवडणुका रणनीती - विधानसभेत परिवर्तन झालं हे महायुतीचे सर्वात मोठे यश... आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विधानसभेप्रमाणेच परिवर्तन बघायला मिळाले... संगमनेरमध्ये अनेकजण भाजपमध्ये येण्यास इच्छुक... मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत नाव जाहीर करणे उचित नाही... ऑन ठाकरे मुंबई मोर्चा - आंध्र आणि कर्नाटकात विरोधकांचे सरकार.. तिथे मतचोरीचा आरोप होत नाही... राज्याच्या जनतेने तुम्हाला नाकारलं.. पराभव मान्य करा... प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार... मात्र जनता त्यांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाही...
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top