Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड़ में डॉ. संपदा मुंडे आत्महत्या: दोषियों पर कठोर कार्रवाई की मांग

MMMahendrakumar Mudholkar
Oct 25, 2025 13:04:10
Beed, Maharashtra
बीड: डॉ.संपदा मुंडे व्यवस्थेचा बळी, दोषींवर कठोरात-कठोर कारवाई करावी- प्रा.मिलींद आव्हाड यांची मागणी..! Anc- रोहित वेमुल्ला, डॉ. पायल तडवी आणि आता बीडच्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची कारणं वेगळी असली, तरी या तिन्ही घटना व्यवस्थेच्या अन्यायकारक आणि असंवेदनशील रचनेचं द्योतक असल्याचं मत विचारवंत प्रा. मिलिंद आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. डॉ. मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रा. आव्हाड म्हणाले की, “या सर्व विद्यार्थी व्यवस्थेचे बळी आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मानसिक छळ आणि जातीय भेदभाव अजूनही सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. बाईट: प्रा. मिलिंद आव्हाड, ज्येष्ठ विचारवंत
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Oct 25, 2025 17:45:18
Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग :पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेला बोर्ड शिवसैनिकांनी उखडून फेकत बोर्डला फासले काळे पीआरकार्ड सर्व्हेक्षण शुभारंभ कार्यक्रमाच्या बोर्डवरून भाजप शिवसेनेत जुंपली पीआरकार्ड सर्व्हेक्षण शुभारंभाच्या बोर्डवरून आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव वगळण्यात आल्यानं शिवसैनिकांनी बोर्ड उखडून फेकत बोर्डला फासले काळे आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला पीआरकार्ड सर्व्हेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अँकर : जालन्यात आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पीआर कार्ड सर्व्हेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाचा एक बोर्ड देखील लावण्यात आला.मात्र जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव या बोर्डवरून वगळण्यात आलं.त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेला बोर्ड उखडून फेकला असून या बोर्डला काळं फासल आहे.त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बाईट : अंबादास चित्तेकर,शिवसैनिक,चंदनझीरा ,जालना
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 25, 2025 17:03:07
Shirdi, Maharashtra:सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी , थेट महिला , पुरुष ग्राहकाला मारहाण ; मारहाणीचा व्हिडिओ समोर... शिर्डीनजीक सावळीविहीर बुद्रुक येथील आर जे पेट्रोल अँड सीएनजी पंपावर ग्राहकांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर... साईदर्शनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या नमिता घरद यांच्यासह पत्नीला पंप मालकासह कर्मचाऱ्यांनी केली मारहाण.. तासंतास रांगेत उभे राहून बाकीच्या लोकांना दिला जात होता सीएनजी... कर्मचारी आणि ग्राहकाचे बाचाबाचीचे रूपांतर थेट मारहाणीत... घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल... शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल... कलम 115, 352, 351 अंतर्गत आर जे पेट्रोलियमच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल....
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 25, 2025 17:02:49
Pandharpur, Maharashtra:Solapur जिल्ह्यातील ऑपरेशन लोटस थांबणार नाहीच. लवकरच जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचे प्रवेश भाजपमध्ये झालेले दिसतील. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर जिल्ह्यातील भाजप इनकमिंग मिशन सुरूच राहणार. ग्रामविकास मंत्रीांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या तीन माजी आमदार आणि काँग्रेसच्या एका माजी आमदाराचा प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे या सोबतच सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील दिग्गज नेते येत्या काही दिवसात भाजपमध्ये आलेले दिसतील ऑपरेशन लोटस अजिबात थांबणार नाही असा पुनर्विचार मंत्री गोरे यांनी केला आहे. 29 ऑक्टोबर रोजी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होईल असेही गोरे यांनी अनौपचारिकपणे सांगितले
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 25, 2025 16:53:27
Thane, Maharashtra:शहापूर, कल्याण व भिवंडी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी.. जनजीवन विस्कळित... शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाच नुकसान होण्याची भीती... संध्याकाळी सहा वाजल्यापासून परतीच्या पावसाने शहापूर, कल्याण व भिवंडीतील ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक भागात जोरदार वादळी वारा व विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतीत कापूस ठेवलेले भात पिक वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. संध्याकाळच्या सुमारास जोरदार विजांच्या गडगडाट व वादळी वाऱ्यांसह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. संध्याकाळी आलेल्या पावसाने काही प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेती पिकं मात्र पाण्याखाली गेली आहेत. अजून ही पावसाची रिपरिप व विजांचा कडकडाट सुरूच आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Oct 25, 2025 16:23:24
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. वाशीम येथील रहिवासी असलेल्या राहुल चव्हाण या क्रूर बापाने, प्रवासादरम्यान पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून संतापून आपल्याच दोन निष्पाप जुळ्या मुलींचा गळा कापून निर्घृण खून केला आहे. पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर रागाच्या भरात त्याने अंढेरा फाटा परिसरातील जंगलात हे अमानुष कृत्य केले. दोन लहान जीवांचा बळी घेतल्यानंतर, या नराधम बापाने स्वतः वाशीम पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 25, 2025 15:18:18
Bhandara, Maharashtra:*ऑन परिणय फुके 20% कमिशन आरोप* भंडारा नगरपरिषदेवर यांच्याच पक्षाचे खासदार नगराध्यक्ष म्हणून होते... त्यानंतर तिथं प्रशासक राज असताना शिवसेनेचे आमदार आहेत. कोण कमिशन खातोय कोणाला वाटा भेटत नाही...?? त्याची जंत्री (कागदपत्र) आम्ही काढून ठेवली आहे... भ्रष्टाचारामध्ये लुप्त असलेले हे महायुती सरकार आहे... महाराष्ट्राच्या जनतेची लूट कशी करायची याच्यावर यांचं काम चाललं आहे.. *ऑन चंद्रशेखर बावनकुळे..* चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाल्यानंतर त्यांना सिंग फुटली असतील तर मला माहित नाही... सरदार वल्लभभाई पटेल यांनी देखील आरएसएस वर बंदी घातली पाहिजे असं म्हटलं होतं.... तर मग हे सरदार वल्लभाई पटेल यांना देसद्रोही जाहीर करणार आहेत का...? उचलली जीभ लावली टाळ्याला असं काही बोललं तर चालणार नाही... कायदा सगळ्यांसाठी असतो आणि कायद्याप्रमाणे सगळ्या संघटनांनी वागलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे... *ऑन महाविकास आघाडी...* जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने निवडणुका लढू.... स्थानिक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विश्वासात घेऊनच युतीचा निर्णय घेतला जाईल... *ऑन अजित पवार कर्जमाफी आश्वासन..* निवडणुका आल्या की यांच्या जिभा पलटतात... या सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही... यांनी आपल्या जाहीरनामा स्पष्ट केलं होतं की आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा कर्ज माफ करू... तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करत आहात का... अदाणीला पैसा देताय त्याच्यामुळे यांच्या तिजोरीत पैसे नाहीत... शेतकऱ्यांची थट्टा करू नका कर्जमाफी द्यायची असेल तर द्या... शेतकऱ्यांनी अंधारात दिवाळी साजरी केली...
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 25, 2025 14:19:16
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली पोलीस दलाने सुरू केले 73 वे सार्वजनिक वाचनालय, “एक गाव, एक वाचनालय” उपक्रमाअंतर्गत सुरू केले।वाचनालय, ग्रंथदिंडीत सहभागी झाले अतिदुर्गम भागातील विद्यार्थी आणि नागरिक अँकर:-- गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागात “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आलााय. या उपक्रमांतर्गत एटापल्ली तालुक्यातील  वांगेतुरी या अतिदुर्गम गावात 73 व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.  पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते वरिष्ठ अधिकारी व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मौजा वांगेतुरी येथे सर्व सुविधांनी सुसज्ज अशा सार्वजनिक वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ चे अधिकारी व अंमलदार तसेच वांगेतुरी परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने श्रमदानातून व लोकवर्गणीतून मौजा वांगेतुरी येथे सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. यानिमित्ताने  सार्वजनिक वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. गावातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीकांनी पारंपारिक वेशभूषा करून व पारंपारिक वाद्य वाजवून उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या वाचनालयामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी व नागरिकांना फायदा होत स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. 2023 पासून सुरु करण्यात आलेल्या एक गाव एक वाचनालय उपक्रमाच्या माध्यंमातून यापुर्वी स्थापन करण्यात आलेल्या 72 वाचनालयांचा लाभ अतिदुर्गम भागातील 8500 पेक्षा जास्त युवक-युवती व नागरिकांना होत असून या माध्यमातून एकूण 205 विद्यार्थी शासनाच्या विविध विभांगामध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 25, 2025 12:48:34
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील कास तलावात नगर पालिकेच्या वतीने नव्याने नौकाविहार सुरु करण्यात आला आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नौकाविहार चा शुभारंभ करण्यात आला .यावेळी मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते.कास पठार आणि कास तलाव या भागात पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात मात्र कास तलाव भागात नौकाविहार सुरु नव्हते मात्र आता ते सुरू झाल्याने पर्यटकांना साताऱ्याच्या जवळच नौकाविहार चा आनंद घेता येणार आहे.नौकाविहार सोबत झिप लाईन , पॅरासिंग अशा वेगवेगळ्या साहसी खेळ देखील कास भागात सुरू केले जाणार आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यात पर्यटनाला अजून वाव मिळणार आहे.
3
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 25, 2025 12:42:39
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 25, 2025 12:39:58
Baramati, Maharashtra:दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा.....मतदार यादीतील नावे पूर्वसूचना न देता दुसरा प्रभागात टाकल्यावरून वीरधवल जगदाळे,वैशाली नागवडेंनी मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब..... मतदार यादीतील नावे कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात का टाकली याचा जाब त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारला आहे. या मतदार यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन याचा जाब विचारला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मतदार यादीतील नावे दुसऱ्या प्रभागात टाकल्यामुळे याचा जाब या कार्यकर्त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांना विचारला आहे.
2
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top