Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

महाड में शिवसेना-राष्ट्रवादी के कार्यकर्ताओं के बीच भिड़ंत, FIR दर्ज

PPPRAFULLA PAWAR
Dec 03, 2025 04:31:01
Chendhare, Alibag, Maharashtra
शिवसेना नेते विकास गोगावले यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल महाड पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांची तक्रार अंगरक्षकाकडील रिव्हॉल्वर खेचून पळवून नेले अशीही तक्रार मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी गेलो असता मारहाण केल्याची, गाड्या फोडल्याची तक्रार मंगळवारी महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या पुत्र विकास गोगावले यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादी कार्यकर्ते सुशांत जाबरे यांनी महाड तालुका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी गेलो असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्या फोडल्या, सोबतच्या व्यक्तींना मारहाण केली, अंगरक्षकाकडील रिव्हॉल्वर हिसकावुन घेतली आणि सोन्याची चेन, मोबाईल लंपास केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये जाबरे यांच्या सोबतच्या पाच जणांना गंभिर दुखापत झाल्याचे देखील तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालूसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालूसरे, वैभव मालूसरे, सुरज मालूसरे, सिद्धेश शेठ आणि इतर अनोळखी आठ ते दहा जणांविरोधाता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा हा गुन्हा महाड तालुका पोलिस ठाण्यात दाखल करून तपासा करिता महाड शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणासही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Dec 16, 2025 02:48:18
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 02:34:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर आधारित आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयाने नुकतीच ऑक्टोबर २०२५ ची राज्यस्तरीय रँकिंग जाहीर केली असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा पिछाडीवर गेला आहे. दरम्यान, आपल्याकडे आरोग्य कार्यक्रमांच्या दैनंदिन नोंदी करणारी यंत्रणा अपुरी असल्यामुळे आपण या महिन्याच्या रॅकिंगमध्ये मागे पडलो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले. राज्यात आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम, अभियान आणि आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये माता बाल आरोग्य, कुटुंब नियोजन किशोरवयीन मुलींचे आरोग्य, विविध लसीकरण, आरसीएच ऑनलाइन पोर्टल नोंदनी इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवले जाते...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 16, 2025 02:33:29
Dhule, Maharashtra:महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर धुळे शहरात राजकीय भूकंप झाला आहे. भाजपाने शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का देत, धुळ्यात माजी महापौर कल्पना महाले यांचा भाजप प्रवेश करून घेतला आहे. पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पना महाले यांचा प्रवेश झाला असून, कल्पना महाले यांच्या समवेत शिवसेनेच्या माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे यांचा देखील प्रवेश केला. महालेन समवेत अनेक कार्यकर्त्याचा देखील भाजपावासी झाले आहेत. महाले कुटुंब हा शरद पवार गटाची मुख्य ओळख होत, हमखास जिंकणार कुटुंब असा लौकिक असलेला महाले परिवार आता शरद पवार गातून बाहेर पडल्याने पक्षाला पालिका निवणुकीत अधिक संघर्ष करावा लागणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 02:33:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महापालिका निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे शिंदेसेना व भाजपा यांच्यात युती व्हावी यादृष्टीने पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपाचे नेते अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्याकडे सोमवारी प्रस्ताव सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी किंवा बुधवारी यासंदर्भात प्राथमिक बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. महापालिका निवडणुकासाठी तारखांची घोषणा होताच सर्व राजकीय पक्षांनी पुढील रणनीती ठरविण्यास सुरुवात केली. काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा वाढविणे सुरू केले. त्याचप्रमाणे उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्यातही बोलणी सुरू आहे. सोमवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपाचे नेते अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना युतीसंदर्भात प्रस्ताव पाठविला. मंगळवारी किंवा बुधवारी युतीची बैठकही होण्याची शक्यता असल्याचे कळतंय, दोन्ही पक्षांनी कोणत्या प्रभागात आपले उमेदवार सक्षम आहेत, याची यादीही तयार केल्याचे कळतेय, याबाबत बैठकीत तोडगा निघेल...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 02:17:23
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 16, 2025 02:16:48
Chendhare, Alibag, Maharashtra:अँकर - महाडच्या युथ क्लब या संस्थेने 28 डिसेंबर रोजी किल्ले रायगड प्रदक्षिणेचे आयोजन केले आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे पाचाड पासून या प्रदक्षिणेला प्रारंभ होणार असून चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, टकमक टोकाच्या खालच्या बाजुकडून भवानी टोकाची दरी मार्गे वाघोली खिंडीतुन हिरकणी वाडी अशी हि प्रदक्षिणा असणार आहे. 14 ते 15 किलो मिटर अंतराच्या या प्रदक्षिणे दरम्यान पर्यटक, शिवप्रेमी आणि ट्रेकर्सना किल्ले रायगडाच्या दरी खोऱ्यात लपलेली निसर्ग संपन्नता आणि रायगडाचं वेगळं रूप पाहण्याची संधी मिळणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन युथ क्लब संस्थे तर्फे करण्यात आले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 02:16:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून शिंदेच्या शिवसेनेचे आजी माजी आमदारात रस्सीखेच.. संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेत गुलमंडी वॉर्डातील उमेदवारीवरून आजी-माजी आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी आपल्या मुलासाठी गुलमंडी वॉर्डातून उमेदवारीची मागणी केली आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी,किशनचंद तनवाणी आणि मी गेल्या 40 वर्षांपासून मित्र आहोत. पक्ष जो निर्णय घेईल, तो आदेश आम्ही मान्य करू,असे दोन नेत्यांनी स्पष्ट केले. माझा भाऊ गुलमंडी वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आला होता, तर माझा मुलगा कॉपमेंबर होता. त्यामुळे सहाजिकच या वॉर्डातील उमेदवारी माझ्या भावाला किंवा मुलाला मिळावी, असा माझा आग्रह आहे. मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. असे तनवाणी म्हणाले... दरम्यान, या वादावर पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देत हा मुद्दा फारसा गंभीर नसल्याचे स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असे किरकोळ वाद होत असतात. पक्षाचा जो आदेश असेल, तो सर्वांना मान्य असेल. अस शिरसाठ म्हणाले. बाईट : आ. प्रदीप जैस्वाल. बाईट : किशनचंद तनवाणी, माजी आमदार.. बाईट : संजय शिरसाठ, पालकमंत्री.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 02:16:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इम्तियाज जलील यांच्याकडे युतीसाठी काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस गेली असेल त्यांच्यातले काही लोक त्याला जवळ करतात मात्र त्यांनी स्वतःची ताकद ओळखावी असा घरचा आहेर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे, सोबतच या शहरात आमच्या पक्षाची ताकद आहे किमान 65 ते 70 जागा आम्ही लढणार महायुतीचे जागावाटप लवकरच होईल असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे, जनता गद्दारांच्या सोबत जाणार नाही जनतेला आता सगळं कळलं आहे त्यामुळे आम्हाला पाठिंबा मिळेल, शिरसाठ आता कुठलेच राहणार नाही आणि महापौर शिवसेनेचा संभाजी नगरात होईल असं खैरे यांचे म्हणणं आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 16, 2025 02:15:22
0
comment0
Report
Advertisement
Back to top