Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में 32 ग्रामपंचायत अधिकारी के खिलाफ खातेचौकशी जारी, वेतन रोक समेत कार्रवाई

GMGANESH MOHALE
Mar 17, 2026 05:17:02
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यात आर्थिक अपहार, कर्तव्यात कसूर, मुख्यालयी अनुपस्थिती आणि कामकाजातील अनियमितता यांसारख्या तक्रारींवरून चालू २०२५-२६ आर्थिक वर्षात ३२ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर खातेचौकशी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून थेट निधी मिळतो.मात्र निधी अपहार व अन्य अनियमिततेच्या तक्रारींमुळे आयुक्त व जिल्हा परिषद स्तरावर चौकशी केली जात आहे.आयुक्त स्तरावर २२ अहवाल प्राप्त झाले असून,त्यापैकी ३ अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे, तर १९ प्रकरणांवर पुढील कारवाई प्रस्तावित आहे.या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला असून प्रशासनाने गैरप्रकारांना कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचा संदेश दिला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Mar 17, 2026 06:20:46
Bhandara, Maharashtra:आखाती युद्धाचा परिणाम अब भंडारा जिल्ह्यातील छोट्या व्यवसायांवरही दिसून येत आहे. भंडाऱ्याच्या वरठी येथे रेल्वे स्थानक परिसरातील चहा विक्रेत्यांना गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू लागल्याने त्यांनी पर्याय म्हणून इंडक्शनचा वापर सुरू केला आहे. दिवसभर चहाच्या विक्रीवरच उदरनिर्वाह अवलंबून असल्याने दुकान बंद ठेवणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे सिलेंडर संपल्यानंतरही ग्राहकांची सेवा खंडित होऊ नये म्हणून इंडक्शनवर चहा बनवून ते आपला रोजचा गाडा पुढे नेत आहेत. बदलत्या परिस्थितीतही व्यवसाय टिकवण्यासाठी स्थानिक चहा विक्रेते नव्या पर्यायांचा अवलंब करत असल्याचे चित्र सध्या वरठी येथे पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 17, 2026 06:00:41
825
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 05:15:18
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. वढू बुद्रुक येथे जमीनाच्या वादातून सावत्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांकडून आई ला जबर मारहाण केल्याची घटना घडलीय, सावत्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये जमीन वाटपावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी वृद्ध आईला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आई गंभीर जखमी झाली असल्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नात्यांना काळीमा फासणारी ही घटना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केलाय.
1000
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 17, 2026 05:07:22
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरात केंद्र व राज्य सरकारच्या अमृत पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये या योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात उतरून शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगन्लावार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. सन २०१९ पर्यंत अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र या योजनेचा खेळ खंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून अनेक अपघात देखील घडत आहेत. लाखो लिटर पाण्याचा देखील अपव्यय होत आहे. पाच ते सहा दिवसात लोकांना पाणी मिळत आहे. जीवन प्राधिकरणाने या समस्यांकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय उपगन्लावार यांनी दिला आहे.
995
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 17, 2026 04:48:58
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅसचा अवैध वापर करणाऱ्यांविरोधात पुरवठा विभागाने कारवाईची मोहीम सुरू आहे. पुरवठा विभागाने मालेगाव शहरातील हॉटेल्सवर धाड टाकून तपासणी केली.मालेगाव शहरात पुरवठा विभागाच्या वतीने एकूण १४ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.या तपासणीदरम्यान दोन हॉटेल्समध्ये घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले.त्यामुळे संबंधित हॉटेल्समधून दोन घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.ही कारवाई मालेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या पथकाने केली असून,अशा प्रकारचा अवैध वापर करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
1013
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 17, 2026 04:46:44
1088
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 17, 2026 04:36:18
Navi Mumbai, Maharashtra:थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ‘अभय योजना’ जाहीर करून नागरिकांना कर भरण्याची संधी दिलेय. मात्र तरी काही मालमत्ताधारकांकडून अजूनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करण्यात येतेय. नवी मुंबई मनपाने थकीत कर वसुलीसाठी आता अटकावणीची मोहीम तीव्र केली असून या मोहिमे अंतर्गत नवी मुंबई मनपा क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर धारकांच्या एकूण 130 मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आलेय. सर्व थकीत मालमत्ता धारकांनी ‘अभय योजना’चा लाभ घेऊन लवकरात लवकर कर भरावा, अन्यथा अशाच प्रकारे अटकावणीची कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आलाय.
1078
comment0
Report
Advertisement
Back to top