Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ नगर परिषद: अशोक उईके की बेटी प्रियदर्शिनी उईके नगराध्यक्ष पद के लिए दावेदार

SRSHRIKANT RAUT
Nov 15, 2025 13:17:03
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाकडून राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या एडवोकेट प्रियदर्शनी उईके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रियदर्शनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात समुपदेशी आहेत. नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भाजप नेते मदन येरावार ठरवतील असे सांगून मंत्री उईके यांनी प्रियदर्शनीच्या उमेदवारीचा चेंडू मदन येरावार यांच्या कोर्टात ढकलला होता, दरम्यान वरिष्ठ पातळीवरून आलेल्या सूचनानंतर प्रियदर्शनी उईके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीसाठी महायुती झाली नसल्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आघाडीकडून उमेदवार दिल्या जातो का याकडे लक्ष लागले आहे. बाईट : प्रियदर्शनी उईके : उमेदवार भाजपा
134
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Nov 15, 2025 15:00:31
Jalna, Maharashtra:जालना: विविध मागण्यांसाठी एका शेतकऱ्याचं स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केलं. नायबराव गोंडगे असे या शेतकऱ्याचं नाव आहे, वय 50 वर्ष. काही लोकांनी बेकायदेशीरपणे बनवलेल्या जमिनीचा 7/12 रद्द करून शेतजमीन गोंडगे यांच्या नावावर देण्याची मागणी केली. शेतकरी नायबराव गोंडगे हे आपल्या कुटुंबासह मंठा तालुक्यातील गेवराई येथे राहतात. त्यांची वडिलोपार्जित शेजमीन सर्वे नंबर 18, गट नंबर 61, 62 आणि 63 मध्ये आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन काही लोकांनी या जमिनीचा भाग बेकायदेशीरपणे (डुप्लिकेट नोंदणी करून) सर्वे नंबर 14, 15, 19 आणि 40 या नावाने इतरांच्या नावे नोंदवून शेतजमीन हडप केल्याचा आरोप केला. “आमच्या कुटुंबातील कुणीही जमीन विकलेली नाही; तरीही काही लोकांनी बेकायदेशीरपणे ती त्यांच्या नावे करून घेतली,” असे शेतकरी गोंडगे यांनी सांगितले. त्यामुळे स्वतःची जमीन परत मिळावी, या मागणीसाठी त्यांनी चक्क स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केलंय. मागणीच्या निवेदनाप्रत उत्तर मिळत नसल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 15, 2025 14:50:41
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यातील निकुंबे गावातील विवाहिता गायत्री पाटील यांच्यासह दोन चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीत मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27 वर्षे) यांनी आपल्या मुलगा दुर्गेश (वय 6 वर्षे) आणि मुलगी दुर्वा (वय 3 वर्षे) यांच्यासह गाव शिवारातील गोशाळेकडील विहिरीत उडी घेतली. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पण पोलीस यां प्रकारांची सखोल चौकशी करीत आहेत. विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी असल्याने घटनेची लगेच कोणालाही कल्पना आली नाही. तिघांचा शोध सुरू झाल्यावर जवळपास संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाल्यावर तपासाची दिशा स्पष्ट झाली. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 15, 2025 14:21:09
114
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 15, 2025 14:19:35
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला... महायुतीतील पक्षांना एकत्र घेऊन शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवणार असल्याचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या आधीच स्पष्ट केलं होतं... त्यानुसार आज महायुतीतील घटक पक्ष आणि यड्रावकर गटाने बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत संजय पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. जयसिंगपूर मध्ये महायुती विरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी देखील जोरदार मोर्चे बांधणी केली असून अभिमानी शेतकरी संघटनेला देखील सतेज पाटील यांनी सोबत घेतल्याने जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे..
151
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 15, 2025 14:01:16
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक लढण्यासाठी भाजपने सध्या मित्र पक्ष फोडा आणि प्रवेश द्या ही वेगळीच रणनीती राबवली आहे. भाजपा मजबूत होताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना खिळखिळे करण्याचा डाव भाजप खेळतं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच 12 नगरपालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक भाजप कमळ चिन्हावर लढणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली आहे नगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच आता जयकुमार गोरे यांनी करमाळ्यात शिवसेना एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. विधानसभा लढलेले उमेंदवार दिग्विजय बागल भाजपात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेतील अंतर्गत वादा मुळे करमाळा तालुक्यातील 55 शाखा प्रमुख आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामा दिले आहेत.
163
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 15, 2025 13:46:24
Oros, Maharashtra:अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपला रोखण्यासाठी अखेर शहर विकास आघाडीची स्थापना झाली असून शहरविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. एकीकडे शहरविकास आघाडीत भाजपा आणि शिंदे सेनेला न घेण्याचे निर्देश वरिष्ठानी दिलेले असताना देखील कणकवली शहर विकास आघाडित भाजपा शिवसेना ( शिंदे सेना ) राष्ट्रवादि आणि सर्वच राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे असे थेट आव्हानच संदेश पारकर यांनी केलेय. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे मी शहर विकास आघाडी करतोय ती महाराष्ट्रातील नवीन आघाडी नाही. कणकवली मधील भ्रस्ट टोळीला रोखण्यासाठी एकत्र यावं असं मी आवाहन केले असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितलेय.
141
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 15, 2025 13:01:58
Kolhapur, Maharashtra:Anc:- कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच कुरघोडी आणि शह–काटशहाचं राजकारण समोर येत आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर भाजपने गडहिंग्लज नगरपरिषदेत हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीला एकाकी पाडण्यासाठी व्यूहरचना भाजपने आखली आहे. चंदगड नगरपंचायतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र चंदगडमध्ये भाजपला एकाकी पाडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न चंदगडमधील या भूमिकेनंतर भाजप नाराज गडहिंग्लज नगरपरिषदेत जनता दल ,जनसुराज्य पक्ष आणि भाजप एकत्र गडहिंग्लज मध्ये हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीला एकाकी पाडण्याचा भाजपचा प्रयत्न VO 1 :- नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या निमित्ताने महायुतीतच शह–काटशहाची चढाओढ सुरू आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीत भाजपला एकाकी पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार गटाशी हातमिळवणी करून आघाडी केली. पण राष्ट्रवादीची ही भूमिका भाजपला रुचली नाही. याबात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर, आता गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे ‘उट्टे काढत’, जनता दल, आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. या एकत्रिकरणाचा उद्देश एकच गडहिंग्लजमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना रोखणं. मात्र भाजप नेते याबाबत सावध भूमिका मांडत आहेत. Byte:- धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार VO 2 :- गडहिंग्लज नगरपरिषद ही कागल विधानसभा मतदारसंघाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ही निवडणूक हसन मुश्रीफ यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे.अशातच युतीत असणाऱ्या भाजपने जनता दलासोबत हातमिळवणी करत राजकीय समीकरणे बदलली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 13 नगरपंचायती आहेत. आणि या पैकी बहुतांश ठिकाणी युती विरुद्ध युती असेच चित्र दिसत असले तरी महायुती मात्र अनेक ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरे जात असताना दिसत आहे. त्यामुळेच येत्या निवडणुका अत्यंत रोचक होण्याची चिन्हे आहेत.
188
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 15, 2025 12:36:01
Satara, Maharashtra:सातारा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महाबळेश्वर दौरेावर आले असताना त्यांनी शिवसेना पक्षप्रवेश कार्यकर्ता मेळाव्यात हजेरी लावली यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई हे देखील उपस्थित होते. भाजपचे नेते माजी आमदार मदनदादा भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या बरोबरीने महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार म्हणून.. लाडकी बहीण योजने विषयी भाष्य करत ही योजना कधीही बंद पडणार नाही असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला आहे... स्टेज बाईट: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
112
comment0
Report
Advertisement
Back to top