icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
410401
CRCHAITRALI RAJAPURKAR16 Nov 2025, 01:46 pm

लोणावळा में ड्राइवर पर हमला VIDEO वायरल; गाड़ी तोड़ी गई

Pune, Maharashtra:लोणावळ्यातील मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथून प्रवासी भाडे घेऊन आलेल्या एका कारचालकाला स्थानिक वाहनचालकांनी मारहाण करत त्याची गाडी दगडाने फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित कारचालक सांगतो की, तो फक्त नाश्ता करण्यासाठी थांबला होता; मात्र त्याचे काहीही ऐकून न घेता एका व्यक्तीने दादागिरी करत कार फोडली. मात्र स्थानिक लोणावळा-खंडाळा टॅक्सी संघटनेने त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. वाहन चालकाला मारहाण करणाऱ्या लोनावळा ग्रामीण पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलेला आहे. नाश्ता करण्यासाठी गेलेल्या एका वाहन चालकास रोहित रामकिसन गुप्ता याने बेदम मारहाण करत गाडीच्या काचे फोडून वाहनाचे नुकसान केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत तात्याराव सपकाळ या वाहन चालकाने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर वाद हा बाहेरचे टॅक्सी चालक व स्थानिक टॅक्सी चालक यातून झाला आहे. या प्रकारामुळे बाहेरून लोणावळ्यात प्रवासी घेऊन येणाऱ्या वाहन चालकांची सुरक्षा धोक्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ताडोबा-अंधारी अभयारण्य दिवाली की छुट्टियों में हाउसफुल, पर्यटन ने पकड़ी रफ्तार

Chandrapur, Chhattisgarh:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे हाउसफुल झालाय. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोर आणि बफर क्षेत्रातील सर्व गेटवरील सफारी गाड्यांची बुकिंग हाऊसफुल झाली आहे. दिवाळीच्या सलग सुट्ट्या, हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरण आणि अतिशय आधुनिक सोयी सुविधांमुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. गेल्या काही वर्षात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बुकिंग पासून ते सफारी पर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक बदल करण्यात आले आहेत आणि त्यामुळे देशभरातील पर्यटकांचा ओढा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे वाढलाय. त्यातही दिवाळीच्या सलग सुट्ट्या या पर्यटकांसाठी ताडोबाची टायगर सफारी अनुभवण्याची मोठी संधी ठरते आणि त्यामुळेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
0
0
Report

दिवाली पर घर लौटे जज की 11 केवी विद्युत धक्का से मौत, गांव शोक

Vasai-Virar, Maharashtra:दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू. दिवाळीची सुट्टी आनंदात गावी आलेल्या न्यायाधीशांवर काळाने घाला घातला आहे. शेतातील उसाच्या मळ्याला लागलेली आग पाहण्यासाठी गेलेल्या न्यायाधीशांचा 11 केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग गावावर शोककळा पसरली आहे. तुकाराम उर्फ अजित पतंगराव मोटे असं मृत न्यायाधीशांचं नाव असून, ते पालघर जिल्ह्यातील वसई येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायधीश म्हणून कार्यरत होते.
0
0
Report

नाशिक के कळवण में होलसेल गोदाम में भीषण आग, करोड़ों का माल जलकर खाक

Nashik, Maharashtra:नाशिकच्या कळवणमध्ये होलसेल किराणा मालाच्या गोदामाला भीषण आग आगीत साडेतीन कोटी रुपयांचा माल जळून खाक गोदामाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान स्थानिक नागरिकांनी पाण्याचे टँकर आणि बाल्टीच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळणे अवघड होते. आगीची माहिती मिळताच कळवण, देवळा आणि सटाणा येथील अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तीन बंबांच्या साह्याने 12 फेऱ्या करून जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझविली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या आगीत सुमारे ३ ते साडेतीन कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला तर गोडाऊनचेही मोठे नुकसान झाले आहे.
0
0
Report
Advertisement

लातूर में संपत्ति विवाद: पिता ने बेटे की हत्या, शव नाले में फेंका

Latur, Maharashtra:मालमत्तेत वाटेकरी नको म्हणून पोटच्या मुलाचा खून ... मालमत्तेत वाटेकरी नको म्हणून एका पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये समोर आलीय... विशेष म्हणजे, मुलाचा मृतदेह शेतातील नाल्यात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला... अरमान असं या चिमुकल्याचं नाव आहे... या प्रकरणी संशयित पिता युसूफ सय्यद याला पोलिसांनी परभणीतून अटक केलीय... मालमत्तेच्या वादातून एका निष्पाप बालकाचा जीव घेण्यापर्यंत बापाची मजल गेल्याने लातूर जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय...
0
0
Report

नांदेड में कपड़ा दुकान में भीषण आग, लाखों के नुकसान की आशंका

Nanded-Waghala, Maharashtra:काल दिवाली लक्ष्मीपुजनाचा उत्साह असताना नांदेड शहरातील कापड दुकानाला भीषण आग लागली. कौठा भागातील वसरनी रोडवर सचिन ड्रेसेस हे कापड दुकान आहे. रात्री अकराच्या सुमरास कापड दुकानाला अचानक आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले पण कापड दुकान असल्याने आग झपाट्याने वाढत गेली. कापड दुकानाला लागूनच दुकानाच्या मागे टिन शेडमध्ये गोडाऊन असल्याने ही आग गोडाऊन पर्यंत गेली. मोठी आग असल्याने कितीही पाणी मारले तरी आग विझत नव्हती. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे पकडे जळून राख झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
0
0
Report
Advertisement

कम बारिश से भूजल घटा, २४७ गांवों में पानी की किल्लत की आशंका; जल संचयन के उपाय तेज

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात कमी पावसामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली असून, ७९ पैकी ७७ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी सरासरी १.११ मीटरने खालावली आहे. त्यामुळे आगामी काळात २४७ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जल संधारणासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरणाच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना गाळ वाहतुकीसाठी प्रति घनमीटर ३५ रुपये ७५ पैसे अनुदान दिले जाणार आहे. एका एकरासाठी १५ हजार रुपये, तर कमाल अडीच एकर क्षेत्रासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. भूजल पातळी वाढवून भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाकडून या उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
0
0
Report

शिंदेसेने के नेता सिद्धाराम म्हेत्रे के बयान पर भाजपा ने दिया कड़ा जवाब

Solapur, Maharashtra:सोलापूर - शिंदेसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी मोदींबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजप देखील आक्रमक, भविष्यात नेत्याचा बाप काढण्याचा भाजपचा इशारा - आ. रोहित पवार हे अक्कलकोट मध्ये दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत असताना शिंदेसेनेचे नेते तथा माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केले होते वादग्रस्त विधान - शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही जनतेच्या टॅक्स च्या माध्यमातून मिळते, कोणी त्याच्या बापाच्या घरचे देत नाही असे म्हणत मोदींवर केली होती टीका - शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांना भाजप आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून चोख प्रतिउत्तर - यापुढे सिद्धाराम म्हेत्रे यांनी असे वक्तव्य केल्यास तुझा बाप, तुझ्या नेत्याचा, तुझ्या पिलावळ या सगळ्यांचा बाप काढण्याचा आ. सचिन कल्याणशेट्टी यांचा इशारा इशारा - शिंदेसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी आ. रोहित पवार यांच्या सभेला उपस्थिती लावत ही टीका केल्याने अनेक चर्चा उधाण - महायुती मधीलच मित्रपक्षाच्या महत्वाच्या नेत्याने मोदींबद्दल असे विधान केल्याने सर्वत्र नाराजीचा सूर बाईट - सिद्धाराम म्हेत्रे ( शिंदेसेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री ) बाईट - सचिन कल्याणशेट्टी ( भाजप, आमदार )
0
0
Report
Advertisement

जेजुरी गड़ पर सोमवती अमावस्या यात्रा, पालखी का कर्हा स्नान और आतिशबाजी

Rui, Maharashtra:जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्था यात्रा..... पहाटे पाच वाजता मंदिर गडकोटातून कऱ्हा स्नानासाठी पालखीचे प्रस्थान..... जेजुरी गडावर फटाक्यांची आतिषबाजी आणि मुक्त भंडार खोबऱ्याची उधळण.... सोमवती यंत्र निमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी...... दुपारी 12 पूर्वी उत्सव मूर्तिंना घातलं जाणार कऱ्हा स्नान..... अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा पार पडत आहे. सोमवती अमावस्या निमित्ताने जेजुरी गडावर पहाटे पाच वाजता श्री खंडोबा मंदिर गडकोटातून श्री खंडेरायाच्या पालखीचं कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी आणि भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. दुपारी बारा वाजण्यापूर्वी उत्सव मूर्तिंना कऱ्हा नदीपात्रात स्नान घातलं जाईल. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत पालखी सोहळा पुन्हा मंदिरात दाखल होईल. सोमवती अमावस्या निमित्त मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावर दाखल झालेत श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी कडून भाविकांच्या दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
0
0
Report

आहिल्यानगर में गन्ना मूल्य को लेकर किसानों ने 4000 रुपए प्रति टन की मांग का आंदोलAnnouncement शुरू

Shirdi, Maharashtra:Anc -सांगली आणि कोल्हापूरनंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यातही ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्हं आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 4 हजार रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शिंदे गटाचे शेतकरी नेते रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज बेमुदत रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून, साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी आंदोलकांची भूमिका आहे. त्यामुळे आज जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्द्यावरून शेतकरी विरुद्ध साखर कारखानदार असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. आता या आंदोलनाला प्रशासन आणि साखर कारखानदार काय प्रतिसाद देतात , हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report

विरार वेस्ट के HDIL सोसाइटी में भीषण आग, दमकल ने नियंत्रण पाया, लाखों का नुकसान

Vasai-Virar, Maharashtra:विरार पश्चिमेतील HDIL सोसायटीमध्ये एका घराला लागलेल्या भीषण आगीवर अखेर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलं आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली होती. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने रौद्ररूप धारण करत वरच्या मजल्यापर्यंत भडका घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं, तरी घरातील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
0
0
Report
Advertisement

Solapur में ऊस दर आंदोलन तेज: अजित बोरकर के नेतृत्व में स्वाभिमानी ने ऊस ट्रांसपोर्ट रोक दिया

Pandharpur, Maharashtra:Solapur जिल्ह्यातील ऊस दर आंदोलनामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी उडी घेतल्यानंतर रात्रीपासून मालशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली ऊस दर आंदोलन आक्रमक झाले आहे पंढरपूर पुणे पालखी मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्याने साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली आहे राजू शेट्टी यांनी कालच साखर कारखानदारांना इशारा दिला आहे उद्यापासून एकही उसाचं गाळप करायचं नाही जोपर्यंत दराचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत ऊस गाळप करायचा नाही हा इशारा दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत
0
0
Report

यवला तालुक्यात ममदापूरजवळ दरोडा: चौघे घरात घुसले, लाखों की नगद-सोना लुटा; एक पकडा

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील ममदापूरजवळील कोळगाव शिवारात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अरुण भागाजी गिडगे यांच्या वस्तीवर चौघा दरोडेखोरांनी घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत कुटुंबीयांना मारहाण केली. मका विक्रीतून आलेली लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेली अडीच लाखांची रोकड आणि दीड तोळ्याची सोन्याची पोत घेऊन दरोडेखोर पसार झाले. मात्र, गिडगे कुटुंबीयांनी धाडस दाखवत एका दरोडेखोराला पकडले. घटनेची माहिती मिळताच येवला तालुक्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पकडलेल्या दरोडेखोराला ताब्यात घेतले असून फरार तिघांचा शोध सुरू आहे. एकीकडे दुष्काळाचे संकट, तर दुसरीकडे चोरट्यांच्या दहशीने येवला तालुक्यातील बळीराजा भयभीत...
0
0
Report

यवतमाळ के पुसद में राज्यमंत्री इंद्रनील नाईक ने दिवाळी किसानों के साथ मनाई

Yavatmal, Maharashtra:दुष्काळी परिस्थितीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गौळ मांजरी, चिलवाडी, भगतवाडी आणि श्रीरामपुर येथे पत्नी नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांचे समवेत उपस्थित राहून शेतकरी कुटुंब, निराधार मुलांसोबत उत्साहात दिवाळी साजरी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी, गावातील विविध समस्या आणि संभाव्य उपाययोजनांबाबत संवाद साधत संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली. गावातील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीनिमित्त ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून विविध गोड पदार्थांसह ‘आनंदाचा शिधा’, दिवाळी फराळ वितरित करण्यात आला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top