- Your PIN
- Trending
- Following
421301
बालासाहेब की फोटो फाड़ने पर ठाकरे गुट का तीखा हमला, शायना एन.सी. पर नाराजगी
Kalyan, Maharashtra:बाळासाहेबांचा फोटो फाडला अन् ठाकरे सैनिकांचा संताप अनावर! ‘शायना एन. सी. यांचं थोबाड फोडलं पाहिजे’ रस्त्यावर फिरू देणार नाही’, ठाकरे गटाचा थेट इशारा! Anc..बाळासाहेबांचा फोटो फाडण्याचा प्रकार शायना एन. सी. यांना चांगलाच अंगलट येणार असल्याचे दिसून येतंय , सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना शायना एन. सी. यांच्याकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेल्याचा प्रकार समोर आला .याबाबत शायना हा प्रकार अनावधानाने घडला असल्याचे सांगितले .या घटनेनंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे कल्याण-डोंबिवलीतील ठाकरे सैनिकांनी संताप व्यक्त करत ठाकरे गटाच्या नगरसेविका, गटनेते आणि पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. कुणी ‘शायना एन. सी. यांचं थोबाड फोडलं पाहिजे’, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली, तर कुणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. महाराष्ट्राची आणि देशाची जाहीर माफी मागितली नाही, तर रस्त्यावर उतरून जाब विचारू आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशाराही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
444004
पानी संकट पर ग्रामवासियों का जिल्हा परिषद के सामने प्रदर्शन—तुरंत टंकर जल पहुंचाव की मांग
Akola, Maharashtra:पातूर तालुक्यातील सावरगाव, आलेगाव, गोळेगाव आणि पिंपळडोळी या गावांमधील भीषण पाणीटंचाईच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर घागरी फोडून प्रशासनाचा निषेध केला. गावांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या निकृष्ट आणि अपूर्ण कामांची स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असून, प्रशासनाने तातडीने पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.0
0
Report
425001
जळगाव जिल्हा सहकारी बँके election: कपबशी-ट्रैक्टर चिन्ह पर प्रचार तेज
Jalgaon, Maharashtra:जळगाव, Ancr : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप केले आहे. बँकेच्या एकूण २१ जागांपैकी १२ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ९ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. या नऊ जागांसाठी तब्बल २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सहकार पॅनलमधील नऊ उमेदवारांना 'कपबशी', तर शेतकरी एकता पॅनलमधील सात उमेदवारांना 'ट्रॅक्टर' हे सामूहिक चिन्ह देण्यात आले आहे. याशिवाय उर्वरित १३ वैयक्तिक उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार स्वतंत्र चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात आता कपबशी आणि ट्रॅक्टर या चिन्हांभोवती प्रचाराची रंगत वाढणार आहे. येत्या २९ नोव्हेंबरला जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदारसंघासाठी स्वतंत्र मतपत्रिका असेल. तर महिला, भटक्या विमुक्त जाती-जमाती (एनटी-व्हीजे), इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि इतर सहकारी संस्था या प्रवर्गांसाठी स्वतंत्र मतपत्रिकांची व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात येणार आहे。0
0
Report
Advertisement
415612
रत्नागिरी: कशेडी घाट के डेंजर ज़ोन का खतरा घटा, गाबियन दीवार से पक्का मार्ग बना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कशेडी घाटातील जुन्या महामार्गावरील 'डेंजर झोन'चा धोका घटला; खचणाऱ्या रस्त्यावर गॅबियन तंत्राचा नवा उपाय.. अँकर पोलाडपूर तालुक्यातील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात २००५ पासून दरवर्षी खचणाऱ्या १०५ मीटरच्या 'डेंजर झोन'चा धोका अखेर कमी झाला आहे.. जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीकडून या ठिकाणी दुपदरीऐवजी पक्का एकपदरी डांबरी रस्ता तयार करून, दरीच्या बाजूने गॅबियन तंत्राची १५ फूट उंच भिंत उभारण्यात आली आहे.. या दुरुस्तीमुळे पळचिल विभागातील १२ गावे आणि २८ वाड्यांमधील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र,दुपदरी रस्त्यानंतर अचानक येणाऱ्या या एकपदरी वळणावर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून,या कामाच्या दर्जाची खरी परीक्षा आगामी पावसाळ्यातच होणार आहे..0
0
Report
421301
KDMC की अतिक्रमण विरोधी कार्रवाई: लोढ़ा हेवन 205 दुकानों के शेड हटे, छत्रपाल सिंह गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:लोड़ा हेवन परिसरात KDMC च्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान राडा! जेसीबीसमोर उभे राहत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा गोंधळ पोलिसांशी धक्काबुक्की, छत्रपाल सिंह यांना घेतले ताब्यात! 205 दुकानांसमोरील अनधिकृत शेड हटवले! डोंबिवलीतील लोड़ा हेवन परिसरात अनधिकृत दुकानांच्या शेडवर सुरू असलेल्या KDMC च्या कारवाईदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. महापालिकेच्या ई प्रभाग कार्यालयाकडून 18 नोव्हेंबरपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली असून, पहिल्याच दिवशी 205 दुकानांसमोरील अनधिकृत शेड हटवण्यात आले. मात्र, आज कारवाई सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी छत्रपाल सिंह यांनी जेसीबीसमोर उभे राहत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्याने मानपाडा पोलिसांनी छत्रपाल सिंह यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, राजकीय कार्यकर्त्यांकडून कारवाईला विरोध होत असताना दुसरीकडे दुकानदारांनी मात्र या मोहिमेचे समर्थन केले आहे. अनधिकृत वाईन शॉप आणि इतर बांधकामांवरही अशीच कारवाई करण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे.0
0
Report
