icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
413133
JMJAVED MULANI7 Oct 2025, 04:15 pm

इंदापुर के लाखेवाड़ी में गौतमी पाटील का कार्यक्रम आज, मीडिया से दूरी और विरोध

Baramati, Maharashtra:इ Indapur तालुक्यातील लाखेवाडी येथे गौतमी पाटील दाखल.... लाखेवाडी येथे आज गौतमी पाटील चा होणार कार्यक्रम..... प्रसारमाध्यमांशी बोलणं गौतमी पाटील न टाळलं..... Anchor_पुण्याच्या इंदापुरातील लाखेवाडी मध्ये आज प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमासाठी लाखेवाडी मध्ये गौतमी पाटील लाखेवाडी मध्ये कार्यक्रम स्थळी दाखल झाली आहे. दरम्यान पुण्याच्या नवले ब्रिजवर झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे सध्या गौतमी पाटील चर्चेत आहे.प्रसार माध्यमांनी गौतमी पाटील हिच्याशी यासंदर्भात संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र गौतमी पाटील प्रसार माध्यमांना सध्यातरी टाळल आहे. याच मुद्द्यावरून आज पुण्यात गनिमी कावा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन देखील झालं. गौतमी पाटील चा इंदापूर मधील कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशारा गनिमी कावा संघटनेकडून देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या लाखेवाडी मधील गौतमीचा हा कार्यक्रम सुस्थितीत पार पडणार का हे पाहणं ही महत्त्वाच असणार आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जालना के किसानों पर सूखे का खतरा: ठिंबक-तुषार सिंचनों से फसल बचाने की जद्दोजहद

Jalna, Maharashtra:जालना : खरीप पिकांचा तुषार,ठिंबक सिंचनावर आधार,पावसाअभावी शेतकरी बेजार व्हिओ : ०१: अर्ध सोयाबीन पावसाअभावी पिवळं पडलं. मक्याच्या कणसात दाणे भरण्याआधीच वाळून गेली. पावसाअभावी मिरची पिकांवर रोगराई पसरली. हजारो शेतकऱ्यांच्या कपाशी पीकानं माना टाकल्या. ही परिस्थिती आहे जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची. सध्या अर्धी पिकं हिरवी तर अर्धी करपली असं चित्र सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत पाहायला मिळतं.त्याच कारण आहे.ठिंबक आणि तुषार सिंचनाचा वापर. सुरुवातीला झालेल्या पावसानं विहिरीत पाणी आलं.मात्र नंतर पाऊस पडला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरीत होतं नव्हतं ते पाणी तुषार आणि ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना देण्यास सुरुवात केली.आणि पिकं आतापर्यंत जगवली.पण आता विहिरीनीच तळ गाठलाय. त्यामुळे सध्या दिसणारं हिरवगार पीकही दुष्काळाच्या गर्तेत सापडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागलीय. व्हिओ:०२:आता ही कपाशी पहा .आतापर्यंत पावसाभावी फक्त या कपाशीची वाढ खुंटली.कैऱ्या बऱ्यापैकी आहे.ठिंबक सिंचनावर असल्यानं एक दोन तास पाणी देऊन ही कपाशी वाचवण्यात आली. पण आता विहिरींनीच तळ गाठलाय त्यामुळे यापुढे ही कपाशी कधीपर्यंत जगेल याचाच विश्वास शेतकऱ्यांना राहिला नाही.त्यामुळे सरकारने आता तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय, व्हिओ:३: आता दुसऱ्या आणखी एका कपाशीची अवस्था पहा. पावसच नसल्यानं या कपाशीने माना टाकायला सुरुवात केलीय.विहिरीतच पाणी नाही तर कपाशीला पाणी देण्यासाठी कोठुन आणणार अशी परिस्थिती शेतकऱ्याची झालीय.ऐन दुपारच्या वेळी पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिकं माना टाकतात तसा शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. व्हिओ:०४: शेतकऱ्यांनी विहिरीत होतं नव्हतं ते सगळं पाणी काटकसरीने वापरून ठिंबक आणि तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना देण्याचा अतोनात प्रयत्न केला पण आता विहिरीतीलच पाणीसाठा तळाला गेलाय त्यामुळे वाचवलेली पिकंही हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागलीय.त्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा आता सरकार दुष्काळ कधी जाहीर करत याकडे लागल्या आहेत.
0
0
Report

टिटवल में भारी बारिश में खुले में अंतिम संस्कार: KDMC प्रशासन पर निष्क्रियता के आरोप

Kalyan, Maharashtra:टिटवाळ्यात भर पावसात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष.. टिटवळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भर पावसात उघड्यावर अंत्यविधी सुरू असल्याचे दिसत आहे. अंत्यविधीदरम्यान काही तरुण मृतदेहावर पाऊस पडू नये यासाठी तारपत्री घेऊन उभे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात अंत्यविधीसाठी योग्य जागा आणि सुविधांची मागणी केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे अद्याप पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पावसाळ्यात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर येत असल्याने केडीएमसी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

यशोमती ठाकूर का बावनकुळे पर कड़ा हमला; बेरोजगारी और नेतृत्त्व पर तंज

Amravati, Maharashtra:बावनकुळे साहेब तुम्ही तुमच्या जिभेवर लगाम दया नाहीतर तुम्हाला आगऱ्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करू - यशोमती ठाकूर अँकर :- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत चुकीच्या भाषेचा वापर केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला असून त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बावनकुळे साहेब तुम्ही तुमच्या जिभेवर लगाम दया.... नाही तर तुम्हाला आगऱ्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करू आता जर पुढे बोलले तर गाठ सच्चा काँग्रेस कार्यकर्त्याशी राहिल असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी बावनकुळे यांना खडे बोल सुनावले आहे. ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या मला वाटत होतं की बावनकुळे सिरीयस नेता आहे. आपली लढाई वैचारिक पातळीवर आहे मात्र ते आता वैयक्तिक टीका करत आहे. राहुल गांधी हे संसदेचे विरोधी पक्षनेते आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पुत्र आहे. नेहरू, गांधी घरातील आहे त्यांच्या कुटुंबातील लोकांनी बलिदान दिलं आहे. तुम्हाला आजचे प्रश्न कळत नाही, तुम्हाला बेरोजगारीवर बोलता येत नाही, तुम्हाला इंदोरचा चा छात्र की गुंज कार्यक्रम सहन झालेला नाही आणि तुमच्या जनता दरबार मध्ये 2 ते 3 हजार निवेदने येत असतील तर लोक किती असंतुष्ट आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती परिवार ने कैलिफोर्निया में गणेशोत्सव की धूम मचाई

Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे सातासमुद्रापार अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातही गणेशोत्सवाची धूम; अमरावतीच्या देशमुख आणि दिघडे कुटुंबीयांनी स्थापन केला बाप्पा अमेरिका- सान होजे शहरातील आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पाची स्थापना केली असल्याने सातासमुद्रापार बाप्पाची धूम पाहायला मिळत असून अमेरिकेत सकाळ संध्याकाळ बाप्पाच्या आरती ऐकायला मिळत आहे. अमेरिकेत गणपती बसवणे ही एक वेगळी मजा असून गणपती बसवतांना अनेक आवाहने असल्याचे भारतीय नागरिक सांगत आहेत. दोन ते तीन महिन्या आधी बाप्पाची मूर्ती ऑर्डर करून तिला घरी आणणे, डेकोरेशनच्या वस्तू आणणे आणि मग मित्रांना बोलावून घर सजवण्याची मजा असल्याचे सिद्धांत देशमुख सांगतात. महिलांना कामाची जबादारी सांभाळून बाप्पाची काळजी घ्यावी लागते; मात्र रात्री आरतीसाठी मित्रपरिवार जुळतो आणि ज्या गप्पा होतात ही एक वेगळीच मजा असून गणेशोत्सवात महाराष्ट्राची मजा इथे निर्माण करण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे मंजिरी दिघडे सांगत आहेत.
0
0
Report

सोलापूर पुलिस ने 7 डाकुओं को दबोचा, हथियारों सहित भारी मात्रा का माल बरामद

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सशस्त्र दरोड़ा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 दरोडेखोरांना सोलापूर शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी जप्त - सोलापूर शहरात पहाटेच्या सुमारास सशस्त्र मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीच्या आवळल्या मुसक्या - बिहार, पंजाब, नांदेड, औरंगाबाद येथील सात दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक - सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई - दरोडेखोरांकडून दहा लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त - दरोडेखोरांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी जप्त - अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस त्यांचा कसून तपास करीत आहेत
0
0
Report
Advertisement

किन्ही ग्रामपंचायत कार्यालय में मध्यरात्रि आग, भ्रष्टाचार जांच के बीच जाँच शुरू

Washim, Maharashtra:व Washim जिले के मालेगाव के किन्ही ग्रामपंचायत कार्यालय को मध्यरात्री अचानक आग लगने की घटना सामने आई है. रात्री दो बजे के सुमारास यह आग लगने की प्राथमिक जानकारी है. विशेष रूप से ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार प्रकरण की चौकशी चल रही थी, उसी दौरान आग लगना सवाल खड़े करता है. किन्ही ग्रामपंचायत कार्यालय में मध्यरात्रि अचानक आग लगी. आग में कार्यालय के कागदपत्र, फाईल्स या अन्य सामग्री के नुकसान की जांच जारी है. साथ ही बताया गया है कि ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार के मामले की चौकशी चल रही है. आग शॉर्ट सर्किट के कारण लगी या अन्य कारणों से, इस पर चर्चा हो रही है. पर आग के नेमके कारण अभी स्पष्ट नहीं हैं. पोलीस और संबंधित यंत्रणाओं की जाँच के बाद ही सच्चाई सामने आएगी.
0
0
Report

लोहारा में किसानों का रोष: विधायक प्रवीण स्वामी के खिलाफ रोष प्रदर्शन

Dharashiv, Maharashtra:शेतकऱ्यांचा आमदार प्रवीण स्वामींवर रोष! मोर्चादरम्यान आमदारांवर फेकलं वाळलेलं सोयाबीन... लोहारा तालुका मदतीपासून वंचित राहिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. “शेतकऱ्यांचा रोष मान्य, मी नाराज नाही” – आमदार प्रवीण स्वामी अँकर धाराशिवच्या लोहारा तालुक्यात शेतकऱ्यांच्या रोषाचा आमदार प्रवीण स्वामी यांना सामना करावा लागलाय... दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लोहारा शहरात ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा काढला होता... यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना शेतकऱ्यांनी आमदार प्रवीण स्वामी यांची अडवणूक केली... एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांनी आमदारांच्या अंगावर वाळलेलं सोयाबीन फेकलं... लोहारा तालुक्यात पावसाचा चुकीचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आल्याने तालुका मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय... आमदार म्हणून या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात प्रवीण स्वामी कमी पडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे... मात्र, शेतकऱ्यांचा रोष मला मान्य आहे... त्यांनी मला निवडून दिलं असून आपल्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे... ज्यांनी माझ्यावर सोयाबीन फेकलं, त्यांच्यावरही आपण नाराज नसल्याचं आमदार प्रवीण स्वामी यांनी म्हटलंय...
0
0
Report
Advertisement

विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिनों के लिए दर्शन बंद, 26 सितम्बर से फिर खुला

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उद्या पासून तीन दिवस दर्शनासाठी बंद, आज रात्री शेजाराती नंतर जतन संवर्धन काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांची माहिती. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक येत असतात विठुरायाच आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेण्याची भाविकांची इच्छा असते. या सततच्या मूर्तीला स्पर्श होण्याने मूर्तीच्या पायांची झीज सातत्याने होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मूर्ती जतन संवर्धन काम करण्यासाठी 23 24 आणि 25 सप्टेंबर रोजी पदस्पर्श आणि मुखदर्शन बंद केले आहे. 26 सप्टेंबर पासून पुन्हा देवाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दर पाच वर्षांनी जतन संवर्धन काम करणे आवश्यक असल्याचं मत पुरातत्व विभागाने दिले आहे त्यामुळे यापूर्वी 1988 2005 2012 आणि 2020 मध्ये जतन संवर्धन काम केले आहे. तसेच फक्त रुक्मिणी मातेची 2022 झाली मूर्ती जतन संवर्धन काम केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top