Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

प पुणे-मुंबई एक्सप्रेसवे पर गैस टैंकर हादसा, चालक की सूझबूझ से बड़ा नुकसान टला

CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 23, 2026 06:18:14
Pune, Maharashtra
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा एकदा गॅस टँकरचा अपघात झाला. अचानकपणे टँकरचा ब्रेक फेल झाला, चालकाने प्रसंगावधान दाखवत टँकरची डोंगराला धडक दिली. सुदैवाने टँकर पलटला नाही. अमृतांजन पुलाजवळ दहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली अन पुढच्या काही वेळात क्रेनच्या साह्याने टँकर बाजूला घेण्यात आला. काही काळ वाहतूक ठप्प होती खरी मात्र आडोशी बोगड्याजवळ झालेल्या अपघातातून यंत्रणांनी धडा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळं यावेळी वाहतूक कोंडी टळली. वेळोवेळी महामार्ग पोलीस आणि प्रशासनावर संताप व्यक्त करणाऱ्या प्रवाश्यांनी यावेळी मात्र त्यांचं कौतुक केलं.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Feb 23, 2026 07:34:48
Beed, Maharashtra:बीड: वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पीके आडवी.. 300 हेक्टरहून जास्त शेतीपिकांचे नुकसान..! ANC - परळी तालुक्यातील मांडेखेल येथे काल सायंकाळी अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने मोठा कहर केला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मांडेखेल गाव परिसरातील तब्बल 300 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी पिके आडवी झाली असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः डाळिंब, आंबा व इतर फळबागांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमिनीवर पडली असून काढणीस आलेले उत्पादनही खराब झाले आहे. दरम्यान, नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 23, 2026 07:32:00
Jalna, Maharashtra:जालना: ओबीसी नते नवनाथ वाघमारे बाईट वंजारी समाजाला टार्गेट करून दंगल टु घडवण्याचा जरांगेचा प्रयत्न; गृहविभागाने त्यांच्यावर लक्ष ठेऊन त्यांना बिनभाड्याच्या खोलीत डांबावे—वाघमारे. अधिवेशन आता पूर्वीसारखं सामान्य माणसांसाठी राहिलेलं नाही—वाघमारे. जरांगेंनी कुणाच्या सुपाऱ्या घेतल्या हे अमोल खुणेला माहीत असल्यानं जरांगे खुणेला टार्गेट करतोय. अमोल खुणेच्या जीवाचं बरंवाईट झाल्यास जरांगेजबाबदार राहतील. चिखला गावात जाऊन जातीय पोळी भाजण्याचा जरांगेंचा प्रयत्न. चिखला प्रकरणात योग्य कारवाई व्हावी, जरांगेला राजकारण करण्यासाठी संधी देऊ नये. बाईट: नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते,
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 23, 2026 07:18:39
Kolhapur, Maharashtra:Kop Raju Gore Byte Feed:- Live U Anc:- पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांड प्रकरणात सात वर्षे उलटूनही कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळालेला नाही. या दीर्घकाळ चाललेल्या न्यायप्रक्रियेविरोधात संतप्त झालेल्या अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत देशाचे राष्ट्रपती आणि सरन्यायाधिश यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यूनंतर न्यायालयाने हा खून असल्याचे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. मात्र, इतके असूनही प्रशासनाकडून अद्याप त्यांच्या मृत्यूचा अधिकृत दाखला दिला जात नसल्याचा गंभीर आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. मृत्यूचा दाखला नसल्यामुळे अश्विनी बिद्रे यांच्या सेवेशी संबंधित कोणतेही शासकीय लाभ — पेन्शन, अनुकंपा लाभ अथवा इतर हक्क कुटुंबीयांना मिळालेले नाहीत. एकीकडे ही बाब असताना दुसरीकडे मात्र या हत्याकांडातील प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला पोलीस यंत्रणेकडून तुरुंगात थेट मदत केली जात असल्याचा गंभीर आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. आरोपीला विशेष सवलती दिल्या जात असून सामान्य कुटुंबीय मात्र न्यायासाठी दरवाजे ठोठावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 23, 2026 07:18:01
Baramati, Maharashtra:इंदापुरात बंद पुकारलेला असताना भिगवण बाजारपेठ सुरू.... व्यापाऱ्यांनी सांगितलं नेमकं कारण..... Anchor _पुण्याच्या भिगवण घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने इंदापूर दौंड आणि बारामती बंदच आवाहन करण्यात आलेल आहे मात्र असं असताना ज्या भिगवण मध्ये ही घटना घडल्ली त्या भिगवणची बाजारपेठ मात्र आज सुरू ठेवण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर 18 फेब्रुवारीला भिगवण करांनी कडकडीत बंद पाळत या घटनेचा निषेध नोंदवला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची आणि नागरिकांची वाताहात होऊ नये याकरिता व्यापारी वर्गाने बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.याशिवाय जी घटना घडली त्याचा आम्ही निषेध करत असून पीडित कुटुंबाच्या पाठीशी व्यापारी उभे असल्यासही त्यांनी सांगितल आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 23, 2026 07:15:41
Chendhare, Maharashtra:स्‍लग – विद्यार्थ्‍यांच्‍या जिज्ञासुवृत्‍तीला चालना देण्‍याचा प्रयत्‍न अलिबाग तालुक्‍यातील शाळांचे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्‍यांनी कल्‍पकतेतून साकारला आविष्‍कार 50 हून अधिक शाळांचा प्रदर्शनात सहभाग अगस्‍त्‍या फाऊंडेशनने आयोजीत केलेल्‍या या प्रदर्शनात अलिबाग तालुक्‍यातील 50 हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला असून विद्यार्थ्‍यांनी स्‍वतःच्‍या कल्‍पकतेतून साकारलेल‍या प्रतिकृती इथं मांडण्‍यात आल्‍या आहेत. यात नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेण्‍यात आला आहे. विद्यार्थ्‍यांमध्‍ये विज्ञानविषयक दृष्‍टिकोन जागृत व्‍हावा तसेच त्‍यांच्‍या जिज्ञासुवृत्‍तीला चालना मिळावी या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आल्‍याचे आयोजकांनी सांगितले. अगस्‍त्‍या फाऊंडेशनच्‍या या उपक्रमाबददल पालकांनीही समाधान व्‍यक्‍त केले.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 23, 2026 07:01:50
Beed, Maharashtra:बीड: गेवराई शहरात शिवप्रेमींनी रात्रीतूनच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ पुतळा Anc:बीडच्या गेवराई शहरात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ पुतळा उभारण्याची मागणी शिवप्रेमींसह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीची होती. यासाठी अनेकदा आंदोलन झाली. मात्र काही परवानग्या अभावी ही मागणी अनेक वर्षांपासून रखडली होती. आज अखेर शिवप्रेमींनी रात्रीतूनच गेवराई शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर हा पुतळा उभारलाय. दरम्यान पोलीस प्रशासन याबाबत माहिती घेत असून नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या तक्राऱ्यावरून या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं शिवप्रेमीतून आनंद व्यक्त केला जातोय.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 23, 2026 06:49:53
Nanded, Maharashtra:कचरा टाकल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. एका वर दगडफेक करण्यात आली, तसेच घरात घुसून तोडफोड केल्याचा आरोप आहे. रविवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे. देळूब येथील स्वप्नील बोंधारे यांनी फळाचा कचरा रस्त्यावर टाकला होता. त्यावरुन दुसऱ्या गटाने त्याला बोलावून घेउन शिवीगाळ केली. नंतर जमवाने बोंधारे यांच्या घरावर दगडफेक करत घरात घुसून तोडफोड केल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे दोन गट आमने सामने आले. ईथे मोठा जमाव जमला आणि दोन गटात वाद झाला. एका गटाने धुडगुस घातला. वेळीच पोलीस गावात पोहचले त्यामुळे परिस्तिथी नियंत्रणात आली. या प्रकरणी अर्धापूर पोलीसांनी देळूब गावच्या सरपंचासह 69 जणांवर गुन्हा दाखल केला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 23, 2026 06:34:27
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला २८ फेब्रुवारीला एक महिना पूर्ण होत असताना या घटनेबाबत अजूनही अनेक शंका अनुत्तरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मिटकरी म्हणाले की, हा प्रकार अपघात होता की घातपात, हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाले पाहिजे. संबंधित वैमानिक कपूर याच्या भूतकाळाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, त्याची ‘ड्रंक हिस्ट्री’ असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हा प्रकार सुसाईड मिशनसारखा तर नव्हता ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करत तुलना केली. तसेच डीजीसीएच्या अहवालानुसार विमानात सहा जण असल्याचे सांगितले जात असताना घटनास्थळी पाचच मृतदेह सापडल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, तसेच सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 23, 2026 06:32:24
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:कृष्णा नदीतील शेकडो माशांचा मृत्यू, शेरीनाल्याचे सांडपाणी व मयूषित पाण्यामुळे मृत्यूचा आरोप.. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हे मासे मृत्यू मुखी पडल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कृष्णा नदीतल्या सांगली बंधारया जवळ शेकडो मासे मृत्यू मुखी पडले आहेत.त्यामुळे नदी काठावर मोठी दुर्गंधी पसरली आहे.कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या खालावली आहे,अशा मध्ये शहरातल्या शेरीनाल्याचे सांडपाणी आणि नदी काठच्या कारखान्यांकडून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.कृष्णा नदी पात्रामध्ये वारंवार मासे मृत्युमुखीच्या घटना घडतात मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून जाणीपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top