Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410501

चाकण में पेड़ काटे जाने पर activist ने मंत्री को पत्र, जांच और कार्रवाई मांगी

HCHEMANT CHAPUDE
Dec 12, 2025 03:48:01
Chakan, Maharashtra
पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहत परिसरात वृक्षांची कत्तल करून उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी हजारो टन वृक्ष जाळले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल बुट्टे पाटील यांनी केला. या संदर्भात त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांना पत्राद्वारे कारवाई करण्याची विनंती केलीय. एकीकडे बिबट्याचा हल्ल्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले, तर या संदर्भात त्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांची भेट घेऊन या विषयात लक्ष घालण्याची विनंती केलीय. त्यामुळे पुढील काळात वन विभागाचे अधिकारी आणि प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Dec 12, 2025 05:48:20
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 12, 2025 05:47:59
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी येथील वेकोलीच्या निलजई खदान आणि घुग्घुस येथे महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कोल वॉशरी येथे सीबीआय आणि दक्षतेच्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यामुळे संपूर्ण कोळसा व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सुमारे १२ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोलवॉशरी, निलजई खदान, वेब्रिज आणि उपक्षेत्र कार्यालयात व्यापक चौकशी करीत कागदपत्रे जप्त केली. कर्नाटकातील शक्ती नगर येथील रायचूर थर्मल पॉवर स्टेशन साठी निलजई खाणीतून जी-१३ ग्रेड कोळशाचे वाटप करायचे होते मात्र त्याऐवजी जी-10 ग्रेड कोळसा पोहचत होता. महामाया इन्फ्राच्या वॉशरीत कोळसा धुतला जायचा, तक्रारीनुसार कोळशाच्या ट्रकची यातायात, वेब्रिज रेकॉर्ड आणि कोळसा धुण्याच्या साठ्यात "गंभीर विसंगती" आढळली. यात सीबीआय काय अहवाल देते याकडे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 12, 2025 04:36:11
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 12, 2025 04:17:39
Amravati, Maharashtra:कापूस वेचणीदरम्यान फत्तेपूर येथील ३० वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली. पूनम अंकुश राऊत असे मृत महिलेचे नाव आहे. फत्तेपूर जावरा येथील गजानन राऊत यांच्या शेतात आपल्या पतीसह पूनम राऊत या कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. दुपारी जेवण आटोपल्यानंतर दोघे पुन्हा कामास परतले असता पूनम यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. येथील काही मजूर महिलांनी मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रकृतीत जास्त बिघाड झाल्याने त्यांना तातडीने तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पूनम राऊत यांच्या निधनाने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पच्छात पती, एक सात वर्षांचा लहान मुलगा आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 12, 2025 04:03:58
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या प्रशासनाचे मैदान गिळंकृत करण्याचे कारस्थान पुन्हा उजेडात आले आहे. शहरातील एकमेव व्यायामाचे मैदान असलेल्या रामबाग मैदानावर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या नव्या इमारत बांधकामासाठी भलेमोठे खोदकाम करण्यात आले आहे. चंद्रपूरकर नागरिकांनी याआधी दोनदा आंदोलन करून हे प्रयत्न हाणून पाडले होते. आता निवडणूकांच्या धामधुमीत मैदानावर गुपचूप महाकाय खड्डा खोदण्यात आलाय. आज सकाळी प्रहार सामाजिक संघटनेने नागरिक-विद्यार्थ्यांना एकत्र करत जोरदार आंदोलन केले. हा संपूर्ण भूखंड ,मैदान रुपात आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. रामबाग मैदान वाचविण्यासाठी निकराचा संघर्ष करण्याचा निर्धार नागरिकांनी केलाय.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 12, 2025 04:01:20
Latur, Maharashtra:लातूर - औसा रोडवरील प्राप्ती हाँटेलला मध्यरात्री भिषण आग... आगीत सिलेंडर टाकीचा ही झाला स्फोट... आगीत हॉटेलचे मोठे नुकसान.. वस्तीला असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली..... लातूर–औसा रोडवरील प्राप्ती हॉटेलला मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्टसर्किटमुळे हि आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडरचा हि मोठा स्फोट झाल्यामुळे संपूर्ण हॉटेल जळून खाक झालं आहे. मध्यरात्री औसा पोलिसांची गस्त सुरू असताना ही आग गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी तातडीने हॉटेल मालकांना झोपेतून उठवलं आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी वेळेवर हॉटेल मालकांना कळवल्यामुळे हॉटेलला लागून राहणारे कुटुंब.safe बाहेर काढण्यात यश आले आणि मोठी जीवितहानी टळली. आगीमध्ये हॉटेलचे सर्व साहित्य जळून खाक झाले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 12, 2025 04:00:30
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले में घरफोड़्या करणाऱ्या दोघांना इचलकरंजी शहरातील शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून तब्बल 53 लाख 74 हजार रुपये किंमतीचे 43 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटकेत घेतलेल्यांमध्ये हातकणंगले-तारदाळ येथील प्रल्हाद विठ्ठल कवठेकर आणि यड्राव येथील उदय माने यांचा समावेश आहे. या दोघांकडून 1 डिसेंबरला निमशिरगाव रोड, तारदाळ येथील घरफोडीसह आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर, हातकणंगले आणि कुरुंदवाड, तर सांगली ग्रामीण क्षेत्रातही गुन्हे केल्याची कबुली दोघांनी दिली आहे. अटक आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून संशयितांकडून अजूनही काही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 12, 2025 03:48:57
Dhule, Maharashtra:धुळे महापालिकेच्या निवडणूकसाठी भाजपत उमेदवार यांचा महापूर आल्याचे चित्र आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. धुळे महानगरपालिकेवर भाजपचे एकहाती सत्ता असून येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे अर्ज करण्यात आले आहेत. धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी भाजपाकडून 528 जणांनी इच्छुक म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत. नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती पक्षातर्फे घेण्यात येत असून सर्व मुलाखती झाल्यानंतर त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान भाजपा तर्फे निवडणूक लढू पाहणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असून तिकीट वाटप करताना पक्षाचे देखील दमछाक होणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 03:48:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील समितीने विलंबाने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आले आहेत. ७ हजार २१४ जन्म नोंदणीच्या प्रमाणपत्रांपैकी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे हमीपत्र नसलेली २ हजार ১৭३ प्रमाणपत्रे रद्द ठरवण्यात आली असून, उर्वरित ५ हजार ४१ प्रमाणपत्रे रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे. तर आतापर्यंत ४७ लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. या मोहिमेत राज्यातील हजारो बनावट जन्मनोंदणी प्रमाणपत्रे रद्द होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर शासकीय योजनांचा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top