Back
परभणी में शादी फसवणूक टोळी का पर्दाफाश, 2.9 लाख और गहने फरार
GDGAJANAN DESHMUKH
Dec 05, 2025 11:02:02
Parbhani, Maharashtra
नवरी मुलीचा फोटो 2c केला आहे हल्ली लग्नानंतर नवरी पळून जाण्याच्या घटनेत वाढ झाली असून नवर्या मुलाची फसवणूक करणारी टोळी समोर आलीये, सोने आणि पैसे घेऊन नवरी भुर्रर्र झाल्याची घटना घडलीये, नवरदेवाचे 2 लाख 90 हजार रुपयाने फसवणूक झाल्याचा गुन्हा परभणीच्या पालम पोलीस ठाण्यात दाखल झालाय, पुणे येथील एका तरुणाला ईचलकरंजी येथील एजटाने उपवर मुलीचे फोटो दाखविले, त्यापैकी एक मुलगी या कुटुंबाला पसंत आल्याने पुणे येथील कुटुंब थेट परभणीच्या पालम शहरातील केरवाडी येथे पोहोचले,येथे एका घरात मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम झाला मुलगी पसंत आल्यानंतर एका मंदिरात लग्न लावून देण्यात आलं, मुलीला पुणे येथे घेऊन जात असतांना गाडी आंबेजोगाई येथे थांबली असता नवरी मुलगी सिने स्टाईलने पाठीमागून येत असलेल्या कारमध्ये बसून पळून गेली, मुलीचे आई- चेहरा ब्लर्क करणे, सरला मदुकर कोलते अश्या नावाचे बनावट आधार कार्ड बनवून मुलीच्या आईची खूप गरीब परिस्थिती आहे असे सांगत,मुलीने एजंटमार्फत 2 लाख 90 हजार रुपये उकळले,लग्नात मणी मंगळसूत्र जोडवे असे 35 हजार रुपयांचे दागिने तिच्या अंगावर घालण्यात आले, मुलगी दाखवताना केरवाडी येथील दोन महिलांना पाचशे पाचशे रुपये देऊन त्या मुलीचं हेच घर आहे असं सांगण्यात आले,त्या महिलांना चहा फराळ पाण्याची नवरा मुलाची सोय केली, पुणे येथील फसवणूक झालेल्या या कुटुंबाच्या कोल्हापूर सोलापूर नांदेड,लातूर आणि परभणी येथील एजंट संपर्कात आले होते, विवाह-जुळवणीच्या नावाखाली अशा प्रकारची अचूक योजना आखून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे, पालम पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून 11 जणांवर फसवणुकीसह विविध कलमानव्ये गुन्हे दाखल केले असुन आरोपीच्या मागावर पथके पाठवली आहेत, गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 05, 2025 11:47:4034
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 05, 2025 11:23:330
Report
SKShubham Koli
FollowDec 05, 2025 11:16:2159
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 05, 2025 11:08:4249
Report
SNSWATI NAIK
FollowDec 05, 2025 11:06:5676
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 11:06:4151
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 10:51:4672
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 10:48:44151
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 05, 2025 10:33:40152
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 10:19:24175
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 10:08:1477
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 05, 2025 10:05:23190
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 05, 2025 09:45:23102
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 05, 2025 09:37:0796
Report