Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

दिवाली हत्या: आरोपी गिरफ्तारी से दूर, मंत्री नितेश राणे ने परिवार से भेंट की

GDGAJANAN DESHMUKH
Dec 10, 2025 09:33:31
Parbhani, Maharashtra
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथे मारोतराव डुकरे यांच्या फटाके फोडण्याच्या कारणावरून दिवाळी दरम्यान खून झाला होता. या घटनेत आता दीड महिना लोटला असून यातील काही आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याने मयताच्या कुटुंबाच्या भेटीसाठी मंत्री नितेश राणे आज रोहिला पिंपरी येथे आले होते. त्यांनी रोहिला पिंपरी येथे जाऊन कुटुंबाची सांत्वन पर भेट घेत या कुटुंबाला द्याय मिळवून देणार असल्याचा शब्द दिला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 10, 2025 10:45:43
Kolhapur, Maharashtra:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आल. या आंदोलनासाठी गडहिंग्ज तालुक्यातील शेतकरी सोयाबीनची पोती घेऊन प्रांत कार्यालयावर दाखल झाले. दोन महिने मागणी करूनही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारकडे सोयाबीन खरेदी करण्यास प्रस्ताव दाखल करूनही मान्यता देण्यात आली नसल्याने संतप्त शेतक-यांनी प्रांत कार्यालयावर सोयाबीन पोती विक्री करण्यास आणले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले..
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 10, 2025 10:39:13
Pune, Maharashtra:नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील कडाडून विरोध केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे साधुसंतांच्या निवासासाठी वृक्षतोड करून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मात्र या वृक्षतोडीला सामाजिक स्तरातून विरोध होत आहे या वृक्षतोडाला आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील विरोध केला आहे. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत... फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावेत मात्र मोठ्या झाडांना तोडू नये अशी माझी विनंती असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. समाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा नुकताच निधन झाला आहे. या निमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी जीवनात कुठल्याही फळाची अपेक्षा केली नाही निष्कलंक काम करणार ह हीच खरी पूजा असते अशा शब्दात अण्णा हजारेंनी बाबा आढाव यांना नाश्रद्धांजली वाहिली. बाबा आडव्यांनी आयुष्यभर जनतेची पूजा केली असं अण्णा हजारेंनी म्हटल आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 10, 2025 10:20:39
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील वाघापूर कमानीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या उद्देशाने वाघापूर ते नागपूर पायी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. आज हे मोर्चेकरी कोल्हापुरात पोहोचले असून कमानीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लागत नाही तोपर्यंत गावाकडे परत जाणार नसल्याचा निर्धार वाघापूरच्या आंबेडकरी समाजाने केला आहे. गावातील आंबेडकरी समाजानं प्रशासनाकडे गेली वर्षभर पाठपुरावा केला मात्र कोणताच निर्णय न झाल्याने नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यासाठी हे मोर्चेकरी नागपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 10, 2025 10:20:20
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांनी उच्छाद मांडला असून अनेकांवर जिवघेणे हल्ले वाढले आहेत.. वनविभागाकडून बिबट्यांची धरपकड सुरू असून आत्तापर्यंत जवळपास 28 बिबटे जेरबंद केलेले आहेत.. 1150 च्या वर बिबटे जिल्ह्यात असून पकडलेल्या बिबट्यांना सांभाळायचे कसे असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.. एकीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी एक कोटी रूपयांच्या शेळ्या मेंढ्या बिबट्यांना भक्ष म्हणून देणार असल्याचं जाहीर केलेले असले तरी राज्यभरात पकडलेल्या बिबट्यांना खाद्य देण्यासाठी निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही.. त्यामुळे वनविभागाला आपत्कालीन निधीतून कशीबशी तरतूद केली जात असून बिबट्यांची उपासमार होत असल्याचं चित्र आहे.. जिल्हा वनविभागाकडून देण्यात आलेले प्रस्तावाला लवकर मंजूरी देणं गरजेचं आहे..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 10, 2025 10:19:58
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर के CPR अस्पताल में मेडिकल बिलों की फाइल मंजूरी में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार के आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ने लगाए हैं। 8 दिसंबर को किए गए स्टिंग ऑपरेशन में फाइल क्रमांक 3 से पैसे के व्यवहार का हिसाब खोलकर इस फाइल को जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर को सिल कर निष्क्रिय बनाने की बात कही गई है। इस प्रकरण की चौकशी त्रिसदस्यीय समिति से कराने, आर्थिक अपराध अन्वेषण विभाग में प्रकरण दर्ज कराने और माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख के कार्यकाल के सभी व्यवहारों की जांच कराने की मांग शिवसेना उबाठा पार्टी ने जिल्हाधिकाऱ्यांकडे रखी है। इस विषय पर शिवसेना उबाठा के उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे तथा अन्य पदाधिकारी मौजूद थे।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 10, 2025 10:16:24
Nagpur, Maharashtra:नागपूर: वन मंत्री गणेश नाईक कितीही बड़े दावे करत असले, तरी वन विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना आज घडली आहे. नागपूरच्या पारडी परिसरातील शिवनगर मधून बिबटला बेशुद्ध करून वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या खासvehicle वर पिंजरा ठेवून रेस्क्यू सेंटर कडे टीम निघाली असताना पारडी परिसरामध्येच त्यांची रेस्क्यू वॅन बंद पडली. क्लच प्लेट खराब असल्यामुळे रेस्क्यू व्हेन मध्ये बिबट असताना ती पुन्हा सुरूच झाली नाही. अखेरीस दुसरे मालवाहतूक वाहन बोलावून त्याच्यामध्ये बिबटचा पिंजरा ठेवून वन विभागाचे रेस्क्यू सेंटर पर्यंत बिबटला पोहोचवण्यात आले. तर वनविभागाच्या रेस्क्यू टीमची ती खास व्हॅन ज्याच्यामध्ये बिबट चा पिंजरा ठेवून टीम घटनास्थळातून रेस्क्यू सेंटर कडे निघाली होती ती व्हेन कर्मचाऱ्यांना धक्का मारून आणावी लागत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 10, 2025 09:23:19
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत तीन महिन्यांपासून प्रलंबित असणारे अर्ज तातडीने मंजूर करावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या लाभ घेण्यासाठी कामगारांकडून विविध अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.मात्र कामगार विभागाकडून केवळ भांडी आणि पेट्या वाटप एवढाच उपक्रम राबवला जात आहे, कामगारांना शासनाचे वेगवेगळे आर्थिक लाभ देण्याच्या अर्जांची पूर्तता केली जात नाही,असा आरोप करत कॉम्रेड शंकर पुजारींच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांनी आंदोलन करत तातडीने मागण्यांबाबत कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देखील दिला आहे.
54
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 10, 2025 08:48:09
Chendhare, Alibag, Maharashtra:२४ तास उलटून गेले तरी बिबट्या मोकाटच ...... नागावमध्ये भीतीचं सावट कायम ........ वनविभागाची शोधमोहीम सुरूच राहणार ....... बिबट्या नैसर्गिक अधिवासात गेला असण्याची शक्यता ...... अलीबागच्या नागावमध्ये बिबट्या येऊन २४ तास उलटून गेले तरी त्याला जेरबंद करण्यात अद्याप वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे नागाव मध्ये भीतीचं सावट कायम आहे. वनविभागाचे ८० कर्मचारी , अधिकारी कालपासून इथ शोध मोहीम राबवत आहेत. संध्याकाळ नंतर बिबट्या कुणाच्या नजरेस पडला नाही त्यामुळे तो कदाचित त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत गेला असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. मात्र याबाबत खात्री होत नाही तोवर शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचं उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितलं.
183
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 10, 2025 08:19:03
72
comment0
Report
Advertisement
Back to top