Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401301

वासई-विरार नगरपालिका चुनाव: 54 उम्मीदवारों ने पर्चा दाखिल, ठाकरे गुट के उम्मीदवार आगे

PTPRATHAMESH TAWADE
Dec 29, 2025 15:23:49
Virar, Maharashtra
ANC : वसई–विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज एकूण ५४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. या अर्ज भरण्यावेळी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत ढोल-ताशाच्या गजरात उमेदवारांनी अर्ज दाखल करत निवडणूक रणशिंग फुंकले आहे. शिवसेना ठाकरे गटाने वार्ड क्रमांक महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळाचा नारा दिला आहे. हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, मनसे आणि काँग्रेस हे एकत्र लढत असून आगामी शिवसेना ठाकरे गटाने स्वतंत्र लढण्याचा नारा दिला आहे. तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट महायुतीच्या माध्यमातून लढत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत विरार पश्चिममध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Dec 29, 2025 16:30:37
Akola, Maharashtra:अकोल्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली चर्चा अधिकच लांबली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक गेल्या दोन दिवसांपासून अकोल्यात तळ ठोकून असून, आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड अकोल्यात दाखल झाले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रनील नाईक आणि संजय राठोड यांच्यात युती संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार असून, या चर्चेनंतर भाजपसोबत अंतिम तोडगा काढण्यासाठी शेवटची बोलणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, अशी आशा व्यक्त करत चर्चा पूर्ण झाल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचं मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 29, 2025 15:49:14
Kalyan, Maharashtra:कार्यकर्ते समोर झाले भाऊक.. डोंबिवलीत शिंदे गटा कडून बंडखोरीचे संकेत — अपक्ष उमेदवारीचा इशारा! शिवसेना शिंदे गटातील इच्छुक उमेदवाराकडून बंडखोरीचा थेट इशारा डोंबिवली पॅनल क्रमांक 29 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील लोकसभा उपजिल्हा अध्यक्ष 2010 मधील माजी नगरसेवक रवी पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत 65 इमारती प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या मंदार टावरे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याने नाराजी यामुळे शिंदे गटातील जिल्हा लोकसभा अध्यक्ष रवी पाटील आक्रमक डोंबिवलीतील अहिरे गावात कार्यकर्ता मेळावा घेत अपक्ष निवडणूक लढण्याची मांडली स्पष्ट भूमिका अहिरे गाव प्रभाग 29 मधून रवी पाटील इच्छुक उमेदवार होते अनेक वर्ष महायुतीचं काम केलं मात्र आता अशा लोकांना उमेदवारी भाजप उमेदवारी देत असल्याने अपक्ष निवडणूक लढण्याची स्पष्ट मांडली भूमिका विशेष म्हणजे 65 इमारती प्रकरणात खोटे दस्तावेज सह अनेक अनधिकृत बांधकाम विषयी पालिकेने देखील त्यांच्यावरती ठपका ठेवला आहे .. ते उमेदवारी अर्ज देखील भरू शकत नाही तरीदेखील भाजप नेत्यांना उमेदवारी दिली आहे आम्ही आमचं स्वतःचं पॅनल तयार करून अपक्ष लढणार या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यांना काल भेटू माहिती दिली असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितले आहे यामुळे आता महायुतीत लढणारे दोन्ही मित्र पक्षांमधील इच्छुक उमेदवारांनी आता बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी लढणार असल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 29, 2025 15:24:57
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 29, 2025 14:38:35
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आता तिरंगी होणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि राजर्षी शाहू महाराज आघाडी एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत. असं असलं तरी, या निवडणुकीतील प्रमुख लढत काँग्रेस विरुद्ध महायुतीचे घटक पक्ष अशीच पाहायला मिळणार आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी मधील नाराजानी काही ठिकाणी बंडाचा झेंडा फडकवल्याने या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रत्येक प्रभागावर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं सांगत उमेदवारांना कामाला लागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एकीकडे काँग्रेस उमेदवारांच्या याद्या जाहीर करत असताना, दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये जागावाटपावरून तब्बल 6 दिवस जोरदार रस्सीखेच सुरू होती. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या जागांवर ठाम राहिल्यामुळे तिढा अधिकच वाढला. या वादात अखेर राज्यस्तरीय नेत्यांनाही हस्तक्षेप करावा लागला. चर्चेअंती भाजप 36, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागा असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागांवर ठाम होती, तर कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघातील सर्वच खुल्या प्रवर्गाच्या जागांवर दावा केला होता. अखेर महायुती मधील सर्व पक्षांनी एक पाऊल मागे येत तडजोड करून महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. पण उमेदवारी यादी मात्र गुलदस्तात ठेवली आहे. महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटणार नाही, आणि त्यामुळे राष्ट्रवादी स्वबळावर जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, राष्ट्रवादीला 15 जागा देत महायुती टिकवण्यात भाजप आणि शिवसेनेला यश आलं. तरीही, भाजपला आणि शिवसेनेच्या आपल्या सर्व इच्छुकांना न्याय देता आला नाही. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काहींनी बंडाचा झेंडा देखील उभारला आहे. एका दिशेने महायुती टिकवताना अनेक इच्छुक नाराज झाले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसकडून शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला अपेक्षित न्याय मिळाला नाही. याच नाराजीचा फायदा घेत वंचित बहुजन आघाडी, शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र येत राजर्षी शाहू महाराज आघाडी स्थापन करण्यात आली आहे. पण सुरुवातीला ही निवडणूक दुरंगी होईल, असं चित्र होतं. मात्र, महाविकास आघाडीतून दुखावलेल्या पक्षांनी स्वतंत्र आघाडी उभार कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात तिसरा पर्याय उभा केला आहे. त्यामुळे आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि तिरंगी ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 29, 2025 14:37:45
Kalyan, Maharashtra:सेना और भाजपा के इच्छुक उम्मीदवारों के टिकट कटने से वे दूसरे दलों की ओर शिफ्ट हो रहे हैं. कल्याण डोंबिवली नगर निगम चुनाव के लिए सेना-भाजपा की आख़िर युति हुई, जिसके कारण इन दोनों पार्टियों के अनेक इच्छुक उम्मीदवारों के टिकट काट दिए गए. परिणामस्वरूप इन उम्मीदवारों ने सेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी और मनसे के पास जाने की दौड़ शुरू कर दी है. भाजपा और शिवसेना की युति के कारण कुछ उम्मीदवारों को टिकट नहीं मिला. इनमें भाजपा के Standing नगरसेवक वैशाली पाटिल, अर्जुन भोईर, और चार दिन पहले मनसे से भाजपा में आए त्रिप्ती भोईर भी टिकट नहीं पाए, इसलिए वे नाराज हैं. परिणामस्वरूप कुछ उम्मीदवारों ने अपने पक्ष से इस्तीफा दिया है. चूंकि कल नामांकन दाखिले की आख़िरी तारीख है, ये नाराज उम्मीदवार कल किस दल से नामांकन दाखिल करेंगे, यह देखना होगा. साथ ही यह भी देखना होगा कि इनमें से कितने नाराज़ उम्मीदवार दोनों पक्षों द्वारा मनाने में सफल होते हैं.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 29, 2025 14:36:42
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 66 उमेदवारी अर्ज झाले दाखल, शेवटच्या दिवशी मंगळवारी सकाळी 11 ते 2 या कालावधीत अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार असून अद्याप प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची नावनिश्चिती झाली नसल्याने गोंधळात भर पडली आहे. अनेक इच्छूकांनी उमेदवारी अर्ज आधीच दाखल केले असून एबी फॉर्म मिळाल्यावर ते जोडले जाणारे आहेत. उमेदवारांची अन्य पक्षांकडे पळापळ होऊ नये यासाठी यादी रोखून धरत सावध खेळी खेळली जात आहे. भाजपची यादी नागपुरात निश्चित होत असली तरी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या चंद्रपुरातील निवासस्थानी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 29, 2025 14:36:20
Amravati, Maharashtra:अमरावती महापालिका जागा वाटपात मोठा ट्विस्ट शिवसेना भाजपचा जागावाटप ठरत नसल्याने शिवसेनेत असंतोष माजी मंत्री व शिवसेनेचे पश्चिम विदर्भाचे संघटन प्रमुख जगदीश गुप्ता बैठक सोडून गेले निघून जगदीश गुप्ता यांचा मंत्री संजय राठोड यांच्यावर रोष? सर्व गोष्टी सांगायच्या नसतात काही गोष्टी समजायच्या असतात जगदीश गुप्ता यांची सूचक प्रतिक्रिया जगदीश गुप्ता उद्या पत्रकार परिषद घेत धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता भाजप शिवसेनेला सन्मानजनक जागा देत नसल्याचा जगदीश गुप्ता यांचा आरोप जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेला जय श्रीराम? स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी? बाईट :– जगदीश गुप्ता, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 29, 2025 14:20:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका चुनाव में भाजपा और कांग्रेससह इतर पक्षातले नाराज इच्छुक उमेदवार शिंदे शिवसेनाकडे मोर्चा वळवला आहे. सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ही दाखल झाले असून, या पार्श्वभूमीवर आता भाजपा व काँग्रेस व राष्ट्रवादी मधून उमेदवारी डावलण्यात आलेले इच्छुक उमेदवार पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या भेटीला पोचले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सहकार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव सावंत यांच्या नेतृत्वाखाली 35-40 इच्छुकांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत, शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपा आणि काँग्रेस मधल्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे, काही माजी नगरसेवकांचा देखील यामध्ये समावेश आहे. सांगली महापालिकेसाठी भाजपा स्वबळावर लढताय, तर काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी अशी आघाडीची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे सर्वच पक्षातील डावलण्यात येत असलेल्या उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारीसाठी मागणी करत आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 29, 2025 14:05:33
0
comment0
Report
Advertisement
Back to top