Back
Kolhapur नगर निगम चुनाव: कांग्रेस बनाम महायुती, तिरंगी हो सकती है
PNPratap Naik1
Dec 29, 2025 14:38:35
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आता तिरंगी होणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि राजर्षी शाहू महाराज आघाडी एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत. असं असलं तरी, या निवडणुकीतील प्रमुख लढत काँग्रेस विरुद्ध महायुतीचे घटक पक्ष अशीच पाहायला मिळणार आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी मधील नाराजानी काही ठिकाणी बंडाचा झेंडा फडकवल्याने या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रत्येक प्रभागावर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं सांगत उमेदवारांना कामाला लागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एकीकडे काँग्रेस उमेदवारांच्या याद्या जाहीर करत असताना, दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये जागावाटपावरून तब्बल 6 दिवस जोरदार रस्सीखेच सुरू होती. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या जागांवर ठाम राहिल्यामुळे तिढा अधिकच वाढला. या वादात अखेर राज्यस्तरीय नेत्यांनाही हस्तक्षेप करावा लागला. चर्चेअंती भाजप 36, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागा असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागांवर ठाम होती, तर कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघातील सर्वच खुल्या प्रवर्गाच्या जागांवर दावा केला होता. अखेर महायुती मधील सर्व पक्षांनी एक पाऊल मागे येत तडजोड करून महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. पण उमेदवारी यादी मात्र गुलदस्तात ठेवली आहे. महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटणार नाही, आणि त्यामुळे राष्ट्रवादी स्वबळावर जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, राष्ट्रवादीला 15 जागा देत महायुती टिकवण्यात भाजप आणि शिवसेनेला यश आलं. तरीही, भाजपला आणि शिवसेनेच्या आपल्या सर्व इच्छुकांना न्याय देता आला नाही. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काहींनी बंडाचा झेंडा देखील उभारला आहे. एका दिशेने महायुती टिकवताना अनेक इच्छुक नाराज झाले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसकडून शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला अपेक्षित न्याय मिळाला नाही. याच नाराजीचा फायदा घेत वंचित बहुजन आघाडी, शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र येत राजर्षी शाहू महाराज आघाडी स्थापन करण्यात आली आहे. पण सुरुवातीला ही निवडणूक दुरंगी होईल, असं चित्र होतं. मात्र, महाविकास आघाडीतून दुखावलेल्या पक्षांनी स्वतंत्र आघाडी उभार कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात तिसरा पर्याय उभा केला आहे. त्यामुळे आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि तिरंगी ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 29, 2025 15:49:140
Report
PNPratap Naik1
FollowDec 29, 2025 15:24:570
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 29, 2025 15:23:490
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 29, 2025 15:18:580
Report
ABATISH BHOIR
FollowDec 29, 2025 14:37:450
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 29, 2025 14:36:420
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 29, 2025 14:36:200
Report
KJKunal Jamdade
FollowDec 29, 2025 14:20:340
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 14:20:080
Report
JMJAVED MULANI
FollowDec 29, 2025 14:05:330
Report
KJKunal Jamdade
FollowDec 29, 2025 13:26:070
Report
KJKunal Jamdade
FollowDec 29, 2025 13:25:570
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 13:00:460
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 29, 2025 12:30:380
Report