Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

अंबही के छेडा फूड्स से दूषित पानी, किसानों में उफान रोष

HPHARSHAD PATIL
Nov 11, 2025 01:16:26
Palghar, Maharashtra
पालघर - वाडा तालुक्यातील अंभई येथे असलेल्या छेडा फूड्स कंपनीपासून सध्या येथील शेतकरी त्रस्त आहेत. कंपनीतून निघणार सांडपाणी आणि वेस्टेज थेट नैसर्गिक नाल्याने शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा चित्र समोर आला आहे. या कारखान्यातून निघणाऱ्या वेस्टेज शेतकऱ्यांच्या शेतातून जात असल्याने येथील अनेक विहिरी आणि बोरवेल दूषित झाले आहेत. त्यामुळे गावात रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून त्या कारखान्यावर कलाबाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कंपनी विरोधात मागील अनेक वर्षांपासून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करत असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त झाला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 11, 2025 03:01:58
Nashik, Maharashtra:म्हस्के टोळीचा म्होरखा टोन्याला पोलिसांनी केली अटक नाशिकच्या सुभाष रोड पवारवाडी येथे दोघा युवकांवर हल्ला करून बंदुकीचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या हर्ष सुरेश म्हस्के उरल टोनू पाईकराव याला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे मालधक्का येथे शिताफीने अटक केलीये.... तो दुचाकीवर उभा असताना पोलिसांनी त्याला खाली पाडले. त्याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढण्याच्या आत पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. तेव्हा त्याच्यासोबत असलेले अन्य तीन साथीदार फरार झाले. हर्षला क्राईम बॅण्च युनिट एकमध्ये आणून त्याच्याकडून देखील 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असे वदवून घेण्यात आले.नाशिकरोड युनिट चारच्या पथकाने टोळीतील फरार तिघांनाही रविवारी रात्री शोधून काढले...जबरी लूट, दहशत निर्माण करणे असे वेगवेगळे गुन्हे टोनू म्हस्के व त्याच्या साथीदारांवर दाखल होते......
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 11, 2025 02:47:27
Nashik, Maharashtra:अँकर पेट्रोलपंप कामगाराने फाटलेली नोट घेतली नसल्याच्या रागातून संशयिताने ग्राहकावर तलवारीने हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हेल्मेटमुळे जीव वाचला. धात्रक पेट्रोलपंप, बोधलेनगर येथे हा प्रकार घडला. मुंबईनाका पोलिसांनी संशयिताला अटक केली. मदन लक्ष्मण सोमवंशीअसे या संशयिताचे नाव आहे. सायंकाळी पंपावर झालेल्या या प्रकारामुळे भीतीपोटी कामगार पळून गेले. त्याचवेळी पगारे दुचाकीमध्ये इंधन भरण्यास आले होते. येथे हा संशयित हातात तलवार घेऊन उभा होता. तू या पंपावर का आला. येथे नोटा घेत नाही असे बोलून शिवीगाळ केली. पगारे यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या संशयिताने तलवार पगारे यांच्या डोक्यात मारली. हेल्मेटमुळे गंभीर जखम झाली नाही. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. अखेर ग्राहक पगारे यांनी पोलिसात तक्रार केलीय.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 11, 2025 02:47:16
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 11, 2025 02:40:10
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 11, 2025 02:39:42
Akola, Maharashtra:राज्यभर थंडीचा जोर वाढत असताना उष्णतेसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोल्यातही आता थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात झपाट्याने घट होत असून, किमान तापमान 13.2 अंशांच्या आसपास नोंदवले गेले. म्हणजेच मागील आठवड्याच्या तुलनेत जवळपास 10 अंशांनी तापमानात घसरण झाली आहे. शहरातील रस्त्यांवर सकाळच्या वेळी धुके पसरले असून, नागरिकांनी रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव सुरु केला आहे. रब्बी हंगामाची कामे सुरू असतानाच थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे शेतकऱ्यांच्या कामात काहीसा विलंब होत असल्याचेही दिसून येत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा, अशी सूचना स्थानिक प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 11, 2025 02:36:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात थंडीची चाहूल लागातच भाजीपाल्याचे भाव वधारले. यामध्ये कोथिंबिरीची जुडी 10 रुपर्यावरून आता 30 रुपयापर्यंत पोचली. कोथिंबिरीचा एक भेळा 70 रुपयांना झाला. यासोबत गवार 100 आणि शेवगा 200 रुपये किलोपर्यंत मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वी पालेभाज्यांचे दर दहा ते वीस रुपये होते. आता वांगी, भेंडी 50 ते 60 किलो, तर काकडी ७० रुपये किलोने मिळत आहे. यातच शेवग्याने शंभरी पार केली. लसूण 80 ते 100 रुपये तर अद्रक 50 ते 80 रुपये किलो झाली. महिनाभर तरी कोथिंबिरीचा भाव असाच राहण्याची शक्यता भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 11, 2025 02:17:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनपा निवडणुकीचा पहिला टप्पा आज प्रभागांच्या आरक्षण सोडतीने सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात या सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी आरक्षणात ५० टक्के महिला आरक्षण कायम ठेवण्यात आले असून कोणत्या प्रभागात महिलांचे आरक्षण लागू होणार आणि एससी, एसटी, ओबीसी गटातील जागा कुठे ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरक्षणाच्या फेरवाटपामुळे अनेक अनुभवी नगरसेवकांची दांडी उडण्याची शक्यता असून अनेक नवीन चेहरे राजकारणात दिसणार असल्याचे संकेत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने शहरात २९ प्रभाग निश्चित केले आहेत. त्यापैकी २८ प्रभाग चार नगरसेवकांचे तर एक प्रभाग तीन नगरसेवकांचा असून एकूण ११५ नगरसेवकांची निवड या निवडणुकीत होणार आहे. आरक्षणासाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरली आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 11, 2025 02:16:38
Bhandara, Maharashtra:शेतकऱ्यांच्या विषयावर नाना पटोले यांनी पोलिस अधिकारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन वर चांगलच दम दिला.... भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा काम सुरू आहे. तर सीमा कन्स्ट्रक्शन कंपनी काम करीत आहे. रस्त्यावरील माती खोदून शेतकऱ्यांच्या शेतात टाकली असल्याची तक्रार शेतकऱ्याने पोलिसांना दिली मात्र पोलिस देखील शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत नाही म्हणून शेतकरी स्थानिक आमदार नाना पटोले यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. नाना पटोले यांनी पोलिस अधिकारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन वर चांगलच दम दिला.... जर शेतकऱ्यांची समस्या लवकर सुटली नाही तर कंपनीचा संपूर्ण सामान मी विकतो अशी धमकीच नाना पटोले यांनी देऊन टाकली...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 11, 2025 02:06:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील पैठण गेट मार्केट परिसरात सोमवारी रात्री अंदाजे १० वाजण्याच्या सुमारास जुन्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एका दुकानदाराचा मृत्यू झाला. इम्रान अकबर कुरेशी असे मृत दुकानदाराचे नाव आहे. इम्रान कुरेशी आणि आरोपी दोघेही एकाच भागात व्यवसाय करत असल्याने त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी रात्री हा वाद पुन्हा चिघळला, तेव्हा आरोपीने इम्रानवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात इम्रान गंभीर जखमी झाला. नागरिकांनी पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली, मात्र इम्रानला घाटी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शहराच्या प्रमुख व्यापारी भागात घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, दरम्यान घटनेनंतर संतप्त जमावाने काही वाहनांची तोडफोड केली...
0
comment0
Report
PDPradyut Das
Nov 11, 2025 02:04:23
Jalpaiguri, West Bengal:স্কুলের মধ্যেই প্রধান শিক্ষিকাকে কান ধরে ওঠবস করাচ্ছেন বিদ্যালয়ের পরিচালন কমিটির সভাপতি তথা বর্তমানে জলপাইগুড়ি পুরসভার চেয়ারম্যান সৈকত চট্টোপাধ্যায়। সিসি টিভির ফুটেজ দিয়ে এমনটাই দাবি করে সোশ্যাল মিডিয়ায় পোস্ট করেছেন রাজ্যের বিরোধী দলনেতা শুভেন্দু অধিকারী। তাঁর ওই পোস্ট ঘিরে তোলপাড় শুরু হয়েছে। ভিডিও ভাইরাল হওয়ার অভিযোগে বিতর্ক শুরু হয়েছে। জলপাইগুড়ি সুনীতিবালা সদর গার্লস হাইস্কুলের ঘটনা। এআই দিয়ে ভুয়ো ভিডিও ছড়ানো হয়েছে বলে সৈকতের দাবি। স্কুলের প্রধান শিক্ষিকা সুতপা দাসের দাবি, ফুটেজ সত্য। বিষয়টি ডি আইয়ের মাধ্যমে রাজ্যের শিক্ষা দপ্তরে জানান তিনি, তবে কোনো সুরাহা হয়নি। সেকারণে আইনের দ্বারস্থ হয়েছে। ঘটনায় জেলা বিজেপি নেমেছে। ভিডিও ছড়িয়ে পড়ায় ব্যাপক চাঞ্চল্য তৈরি হয়েছে। ১) সৈকত চ্যাটার্জী ( তৃণমূল জেলা কমিটির সমর্থ/ ভাইস চেয়ারম্যান/ ভাবী চেয়ারম্যান) ২) সুতপা দাস ( প্রধান শিক্ষিকা) ৩) অরুনিমা মৈত্র ( সহকারী প্রধান শিক্ষিকা) ৪) বাপী গোস্বামী ( প্রাক্তন জেলা সভাপতি)
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 11, 2025 01:16:39
0
comment0
Report
Advertisement
Back to top