Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

नाना पटोले ने पोलिस- कंपनी कर्मियों को फोन पर धमकी भरा संदेश दिया

PTPRAVIN TANDEKAR
Nov 11, 2025 02:16:38
Bhandara, Maharashtra
शेतकऱ्यांच्या विषयावर नाना पटोले यांनी पोलिस अधिकारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन वर चांगलच दम दिला.... भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा काम सुरू आहे. तर सीमा कन्स्ट्रक्शन कंपनी काम करीत आहे. रस्त्यावरील माती खोदून शेतकऱ्यांच्या शेतात टाकली असल्याची तक्रार शेतकऱ्याने पोलिसांना दिली मात्र पोलिस देखील शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत नाही म्हणून शेतकरी स्थानिक आमदार नाना पटोले यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. नाना पटोले यांनी पोलिस अधिकारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन वर चांगलच दम दिला.... जर शेतकऱ्यांची समस्या लवकर सुटली नाही तर कंपनीचा संपूर्ण सामान मी विकतो अशी धमकीच नाना पटोले यांनी देऊन टाकली...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Nov 11, 2025 04:36:36
Beed, Maharashtra:बीड: परळीतील वैद्यनाथ मंदिराची सुरक्षा राम भरोसे, देशात हाय अलर्ट असताना पोलिस प्रशासन मात्र सुस्त..! राजधानी दिल्लीत स्फोट झाल्यानंतर मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीडमधील परळी येथील 11 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैजनाथ मंदिर देखील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी देखील वैजनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आले होते. मात्र काल दिल्लीत स्फोट झाल्यानंतर देखील वैजनाथ मंदिराला कसलीही सुरक्षा प्रदान करण्यात आलीली नाही. त्यामुळे परळी येथील वैजनाथ मंदिर सध्या तरी राम भरोसे असल्याचे पाहायला मिळतेय。
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 11, 2025 04:36:04
Nagpur, Maharashtra:नागपूर देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळच्या झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. शहरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल आणि रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरा जवळ येथे प्रत्येक हालचालींवर बारिक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीत झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयातून सर्व संवेदनशील स्थळांना अलर्ट जारी करण्यात आला. महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय येथे तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असून तब्बल 120 जवान 24 तासकरता तैनात असतात. तर रेशीमबाग डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात 60 पोलीस जवान तैनात असतात. या दोन्ही ठिकाणी येऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा केली. संघ मुख्यालयाजवळून त्याच्याच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 11, 2025 04:20:01
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 11, 2025 04:19:45
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 11, 2025 04:06:30
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 11, 2025 04:05:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - कृष्णामाईच्या काठी थंडीचा 'गुलाबी' साज, निसर्ग झाला अधिक मोहक अँकर - सांगलीच्या ​पलूस तालुक्यात सध्या कृष्णा नदीच्या काठावर गुलाबी थंडीने हुडहुडी भरू लागली आहे.पार घसरत असल्याने आल्हाददायक धुक्याची चादर पसरल्याचे चित्र निर्माण झाले होते.गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असला तरी, या गारठ्याने नदीकाठच्या वातावरणाला एक मोहक असे रूप पाहायला मिळत आहे.​पहाटेच्या वेळी नदीच्या पाण्यावरून वाहणारी गार हवा आणि त्यावर हलके धुकं यामुळे परिसर एखाद्या चित्रांत रेखाटलेल्या दृश्याप्रमाणे भासत आहे.पलूस तालुक्यातील आमणापूर येथे कृष्णामाईचा शांत आणि स्थिर प्रवाह, आणि त्या प्रवाहावर थंडीमुळे निर्माण झालेला नीरव शांतता यामुळे वातावरण अधिकच रमणीय भासत आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 11, 2025 04:05:12
Satara, Maharashtra:सातारा - सातारा नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या भाजपच्या वतीने दिवसभर मुलाखती पार पडल्या यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे इच्छुक उमेदवार आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे इच्छुक उमेदवारांनी एकत्र मुलाखती दिल्या यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी आमच्या दोघांचे मनोमिलन कायम असल्याचे सांगत भाजप म्हणून आम्ही दोघे कमल चिन्हावर ही नगरपालिका निवडणूक लढवली जाणार असल्याचं यावेळी सांगितलं मात्र नगराध्यक्ष पदासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांची बैठक पार पडली यामध्ये नगराध्यक्ष कोणत्या आघाडीचा असावा याबाबत अजून एकमत झालेलं दिसत नाही.यावेळी खासदार उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतःच इच्छुक असल्याचे टिप्पणी पुन्हा केली आहे मात्र साताऱ्याचा नगराध्यक्ष कोण या प्रश्नाला बगल दिलीये म्हणजेच नगराध्यक्ष पदावरून या दोन्ही राजेंमध्ये एकवाक्यता झाली नसल्याचे समोर आले आहे
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 11, 2025 03:52:15
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीची विक्री करण्याचा निर्णय. इमारत विक्रीसाठी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ (एमएमआरडीए) कडून खरेदीचा प्रस्ताव. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने विक्रीचा प्रस्ताव मंजूर केला. आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी बँकेकडून इमारत विक्रीचा पर्याय निवडला. जिल्हा बँकेवर सुमारे 2,200 कोटींचे कर्ज; आर्थिक ताण वाढल्याने निर्णय. इमारतीचे शासनमान्य मूल्य निश्चित; व्यवहार आचारसंहितेनंतर पूर्ण होणार. एमएमआरडीएने शासनमान्य मूल्यावर खरेदी प्रस्ताव दिला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे विक्री प्रक्रियेचा अधिकार. 2019 मध्ये बांधलेली ही इमारत सुमारे 23 कोटी खर्चून उभारली होती. स्मशान भूमीवर असल्याने बँक तोट्यात जात असल्याने व्यवस्थापनाने अंधश्रधेपौटी थांबवला होता कारभार विक्री प्रस्तावावर अंतिम निर्णय शासनाच्या मंजुरीनंतर घेतला जाणार.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 11, 2025 03:30:57
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा अबकी बार 50 पारचा नारा - सोलापूर महानगरपालिकेतील 102 जागांसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून जोरदार तयारी, महायुतीतील घटक पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी तयार - सोलापूर महानगरपालिकेत अबकी बार 50 पारचा दिला नारा - राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिला नारा. - सुधीर खरटमल, माजी उपमहापौर विष्णू निकंबे, सिद्धाराम आळंदकर, चंद्रकांत दायमा अजित पवार पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला सत्कार - सोलापूर महानगरपालिकेत माजी महापौर, माजी उपमहापौर आणि नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या संपर्कात - राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची घेण्यात आली बैठक.. Byte : संतोष पवार, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष शहराध्यक्ष सोलापूर
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 11, 2025 03:22:43
Solapur, Maharashtra:बार्शी तालुक्यातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा एसटी महामंडळामुळे धोक्यात आलीय - बार्शीतून 5 वाजता बस खडकोणी गावाला सोडण्याचे वेळापत्रक आहे मात्र प्रशासनाकडून बस उशिरा सोडली जाते - त्यामुळे आगळगाव येथे शाळेला येणाऱ्या 44 मुलींना गावी परत जाण्यासाठी 7 वाजेपर्यंत वाट पाहावी लागतेय - त्यामुळे 5 ते 7 असे दोन तास मुलींना जीव मुठीत घेऊन बस स्टॉपवर बसावे लागतेय - पालकांनी आगारप्रमुखांकडे याबाबत वारंवार तक्रारी दिल्या आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते - त्यामुळे संबंधित दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जातेय
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 11, 2025 03:22:14
Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग - उमेदवारी जाहीर होत नसल्‍याने इच्‍छुकांची घालमेल. प्रचारासाठी वेळ कमी मिळणार असल्‍याने चिंता. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही. अँकर – नगरपालिका निवडणूकांसाठी रायगड जिल्ह्यात राजकीय पक्षांच्‍या आघाडीवर अजूनही म्‍हणावी तशी गडबड दिसत नाही. युती आघाडीच्या जंजाळात प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. कामाला लागा असे संकेत मिळाले असले तरी अधिकृत घोषणा होत नसल्‍याने इच्‍छुकांची घालमेल सुरू आहे. प्रचाराला कमी वेळ मिळणार असल्‍याने ही चिंता इच्‍छुकांना सतावते आहे. रायगड जिल्‍ह्यातील 10 नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सोमवारपासून सुरूवात झाली. मात्र काल दिवसभरात एकही अर्ज दाखल झाला नाही. चिन्ह वाटपानंतर प्रचारासाठी केवळ पाच दिवस मिळणार आहेत. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top