Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर के पूनम पार्क परिसर में भंगार गोदाम में रात की भीषण आग, दहशत

HPHARSHAD PATIL
Dec 12, 2025 01:30:54
Palghar, Maharashtra
पालघर पूर्वेला पूनम पार्क परिसरात भंगार गोदामाला रात्री भीषण आग लागली होती. विशेष म्हणजे रविवाशी संकुलात गोदाम असल्याने या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अनिग्शमन दलाच्या दोन गाड्यांची आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान भंगार गोदाममध्ये असलेल्या ज्वलनशील रासायनिक साठ्यांमुळे सदर आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर रहिवासी संकुलात या भंगार गोदाम मालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Dec 12, 2025 04:03:58
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या प्रशासनाचे मैदान गिळंकृत करण्याचे कारस्थान पुन्हा उजेडात आले आहे. शहरातील एकमेव व्यायामाचे मैदान असलेल्या रामबाग मैदानावर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या नव्या इमारत बांधकामासाठी भलेमोठे खोदकाम करण्यात आले आहे. चंद्रपूरकर नागरिकांनी याआधी दोनदा आंदोलन करून हे प्रयत्न हाणून पाडले होते. आता निवडणूकांच्या धामधुमीत मैदानावर गुपचूप महाकाय खड्डा खोदण्यात आलाय. आज सकाळी प्रहार सामाजिक संघटनेने नागरिक-विद्यार्थ्यांना एकत्र करत जोरदार आंदोलन केले. हा संपूर्ण भूखंड ,मैदान रुपात आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. रामबाग मैदान वाचविण्यासाठी निकराचा संघर्ष करण्याचा निर्धार नागरिकांनी केलाय.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 12, 2025 04:01:20
Latur, Maharashtra:लातूर - औसा रोडवरील प्राप्ती हाँटेलला मध्यरात्री भिषण आग... आगीत सिलेंडर टाकीचा ही झाला स्फोट... आगीत हॉटेलचे मोठे नुकसान.. वस्तीला असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली..... लातूर–औसा रोडवरील प्राप्ती हॉटेलला मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्टसर्किटमुळे हि आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडरचा हि मोठा स्फोट झाल्यामुळे संपूर्ण हॉटेल जळून खाक झालं आहे. मध्यरात्री औसा पोलिसांची गस्त सुरू असताना ही आग गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी तातडीने हॉटेल मालकांना झोपेतून उठवलं आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी वेळेवर हॉटेल मालकांना कळवल्यामुळे हॉटेलला लागून राहणारे कुटुंब.safe बाहेर काढण्यात यश आले आणि मोठी जीवितहानी टळली. आगीमध्ये हॉटेलचे सर्व साहित्य जळून खाक झाले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 12, 2025 04:00:30
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले में घरफोड़्या करणाऱ्या दोघांना इचलकरंजी शहरातील शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून तब्बल 53 लाख 74 हजार रुपये किंमतीचे 43 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटकेत घेतलेल्यांमध्ये हातकणंगले-तारदाळ येथील प्रल्हाद विठ्ठल कवठेकर आणि यड्राव येथील उदय माने यांचा समावेश आहे. या दोघांकडून 1 डिसेंबरला निमशिरगाव रोड, तारदाळ येथील घरफोडीसह आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर, हातकणंगले आणि कुरुंदवाड, तर सांगली ग्रामीण क्षेत्रातही गुन्हे केल्याची कबुली दोघांनी दिली आहे. अटक आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून संशयितांकडून अजूनही काही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 12, 2025 03:48:57
Dhule, Maharashtra:धुळे महापालिकेच्या निवडणूकसाठी भाजपत उमेदवार यांचा महापूर आल्याचे चित्र आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. धुळे महानगरपालिकेवर भाजपचे एकहाती सत्ता असून येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे अर्ज करण्यात आले आहेत. धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी भाजपाकडून 528 जणांनी इच्छुक म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत. नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती पक्षातर्फे घेण्यात येत असून सर्व मुलाखती झाल्यानंतर त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान भाजपा तर्फे निवडणूक लढू पाहणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असून तिकीट वाटप करताना पक्षाचे देखील दमछाक होणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 03:48:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील समितीने विलंबाने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आले आहेत. ७ हजार २१४ जन्म नोंदणीच्या प्रमाणपत्रांपैकी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे हमीपत्र नसलेली २ हजार ১৭३ प्रमाणपत्रे रद्द ठरवण्यात आली असून, उर्वरित ५ हजार ४१ प्रमाणपत्रे रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे. तर आतापर्यंत ४७ लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. या मोहिमेत राज्यातील हजारो बनावट जन्मनोंदणी प्रमाणपत्रे रद्द होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर शासकीय योजनांचा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 12, 2025 03:48:01
Chakan, Maharashtra:पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहत परिसरात वृक्षांची कत्तल करून उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी हजारो टन वृक्ष जाळले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल बुट्टे पाटील यांनी केला. या संदर्भात त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांना पत्राद्वारे कारवाई करण्याची विनंती केलीय. एकीकडे बिबट्याचा हल्ल्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले, तर या संदर्भात त्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांची भेट घेऊन या विषयात लक्ष घालण्याची विनंती केलीय. त्यामुळे पुढील काळात वन विभागाचे अधिकारी आणि प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 12, 2025 03:46:29
Washim, Maharashtra:वाशीम: हळदीचे दरात अलीकडे तेजी दिसून येत आहे. काल रिसोड कृषी उत्पन्न बाजार समित्यात हळदीला प्रती क्विंटल कमाल १५,१०० रुपये दर मिळाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात हळदीच्या लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. वाशिम आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समित्यांत हळदीची खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांना जिल्ह्यातच उत्तम बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कलही हळद लागवडीकडे अधिक वाढत आहे. मागील महिन्यात हळदीच्या दरात काहीशी घसरण झाली होती; मात्र डिसेंबरच्या सुरुवातीपासून दरात सातत्याने सुधारणा होत आहे. गेल्या आठवड्यात वाशिम बाजार समितीत कांडी हळदीला १२,७०० ते १४,३०० रुपये, तर गट्टू हळदीला ११,५०० ते १३,५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाले. तसेच रिसोड बाजार समितीत कांडी हळदीला किमान १३,००० रुपये दर मिळाला होता. हळदीचे वाढते दर आणि जिल्ह्यात सहज उपलब्ध बाजारपेठ यामुळे हळद उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 12, 2025 03:32:53
Dharashiv, Maharashtra:गेली 21 वर्षांपासून शिक्षकांचे विना वेतन ज्ञानार्जन शाळेला अनुदान मिळेना म्हणुन देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्याकडे मागीतली ईच्छा मरणाची परवाणगी अनेक आंदोलने पंतप्रधान राष्ट्रपतींना पत्रव्यवहार करुनही दखल नाही धाराशिव -गेली 21 वर्षांपासून विनावेतन विद्यार्थ्यांना शिकवण्याच काम करणाऱ्या शिक्षकांनी अखेर मागीतली ईच्छा मरणाची परवानगी मागितलीय. धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील भातागळी येथील अनुसुचित जाती मुला मुलींच्या निवासी आश्रम शाळेतील शिक्षक आणि संस्थाचालकांनी आत्तापर्यंत डझनभर मंत्र्यांना आणि राष्ट्रपतीसह पंतप्रधान यांना अनुदान मागणीसाठी पत्रव्यवहार करुनही संस्थापक आणि शिक्षकांना न्याय मिळत नाही. शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे झालेल्या शैक्षणिक नुकसानीस कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण होत आहे. धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये 165 शाळा विनाअनुदानित तत्वावर चालवल्या जात आहेत या 165 शाळांवरील 4 हजारहुन अधिक शिक्षकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. आयुष्यातली 21 वर्ष विनावेतन ज्ञानार्जन करुनही शिक्षकांवरती ईच्छामरण मागण्याची वेळ आलीय.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 03:19:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगरमध्ये लुटेरी दुल्हनचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात लग्नाच्या नावाने लुटणाऱ्या टोळीनंतर आता आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. कोरोना काळात पत्नीचे निधन झाल्याने दुसरे लग्न करू इच्छिणाऱ्या राजस्थान येथील एका सलून चालकाला शहरातील एका टोळीने बोलावले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून १ लाख ३० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर नवरी तिच्या मैत्रिणीसह मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून रात्रीच पळून गेल्याने फसवणूक झालेल्या तरुणाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, नवरी मात्र अजूनही फरार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 12, 2025 03:19:25
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करत एकूण पाच जणांना अटक केली. कारंजा शहरात राहणारा एक तरुण बनावट नोटा विक्रीचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती पोलिस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी इम्मी निनसुरवाले या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी घेतलेल्या चौकशीत त्याने ६९ बनावट ५०० रुपयांच्या नोटा बाळगल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पीसीआर मंजूर केली. पीसीआरदरम्यान केलेल्या चौकशीत इम्मीने आपल्या टोळीतील इतर सदस्यांची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कारंजा पोलिसांनी तत्काळ पथके रवाना करून भिवंडीहून एक, मनमाडहून एक आणि नाशिकहून दोन अशा चार जणांना अटक केली. सर्व आरोपींना कारंजा पोलिस ठाण्यात आणून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कारंजा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या रॅकेटमागील मूळ सूत्रधार आणि बनावट नोटांची उगमस्थाने शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. बाइट: दिनेश चंद्र शुक्ला, पोलिस निरीक्षक
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 03:19:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर येत असून, सरकारने संभाव्य कर्जमाफीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नुकतेच पत्र पाठवले आहे. बँकांनी अनेक्क्षर ए आणि बी ची माहिती तयार करून ठेवावी, असे या पत्रात नमूद केले आहे. सोबतच सुधारित नमुन्यातील माहिती तयार करून ठेवण्यात यावी व महाआयटीकडून पोर्टल कार्यान्वित झाल्यावर ती पोर्टलवर भरण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना पत्राद्वारे देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या माहितीची जुळवाजुळव सुरू झाली असून, सरकारकडून मोठी घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 12, 2025 03:05:02
Nashik, Maharashtra:झी 24 तासने शिक्षण क्षेत्रातील केला होता मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सखोल तपासानंतर कारवाईला सुरुवात नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंकालक बी. बी. चव्हाण आणि नंदुरबारचे शिक्षणाधिकारी निलंबित. आतापर्यंत चार शिक्षणाधिकारी दोन उपसंचालक अटकेत शालार्थ क्रमांक / वैयक्तिक मान्यतांच्या घोटाळ्यात सहभाग चौकशीदरम्यान चौकशी पथकाला सहकार्य न केल्याचा आरोप. एका शाळेत बोगस शिक्षक भरती केल्यामुळे शासनाला आर्थिक नुकसान. संबंधित प्रकरणात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक व शिक्षण निरीक्षक यांच्यासह चव्हाण यांच्यावरही गुन्हा दाखल. गुन्हा मालेगाव पवारवाडी पोलीस ठाण्यात नोंद. या सर्व गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांना सेवेतून निलंबनाची कारवाई.
0
comment0
Report
Advertisement
Back to top