Back
विरार हत्या मामले में गैंगस्टर सुभाष सिंह ठाकूर गिरफ्तार, मुंबई लाने की तैयारी
PTPRATHAMESH TAWADE
Dec 16, 2025 02:48:41
Virar, Maharashtra
विरार मधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुख्यात गॅंगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तरप्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहात अटक केली आहे. मंगळवारी त्याला वसईत आणले जाणार आहे.
विरार मध्ये राहणार्या समय चौहान या चाळ बिल्डरची २६ फेब्रुवारी २०२२ रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १३ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गॅंगस्टर सुभाष सिंग ठाकूर हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. तो जेजे हत्या प्रकरणात उत्तरप्रदेशात फतेहगढ कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र २०१९ पासून उपचाराच्या नावाखाली बनारस हिंदू विद्यापीठाच्या सर सुंदरलाल रुग्णालयात रुग्णालायत होता. त्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करता येत नव्हती. २०२४ मध्ये सुभाषसिंग ठाकूर याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर सुभाषसिंग ठाकूर याला वसईत आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती.
सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि कारागृहातून सुभाषसिंग ठाकूर याचा ताबा घेतला. त्याला मंगळवारी मुंबईत आणले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowDec 16, 2025 10:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:520
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 16, 2025 10:54:250
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 16, 2025 10:53:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 10:08:130
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 16, 2025 10:04:090
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 16, 2025 09:26:100
Report
KJKunal Jamdade
FollowDec 16, 2025 09:07:470
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 16, 2025 09:07:310
Report
PNPratap Naik1
FollowDec 16, 2025 08:49:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 08:17:050
Report
KPKAILAS PURI
FollowDec 16, 2025 08:16:310
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 16, 2025 08:11:120
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 16, 2025 08:05:240
Report