Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

उमरगा के कदेर क्षेत्र में ओलों से खेतों को बड़ा नुकसान, किसान परेशान

DPdnyaneshwar patange
Mar 17, 2026 14:45:56
Dharashiv, Maharashtra
धाराशिव के उमरगा तालुक के कदेर क्षेत्र में ओलों की बारिश से खेती पिकों को नुकसान हुआ है। अचानक गर्मी के मौसम में आई वर्षा के कारण कटाई के लिए तैयार प्याज, ज्वार और गेहूं की फसलें भारी नुकसान उठाई हैं। ओलों की वर्षा और अवकाळी बारिश ने किसानों की चिंता बढ़ा दी है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 16:15:30
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिलेातील सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील पेपर चोरी प्रकरणानंतर ही उद्या भूगोल विषयाचा दहावीचा पेपर नियमित वेळेत पार पडणार आहे. सदर पेपर चोरी घटनेस जबाबदार केंद्र संचालक आणि गटशिक्षणाधिकारी यांचे निलंबन केले जाणार. सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर प्रशालेत आज सकाळी दहावीच्या भूगोल विषयाचे प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेल्याचा प्रकार अनुभवास आला होता. स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडून एका व्यक्तीने सदर पेपर चोरी केले होते. या प्रकरणानंतर दहावीचा भूगोल विषयाचा पेपर उद्या होणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र उद्या नियमित वेळेत दहावीचा भूगोल विषयाचा पेपर होईल अशी माहिती सोलापुर माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे. सांगोलाबाद विद्यामंदिर प्रशाले पेपर चोरी प्रकरणी केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक अमोल गायवाड आणि गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांचे निलंबन होणार असल्याची माहिती सुद्धा माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांनी दिली आहे
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 17, 2026 15:33:13
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावातील ॲसिड हल्ला प्रकरण... सहावी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला.. आरोपी फरार.. पोलिसांकडून शोध सुरू.. अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.. घरापासून साडेचार किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत घेत होती सहावी इयत्तेत शिक्षण... घरापासून शाळेत जाण्यासाठी रोज सायकवरून प्रवास... मुलीच्या घरची परिस्थिती सामान्य... वडील नसल्याने आई आणि मुलगी मामाकडे राहायला होती.. घरात आई , लहान भाऊ आणि मुलगी असा परिवार... शाळेुतून परतत असताना झाला हल्ला.. मुख्य रस्त्यापासून घर वस्तीवर असल्याने छोटा रस्ता.. निर्जनस्थळ बघून आरोपीने केले कृत्य... मुलीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घेतली धाव... पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू... मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू... उजव्या बाजूचा चेहरा भाजला... नराधमाला तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी.. कुटुंबीयांची मागणी...
956
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 17, 2026 14:19:15
Akola, Maharashtra:अकोला शहरातील दक्षता नगर पेट्रोल पंपाजवळील उड्डाण पुलावर एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही गाडी रत्नागिरी येथील असून या वाहनात पाच प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, अचानक वाहनातून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण वाहन जळून खाक झाले होते.दरम्यान, या आगीमुळे उड्डाण पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
1099
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 13:50:32
1049
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 17, 2026 13:50:21
Satara, Maharashtra:सातारा -जावली पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे सौरभ शिंदे यांची निवड झाल्यानंतर महायुतीत मतभेद उघड झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. कदम म्हणाले की, निवडणुकीत आम्हाला अंधारात ठेवून दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केली आणि जावलीच्या जनतेचा विश्वासघात केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर सदस्यांच्या मदतीने ‘ईश्वर चिठ्ठी’द्वारे सभापती निवडण्याचे ठरले होते, मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतल्याने भाजपचा विजय झाला.या घडामोडींमुळे जावलीतील महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
1076
comment0
Report
CFChandrakant Funde
Mar 17, 2026 13:21:05
1022
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 17, 2026 13:00:48
1039
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 17, 2026 12:46:00
Ahilyanagar, Maharashtra:आखाती देशांमध्ये सुरूलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातील विविध उद्योगांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा फटका केवळ मोठ्या उद्योगांनाच नाही, तर छोट्या व्यावसायिकांनाही बसताना दिसतोय. हॉटेल व्यवसाय आणि नाश्ता सेंटर चालक सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. व्यावसायिक गॅसवर निर्बंध आल्यामुळे नाश्ता सेंटर चालकांना आता चुलीवर नास्त्याचे पदार्थ तयार करावे लागत आहेत. गॅस मिळत नसल्याचा परिणाम नाश्ता सेंटर कडून अनेक पदार्थ तयार होत नाहीत त्याबरोबरच आगामी काळात भाव वाढ देखील करावी लागेल या मनस्थितीत नाश्ता सेंटरचे मालक आहेत अहिल्यानगरच्या नाश्ता सेंटर वरून आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
1011
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 17, 2026 12:37:32
Ahilyanagar, Maharashtra:मुंबई आझाद मैदानावर कला शिक्षक भरतीसाठीच्या सुरू असलेल्या कला शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगरच्या स्माईलींग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे... अहिल्यानगरच्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी हे आंदोलन सुरू असून आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली...जवळपास मागच्या पंधरा वर्षांपासून राज्य सरकारकडून कला शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही...यंदाच्या शिक्षक अभियोग्यता चाचणीत राज्यातील हजारो कला शिक्षकांनी सहभाग घेतला आहे, संच मान्यता प्रक्रिया देखील सुरू आहे, मात्र संचमान्यता आणि बिंदूनमावलीत कला शिक्षकांचा विचार केला गेला नसल्याने राज्यातील हजारो शिक्षक हे 12 मार्चपासून मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करत आहेत... 500 विद्यार्थ्यांमागे एक कलाशिक्षक असे शासनाचे अन्यायकारक धोरण आहे. ही अन्यायकारक जाचक अट तात्काळ रद्द करावी, कला शिक्षकांचे बिंदू नामावली तात्काळ करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
1069
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 17, 2026 12:37:04
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील पारोळा चौफुली जवळ एका शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे शहराजवळील पारोळा चौफुलीच्या उड्डाणपुलाजवळ शिवशाही बसला अचानक आग लागली. सुदैवाने आगीत एकही प्रवासी नसल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. एसटी वर्कशॉप मधून काम केल्यानंतर सदर शिवशाही बस ही आरटीओ ऑफिसला पार्सिंग साठी जात होती. यावेळी अचानक इंजिन जवळ शॉर्टसर्किट होऊन शिवशाही बसच्या केबिनला आग लागली. दरम्यान आग लागल्याची घटना कळताच लागलीच धुळे महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. यावेळी शर्तीचे प्रयत्न करत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणती जीवित हानी झाली नसून एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे.
1029
comment0
Report
Advertisement
Back to top