Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411001
सीसीटीवी लगने से केंद्रों के परिणाम 60-70% घट, कई केंद्रों में 90% तक गिरावट
CFChandrakant Funde
Mar 17, 2026 13:21:05
Pune, Maharashtra
राज्य परिक्षा परिषदेनं संशयास्पद परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवताच तिथला निकाल तब्बल 60 ते 70 टक्क्यांनी घसरल्याची धक्कादायक बाब समोर आलीय... संगणक टंकलेखन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील इयत्ता आठवीं्या शिष्यवृत्ती परिक्षा निकालाच्या तौलानिक पडताळणीत ही गंभीर समोर आलीय... काही परीक्षा सेंटर्सचा निकाल तर गेल्या वेळेपेक्षा तब्बल 90 टक्क्यांनी खाली आलाय... थोडक्यात ऑनलाईन सीसीटीव्ही यंञणेचा या संशयास्पद परिक्षा केंद्रांना मोटा दणका बसलाय, अशी माहिती परिक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बिडसे यांनी झी 24तासला दिलीय...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 17, 2026 14:19:15
Akola, Maharashtra:अकोला शहरातील दक्षता नगर पेट्रोल पंपाजवळील उड्डाण पुलावर एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही गाडी रत्नागिरी येथील असून या वाहनात पाच प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, अचानक वाहनातून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण वाहन जळून खाक झाले होते.दरम्यान, या आगीमुळे उड्डाण पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 13:50:32
996
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 17, 2026 13:50:21
Satara, Maharashtra:सातारा -जावली पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे सौरभ शिंदे यांची निवड झाल्यानंतर महायुतीत मतभेद उघड झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. कदम म्हणाले की, निवडणुकीत आम्हाला अंधारात ठेवून दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केली आणि जावलीच्या जनतेचा विश्वासघात केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर सदस्यांच्या मदतीने ‘ईश्वर चिठ्ठी’द्वारे सभापती निवडण्याचे ठरले होते, मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतल्याने भाजपचा विजय झाला.या घडामोडींमुळे जावलीतील महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
1052
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 17, 2026 13:00:48
1016
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 17, 2026 12:46:00
Ahilyanagar, Maharashtra:आखाती देशांमध्ये सुरूलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातील विविध उद्योगांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा फटका केवळ मोठ्या उद्योगांनाच नाही, तर छोट्या व्यावसायिकांनाही बसताना दिसतोय. हॉटेल व्यवसाय आणि नाश्ता सेंटर चालक सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. व्यावसायिक गॅसवर निर्बंध आल्यामुळे नाश्ता सेंटर चालकांना आता चुलीवर नास्त्याचे पदार्थ तयार करावे लागत आहेत. गॅस मिळत नसल्याचा परिणाम नाश्ता सेंटर कडून अनेक पदार्थ तयार होत नाहीत त्याबरोबरच आगामी काळात भाव वाढ देखील करावी लागेल या मनस्थितीत नाश्ता सेंटरचे मालक आहेत अहिल्यानगरच्या नाश्ता सेंटर वरून आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
1011
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 17, 2026 12:37:32
Ahilyanagar, Maharashtra:मुंबई आझाद मैदानावर कला शिक्षक भरतीसाठीच्या सुरू असलेल्या कला शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगरच्या स्माईलींग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे... अहिल्यानगरच्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी हे आंदोलन सुरू असून आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली...जवळपास मागच्या पंधरा वर्षांपासून राज्य सरकारकडून कला शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही...यंदाच्या शिक्षक अभियोग्यता चाचणीत राज्यातील हजारो कला शिक्षकांनी सहभाग घेतला आहे, संच मान्यता प्रक्रिया देखील सुरू आहे, मात्र संचमान्यता आणि बिंदूनमावलीत कला शिक्षकांचा विचार केला गेला नसल्याने राज्यातील हजारो शिक्षक हे 12 मार्चपासून मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करत आहेत... 500 विद्यार्थ्यांमागे एक कलाशिक्षक असे शासनाचे अन्यायकारक धोरण आहे. ही अन्यायकारक जाचक अट तात्काळ रद्द करावी, कला शिक्षकांचे बिंदू नामावली तात्काळ करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
1069
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 17, 2026 12:37:04
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील पारोळा चौफुली जवळ एका शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे शहराजवळील पारोळा चौफुलीच्या उड्डाणपुलाजवळ शिवशाही बसला अचानक आग लागली. सुदैवाने आगीत एकही प्रवासी नसल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. एसटी वर्कशॉप मधून काम केल्यानंतर सदर शिवशाही बस ही आरटीओ ऑफिसला पार्सिंग साठी जात होती. यावेळी अचानक इंजिन जवळ शॉर्टसर्किट होऊन शिवशाही बसच्या केबिनला आग लागली. दरम्यान आग लागल्याची घटना कळताच लागलीच धुळे महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. यावेळी शर्तीचे प्रयत्न करत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणती जीवित हानी झाली नसून एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे.
1029
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 17, 2026 12:36:45
Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपूर जिल्ह्यात नागभिड तालुक्यातल्या गोसेखुर्द कालव्यात पडलेल्या नीलगायीला जीवदान, वनविभाग आणि स्वाब वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी 2 तासांचे बचावकार्य राबविले. नागभिड तालुक्यात तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्रातील मौजा सावंगी येथील गोसेखुर्द कालव्यात नर नीलगाय पडल्याची घटना पुढे आली. 'स्वाब' संस्था आणि वनविभागाच्या पथकाने तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर या नीलगायीला सुखरूप बाहेर काढले. कालव्याच्या खोल पाण्यात अडकलेल्या नीलगायीला बाहेर काढण्यासाठी जाळे आणि दोरखंडाचा वापर करण्यात आला. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर तिला बाहेर काढण्यात यश आले. पशुवैद्यकीय अधिका-यांनी तपासणी केल्यानंतर नीलगायीला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले. पवनी ते चंद्रपूर जाणारा हा गोसेखुर्द कालवा तळोधी वनक्षेत्रातून जातो. हा कालवा उघडा असल्याने या भागात वन्यप्राणी अडकून पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वन्यप्राण्यांच्या भ्रमणासाठी कालव्यावर ठराविक अंतरावर पुलांची सोय करणे आणि जनावरांना बाहेर पडण्यासाठी पायऱ्या तयार करणे आवश्यक असल्याची मागणी स्वाब वन्यजीव संस्थेने केली आहे.
1072
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 17, 2026 12:36:23
Nagpur, Maharashtra:नागपूर में हिंदू सम्मेलन के विवादित वक्तव्य पर कांग्रेस ने राष्ट्रपिता महात्मा गांधी विरोधी टिप्पणी का केस मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ में दाखिल किया गया। नागपुर पोलीस आयुक्त, गृह विभाग, आयोजक निशांत गांधी और वक्ते पुष्पेन्द्र कुलश्रेष्ट यांच्याला नोटीस जारी करण्यात आली. कथित आक्षेपार्ह वक्तव्य के बारे में आरोप, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी याचिका दाखल केली. पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात विलंब झाल्याचा दावा. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपुरातील चिटणीस सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात वक्तव्याचा आरोप. कार्यक्रमाचे आयोजन निशांत गांधी यांनी केल्याचा याचिकेत उल्लेख. वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता. २८ फेब्रुवारीला Sitabuldi Police Station येथे तक्रार, ४ मार्चला पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार. तक्रारीनंतरही गुन्हा नोंद न झाल्याचा दावा. राज्य सरकार, नागपूर पोलिस आयुक्त व सीताबर्डी पोलिसांना प्रतिवादी करण्यात आले. भारतीय दंडविधीच्या कलम 353(1)(ब)(क) आणि 356 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी. पुढील सुनावणीत काय होत याकडे लक्ष.
1010
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 12:17:41
Junnar, Pune, Maharashtra:पुण्याच्या ओतूरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. दहावीची परीक्षा सुरू असताना, चक्क भर वर्गात घुसून एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचं समजतंय, पण या घटनेनं परीक्षा केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट... पुणे जिल्ह्याच्या ओतूरमधील विद्यालयात... दहावीची परीक्षा सुरू होती, विद्यार्थी शांतपणे पेपर लिहीत होते. पण अचानक वर्गात एक तरुण हातात कोयता घेऊन घुसतो आणि एका १६ वर्षाच्या १० वी मध्ये शिक्षण घेणाय्रा अल्पवयीन विद्यार्थ्यावर थेट वार करतो. या अनपेक्षित हल्ल्यामुळे वर्गात एकच खळबळ उडली आणि शांत असलेल्या परीक्षा केंद्रावर रक्ताचा सडा पडला. धक्कादायक म्हणजे हल्ला करणारा विद्यार्थीही अल्पवयीन असून तो अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थांवर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने शाळेत धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, आरोपी आणि जखमी विद्यार्थी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने थेट परीक्षा केंद्र गाठलं. पोलिसांनी या प्रकरणी मुख्यपडलारोपीसह त्याच्या इतर ४ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतलंय.. सध्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेनं शालेय परिसरात होणारी गुन्हेगारी आणि अल्पवयीन मुलांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय बनली आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया ओतूर जुन्नर..
1036
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 17, 2026 12:16:48
Kalyan, Maharashtra:Dombivali इलेक्ट्रिक फिडरच्या पिलरला स्पर्श होताच चिमुरड्याचा मृत्यू टिळकनगर पोलिसांकडून चौकशी सुरू जिजाईनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली. याच परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या फिडर पिलरला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का लागून मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरला आहे. कृष्णा संजय यादव (वय ७ वर्ष ९ महिने) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. संजय यादव यांचा लहान मुलगा कृष्णा हा शाळेला सुट्टी असल्याने विठ्ठल कृपा बिल्डींगच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बॉल खेळत होता. त्याचा बॉल यमुना अर्जुन सोसायटीसमोर कॉर्नरला असलेल्या लाईटचा फिडर पिलर जवळ गेला. बॉल काढत असताना स्पर्श झाल्याने कृष्णा फिडरच्या पिलरला चिकटून बेशुद्ध पडला. हे पाहून परिसरातील रहिवाशांनी तत्काळ उचलून त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र मृत घोषित केले. याबाबत टिळकनगर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
1086
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 17, 2026 12:02:59
Rui, Maharashtra:बारामती मधून लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद लक्ष्मण हाके बारामती बाईट ऑन बारामती दौरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बारामती विधानसभा पोट निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे कार्यकर्त्यंचं म्हणणं आहे की ही पोटनिवडणूक लढली पाहिजे त्या पार्श्वभूमीवर मी बारामतीकरांच्या भेटी घेत आहे. पुढील चार-पाच दिवस मी नागरिकांच्या भेटीसाठी येणार आहे. निवडणूक लढली पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे निवडणूक बिनविरोध करणं हे लोकशाही विरोधी कृती आहे इथे सहानुभूती आहे दादांचं अपघाती निधन चालू आहे बारामतीकरांच्या मनात दुःख असणं हे स्वभाविक आहे. एक महिला महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली ही गोष्ट ही अपेलिंग आहे. जर अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल एवढं दुःख असेल तर सुनेत्रा पवारांना तुम्ही बिनविरोध विधान परिषदेवर घ्या राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आमचं पंचायत राज मधलं आरक्षण गेलं आहे आम्हाला माणसांना मिळत नाही बजेट मिळत नाही आम्ही निवडणुकीला उभे राहतोय यांच्या पोटात गोळा आम्हाला बदनाम करताय आम्हाला खलनायक करताय मग तुम्ही शरद पवार पार्थ पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं ना तुमच्या धमक असेल तर तुम्ही कोणताही उमेदवार उभा करा आम्ही तुम्हाला पराभूत करून दाखवू हा विश्वास द्यायला मी बारामती चालू आहे ऑन लक्ष्मण हाके उमेदवार कोणीही उमेदवार असेल एखादा साधाही उमेदवार इथला असेल सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर बिनविरोध द्या ऑन युगेंद्र पवार आमच्याही मनात दुःख आहे मग तुम्ही सुनेत्रा पवारांना वरिष्ठ सभागृहात बिनविरोध पाठवा जनतेचे प्रश्न जिथल्या तिथे आहेत सर्व श्रीमंत मंडळी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला जातात आम्ही चळवळीतील मंडळी जिथल्या तिथेच आहोत जनसामान्यांनी नक्की विश्वास कोणावर ठेवायचा आम्ही किती दिवस आंदोलन करायची बारामतीची निवडणूक शासनाचे विरोधात आम्ही ठामपणे लढवू एक महाराष्ट्राची महिला उपमुख्यमंत्री झाली दादांची पत्नी आहे दुःखद घटना आहे जसं तुम्ही शरद पवारांना पार्थ पवारांना वरिष्ठ सभागृहात पाठवलं तसं तुम्ही सुनेत्रा पवारांना विधान परिषदेत घ्या बारामती तुम्ही दुसरा उमेदवार द्या आम्ही त्याला पराभूत करून दाखवू आम्ही लढणार आहोत पण अजून एक आम्ही त्यांना संधी देत आहोत आम्ही माणस आहोत आम्हाला संवेदना कळतात दुःखद प्रसंग कळतो तुमच्या मनात जी भावना आहे तीच आमच्या मनात आहे पण आम्हाला प्रत्येक प्रश्नावर बेदखल का करत आहात कधी ही मुख्यमंत्रींनी फोन केला नाही तिथल्या राज्यकर्त्यांनी फोन केला नाही कालच्या बजेटमध्ये तरतूद केली आम्ही प्रश्न मांडायचे कुठे ऑन विधानसभा कोणी लढवावी कोणते पवार चालतील दादांच्या कुटुंबा व्यतिरिक्त कोणतेही पवाराने निवडणूक लढवावी आम्ही त्यांना पराभूत करून दाखवू ऑन मतदारांना आवाहन मतदार योग्य तो निर्णय घेतील ऑन लक्ष्मण हाके यांना बारामतीची निवडणूक का लढायची आहे बारामती परिसरातील ओबीसी बांधवांचा आग्रह आहे बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात आम्ही पोहोचू आम्ही संविधान चांगलं जाणतो तिथे हुकूमशाही घराणेशाही हा प्रश्न लोकशाहीत प्रश्न उरत नाही जनतेच्या प्रश्नावर निवडणुका लढवल्या जातात याच प्रश्नावरून आम्ही निवडणुकीकडे पाहतोय परत एकदा सांगतो सुनेत्रा ताईंना विधान परिषदेवर बिनविरोध घ्यावे या सत्ताधाऱ्यांनी एक उमेदवार आमच्या समोर द्यावा आम्ही निवडणुकीला सामोरे जातो राहुरीला निवडणूक लागते बारामती देखील निवडणूक लागणार लोकशाहीतील सर्व मार्गाचा अवलंब आम्ही चळवळीतील कार्यकर्ते म्हणून करणार ऑन भावनिक वातावरण बारामतीकर साथ देतील का जनता भावनिक आहे सर्वसामान्य माणसं दुःखी आहेत सर्वसामान्य माणसं दादाच्या अपघातानंतर तर दुःखी होतीच पण रोहित पवार यांच्या प्रेझेंटेशन मुळे अजून ही लोक संभ्रम अवस्थेत आहेत एक बाजूला शरद पवार म्हणतात की हा घातपात नसून अपघात आहे दुसरीकडे त्यांचाच नातू जो त्यांचा वारस बनू पाहतोय तो म्हणतोय की हा घातपात आहे पवार साहेबांची एक भूमिका आणि रोहित पवार यांची एक भूमिका हे काय गौडबंगाल आहे आम्हाला कळालं नाही सत्ताधाऱ्यांचं नक्की काय गौडबंगाल आहे त्यामुळे जनतेच्या मनात दुःखाची भावना आहे पण सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता कळते सत्तेतील टायमिंग कळतं राजकारणातील स्पिरिट शोधायला रोहित पवार रात्रंदिवस पत्रकार परिषद घेत आहेत ऑन अजित पवारांचा घातपात की अपघात महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या अनेक प्रश्नाबाबत ही निवडणूक आहे आजच्या महाराष्ट्रातील जनतेचे इकडे लक्ष आहे मुख्यमंत्री महोदय परत एकदा ऐका
1083
comment0
Report
SKShubham Koli
Mar 17, 2026 11:31:25
Thane, Maharashtra:ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष; आई तुळजाभवानी मंदिराची भव्य प्रतिकृती ठाकरे बंधू एकत्र उपस्थित दर्शन घेणार? चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर यंदाही चैत्र नवरात्रोत्सवाचा भक्तीचा महासागर उसळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे उत्सवाचे हे ३१ वे वर्ष असून, यंदा धाराशिव येथील आई तुळजाभवानी मंदिराची ७० फूट उंच भव्य प्रतिकृती ठाणेकरांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे अनेक राजकीय नेते दर्शनकरिता येत असतात मात्र यंदा ठाकरे बंधू यांच्या युतीमुळे दोन्ही ठाकरे बंधू दर्शनाकरिता येतील व जे युद्ध चालू आहे ते थांबावे अशी देवीकडे प्रार्थना करतो असे यावेळी विचारे म्हणाले आहेत... गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता कळवा बाजारपेठ येथून देवीचा आगमन सोहळा सुरू होईल. ३०० जणांचे लेझीम पथक, वारकरी संप्रदाय, झांज पथक, बँड, घोडेस्वार, आदिवासी नृत्य, दांड पट्टे आणि मावळ्यांच्या लवाजम्यासह ही मिरवणूक काढण्यात येणार आहे.
987
comment0
Report
Advertisement
Back to top