Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

राज्य के उपमुख्यमंत्री अजित पवार के अकाली निधन से पूरी राज्य में शोक

SGSagar Gaikwad
Jan 29, 2026 10:33:42
Nashik, Maharashtra
अँकर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं अकाली निधन झाल्याने संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेले अजित पवार हे अचानक गेल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाशिक महापालिकेच्यावतीने सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांनी नाशिकच्या राजीव गांधी भवन येथे अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Jan 29, 2026 12:57:52
Pune, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारावरती मोठा परिणाम झालाय,तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार सारिका करपे यांच्या कडून साध्या पद्धतीने घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय,पवार परिवाराच्या छत्रछायेखाली आम्ही वाढलोय पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्राचा चेहरा मोहरा या कुटुंबाने बदलण्याचं काम केलंय मात्र आज दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालोय, स्थानिक राजकिय कुरघोडीमुळे आम्हाला शिंदे साहेबांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करावा लागला असून या पुढच्या काळात अजित दादा सारखाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याचा विकास करतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या उमेदवार सारिका करपेंनी व्यक्त केलाय.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 29, 2026 12:45:22
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने 44 नगरसेवकांची शहर सुधार आघाडी तयार केली आहे. 80 नगरसेवकांची संख्या असलेल्या अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 41 नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपकडे असलेल्या 44 नगरसेवकांच्या बळावर महापौर आणि उपमहापौर पद भाजपकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान, काँग्रेसने मात्र आशावाद कायम ठेवत भाजपविरोधी सर्व पक्षांची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित केली.या बैठकीला काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उबाठा, एमआयएम तसेच अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. उद्या होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत सत्ता आम्हीच स्थापन करू, असा दावा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 29, 2026 12:32:34
Chandrapur, Maharashtra:मनपा सत्ता संघर्षात राजकीय क्षेत्रातून एक मोठी घडामोड पुढे आली आहे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेसाठी गुंडगिरीचा वापर होताना बघायला मिळालाय. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर नगरसेवकांची ट्रॅव्हलर गाडी अडवून त्यांना पळवून लावण्याचा प्रकार समोर आलाय, यामुळे चंद्रपुरातील सत्ता संघर्षाला धोकादायक वळण लागण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील येळाकेळी टोल नाक्याजवळ सकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंबईवरून चंद्रपूर मनपाच्या काँग्रेसच्या नगरसेवकांना नागपुरात घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर अडवून पाच नगरसेवकांना जबरदस्तीने खाली उतरवून पळवून नेण्याचा प्रकार पुढे आला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमधील 2 गटात सत्ता स्थापनेसाठी तीव्र संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून बहुमताचा दावा केला जात असताना, मुंबईहून चंद्रपूरकडे परतणाऱ्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या ट्रॅव्हल्सला चेहरे झाकलेल्या काही 15 अज्ञात व्यक्तींनी टोल नाक्याच्या आधी आपली गाडी लावून अडवले. या प्रकाराने तणाव अधिकच वाढला. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, सुमारे 10 ते12 आरोपी फरार आहेत. ट्रॅव्हल्स अडवणाऱ्यांविरोधात सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे—हे गुंड नेमके कोणी पाठवले? महानगरपालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी थेट गुंडांचा वापर करण्यात आला का? हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी नवीन नाही. पक्षाच्या 2 गटातील संघर्ष चर्चेत आहे. मात्र आता महानगरपालिकेच्या सत्तेसाठी समृद्धी महामार्गावर गुंडांचा वापर झाल्याने राजकारणाने अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. या घटनेमुळे चंद्रपूरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीस तपासातून सत्य समोर येईल का, आणि अखेर महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 29, 2026 12:15:29
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 29, 2026 10:23:52
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : सध्या सर्वच वयोगटात मोबाईल पाहण्याचा प्रमाण वाढलंय मात्र याचा सर्वात मोठा फटका लहानग्यांना बसतोय, मोबाईलच्या अति वापरामुळे त्याच्यावर सातत्याने हलणारी चित्र पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होतोय इतकाच नाही तर त्यांच्या मेंदूवर सुद्धा भीषण परिणाम होत असल्याचं आता पुढे आलंय त्यामुळे लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका असंच आवाहन तज्ञांकडून करण्यात येते आहे.. लहानग्यांच्या हातातील मोबाईल टाईम बॉम्ब मोबाईलच्या अतिवापरामुळे 30% मुलांचे डोळे खराब मोबाईलचा वापर मेंदूवर करतोय भीषण परिणाम मोबाईल प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी वस्तू, उगाच वेळ घालवायला उत्तम साधन, त्यामुळे सर्वच वयोगटात तो पहिला जातो, खरं तर अति मोबाईल वापराने सगळ्यांना त्रास होतो मात्र सगळ्यात जास्त फटका बसतोय तो लहानग्यांचा; जेवताना, मूल रडत असेल तर त्याला मोबाईल देण्याचा प्रकार सर्रास दिसतो आणि नेमका याच मूळ मोबाईल पाहण्याची आसक्ती मुलांमध्ये दिसतेय.. मोबाईल दिल्यावर काही प्रमाणात सुरुवातीला मुलांचा हट्ट कमी होतो मात्र नंतर हा वाढतो खास करून दोन ते पाच वर्षांपर्यंत मुलांना मोबाईल वरील हलणारी चित्र पाहायला दिल्याने त्यांच्या डोळ्यावर भीषण परिणाम होतोय, डोळ्यातून पाणी येतंय, डोळे तिरळे होत आहेत मुलांना अकाली चष्मा लागतोय डोळ्याचे स्नायू दुखावताय अशा रुग्णांचे प्रमाण आता डोळ्यांच्या दवाखान्यात वाढलेला आहे.. 2 ते 5 वयोगटात मुलांना ही स्क्रीन अर्धा तास पेक्षा जास्त नको मात्र हे पाळले जात नाही, त्यामुळे लहानगांच्या हातात मोबाईल देऊच नका असं डोळ्यांचे डॉक्टर सांगतात. मोबाईल फक्त डोळ्यांपर्यंतच मर्यादित नाही तर मेंदूवर सुद्धा परिणाम करतोय.. मोबाईलच्या वापरामुळे मुलं चिडचिडे होत आहेत, निद्रानाश होतोय, एकाग्रता राहत नाही, अभ्यासात लक्ष राहत नाही त्यामुळे पालक वेगळ्या आजाराकडे वळतात म्हणून मानसोपचार तज्ञ सुद्धा मोबाईल टाळा म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने 18 ते 24 महिन्यापेक्षा छोटा बाळाला स्क्रीन टाइम शून्य असावा, 2 वर्षांच्या मुलाला फक्त 20 मिनिटे, 2 ते 5 वर्षापर्यंत आठवड्यात 2 ते 3 तास, 6 ते 12 वयोगटात 2 तासांपेक्षा कमी वेळ, 20 मिनिटांच्या स्क्रीन टाइम नंतर 20 फूट दुरवरील वस्तू किमान 20 सेकंद पाहावी, 20-20-20 नियम लागू. अंधत्व झाले नाही, परंतु नजीक दिसण्याच्या समस्या myopia वाढत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 29, 2026 10:08:22
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 2 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. पार्थ दाखल करण्यासाठी सोमवारी सकाळी दहा ते साडेअकरा पर्यंतची वेळ देण्यात आलीय. पुणे विभागीय आयुक्तांनी महापौर, उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार नगरसचिव प्रवीण दंत काळे यांनी बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता सोलापूरचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Jan 29, 2026 09:46:59
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 29, 2026 09:46:47
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू ते मूर्तिजापूर रोडवर आज सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे कुटुंब नाशिकहून परतवाडा येथे जात असतान बोरगाव मंजू जवळ वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच वाहनाच्या धडकेत तीन जनावरांचाही मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी व मृतांना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Jan 29, 2026 09:16:15
Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग - अलिबाग मतदार संघात सेना भाजप युतीचा प्रयत्न फसला. जागा वाटपावर एकमत न झाल्याने युती फिस्कटली. दहा पैकी सहा जागांवर आमने सामने लढाई. अँकर - रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अलिबाग विधान सभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपमधील युतीचा प्रयत्न फसला आहे. युती व्हावी अशी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र जागा वाटपावर एकमत न झाल्याने युती फिस्कटली जिल्हा परिषदेच्या दहापैकी सहा जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने सामने असून त्याला मैत्रीपूर्ण लढत असं गोंडस नाव देण्यात आलंय.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 29, 2026 08:33:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हदरला. कालपासून सगळीकडे शोकाकुल वातावरण पहायला मिळत आहे. आज छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी  आपली दुकान बंद ठेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामत अंतिमसंस्कार पार पडले. याच दुःखात छत्रपती संभाजीनगर शहर सुद्धा आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग म्हणून ओळख असलेल्या केनॉट परिसरात देखील मोठा शुकशूकाट बघायला मिळाला. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर असल्याने केनॉट परिसरातील देखील अनेक दुकाने बंद आहेत. व्यापाऱ्यांनी आपले दुकानें बंद ठेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top