Back
चंद्रपुर नगरपालिका सत्ता संघर्ष: समृद्धि मार्ग पर ट्रैवलर रोककर पार्षदों को जबरन उतारने का प्रयास
AAASHISH AMBADE
Jan 29, 2026 12:32:34
Chandrapur, Maharashtra
मनपा सत्ता संघर्षात राजकीय क्षेत्रातून एक मोठी घडामोड पुढे आली आहे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेसाठी गुंडगिरीचा वापर होताना बघायला मिळालाय. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर नगरसेवकांची ट्रॅव्हलर गाडी अडवून त्यांना पळवून लावण्याचा प्रकार समोर आलाय, यामुळे चंद्रपुरातील सत्ता संघर्षाला धोकादायक वळण लागण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील येळाकेळी टोल नाक्याजवळ सकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंबईवरून चंद्रपूर मनपाच्या काँग्रेसच्या नगरसेवकांना नागपुरात घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर अडवून पाच नगरसेवकांना जबरदस्तीने खाली उतरवून पळवून नेण्याचा प्रकार पुढे आला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमधील 2 गटात सत्ता स्थापनेसाठी तीव्र संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून बहुमताचा दावा केला जात असताना, मुंबईहून चंद्रपूरकडे परतणाऱ्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या ट्रॅव्हल्सला चेहरे झाकलेल्या काही 15 अज्ञात व्यक्तींनी टोल नाक्याच्या आधी आपली गाडी लावून अडवले. या प्रकाराने तणाव अधिकच वाढला. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, सुमारे 10 ते12 आरोपी फरार आहेत. ट्रॅव्हल्स अडवणाऱ्यांविरोधात सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे—हे गुंड नेमके कोणी पाठवले? महानगरपालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी थेट गुंडांचा वापर करण्यात आला का? हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी नवीन नाही. पक्षाच्या 2 गटातील संघर्ष चर्चेत आहे. मात्र आता महानगरपालिकेच्या सत्तेसाठी समृद्धी महामार्गावर गुंडांचा वापर झाल्याने राजकारणाने अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. या घटनेमुळे चंद्रपूरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीस तपासातून सत्य समोर येईल का, आणि अखेर महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowJan 29, 2026 13:51:450
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 29, 2026 13:50:120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 29, 2026 13:36:180
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowJan 29, 2026 13:35:300
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 29, 2026 13:04:13Malegaon, Maharashtra:अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राची हानी झाली.
जैन दिगंबर पंथ राष्ट्रीय संत आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी व्यक्त केला शोक...
अपघातात संशयास्पद ,सखोल चौकशी करावी..
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 29, 2026 12:57:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 29, 2026 12:45:220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 29, 2026 12:15:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 29, 2026 10:47:220
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 29, 2026 10:33:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 29, 2026 10:23:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 29, 2026 10:20:000
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 29, 2026 10:08:220
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 29, 2026 09:54:200
Report