Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

चारित्र्य शक पर पत्नी की हत्या: म्हसला पुलिस ने सतीश चव्हाण को गिरफ्तार किया

PPPRAFULLA PAWAR
Mar 04, 2026 02:16:58
Chendhare, Maharashtra
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून मृतदेह जंगल भागात फेकून देणाऱ्या पतीला म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे. सतीश चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी सतीश याचा विवाह त्याच्या मामाची मुलगी निकिता राठोड हिच्याशी झाला. विवाहानंतर दोघेही कर्नाटकातील गुरबर्गा इथून म्हसला तालुक्यातील चिरे खाणीवर काम करण्यासाठी आले होते. सतीश चारित्र्याच्या संशयातून निकिताला सतत त्रास देत होता तसेच माहेर हून पैसे आण असा तगादा लावत होता, अशी माहिती समोर आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 04, 2026 03:46:01
Nagpur, Maharashtra:नागपूर - कामठीतील चौधरी हॉस्पिटल परिसरात धक्कादायक घटना, वाहनाला साईड देण्याच्या कारणावरून किरकोळ कारणावरून झाला वाद - मात्र टोकाला जात वादाचे हाणामारीत रूपांतर झालं यात तरुणाचा मृत्यू - रवी शिवकुमार गुटलेवार असं मृतक तरुणाच नाव आहेय... - अक्षयकुमार धनराज गेडाम असं आरोपीचे नाव आहेय... - धक्काबुक्कीत खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत, लागलीच उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे उपचार - त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले - उपचारादरम्यान प्रकृती खालावून मृत्यू, एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता, पत्नीसमवेत भाड्याच्या घरात वास्तव्यास होता... - होळीच्या दिवशी घडलेली घटन घडल्यान शहरात तणावाचे वातावरण - जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 04, 2026 03:45:42
Satara, Maharashtra:कराड:- पुणे- बेंगळोर महामार्गावर रस्त्यातच कंटेनर आडवा पलटी झाल्याने मध्यरात्री एक वाजेपर्यंत वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. पुणे मुंबई सातारा या शहरांकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री नऊ वाजता पलटी झालेला कंटेनर एक वाजता बाजूला करण्यात आला तर त्यानंतर जवळपास दहा ते बारा किलोमीटर लागलेल्या वाहनांच्या रांगा रिकाम्या करण्यात आल्या. कराड जवळ खोडशी येथे हा अपघात झाल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता. कंटेनर मोठा असल्याने अनेक वाहन चालकांनी आणि प्रवासी ने रस्त्यातच जेवण उरकून घेतले. यावेळी ॲम्बुलन्स देखील या ट्रॅफिक मध्ये बराच काळ अडकली होती.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 04, 2026 03:45:27
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या वणी येथे होळी च्या धुळवडीला गुद्दलपेंडीचा थरार रंगला. रंगनाथ स्वामी मंदिरापुढील जत्रा मैदानावर दोन स्पर्धक एकमेकांना ठोसे मारून हा पारंपरिक खेळ खेळतात. एका खांबाला बांधलेला नाडा, एक हाताने पकडून दुसऱ्या हाताने प्रतिस्पर्ध्यावर ठोसे मारले जातात. नाडा सोडला तर तो स्पर्धक बाद ठरतो. विजयी व पराभूत स्पर्धक शेवटी गळाभेट घेऊन खेळ संपवतात. विशेष म्हणजे या खेळाला वयाची मर्यादा नाही. गुद्दलपेंडी हा केवळ मारामारीचा खेळ नसून ‘कायमचे वैर संपवणारा खेळ’ अशी त्याची ओळख आहे. पूर्वी एकमेकांशी वैर असलेले लोक या खेळातून राग व्यक्त करून शेवटी गळाभेट घेत आपले मतभेद मिटवायचे, शंभर वर्षांहून अधिकची परंपरा लाभलेल्या या गुद्दलपेंडी खेळामुळे वणी शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 04, 2026 03:45:13
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 04, 2026 03:32:44
Wardha, Maharashtra:वर्धा के हनुमान टेकड़ी परिसरात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. टेकड़ीवरील कोरड्या गवताला व झाडाझुडपांना आग लागल्यानंतर काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचे फवारे व विशेष उपकरणांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र नैसर्गिक वनस्पतींचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 04, 2026 03:32:21
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 04, 2026 03:32:05
Nashik, Maharashtra:२२८ नागरिक आखाती देशांपैकी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातमधील काही शहरांमध्ये अडकले आहेत. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू झालेल्या युद्धाचा फटका या भारतीयांना बसला आहे. विमानसेवा बंद असल्यामुळे त्यांचा भारतात परतण्याबाबत अनिश्चितता निर्माण झालीये.... जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून सातत्याने आखाती देशांत असलेल्या नाशिकच्या नागरिकांची माहिती मिळविण्यावर भर दिला जात आहे. काल सायंकाळपर्यंत २२८ पर्यंत आकडा पोहोचला होता.नाशिक शहरासह मालेगावमधून मोठ्या संख्येने रमजान पर्वच्या औचित्यावर मुस्लीम बांधव 'उमराह' या तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबिया देशात पोहोचलेले आहे. खासगी टूर ऑपरेटर कंपन्यांच्या माध्यमातून हे यात्रेकरू त्या ठिकाणी गेलेले आहेत. प्रत्येकाच्या यात्रेचा कालावधी वेगवेगळा आहे. नाशिक शहरातील ५०, तर मालेगावमधील १७८ असे एकूण २२८ नागरिक असल्याचे निश्चित झाले आहेत. या मध्ये सातजण हे शिक्षणासाठी तेथे गेलेले असून ते विद्यार्थी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीये...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 04, 2026 03:31:38
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील 13 पर्यटक दुबईत अडकले की माहिती समोर आली आहे. फिरण्यासाठी दुबईला गेलेले हे पर्यटक सध्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकले असून प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिघेजण मनामा शहरात तर उर्वरित दहा जण दुबईतील कर्मा हॉटेलमध्ये अडकल्याची माहिती आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये उमरगा शहरातील चौघेजण, तुळजापूर तालुक्यातील दोघेजण आणि धाराशिव तालुक्यातील दोघेजणांचा समावेश आहे. इतर काही जणांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, उमरगा येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि शिवानंद माशाळकर हे आपल्या पत्नीसह दुबईला पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आम्ही दुबईमध्ये अडकलो असल्याची माहिती दिली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने सर्व पर्यटकांचे संपर्क क्रमांक मिळवले असून त्यांच्याशी संपर्कही साधला आहे. या प्रकरणाची माहिती केंद्र आणि राज्य सरकारलाही देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 04, 2026 03:31:23
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी कार्यकर्ते दिपक खेडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवडण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले...खेडकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि संघटन कौशल्य पाहून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण असून पक्ष संघटनेला मोठी बळकटी मिळेल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून शहरात त्यांचे कौतुक होत आहे..
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 04, 2026 03:31:04
Ahilyanagar, Maharashtra:शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे १८ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृती समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो... यावर्षीचा मानाचा राष्ट्रीय स्तरावरील 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मृत्युंजय पुरस्कार' अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जाहीर झाला आहे....धर्मरक्षण आणि समाजकार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल वढू ग्रामस्थ व स्मृती समितीने त्यांची निवड केली आहे....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. ऐतिहासिक स्मृतिचिन्ह, ५१ हजार रुपये रोख आणि ग्रंथसंपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 04, 2026 03:17:44
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 04, 2026 03:17:15
Washim, Maharashtra:वाशीमच्या वनोजा येथील तांडा वस्तीत बंजारा समाजात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.या समाजात होळीच्या दिवशी होळी पेटवली जात नाही,तर धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी विधिवत होळी पेटवण्याची जुनी परंपरा आहे. त्यानंतर संध्याकाळी होळीस्थळी झेंडा लावून पूजा केली जाते.यंदा चंद्रग्रहणामुळे सकाळचा विधी आधल्या दिवशी सायंकाळी पार पडला.धुलीवंदनाच्या संध्याकाळी समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले.विधिवत पूजा करून महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य व गीतांद्वारे होळी साजरी केली.होळीला धान्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धी साठी प्रार्थना करण्यात आली.हिंदू पुराणातील होलिका यांच्या कथेनुसार अन्यायावर भक्तीच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो.बंजारा समाज आजही श्रद्धा, ऐक्य आणि उत्साहाने ही परंपरा जपत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 04, 2026 03:15:53
Kolhapur, Maharashtra:इराण आणि इस्रायल यांदेशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क आहेत, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. आखाती देशांमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका आणि त्यांच्या घरवापसीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हा प्रशासनाने घेतला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, जिल्हा प्रशासनाने अडकलेल्या नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयाने जिल्ह्यातील अडकलेले नागरिक, पर्यटक, नोकरीनिमित्त गेलेले व्यक्ती आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीचे नियोजन केले जात आहे. ज्यांचे कुटुंबीय परदेशात अडकले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये. ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत, त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी असं देखील पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top