Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

Sadhugram भू-संपादन: 268 एकर, 4000 करोड़ लागत, आज निर्णायक बैठक

YKYOGESH KHARE
Nov 20, 2025 02:03:58
Nashik, Maharashtra
साधुग्राम भूसंपादनावर आज महत्त्वाची बैठक मनपा शेतकऱ्यांसमोर मांडणार नवा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनंतर मनपा भूसंपादन प्रक्रिया गतीने पहिले टप्प्यात तपोवनातील 268 एकर जमीन कायमस्वरूपी अधिग्रहित करण्याची तयारी साधुग्रामसाठी एकूण 1000 एकरची आवश्यकता सध्या 93 एकर अधिग्रहित, आणखी 283 एकर जमीन बाकी भाडेतत्त्वाऐवजी कायमस्वरूपी जमिनीचे अधिग्रहण करण्याचे निर्देश पूर्ण भूसंपादनासाठी लागणारा खर्च सुमारे 4000 कोटी मनपाचा प्रस्ताव: 50% रोख + 50% TDR तरीही 2000 कोटींची तूट — चार टप्प्यांत निधी देण्याचा पर्याय आज निवडक शेतकऱ्यांसोबत थेट वाटाघाटी साधुग्राम प्रकल्पातील पुढचा निर्णायक टप्पा आज ठरणार
94
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Nov 20, 2025 03:30:45
Palghar, Maharashtra:पालघर जव्हार तालुक्यातील जांभूळमाथा जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाच्या भीतीने विद्यार्थी शाळेत न जाता जंगलात लपून राहण्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे पालकांमध्ये लोकनाथ जाधव या शिक्षकाबाबत संतापाची लाट पसरली आहे. पालकांसोबतच येथील उपसरपंच सुभाष भोरे आक्रमक झाले असून त्यांनी गट विकास तसेच गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. जाधव यांनी काही विद्यार्थ्यांना १ किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले, दूर अंतर असल्याने ह्या विद्यार्थ्यांना पाणी आणण्यात उशीर झाला, तेव्हा शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे विद्यार्थी आता शाळेत जायला घाबरत आहेत.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 03:19:28
Ratnagiri, Maharashtra:सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्तींना टार्गेट करत होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीचा फटका आता जिल्ह्यातील दोन सेवानिवृत्त शिक्षकांना बसला आहे. जयगड-संदखोल येथील एका शिक्षकाने व्हॉट्सअॅपवर आलेली बनावट बँक पीडीएफ फाईल उघडताच अज्ञात हॅकरने त्यांच्या बँक खात्याचा अॅक्सेस मिळवून त्यांच्यासह अन्य एका शिक्षकाच्या खात्यातून तब्बल ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची रक्कम लंपास केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. एका शिक्षकाच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ८५ हजार ५१४ आणि दुसऱ्या शिक्षकाच्या खात्यातून ७१ हजार अशी एकूण ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची मोठी रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जयगड येथील अकबर मोहल्ला परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक नासिर अब्दुल्ला बावडे यांनी या फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. ही घटना १६ व १७ ऑक्टोबर दरम्यान घडली.
131
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 20, 2025 03:17:38
Beed, Maharashtra:मागील अनेक वर्षात बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू होता. याची तक्रार देखील करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत बीड जिल्ह्यातील दोन शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांचा निलंबनात समावेश आहे. नागनाथ शिंदे हे सध्या लातूरचे शिक्षणाधिकारी आहेत. बीड जिल्ह्यात या दोघांविरोधात गंभीर तक्रारी होत्या. निलंबनाच्या काळात त्यांच्यावर चौकशी देखील लादण्यात आली असून या दरम्यान जिल्हा न सोडण्याचे सक्तीचे आदेश आहेत. दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे शिक्षण क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.
70
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 20, 2025 03:16:20
157
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 03:04:23
Kolhapur, Maharashtra:कागल मध्ये मंत्री मुश्रीफ आणि समरजीतसिह घाटगे एकत्र आल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक ॲक्शन मोडवर. कागल नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विरोधी उमेदवाराला नेले अज्ञातवासात नगराध्यक्ष पदाच्या रिंगणातील उमेदवारावर राजकीय दबाव वाढत चालल्याच्या कारणावरून विरोधी उमेदवारांना नेते अज्ञातवासात माघारीची मुदت संपल्यानंतर विरोधी उमेदवारांना कागल मध्ये आणले जाईल. कोणत्याही परिस्थितीत कागल नगरपालिका निवडणुकीतन माघार घ्यायची नाही प्राध्यापक संजय मंडलिक यांची भूमिका. कागल मध्ये हसन मुश्रीफ आणि समरजीतसिह घाटगे यांच्या विरोधात संजय मंडलिक आक्रमक संजय मंडलिक यांनी भाजप नेते संजय घाटगे यांची देखील घेतली भेट.
150
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 20, 2025 03:02:26
Nashik, Maharashtra:नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी दिसून येत आहे. या मध्ये शिवसेना उबाठा गटाकडून या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात एक जागा वगळता इतर ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. तर ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मनसे आमच्या सोबत असून मनसैनिक आम्हाला मदत करत असल्याचे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. तर ही निवडणूक धन शक्ती विरुद्ध जण शक्ती असून जनता आमच्या सोबत असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. प्रत्येक तालुका आणि नगरपालिकेची स्थानिक परिस्थिती वेगळी असून, जिथे जिथे शक्य तिथे आम्ही लढत आहोत, संघर्ष करत आहोत. ही निवडणूक म्हणजे धन शक्ती विरुद्ध जण शक्ती अशी आहे. सत्ताधारी पक्षातील धनुषबान, कमळ आणि घड्याळ समोरासमोर लढत आहे, प्रत्येकासाठी ही प्रत्येकाच्या वर्चस्वाची लढाई दिसत आहे, तर दुसरीकडे मात्र जनता शंभर टक्के आमच्या सोबत आहे. तर सिन्नर ओझर, भगूर, मनमाड येथे आम्ही स्वबळावर लढत असून, इगतपुरी येथे मात्र महाविका आघाडी मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत लढत आल्याचे देखील यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट केले.
160
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 03:02:03
Kolhapur, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये राज्यातील 26 सहकारी बँकांनी घेतली धाव. सहकारातील नव्या नियमाने सहकारी बँकेमधील निम्मे संचालक अपात्रतेची शक्यता असल्याने नागरी बँक असोसिएशनच्या माध्यमातून कोर्टात धाव. देशात सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यामुळे आता सर्व निर्णय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जात आहे सलग दहा वर्षे संचालक पदी राहता येईल हा यापूर्वी कमर्शिअल बँकांना लागू असलेला नियम आता सहकारी बँकांना लागू या नव्या नियमामुळे सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या संचालक अपात्र होण्याची शक्यता असल्याने नागरी बँक असोसिएशन उच्च न्यायालयात. कायदा झाल्यापासून पुढे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरी बँक असोसिएशनची धाव. राज्यात एकूण 458 सहकारी बँका, प्रत्येक बँकेत साधारण 17 ते 19 संचालक. नव्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास निम्याहून अधिक संचालक अपात्र ठरून राजकारण बदलण्याची शक्यता.
52
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 20, 2025 02:47:03
Shirdi, Maharashtra:नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात मेन रोडवरील दुकानांना भीषण आग , आठ दुकाने जळून खाक.. अचानक लागलेल्या आगीने नेवासा शहरात खळबळ... मेनरोडवरील सलून , मोबाईल शॉप, बॅग हाऊस, प्रसाधनालय, कोल्ड्रिंक्स शॉप, गॅस शेगडी रिपेरिंग, केक शॉप व किड्स वेअर— सर्व दुकाने जळून खाक.. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट ; तपास सुरू... सुमारे 2000 नागरिक मदतकार्यासाठी धावून आले मोठी मानवी साखळी निर्माण.. नेवासा नगरपंचायत व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल.. आग विझवण्यात यश मात्र व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान...पोलीस प्रशासनातर्फे परिसर सील ; गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू..
194
comment0
Report
Advertisement
Back to top