Back
नाशिक में प्रकाश लोंढे और उनके बेटे की गिरफ्तार, बार गोलीकांड के साथ मोक्का लगाने की तैयारी
SGSagar Gaikwad
Oct 09, 2025 01:31:43
Nashik, Maharashtra
आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक 'नाना' लोंढे यांना अटक. सातपूरमधील बारमध्ये गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याचा आरोप. संघटित खंडणी रॅकेट चालवल्याचा पोलिसांचा दावा. संपूर्ण टोळीवर 'मोक्का' कायद्यान्वये कारवाईची तयारी पूर्ण.
अँकर
नाशिक शहरात दहशतीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या आणि राजकीय पदाचा गैरवापर करून खंडणीचे रॅकेट चालवणाऱ्या लोंढे पिता-पुत्रांना नाशिक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. सातपूर येथील 'औरा' बारमधील थरारक गोळीबार आणि चाकू हल्ला प्रकरणानुसार पोलिसांनी २४ तासांच्या आत धडक कारवाई करत आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेला त्याचा मुलगा दीपक लोंढे या दोघांनाही अटक केली आहे. या अटकेमुळे नाशिकच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, या संपूर्ण टोळीवर 'मोक्का' लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. औरा' बारमधील घटनेनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे यांनी सूत्रे हातात घेतली. कोणताही राजकीय दबाव न जुमानता, पोलिसांनी थेट प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा भूषण यांना त्यांच्या घरातून उचलले. या कारवाईने हे सिद्ध केले आहे की, शहराची शांतता भंग करणाऱ्या व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असल्या तरी त्यांची गय केली जाणार नाही. उपायुक्त काळे यांनी माहिती देताना सांगितले, 'गुन्हा कोणीही केला तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे. ही फक्त सुरुवात आहे, या टोळीची पाळेमुळे खणून काढून संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले जाईल. त्यांच्यावर 'मोक्का' अंतर्गत कठोर कारवाई प्रस्तावित आहे.’
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 09, 2025 04:38:521
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 09, 2025 04:38:180
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 04:37:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 09, 2025 04:37:490
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 09, 2025 04:37:130
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 04:36:340
Report
PNPratap Naik1
FollowOct 09, 2025 04:16:530
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 09, 2025 04:15:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 04:04:300
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 04:03:470
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 09, 2025 03:52:100
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 09, 2025 03:51:080
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 09, 2025 03:50:550
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 09, 2025 03:50:450
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 09, 2025 03:46:55Ambernath, Maharashtra:धुक्यात हरवली वांगणीची वाट
बदलापूरच्या ग्रामीण भागात दाट धुकं: दृश्यमानतेत घट
पाऊस जाताच गुलाबी थंडीची चाहूल
0
Report