Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

विदेश में नौकरी के जाल में फँसे: 5.43 लाख का फ्रॉड, युवक गिरफ्तार नहीं

SGSagar Gaikwad
Mar 02, 2026 04:32:56
Nashik, Maharashtra
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून ५ लाखाला गंडा.... पंजाबच्या संशयितावर अंबड पोलिसांत गुन्हा.... अँकर नोकरीसाठी व्हिसा काढल्याचे ऑस्ट्रेलिया सरकारचे पत्र पाठवत ५.४३ लाखांना गंडा घातल्या प्रकरणी पंजाब येथील कबुतरबाजा विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परदेशातील नोकरीच्या आमिषाने चांगल्या पगाराची नोकरी गमावण्याची वेळ तक्रारदारावरच आली. जतिंदरसिंग असे या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मनोज नांगला यांनी पोलिसांत तक्रार दिली. संशयित जतिंदरसिंग सोबत ओळख आहे. जून २०२४ मध्ये सिंगने मोबाइलवर 'तुमचा ऑस्ट्रोलियाचा व्हिसा मंजूर झाला आहे' असा मेसेज पाठवला. तीन पानी पत्र व प्राइम फ्लोअर मिल्स कंपनीमध्ये नोकरी लागल्याचे अॅग्रीमेंट लेटरही पाठवले होते. त्यानंतर तरुणाने संशयिताला वेळोवेळी ५ लाख ४३ हजारांची रक्कम दिली. दोन वर्षे उलटूनही पुढील कार्यवाही होत नसल्याने सिंग याच्यासोबत संपर्क साधला. तुम्हाला लवकरच जावे लागेल, असे आश्वासन त्याने दिले. त्यामुळे तरुणाने परदेशात नोकरी मिळाल्याच्या आशेने अंबड येथील कंपनीची नोकरीही सोडून दिली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 02, 2026 06:00:18
Nagpur, Maharashtra:नागपुर जिले के राहुलगांव में SB L कंपनी में विस्फोट के मृतकों के लिए 75 लाख रुपए और घायलों के लिए 25 लाख रुपए की सहायता की मांग स्थानीय भाजपा विधायक चरणसिंह ठाकूर ने की। सहायता मिलते तक अंत्यसंस्कार रोकने की चेतावनी काटोल भाजपा विधायक चरणसिंह ठाकूर ने दी। वहीं SB L Energy Limited नामक विस्फोटक कंपनी में हुए भीषण विस्फोट में 19 कर्मचारियों की मृत्यु हो चुकी है और 23 घायल हैं; 9 लोगों के खिलाफ मुकदमे दर्ज कर 9 लोगों को गिरफ्तार किया गया। विभागीय आयुक्त की आज की बैठक में इन मुद्दों पर चर्चा होगी। नागपुर विभागीय आयुक्त कार्यालय में आज एक महत्वपूर्ण बैठक शुरू होने वाली है। पुलिस अधीक्षक हर्ष पोतदार बैठक के लिए पहुंच चुके हैं। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल और जिलाधिकारी भी बैठक में होंगे। PESO (Petroleum and Explosives Safety Organization) के अधिकारी भी बैठक में उपस्थित रहेंगे। सभी मृतक के परिवारों को आज की बैठक में मुआवजा देने का निर्णय होगा।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 05:49:32
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - चरणसिंग ठाकूर, आमदार काटोल मतदारसंघ, नागपूर स्फोट प्रकरणात मृतकांचा आकडा 19 झालेला आहे... त्यामुळे या प्रकरणात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरण सिंग ठाकूर यांनी केली आहे ते विभागीय आयुक्त कार्यात होणाऱ्या बैठकीसाठी दाखल झालेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चुका आढळून आल्या या सगळ्या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली पाहिजे. मजुरांना प्रशिक्षण दिल्याशिवाय लावू नये... राज्य सरकारचे अधिकारी केंद्र सरकारच्या एजन्सीकडे बोट दाखवतात त्यामुळे हे एकमेकांवर आरोप प्रचारात सुरू आहे.... यामध्ये 75 लाख रुपये भेटल्याशिवाय या ठिकाणी मी उठणार नाही. तर जखमींना 25 लाखाचा मदत दिली पाहिजे.. इथून जाणार नाही, मृतकाचे अंत्यसंस्कार करू देणार आहे... राज्यसरकारने SOP जाहिर करावी, त्याशिवाय कारखाना सुरू होऊ देणार नाही. बंद ठेवला पाहिजे.. राज्य सरकारचे आणि केंद्राचे अधिकारी एकमेकांवर ढकलत जवाबदारी टाळत आहे... Sop तयार करून निरीक्षक ठेवले पाहिजे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 05:48:55
Kolhapur, Maharashtra: America आणि इजराइलने इराकवर जोरदार हल्ला केल्यानंतर इराककडून देखील अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांच्या अमेरिकन एअर बेसवर हल्ला सुरू केला आहे. दुबई देखील इराणच्या रडावर आहे. त्यामुळे दुबईला गेलेले काही पर्यटक आणि कामगार चिंतेत आहेत. कोल्हापुरातील महंमद अब्दुल शानेदिवाण सध्या दुबईमध्ये आहेत. ज्या ठिकाणी ते राहतात, त्याच्या काही अंतरावर अमेरिकन एअर बेस आहे. त्यामुळे महंमद अब्दुल शानेदिवाण यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. महंमद अब्दुल शानेदिवाण यांचे लहान भाऊ असलम शानेदिवाण याच्याशी दुबईमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 05:48:26
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - दुबई मध्ये अडकले सांगलीच्या कुपवाड मधील 30 पर्यटक.. अँकर - इराण- इजरालय युद्धच्या पार्श्वभूमीवर दुबई या ठिकाणी सांगलीच्या कुपवाड येथील 30 पर्यटक अडकले आहेत. पर्यटनासाठी 30 जणांचा ग्रुप हा दुबई मध्ये गेला होता, मात्र इराण इजरायल युद्धामुळे विमानसेवा बंद झाल्याने सर्व पर्यटक आता दुबईमध्येच अडकले असून ते सर्वजण सध्या सुखरूप आहेत. एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून कुपवाड येथील हे सर्व पर्यटक दुबईमध्ये फिरण्यासाठी गेले होते युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते दुबईतच अडकले आहेत. हॉटेलच्या परिसरातील काही अंतरावर स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याने भारत सरकारने आमची सुटका करावी,अशी मागणी या सर्व पर्यटकांकडून आता करण्यात येत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 05:46:25
Chandrapur, Maharashtra:अवैध रेती उत्खनन आणि सीमांकनाच्या वादावरून तस्करांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झालीये. हाणामारीत एकाचा मृत्यू तर दोन जखमी झाले आहेत. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी भारत नागपाल (40) असं मृतकाचं नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आहे. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या बामर्डा घाटावर काल रात्री हा प्रकार घडला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात असलेल्या वर्धा नदीच्या ढिवरी-पिपर येथील रेती घाटाचा शासनाकडून लिलाव झाला होता. मात्र या घाटावरून रेती उत्खनन आणि सीमांकनावरून वर्धा जिल्ह्यातीलच दोन गटांमध्ये काल रात्री वाद झाला. मारामारी करत हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यासोबतच्या हद्दीत आले आणि या ठिकाणी धारदार शस्त्राच्या वापरात नागपालचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. रात्री उशिरा झालेल्या या प्रकाराने महसूल- पोलीस हादरले. वरोरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलिसांनी अटक केलेल्या 3 लोकांना वरोरा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. मृतक नागपाल याचा मृतदेह हिंगणघाट येथे नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 02, 2026 05:30:46
Chendhare, Maharashtra:कोकणात होलिकोत्सवाची धूम सुरू आहे. विशेषतः कोळी वाड्यांमध्ये अधिक उत्साह पहायला मिळतो. कोळी बांधवांनी आपल्या होड्यांची डागडुजी आणि रंगरंगोटी केलीय. रंगीत कापडी पताका और झेंडे लावून होड्या सजवल्या आहेत. होडीचे पूजन करून मान म्हणून मोठा मासा होडीला बांधण्यात आला. अलिबाग तालुक्यातील थळ, नवगाव, रेवस, बोडणी, आग्राव येथील कोळी बांधवांनी या सजवलेल्या होड्यांमधून समुद्रात फेरफटका मारला. यामुळे समुद्रात जणू होड्यांची जत्रा भरल्याचे चित्र पहायला मिळाले. बच्चे कंपनीपासून मोठी मंडळी देखील पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचताना दिसत होती. अरबी समुद्रातील खांदेरी किल्ल्यावर जाऊन तेथील वेताळेश्वराचे दर्शन घेतले आणि यावेळेस मासळीचा हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थना सुद्धा कोळी बांधवांनी केली.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 02, 2026 05:17:00
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.‌‌.. स्किप्ट ::- ज्येष्ठ विचारवंत डॉ. जे. एम. वाघमारे यांचे वृद्धापकाळाने निधन...‌ माजी खासदार आणि माजी कुलगुरूंच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा... AC ::- लातूर जिल्ह्याचे ज्येष्ठ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जे. एम. वाघमारे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ. वाघमारे यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत मराठवाड्यातील उच्च शिक्षणाला नवी दिशा दिली. कुलगुरू म्हणून कार्य करताना त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यावर विशेष भर दिला. राजकारणातही त्यांचा प्रवास उल्लेखनीय राहिला. लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते संसदेपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी मानला जातो. खासदार म्हणून त्यांनी लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांच्या पार्थिवावर औसा तालुक्यातील त्यांच्या मूळगावी कवठा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. डॉ. वाघमारे यांच्या निधनाने मराठवाड्याने एक प्रगल्भ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि दूरदृष्टी असलेला नेता गमावला आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 02, 2026 05:00:21
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये आज व्यापाऱ्यांनी प्रस्तावित कॉरिडॉर विरोधामध्ये बंद पाडून आंदोलन केले पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराच्या भागात कॉरिडॉर होण्याच्या हालचाली सुरू आहेत जिल्हास्तरीय बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे येत्या काही महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार आहे सदर प्रकल्पाला मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी विरोध केलाेला आहे कॉरिडोरमुळे व्यापारी उद्ध्वस्त होतील त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन निघून जाईल त्यामुळे अन्यायकारक पद्धतीने कॉरिडोर करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे कॉरिडोर विरोधासाठी आज मंदिर परिसरामध्ये बंद पाडून शासनाच्या कॉरिडॉर प्रस्तावाचा निषेध करण्यात आला
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 04:49:41
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top