icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
423203
VNVishal Nagesh More16 Dec 2025, 02:51 am

किसान ने प्याज रोप से खेती का नाम बनाकर सरकार का ध्यान खींचा

Malegaon, Maharashtra:पुन्हा कांदा लागवड, शेतकऱ्याने कांदा रोपातून साकारले कांदा लागवड नाव, सरकारकडे केली मागणी - आस्मानी- सुलतानी संकटांतून बाहेर येत बळीराजाची पुन्हा एकदा कांदा लागवड सुरू - सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा उपक्रम.. कसमादे परिसरात बळीराजाची पुन्हा एकदा कांदा लागवड झाली असून व्यंगचित्रकार शेतकरी किरण मोरे यांनी कांद्याच्या रोपातुन कांदा लागवड ही नाव साकारून सरकारचे लक्ष वेधून शेतकरी पुन्हा एकदा कांदा लागवड करीत आहेत मोठ्याप्रमाणावर कांदा पिकवणार आहेत मात्र सरकारने पुन्हा काही अडकाठी आणू नये.. कांदा उत्पादकांचा कांदा परदेशात जाऊ द्यावा.. दोन पैसे मिळू द्यावे, देशालाही परकीय चलन वाढेल अशी मागणी त्यांनी या नावातून केली आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर के कॉलेज चौराहे पर डीजल टँकर उलट, ट्रैफिक रातभर बाधित

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या बल्लारपूर वळण मार्गावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात भरधाव वेगात जाणारा डिझेल टँकर उलटला. रात्रीच्या घटनेनंतर मोठ्या संख्येने यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली. टँकरमधील डिझेल मुख्य महामार्गावर वाहत असल्याने पोलिसांनी वाहतूक बंद केली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने तातडीने धुरा सांभाळली. रात्री उशिरापर्यंत डिझेल टँकर मुख्य मार्गावरून बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू होते. मध्यरात्रीनंतर टँकर बाजूला करण्यात पोलिसांना यश आले. यंत्रणांच्या त्वरीत प्रतिसाद आणि सतर्कतेने मोठा धोका टळला.
0
0
Report

अकोला में पेयजल संकट बढ़ने से भाजपा विधायक ने पांच योजनाओं की मंजूरी की मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता पाणीटंचाईचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. अकोला शहर आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजनांची विचार सुरू आहे। अकोला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी काटेपूर्णा प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं। परंतु, प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने आगामी काळात पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। शहरेाला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातून शहर आणि ग्रामीण भागातील ६४ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो। सध्या या धरणात सुमारे १७ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, दरमहा सरासरी ३.७५ दलघमी पाण्याचा वापर होत आहे। त्यामुळे उपलब्ध साठा केवळ डिसेंबरपर्यंत पुरेल, अशी भीती व्यक्त केली जाते। यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था उभारण्याची मागणी रणधीर सावरकर यांच्याकडकून करण्यात आली आहे। यासाठी मोर्ना नदीपर्यंत पाइपलाइन टाकणे, वन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानग्या आणि अडथळे दूर करणे, तसेच ६४ खेडी, खांबोरा आणि घुसर येथील पाणीपुरवठा योजनांचा उपयोग करण्याचा प्रस्ताव आहे। यासोबतच पाणी सक्षमीकरणासाठी पर्यायी व्यवस्था, पाणीबाबींचं बळकटीकरण आणि नवीन जलस्रोत अधिग्रहित करण्यावरही भर देण्यात आला आहे। अकोला शहर, अकोट, पातूर, उमरी, कौलखेड आणि इतर भागांतील विहिरींचं पुनरुज्जीवन करून टंचाईच्या काळात त्यांचा उपयोग करण्याचा पर्यायही सुचवण्यात आला आहे। दीर्घकाळासाठी पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज लक्षात घेता या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत। याच पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पर्यायी पाणीपुरवठा योजनांवर चर्चाही केली आहे। दुष्काळाची तीव्रता वाढत असताना अकोला शहराला पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या पर्यायी उपाययोजनांना आता किती गती मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
0
0
Report

वाशिम में बारिश न होने से सोयाबीन की फसल बर्बाद, किसान दुष्काल राहत की मांग

Washim, Maharashtra:वाशीम: सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलंय.उभ्या पिकातून काढणीचा खर्चही निघणार नसल्याने अखेर शेतकऱ्यावर उभ्या सोयाबीनमध्येच जनावरे चारण्याची वेळ आली आहे.वाशिमच्या कारंजा तालुक्यातील भुलोडा शिवारातील शेतकरी परिमल गांजरे यांच्या १२ एकर सोयाबीनची अशीच अवस्था झाली आहे.पावसाअभावी पिकाला अपेक्षित शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे कापणी करूनही उत्पादन मिळणार नसल्याणे त्यांनी उभं सोयाबीन जनावरांसाठी सोडून दिलं.पावसाअभावी परिसरातील अनेक शेतकरी संकटात असल्याने शासनाने तातडीने दुष्काळी मदत करावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे
0
0
Report
Advertisement

नितेश राणे बोले: मत्स्य योजना में भ्रष्टाचार, बैंक अधिकारी गलत व्यवहार पर कड़ा कदम

Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, व मत्स्य ठेक्यांमध्ये भ्रष्टाचार होत आहे, ठेका एकाच्या नावाने तर चालविणारा तिसराच आहे. योजनांचा लाभ मिळवताना देखील मासेमारी करणाऱ्या बांधवांना बँकांकडून विनाकारण त्रास होत आहे, आता त्यांची मस्ती उतरवली जाणार असा इशारा राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी यवतमाळच्या कुंभारकिन्ही तलावावर नितेश राणेंनी मासेमारी करणाऱ्या बांधवांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी यंत्रणे कडून होणारा त्रास व स्थानिक मच्छीमारांवर होणारा अन्याय त्यांनी कथन केला. त्यामुळे आता चुकीचे वागणाऱ्यांची गय नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिला. बँकेचे अधिकारी लाभार्थ्यांच्या अर्जात शुल्लक कारणासाठी त्रुटी काढून अर्ज बाद ठरवतात. अशा अधिकाऱ्यांमध्ये थोडं शिस्त आणावी लागेल. पण बँकेचे अधिकारी स्वतःला मोठ समजत असेल तर त्यांनी मस्ती उतरविण्यासाठी काही प्रकार आहेत, ते वापरल्या जातील. झाडावर कीड आहे, तर आपण पेस्टिसाइड मारतो, तसे काही पेस्टिसाइड आमच्याकडे आहे अधिकाऱ्यांवर वापरण्यासाठी. असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
0
0
Report

महाराष्ट्र में मानसून का अंतिम चरण; 19% कमी से दुष्काळ गहरा, मराठवाड़ा चिंताजनक स्थिति

Ratnagiri, Maharashtra:महाराष्ट्रातून परतीचा मानसून अंतिम टप्प्यात; १९ टक्के तुटीसह राज्यावर दुष्काळाचे गडद सावट, मराठवाड्यात चिंताजनक स्थिती.. अँकर राज्यातून मानसूनची माघार वेगाने सुरू असून पुढील दोन ते तीन दिवसांत तो संपूर्ण महाराष्ट्राचा निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.. यंदा सरासरीच्या अवघा ८७ टक्के पाऊस झाल्याने राज्यात तब्बल १९ टक्के तूट नोंदवली गेली आहे.. यात मराठवाड्यात सर्वाधिक ४० टक्के,तर विदर्भात २३ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.. परतीच्या पावसाचीही शक्यता मर्यादित असल्याने धरणांमधील अपुरा साठा,पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.. रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे असून राज्यासमोर तीव्र दुष्काळाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में 2601 हेक्टेयर नुकसान का पंचनामा, तीन तालुकें दुष्काळ घोषित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त २ हजार ६०१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण.. जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त.. यावर्षी अननुच्या प्रभावामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यावर्षी भात पिक ७० ते ७५ टक्के पेक्षा जास्त धोक्यात आले आहे.. त्यामुळे शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी,राजापूर,संगमेश्वर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत.. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून नुकसानाचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ३४५ शेतकऱ्यांच्या २ हजार ६०१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत..
0
0
Report

नवी मुंबई एयरपोर्ट से सिंधुदुर्ग, जालगांव, गोवा और लक्षद्वीप के लिए सीधे हवाई सेवाएं

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीला नवे पंख, सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्विपशी आता थेट हवाई जोडणी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून प्रादेशिक विमान कंपनी FLY91 च्या विमानाचे नवी मुंबई विमानतळावर प्रथमच आगमन झालेय. हैदराबादहून आलेलेल्या या औपचारिक विमानाचे पारंपरिक जलतोफेच्या सलामीने स्वागत करण्यात आले. यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या वाढत्या हवाई नेटवर्कमध्ये आणखी एका महत्त्वाच्या विमान कंपनीची भर पडली असून FLY91 च्या हिवाळी वेळापत्रकानुसार नवी मुंबईहून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या चार ठिकाणी थेट हवाई सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि लक्षद्वीपमधील पर्यटन, व्यवसाय आणि प्रादेशिक प्रवासासाठी प्रवाशांना आता अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
0
0
Report
Advertisement

सिन्नर में रस्ता रोको आंदोलन: धोंडबार-पाचपट्टा मार्ग और नदीजोड़ परियोजना पर तात्कालिक कार्रवाई

Sinnar, Maharashtra:सिन्नर तालुक्यातील धोंडबार-पाचपट्टा मंजूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, कोनांबे-औंढेवाडी नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती करावी आणि या दोन्ही गावांचा नदीजोड प्रकल्पात समावेश करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हरसुले फाटा (घोटी-सिन्नर महामार्ग) येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधी,व संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी रस्त्यांवरील खड्डे पुढील ८ दिवसांत डांबराने भरण्याचे आणि मंजूर कामे त्वरित सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच, जलसंपदा विभागाच्या प्रतिनिधींनी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव सादर केल्यानंतर दोन्ही गावांचा नदीजोड प्रकल्पातील समावेशाचा प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ प्रशासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या या आश्वासनांनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
0
0
Report

भाजपा प्रत्याशी संगीता शिंदे के नामांकन से अमरावती में बंडखोरी बढ़ी

Amravati, Maharashtra:भाजपच्या डॉ. संगीता शिंदे करणार बंडखोरी; आज दाखल करणार उमेदवारी अर्ज, भाजपला अमरावतीत बंडखोरीचे मोठे ग्रहण अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूकीत भाजपला मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यात अजून भर म्हणून भाजपनेते व खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी डॉ. संगीता शिंदे आज बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आज संगीता शिंदे यांच्या निवडणूक नामांकन रॅलीला भाजपचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे महामंत्री नितीन गुडधे पाटील यांनी केले आहे. महायुतीत अमरावती मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाटेला गेला असतानाच भाजप डॉ. संगीता शिंदे यांच्या उमेदवारीसाठी मैदानात उतरल्याने मोठ्या प्रमाणात भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
0
0
Report

मराठवाडा में बारिश कमी से खरीफ फसलों को बड़ा नुकसान, पंचनामे 25% तक

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात अपुऱ्या पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शासन आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून आतापर्यंत १३ लाख १५ हजार हेक्टरवरील म्हणजे २५.१४ टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, जालना जिल्ह्यात ४७ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. मराठवाड्यात खरीप पिकांसह फळबाग आदींचे लागवड क्षेत्र ५२ लाख ३२ हजार ४७४ हेक्टर असून आतापर्यंत ३ हजार ५८६ गावांतील १३ लाख १५ हजार २५६ हेक्टरवरील खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ लाख २ हजार ७४६ हेक्टरवरील म्हणजेच १३.७५ टक्के पंचनामे झाले आहेत. जालना जिल्ह्यात ३ लाख १८ हजार ८१५ हेक्टरवरील (४६.९० टक्के), बीड जिल्ह्यातील २ लाख २३ हजार २९३ हेक्टरवरील (२६.०५ टक्के), लातूर जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ८९४ हेक्टरवरील २७.४०%, धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ९६९ हेक्टरवरील (२१.९८ टक्के), नांदेड जिल्ह्यातील ९५ हजार ७३१ हेक्टर (१३.४१ टक्के), परभणी जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार ४९३ हेक्टरवरील (३३.०३ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यातील ७४ हजार ३१५ हेक्टरवरील (१९.०२ टक्के) नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत
0
0
Report
Advertisement

अकोला में चारे पर पाबंदी: प्रशासन ने बाहर ले जाना रोका

Akola, Maharashtra:अकोला जिले में गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण के कारण चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी यांनी अकोला जिल्ह्यातून हिरवा आणि सुका चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास तसेच विक्री करण्यास बंदी घातली आहे. 3 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. अकोला जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कडबा, कुटी, पेंढा, ऊसाचे पाचट व पाने, मका यासह कोणताही हिरवा किंवा सुका चारा पूर्वपरवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर नेता येणार नाही. मात्र, जिल्ह्यात एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात स्वतःच्या जनावरांसाठी चारा नेण्यास परवानगी राहणार आहे. शासकीय चारा छावण्या आणि प्रशासनाने मंजूर केलेल्या वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. चाऱ्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर पोलीस आणि आरटीओकडून तपासणी नाके सुरू करण्यात येणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
0
0
Report

अकोला में 1900 किलो मिठाई-हलवा जब्त, तीन व्यापारियों के लाइसेंस निलंबित

Akola, Maharashtra:अकोला में खाद्य सुरक्षा और औषध प्रशासन ने बड़ी कार्रवाई कर अस्वच्छ और अनारोग्यदायी परिस्थितियों में परिवहन किया गया करीब 1900 किलोग्राम मिठाई और हलवा जब्त किया। इस साठे की कीमत लगभग 5 लाख 72 हजार रुपए है। इस प्रकरण में माल मांगने वाले तीन व्यापारियों के खाद्य परवाने निलंबित कर दिए गए। गोपनीय जानकारी के आधार पर एफएसएसएआई की टीम ने अकोला शहर के रायलीजिन क्षेत्र में Arco Transport में जांच की। गुजरात के अहमदाबाद से दो ट्रकों में विभिन्न ब्रांडों के हलवा और मिठाई का स्टॉक अकोला लाया गया था। जांच के दौरान मिठाई और हलवा के नमूने आगे की जाँच के लिए लिए गए, परंतु बाकी 1900 किलो साठा जप्त कर लिया गया है। जप्त किए गए इस साठे की अनुमानित कीमत 5 लाख 72 हजार रुपए है और इसे अकोला महापालिका के बायोगैस परियोजना के SWM प्रोसेसिंग प्लांट में नष्ट किया जाएगा।
0
0
Report

समीर भुजबळ की मौजूदगी में अमोल शिंदे ने राष्ट्रवादी में प्रवेश किया

Yeola, Maharashtra:येवला नगरपालिकेचे गटनेते गणेश शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू अमोल शिंदे यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला यापूर्वी अमोल शिंदे हे युवा सेनेचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते मात्र त्यांना कोणतेही नियुक्तीपत्र दिले नाही असे शिवसेनेच्या वतीने जाहीर केल्याने शिंदे हे शिवसेनेत नाराज होते दरम्यान काही दिवसांपूर्वी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना नगरसेवकांचा एक गट समीर भुजबळांच्या भेटीला गेला होता मात्र राज्यात सत्तेत असलेले सेना-भाजप राष्ट्रवादी यांच्या फॉर्मुल्यानुसार निवडून आलेल्या सदस्यांना प्रवेश येता येणार नसल्यामुळे केवळ अमोल शिंदे यांनाच सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष तथा येवला लासलगाव मतदार संघ प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली.राम गीत लॉन्स या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ,गटनेते गणेश शिंदे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top