Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

परती बारिश से राज्य की फसलों को नुकसान; येवला में पंचनामे के आदेश

SKSudarshan Khillare
Oct 02, 2025 01:01:42
Yeola, Maharashtra
राज्यात परतीच्या पावसानं सर्वत्र शेती पिकांचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले; राज्य सरकारच्या आदेशानुसार येवला तालुक्यातील आठही मंडळांमध्ये पंचनामे के आदेश तहसीलदार आबा महाजन यांनी दिले, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी ग्राउंड लेव्हलवर पंचनामे करतात की नाही यह देखने के लिए तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी अचानक भेटी दे रहे हैं; इसके पार्श्वभूमी पर तहसीलदार आबा महाजन व कृषी अधिकारी शुभम बेरड नगरसुल मंडळामध्ये अचानक भेट देकर यंत्रणा पंचनामे करते है या नहीं, इसका आढावा लिया गया.
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Oct 02, 2025 03:18:27
Yeola, Maharashtra:विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने येवला शहरात भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. यंदा संघाचे शताब्दी वर्ष असल्याने या संचलनाला विशेष महत्त्व लाभले. पारंपरिक पोशाखात व गणवेशात स्वयंसेवकांनी तालबद्ध पद्धतीने टाळ-ढोल, घोषवाक्ये आणि शिस्तबद्ध रांगा यांसह शहरातून मगवणूक काढली. प्रमुख मार्गांवरून झालेल्या या पथसंचलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी फुल व टाळ्यांच्या गजरात स्वयंसेवकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाखास्थळी पूजन व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक मान्यवर तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. विजयादशमीच्या उत्सवात “संघाचे शताब्दी वर्ष समाजासाठी समर्पित” हा संदेश देण्यात आला.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 02, 2025 03:18:12
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात आज सायंकाळी शाही दसरा सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी हा सोहळा करवीकरांना अनुभवता येणार असून सायंकाळी 5 वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर शाही मिरवणूक संपन्न होणार आहे. या मिरवणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोल वादन पथके, लेझीम, झांज पथक, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे, मर्दानी खेळाची पथके, घोड्यांसमवेत अब्दागिरी सह मावळे सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्री तुळजाभवानी, श्री आई अंबाबाई आणि गुरु महाराज वाड्यातील पालख्या दसरा चौकाकडे येतील, त्यानंतर न्यू पॅलेस ते दसरा चौक या मार्गावर दीडशे बुलेटस्वार पोलीस एस्कॉर्ट आणि त्यामागे ऐतिहासिक मेबॅक कार मधून छत्रपती परिवाराचे आगमन होईल. ऐतिहासिक दसरा चौकात छत्रपतींच्या हस्ते शमी पूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा पारंपारिक सोळा संपन्न होईल.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 02, 2025 03:18:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मालमत्ता करासाठी छत्रपती संभाजी नगर मनपाने सुरू केलेली 'शास्ती से आझादी' या उपक्रमाला मुदतवाढ देण्यात आली आहे. थकीत मालमत्ता कर संबंधित मालमत्ताधारकांनी एकरकमी भरल्यास थकबाकीवरील शास्तीत ५० टक्के सूट देण्याची योजना मनपाने जाहीर केली आहे. दसरा दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेली ही योजना एक ते ३१ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिकेने परिपत्रक काढले आहे. मालमत्ता करवसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी मनपाकडून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १५ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकीवरील शास्तीत सूट दिली होती...
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Oct 02, 2025 03:15:22
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या बापूकुटी मध्ये अखंड सूत्रयज्ञाने बापूंना आदरांजली वर्ध्यात महात्मा गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रम सेवाग्राम इथल्या बापूकुटी आश्रमात पहाटेपासून कार्यक्रमाला सुरुवात रामधून, सर्वधर्मीय प्रार्थना, स्वच्छता अभियान, अखंड सूतकताई यासह विविध कार्यक्रम विद्यार्थी, गांधी अनुयायी कडून वाहीली जाणार आदरांजली व्याख्यानाचेही आयोजन अँकर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती सेवाग्राम आश्रमात अखंड सूत्रयज्ञाने साजरी केली जात आहे. प्रसिद्ध विचारवंत पुरुषोत्तम अग्रवाल यांचे गांधी विनोबा विचार संगमावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पहाटे नयी तालीम समिती परिसरातील घंटी घर ते बापू कुटी पर्यत 'नाम धून.’ करण्यात आली. सकाळी सहा वाजता बापू कुटीच्या व्हरांड्यात अखंड सूत्रयज्ञाला सुरुवात करण्यात आलीय. सकाळी प्रार्थनेनंतर प्रार्थनाभूमीवर सूतकताई करून बापूंना आदरांजली वाहण्यात आलीय. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने सेवाग्राम येथे आश्रम परिसरात पुरुषोत्तम अग्रवाल यांचे व्याख्यान आयोजित केले गेले आहेय. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या एम्पी थिएटर ग्रंथालय परिसरात साहित्यकार प्रेमचंद मुन्शी यांच्या ‘ईदगाह’ या कादंबरीवर आधारित ‘दास्तांगोई’ ही नाट्यकृती सादर हाेणार आहे. दिवसभर आज राजकीय, सामाजिक, गांधीवादी अनुयायी, विद्यार्थी यांची आदरांजली वाहण्यासाठी गर्दी असणार आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 02, 2025 03:06:16
Nashik, Maharashtra:नाशिक पोलिसांची टवाळखोरांवर कारवाई नाशिक मध्ये वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले असून शहरात सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील टवाळखोरी करणाऱ्या 92 संशयतांवर कठोर कारवाई केली आहे... तर सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणे मद्य प्राशन करून परिसरातील नागरिकांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर खाकीचा धाक दाखवत रस्त्यावरच चोप दिलाय... गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने डोकं वर काढला आहे... नाशिक नगरी ही तंत्रभूमी ते मंत्र भूमी म्हणून ओळख आहे... मात्र गेल्या काही दिवसांपासून ही ओळख कमी होत असून नाशिक हे गुन्हेगारींची नगरी म्हणून ओळख होती की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.... या संदर्भात मंत्री दादा भुसे आणि त्यानंतर भाजपाचे तिन्ही आमदार यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवा अशा पद्धतीच्या सूचना आणि निवेदन दिले होते... यावर आता पोलीस ॲक्शन मोडवर आले असून टवाळ पोरांवर करत कारवाई करत आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 02, 2025 03:04:58
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 02, 2025 03:04:21
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 02, 2025 02:15:40
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 02, 2025 02:01:32
4
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 02, 2025 01:01:25
Thane, Maharashtra:भिवंडीत इमारतीला आग... चित्र कला कंपनीच्या गोडाऊनला आग... भिवंडी तालुक्यातील माणकोली येथील हरिहर कंपाऊंड मधील ई-१५ ए इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. सदरची आग ही चित्र कला नावाची कंपनी लागली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोटबुक बनविण्याच केलं जातं होतं. या आगी मध्ये गोडाऊनच्या आत साठवलेला लाखो रुपयांचा कागद आणि नोटबुक जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली, परंतु माणकोली रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे सुमारे दोन तास उशिरा अग्निशमन दलाच्या गाडीला पोहचायला वेळ लागला. आगीचे कारण समजले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.
3
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 02, 2025 01:01:04
Thane, Maharashtra:भिवंडी\nअवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना अटक...\n\nएका कारमध्ये काही इसम हे बनावट नोटा बदली करण्यासाठी अग्निशस्त्रासह मिल्लतनगर, भिवंडी येथे येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळाली त्याअनुषंगाने जनार्दन सोनवणे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सापळा कारवाईबाबत मार्गदर्शन केल्याप्रमाणे पोलीस पथकाने भिवंडी फरहान हॉलकडे जाणाऱ्या रोडवर, मिल्लतनगर, ममता हॉस्पीटलच्या बाजुला, चाविंद्रा रोड, या ठिकाणी सापळा रचुन आरोपी 1) शिवानंद ज्ञानेश्वर कोळी वय २४ वर्षे, व 2) राहुल रामदास शेजवळ, वय २४ वर्षे, दोघे यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले. आरोपी व त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील ५०० रू. दराच्या नोटांचे 48 बंडल, एका आरोपीच्या ताब्यात 01 माऊझर/पिस्टल व 01 जिवंत काडतुस असे मिळुन आले. सदर पिस्टल, काडतुस, नोटांचे 48 बंडल व इको स्पोर्ट कार असा एकुण 6,33,450/- रू. किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यांच्याविरुद्ध निजामपूरा पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउनि / रविंद्र बी. पाटील, गुन्हे शाखा, घटक - 2 भिवंडी हे करीत आहेत. गुन्हयाच्या प्राथमिक तपासात आरोपी हे जप्त नोटा या खऱ्या भासवुन बदली करण्याच्या प्रयत्नात होते, त्यामुळे याद्वारे आवाहन करण्यात येते की, कोणीही अशा प्रकारच्या बनावट नोटा बदली करण्याच्या आमिषाला बळी पडु नये, याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधीत पोलीस ठाण्यास किंवा गुन्हे शाखेस माहिती द्यावी.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top