Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423101

चांदवड़ राहुड घाट में कंटेनर पलटने से हादसा, जान बची नहीं

SKSudarshan Khillare
Dec 27, 2025 13:30:38
Chandwad, Maharashtra
चांदवड (नाशिक): राहुड घाटात कंटेनर उलटले. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. चार ते पाच वाहनांना हुलकावणी देत कंटेनर रस्त्याच्या खाली गेला. एन.एच.आय.चे कर्मचारी व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने जीवितहानी नाही. राहुड घाट अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरतोय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 27, 2025 14:31:25
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांनी एकत्र येत राजर्षी शाहू आघाडीची औपचारिक घोषणा केली आहे. या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आघाडीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना व्ही. बी. पाटील यांनी, खासदारकी असो किंवा आमदारकी, आजवर सर्व निवडणुकांमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो. मात्र या महापालिका निवडणुकीत इंडिया आघाडीच्या वतीने एकतर्फी भूमिका घेतली गेली. त्यामुळे आता आम्ही आप आणि वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त महापालिका नव्हे तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही हीच आघाडी एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आज २१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही दिली. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)ला २५ जागा तर वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्र पक्षांना ३१ जागा असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. यावेळी व्हि. बी . पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली. एका व्यक्तीमुळे इंडिया आघाडी चुकीच्या दिशेने जात असल्याचे नमूद केले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 14:31:08
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 27, 2025 14:30:26
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 13:54:19
Kolhapur, Maharashtra:महायुती के तौर पर कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवत असताना जागावाटपात तडजोड करावी लागत असल्याचं भाजपचे सचिव महेश जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीकडून तब्बल ७०० ते ८०० इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी पुढे आल्यामुळे, प्रत्येकाला तिकीट देणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. महेश जाधव यांच्या म्हणण्यानुसार, या परिस्थितीत भाजपला काहीच जागा मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे अनेक तरुण, निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार नाही. तरीही महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यागाची तयारी ठेवावी, असं आवाहन त्यांनी केलं. काही ठिकाणी मित्रपक्षाला जागा गेल्या तरी राग मानू नये, प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान पक्षाकडून केला जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला. पक्षविरोधी भूमिका घेऊ नये तसेच बंडखोरी करू नये, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे. महेश जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे. पाहूया महेश जाधव नेमकं काय म्हणाले.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 27, 2025 13:47:00
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत बिघाड झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज जागावाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप 55 शिवसेना एकनाथ शिंदे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प ) 10 जागांवर निवडणूक लढणार असल्याचा फार्मूला जवळपास नक्की झाला होता. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, अकोला महापालिका निवडणूक फिफ्टी-फिफ्टीच्या ( शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) फार्मुल्यावर लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा iki पक्षाच्या नेत्यांनी म्हंटलं आहे. मात्र महायुती संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून चर्चा सुरूच असल्याचे इंद्रनील नाईक , आमदार अमोल मिटकरी आणि एकनाथ शिंदे शिवसेना चे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घडामोडींमुळे अकोला महायुतीतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून पुढील काही तासांत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता וर्तवली जात आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 27, 2025 13:46:37
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार में शिवसेना ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवणार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये बवीआ, मनसे, काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. पालिकेच्या 29 प्रभागात 115 उमेदवार तिन्ही पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या महाविकास आघाडीतून बाजूला होत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 27, 2025 12:53:03
Pune, Maharashtra:जयकुमार गोरे ऑन शंभूराज देसाई साताऱ्यात महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला होता... नाद आणि दहशत या दोन शब्दांवरून मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शंभूराजे यांच्यात वाक्ययुद्ध पहायला मिळालं होतं... शंभूराजे देसाई यांनी बोलताना म्हटलं होतं की आम्ही कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही...दरम्यान आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे अहिल्यानगर दौऱ्यावर असताना मंत्री गोरे यांनी शंभूराजे देसाई यांना प्रतिउत्तर दिलं आहे...मंत्री देसाई यांना दहशत नेमकी कोणाची आहे हे चांगलं माहित आहे...ते माझे सहकारी आणि मित्र आहेत...दहशत त्यांनाही चालत नाही आणि म्हणालाही चालत नाही असं गोरे म्हणाले.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 27, 2025 11:52:22
Dharashiv, Maharashtra:धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर पायी साल्हेरच्या किल्ल्यावर प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते मला “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. साल्हेर किल्ला केवळ उंचीचा नाही, तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा सर्वोच्च शिखर, ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट मधून व्यक्त केली भावना. हिंदवी परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित हिवाळी मोहीम अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक असा साल्हेर किल्ला पायी सर करण्याचा सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मला लाभला. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून चालताना प्रत्येक पाऊल इतिहासाशी संवाद साधत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर उभं राहिल्यावर मन अभिमानाने भरून आलं आणि स्वराज्याची जाणीव अधिक गडद झाली. शारीरिक थकवा होता, पण मन मात्र उंच आकाशाला गवसणी घालत होतं. या ऐतिहासिक मोहिमेला विशेष अर्थ प्राप्त झाला, जेव्हा प्रसिद्ध शिवव्याख्याते व शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते मला “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान वैयक्तिक नसून शिवविचार, सह्याद्री आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा आहे. हा पुरस्कार जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि शिवरायांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प दृढ करणारा आहे. साल्हेर किल्ला | थोडक्यात माहिती • महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला • उंची : सुमारे १५६७ मीटर (समुद्रसपाटीपासून) • जिल्हा : नाशिक • परिसर : बागलाण – साल्हेर–मुल्हेर डोंगररांग • ऐतिहासिक महत्त्व : इ.स. १६७२ मधील साल्हेरची लढाई — छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सैन्यावर मिळवलेला निर्णायक विजय • वैशिष्ट्ये : विशाल पठार, पाण्याच्या टाक्या, प्राचीन अवशेष • साल्हेर–मुल्हेर ही किल्ल्यांची जोडी सह्याद्रीतील अत्यंत महत्त्वाची मानली जाते साल्हेर किल्ला केवळ उंचीचा नाही, तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा सर्वोच्च शिखर आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 27, 2025 11:51:52
kolhapur, Maharashtra:नागपूर - उमरेड शहरातील गाणगापूर परिसरात आई आणि मुलीची क्षुल्लक कारणातून हत्या, - पार्वताबाई फुकट अस वयोरुद्ध महिलेच तर संगीता रिठे असं मृतक मुलीचे नाव आहे. - गाणगापूर शिवारात माय- लेकी नाल्याला लागून असलेल्या घरामध्ये राहत होत्या, - पार्ववतीबाई यांनी एका व्यक्तीला शिवीगाळ केली त्यामुळे संतापून रागाचा भरात दोघीना लाकडी दांड्याने मारहाण केली. यात दोघीचा मृत्यू झाला. - संगीता रिठे हिचा विवाह शेगाव येथे झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर ती आई जवळच राहत होती. - लाकडी दांडा नदीकाठवर फेकला, या घटनेने परिसरात खळबळ उडल्यानं मोठया प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. - उमरेड पोलिसांनी एकाला संशयाचा आधारावर ताब्यात घेतल आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 27, 2025 11:32:25
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये ठाकरे कश शिवसेनेमधील दोन गटात तुफान राडा झाला आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान पक्षातून हकालपट्टी झालेले विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांनी निवडणुकीतील पराभवास खासदार संजय देशमुख हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. ५८ पैकी एकही जागा शिवसेनेला जिंकता आली नाही. यामागे खासदार संजय देशमुख यांची निष्क्रिय भूमिका जबाबदार असल्याचा आरोप करीत ढवळे यांनी खासदार देशमुख यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. दरम्यान या सत्काराच्या ठिकाणी शिवसेना उभाठाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे शिवसैनिकांसह लाठ्या काठ्या घेऊन पोहोचले. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आल्याने त्यांच्यात बाचाबाची, धक्काबुक्कीसह तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी सत्काराचा हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी टेबल ची तोडफोड करण्यात आली. शिवाय खासदारांचे बॅनर काढून नेण्यात आले. बाईट : राजेंद्र गायकवाड : संतोष ढवळे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 27, 2025 11:32:08
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पपईच्या बागांची अपेक्षेप्रमाणे वाढ होऊ शकली नाही. अनेक ठिकाणी पपईची झाडे पिवळी पडली असून फळधारणा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्याचबरोबर रोगराईचाही प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमुळे पपईच्या उत्पादनात सुमारे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. पपई पिकासाठी खत,औषधे आणि मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. मात्र,अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न आलेले नाही. सध्या बाजारात पपईला दर चांगले मिळत असले तरी उत्पादन अत्यल्प असल्याने त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. परिणामी अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 27, 2025 11:31:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये युती साठी शिवसेना भाजप मध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे, पालकमंत्री संजय शिरसाठ आणि मंत्री अतुल सावे और दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या पाच तास मॅरेथॉन बैठकीत अजूनही काही जागाबाबत तिढा कायम आहे.. 90% पर्यंत बोलणं पूर्ण झालं मात्र उर्वरित आठ ते दहा जागांंबाबत चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आलेला असल्याचं मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितलं आणि त्यानंतर वरून जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही युतीची घोषणा करू, पुढील एक तासात सर्व चित्र स्पष्ट होईल अजून युती झाली नाही मात्र आम्ही युतीसाठी आग्रही असल्याचेही संजय शिरसाठ यांनी सांगितलं.. त्यामुळे पाच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत अजूनही पूर्णपणे अंतिम तोडगा निघाला नाही असंच म्हणता येईल... ( बातमी इनसाइड 2 प्रभागांवर दोन्ही पक्षाचा दावा आहे, यातील 8 जागांवर दोन्ही पक्ष ठाम आहे या बाबत वाद ही झालेत मात्र तोडगा नाही त्यामुळं हे हा वाद मुंबई पर्यंत गेलाय...)
0
comment0
Report
Advertisement
Back to top