Back
Kolhapur महापालिका चुनाव: NCP-SP, VBGA और AAP ने राजर्षी शाहू आघाडी घोषित
PNPratap Naik1
Dec 27, 2025 14:31:25
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांनी एकत्र येत राजर्षी शाहू आघाडीची औपचारिक घोषणा केली आहे. या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आघाडीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना व्ही. बी. पाटील यांनी, खासदारकी असो किंवा आमदारकी, आजवर सर्व निवडणुकांमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो. मात्र या महापालिका निवडणुकीत इंडिया आघाडीच्या वतीने एकतर्फी भूमिका घेतली गेली. त्यामुळे आता आम्ही आप आणि वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त महापालिका नव्हे तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही हीच आघाडी एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आज २१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही दिली. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)ला २५ जागा तर वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्र पक्षांना ३१ जागा असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. यावेळी व्हि. बी . पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली. एका व्यक्तीमुळे इंडिया आघाडी चुकीच्या दिशेने जात असल्याचे नमूद केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 27, 2025 16:00:440
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 14:31:080
Report
ABATISH BHOIR
FollowDec 27, 2025 14:30:260
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 27, 2025 13:54:390
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 13:54:190
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 27, 2025 13:47:000
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 27, 2025 13:46:370
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 27, 2025 13:30:380
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 27, 2025 12:53:030
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 27, 2025 11:52:220
Report
AKAMAR KANE
FollowDec 27, 2025 11:51:520
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 27, 2025 11:32:250
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 27, 2025 11:32:080
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 27, 2025 11:31:110
Report