Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेड में 11 नगर पालिकाओं के लिए मतदान शुरू, 291 केंद्र, 2.45 लाख मतदाता

SMSATISH MOHITE
Dec 02, 2025 03:21:16
Nanded, Maharashtra
नांदेड जिल्ह्यातील एकूण 11 नगर पालिकांसाठी मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. 10 नगर परिषद आणि एका नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. एकूण 291 मतदान केंद्र तर 2,45,494 एकूण मतदार आहेत. अध्यक्ष पदासाठी 71 उमेदवार रिंगणात असून सदस्य पदासाठी 873 उमेदवार रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी नांदेडमधील निवडणूका प्रतिष्ठेच्या आहेत. सकाळच्या सत्रात मतदानाला कमी प्रतिसाद दिसत आहे. लोहा येथील मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Dec 16, 2025 03:19:38
Dhule, Maharashtra:अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत खडकापाणी अंतर्गत डोटकीपाडा येथे पंचायत समितीमार्फत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट व मानकबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत युवक क्रांती नंदूरबारच्या वतीने पंचायत समिती अक्कलकुवा येथे निवेदन देण्यात आले. सदर रस्त्याचे काम सुमारे चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र त्या वेळी केवळ खडी टाकून काम अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले होते. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती. अलीकडेच अत्यंत खराब व असमतल अवस्थेत असलेल्या रस्त्यावर कोणतीही योग्य तांत्रिक प्रक्रिया न करता थेट सिमेंट काँक्रिट टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्ष पाहणीत आवश्यक लेव्हेलिंग, कंपॅक्शन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकांनुसार प्रक्रिया न पाळता काम सुरू असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप युवक क्रांतीने केला आहे. त्यामुळे सदर रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता असून शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तात्काळ तांत्रिक चौकशी करून कामाची मोजणी व गुणवत्ता तपासणी करावी, तसेच दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून सदर रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी युवक क्रांती नंदूरबारच्या वतीने करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 16, 2025 03:19:19
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 16, 2025 03:18:54
Ratnagiri, Maharashtra:दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी स्टंटबाजीचा धुमाकूळ; पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र या गर्दीचा फायदा घेत काही पर्यटकांकडून सर्रास नियमभंग केला जात असून, समुद्रकिनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी, रेस लावणे आणि मद्यप्राशनाचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कुटुंबासह, लहान मुले व महिला पर्यटकांसह आलेले सामान्य पर्यटक भीतीच्या छायेखाली आपला वेळ घालवत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी समुद्रकिनारी वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही काळ उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. मात्र सध्या हे आदेश धुडकावून पर्यटक आपली वाहने थेट समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जात असून, हजारो पर्यटकांच्या गर्दीत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रेस लावल्या जात आहेत. काही ठिकाणी तर वाहनांच्या टपावर बसून मद्यप्राशन करत धिंगाणा घालण्याचे प्रकारही सर्रास दिसत असल्याचे चित्र दिसते. या बेजबाबदारपणामुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरणारे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, हजारोंच्या संख्येने पर्यटक उपस्थित असतानाही मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पोलीस बंदोबस्ताचा पूर्णपणे अभाव जाणवत आहे. पर्यटनाला चालना मिळणे ही सकारात्मक बाब असली तरी नियमांचे उल्लंघन आणि सुरक्षेचा बोजवारा उडाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुरुड समुद्रकिनाऱ्यावर तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवून वाहनांवर कठोर निर्बंध घालावेत, तसेच स्टंटबाजी व मद्यप्राशन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांसह सामान्य पर्यटकांकडून जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 16, 2025 03:17:15
Latur, Maharashtra:पैशाची हाव, हत्येचा बनाव... एक चुक नडली अन् भयंकर षडयंत्राचा परदाफाश... पैशाच्या हव्यासापोटी केलेल्या थरकाप उडवणाऱ्या हत्येचा बनाव औसा तालुक्यात उघडकीस आला आहे. कारमध्ये एका जिवंत व्यक्तीला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोविंद यादव असं यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एक कोटींच्या टर्म इन्शुरन्ससाठी स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा गणेश चव्हाण यांनी कट रचला होता. मात्र एका फोन कॉलमुळे त्याचा डाव फसला आणि हे भयंकर षडयित्र पोलिसांनी उघडकीस आणलंय. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.... लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर एका व्यक्तीला आधी पोत्यात भरलं. नंतर कारमध्ये कोंबलं आणि जिवंत अवस्थेतच कारला आग लावून जाळलं. या घटनेत व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. मृतदेह जळून राख झाला. तिथेच पडलेल्या कड्यावरून हा मृतदेह गणेश चव्हाण याचा असल्याचं पोलिसांनी व्यक्त केला. पण पोलिसांच्या तपासाची चक्रं फिरलं आणि हादरवणाऱ्या या हत्येचा खळबळजनक ट्विस्ट आला. गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण नसून गोविंद यादव नावाच्या एका निष्पाप व्यक्तीचा असल्याचं पोलिसांचा तपासात समोर आलं. गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचा भासवण्याचा पुरेपर प्रयत्न केला गेला. पण पोलिसांच्या तपासात हा हत्येचा बनाव असल्याचं उघड झालं. हा बनाव गणेश चव्हाण यानेच केला होता. आपला अपघाती मृत्यू झाल्याचं त्याला दाखवायचं होतं. गणेशने एक कोटींचा टर्म इन्शुअरन्स काढला होता. पैसे मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्याच हत्येचा बनाव केल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे. घटने नंतर आरोपी हा कोल्हापूर मार्गे सिंधुदुर्गात जाऊन लपला.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 16, 2025 03:16:14
Dhule, Maharashtra:सरंगखेड्याच्या अश्व बाजारात ६०६ घोड्यांच्या विक्रीतून तीन कोटी तीस लाख पन्नास हजाराची उलाढाल झाली आहे, हा अश्व विक्रीचा विकरमई टप्पा आहे. येणाऱ्या काही दिवसात पाच कोटींचा टप्पा पार पडेल असा अंदाज चेतक फेस्टिवल चे आयोजक जयपाल सिंग रावल यांनी व्यक्त केला. यावर्षी विक्रमी उलाढाल होणार असून यात्रेत आणखीन दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्वंची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सरंगखेड्याच्या घोडेबाजारात तीन कोटी तीस लाख पन्नास हजाराची उलाढाल झाली आहे. अवघ्या दहा दिवसात ६०६ घोड्यांच्या विक्रीतून तीन कोटी तीस लाख पन्नास हजाराची उलाढाल झाली आहे. यावर्षी सरंगखेड्याच्या घोड्या बाजारात चांगलीच तेजी दिसून येत आहे. देशातील सर्वात मोठा आश्वांच्या बाजार म्हणून सारंखेडा ची ओळख निर्माण होत असल्याने सारंखेडा च्या घोड्या बाजारात देखील तेजी पाहायला मिळून येत आहे. यावर्षी ३,००० पेक्षा अधिक अश्व दाखल झाले आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 16, 2025 03:04:07
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत शिवसेना, भाजप कडून मतदारांचे छायाचित्र असलेल्या वोटर स्ल slip वितरित केल्या जात असून, हा प्रकार धोकादायक आहे, या फोटोचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती शिवसेना युबीटी ने व्यक्त केली आहे. हा प्रकार डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारा असून निवडणूक विभागाने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे. मतदारांचे छायाचित्र असलेले अनधिकृत अॅप व वोटर स्लिप उमेदवारांच्या प्रचार चित्रासह वाटले जात असतानाही कारवाई का नाही असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. छायाचित्र ही वैयक्तिक बाब असल्यामुळे ते सार्वजनिकरित्या तसेच, मोबाईलवर प्रसिद्ध करता येत नाही. मात्र, खासगी सॉफ्टवेअर कंपन्या अनधिकृतपणे हे ऍप उमेदवारांना विकत आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 16, 2025 03:03:50
Dhule, Maharashtra:एकाच कांद्याला दोन भाव असा अनुभव धुळ्यातील शेतकऱ्यांनी घेतलं आहे. धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे. मात्र धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अवघा सातशे ते हजार रुपये पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे कांदा विक्रीस जात आहे. धुळे जिल्ह्यात ज्या कांद्याला सातशे ते हजार रुपये भाव दिला जातो, तोच कांदा लासलगाव कांदा मार्केटात 2700 ते 2800 रुपये पर्यंत भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती विषयी नाराजी व्यक्त केली आहे. धуле जिल्ह्यातील बाजार समितीत व्यापारी साखळी करून कांदा खरेदी करतात का? याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अश्या पद्धतीने शेतकरी्यांची लूट केली जातं असेल तर दोषींवर कारवाई करून त्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 16, 2025 03:00:37
Dhule, Maharashtra:ANCHOR - शिंदखेडा तालुक्यात पंतप्रधान सन्मान निधीपासून शेतकरी वंचित आहेत. यां विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिंदखेडा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळत होता, त्या शेतकऱ्यांना कागदपत्रांवर वेगवेगळ्या त्रुटी दाखवून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसापासून VANCHIT ठेवले जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही निधी खात्यावर जमा होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्रांची पुर्तता करून शेतकऱ्यांना सन्मानाने त्यांच्या खात्यावर निधी द्यावा अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून शेतकाऱ्यांना आर्थिक आधार म्हणून सन्मान निधी दिला जातो. मात्र तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा होत नाही काही शेतकऱ्यांना पुर्वी लाभ भेटत होता मात्र केव्हासी नाही वगैरे वगैरे कारण दाखवून लाभ बंद करण्यात आला. शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली असतांना त्यांना लाभ मिळत नाही.शेतकऱ्यांनी कृषी विभाग, तहसील कार्यालय तसेच संबंधित यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा केला. तरीही प्रश्न प्रलंबितच असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. बी-बियाणे, खत, औषधे यासाठी खर्च वाढलेला असताना सन्मान निधी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना सन्मान निधीचा लाभ द्यावा अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या वतीने शासनाला तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा सन्मान निधीचा प्रश्न कधी मार्गी लागणार, याकडे आता शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 16, 2025 02:52:28
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - 50 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार रंगेहाथ जाळ्यात, पुणे अँटीकरप्शन विभागाची सोलापुरात मोठी कारवाई - सोलापुरात 50 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदाराला रंगेहात अटक - उत्तर तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या चंद्रकांत हेडगिरे या नायब तहसीलदारावर पुणे अँटी करप्शन विभागाची कारवाई - मंडल अधिकाऱ्याचे थकलेले वेतन काढण्यासाठी मागितली होती साठ हजार रुपयांची लाच - पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने सोलapurात नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ - सदर घटनेबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 16, 2025 02:51:46
Malegaon, Maharashtra:पुन्हा कांदा लागवड, शेतकऱ्याने कांदा रोपातून साकारले कांदा लागवड नाव, सरकारकडे केली मागणी - आस्मानी- सुलतानी संकटांतून बाहेर येत बळीराजाची पुन्हा एकदा कांदा लागवड सुरू - सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा उपक्रम.. कसमादे परिसरात बळीराजाची पुन्हा एकदा कांदा लागवड झाली असून व्यंगचित्रकार शेतकरी किरण मोरे यांनी कांद्याच्या रोपातुन कांदा लागवड ही नाव साकारून सरकारचे लक्ष वेधून शेतकरी पुन्हा एकदा कांदा लागवड करीत आहेत मोठ्याप्रमाणावर कांदा पिकवणार आहेत मात्र सरकारने पुन्हा काही अडकाठी आणू नये.. कांदा उत्पादकांचा कांदा परदेशात जाऊ द्यावा.. दोन पैसे मिळू द्यावे, देशालाही परकीय चलन वाढेल अशी मागणी त्यांनी या नावातून केली आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 16, 2025 02:51:01
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 16, 2025 02:48:41
Virar, Maharashtra:विरार मधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुख्यात गॅंगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तरप्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहात अटक केली आहे. मंगळवारी त्याला वसईत आणले जाणार आहे. विरार मध्ये राहणार्‍या समय चौहान या चाळ बिल्डरची २६ फेब्रुवारी २०२२ रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १३ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गॅंगस्टर सुभाष सिंग ठाकूर हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. तो जेजे हत्या प्रकरणात उत्तरप्रदेशात फतेहगढ कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र २०१९ पासून उपचाराच्या नावाखाली बनारस हिंदू विद्यापीठाच्या सर सुंदरलाल रुग्णालयात रुग्णालायत होता. त्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करता येत नव्हती. २०२४ मध्ये सुभाषसिंग ठाकूर याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर सुभाषसिंग ठाकूर याला वसईत आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि कारागृहातून सुभाषसिंग ठाकूर याचा ताबा घेतला. त्याला मंगळवारी मुंबईत आणले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 16, 2025 02:48:18
0
comment0
Report
Advertisement
Back to top