Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेड में आरक्षण उपवर्गीकरण की मांग पर आंदोलन ने सरकार के खिलाफ आवाज उठाई

SMSATISH MOHITE
Oct 23, 2025 12:02:28
Nanded, Maharashtra
एस सी प्रकर्गाच्या आरक्षण वर्गीकरनाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आज अनोखं आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंघोळ करून भाऊबीज साजरी करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवला. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच उपवर्गीकरण करण्याची मागणी करत आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेगळ्या आंदोलनाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Oct 23, 2025 16:45:28
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर-दर्यापूर महामार्गावर पायटांगी गावाजवळ आज तीन वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. कार, ऑटो आणि ट्रॅक्टर या तिन्ही वाहनांच्या धडकेत एक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ exposing वाहतूक सुरळीत केली आहे.दरम्यान, जखमींना तातडीने मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 23, 2025 15:48:45
Akola, Maharashtra:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प ) ही “किंगमेकर” ठरणार असल्याचे मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार RSS च्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याबाबत विचारले असता मिटकरी म्हणाले, “आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे. संघ आमच्यावर विचारधारा लादू शकत नाही. कदाचित प्रकृतीच्या कारणामुळे अजितदादा गेले नसतील.”दरम्यान, फडणवीसांविषयी बोलताना मिटकरी म्हणाले, “145 च्यावर आमदार आणि बहुमत असल्याने ते 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहणारच, यात काही वेगळं नाही.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय हा निर्णायक ठरेल, असेही आमदार मिटकरी यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 23, 2025 15:46:34
Nagpur, Maharashtra:नागपुर के वैशाली नगर में हुए एक मामूली विवाद ने हिंसक रूप ले लिया। ये विवाद एक चाय की दुकान पर हुआ जिसमे चाय विक्रेता को गंभीर रूप से घायल कर दिया गया ,इस हमले में शामिल 3 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है और उनके अन्य साथियों की तलाश कर रही है। जानकारी के अनुसार अभिरूप आशीष कुमार समंदर की चाय की दुकान है। उनकी दुकान के सामने ही प्रणय लारोकर नाम के व्यक्ति की भी चाय की दुकान है। 2 दिन पहले रात के समय प्रणय की दुकान पर आरोपी कामरान मलिक और नबु मलिक, अपने साथियों के साथ पहुंचे और दुकान पर मोबाइल चार्ज करने के लिए कहा।हालांकि तब प्रणय ने चार्जिंग लगाने को मना कर दिया. जिसके चलते आरोपियों ने प्रणय से विवाद के बाद मारपीट शुरू कर दी। तब अभिरुप अपनी दुकान से झगड़ा छुड़वाने के लिए पहुंचा था। जिसके बाद आरोपी वहां से चले गए थे। थोड़ी देर बाद वे दोबारा अन्य साथियों को साथ लेकर वापस लौटे और अभिरय को उसकी दुकान से बाहर खींचकर जानलेवा हमला कर दिया। हमले की यह पूरी घटना परिसर में लगे सीसीटीवी कैमरे में भी कैद हुई है।
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 23, 2025 14:36:31
Baramati, Maharashtra:तलवार आणि कोयता बळगत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न बारामती तालुका पोलिसांनी एकाला केली अटक.. बारामती एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या गुन्ह्याच्या वेळी हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. समर्थ सिद्ध मल्हारी मालुसरे वस्ती वंजारवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे असा आरोपीचे नाव आहे.. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी एमआयडीसी परिसरातून विविध ठिकाणी छापे टाकून आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून तलवार कोयता जप्त केलाय...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 23, 2025 14:36:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : छत्रपती संभाजीनगर मधील वंचित बहुजन आघाडीचा उद्याचा मोर्चा निघणारच - सुजात आंबेडकर - भाजप और मित्रपक्ष सोडून इतरांशी युती करण्यास आम्ही सकारात्मक आहोत - मात्र भाजप सोबत नाही जाणार. - ऑन MIM - इम्तियाज जलील यांचा काय अनुभव आहे मला माहिती नाही. - मात्र आम्ही भाजप विरोधात भूमिका घेतल्यावर अनेकजण आमच्या पक्षात आहे. - लोकसभेत इंडिया आघाडीने आम्हला सोबत घेतले नाही. - त्याचा फटका इंडिया आघाडीला विधानसभेला बसलाय *- ऑन संभाजीनगर मोर्चा :* - वंचित आघाडी उद्याचा मोर्चा काढणार आहोत. - मुळात ज्या संघटनेच्या बॅनर लावला म्हणून गुन्हा दाखल केला ती संघटना मुळात लीगल आहे का? *- ऑन संघ :* - संघ कोणत्या नावाखाली रजिस्टर आहे? तो कोणत्याही नावाखाली फंड गोळा करते त्याचा सोर्स नाही. मग ती संघटना लीगल आहे काय? *ऑन महाविकास आघाडी मोर्चा* - मुळात चोराच्या घरी मोर्चा काढून काय उपयोग आहे. - इलेक्शन कमिशन त्यात सहभागी आहे. - त्यामुळे ECI वर मोर्चा काढून काय उपयोग. - मुळात प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते 76 लाख मत वाढली कशी असा सवाल उपस्थित केला तेव्हा कोणी साथ दिली नाही.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 23, 2025 14:34:11
Pune, Maharashtra:राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या निवासस्थानी सभापती राम शिंदे यांनी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय...राजेंद्र फाळके यांनी सात वर्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद सांभाळून नुकताच तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला...त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते राम शिंदे हे त्यांच्या घरी गेल्याने अनेक वर्षांपासूनचे राजकीय विरोधक एकत्र आल्याने चर्चेला उधान आलय... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या वेळी शरद पवारांना साथ देणारे राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हा परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे आणि फाळके यांच्या भेटीला विशेष mahत्त्व आले आहे...सभापती आमदार राम शिंदे यांनी राजेंद्र फाळके यांच्या निवासस्थानी फराळाचा आस्वाद घेतला आहे...या वेळी कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी आप्पा फाळके यांच्यासह परिवारातील इतर सदस्य, कर्जत तालुका भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते...विशेष म्हणजे राजेंद्र फाळके हे कर्जत येथे राहतात त्यामुळे फाळके आणि शिंदे यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांना अडचणीत आणण्याचा तर प्रकरण आहे ना असा सवाल उपस्थित होत है.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 23, 2025 14:10:00
Baramati, Maharashtra:बाबीर यात्रेत धनगर समाजाचे पारंपारिक गजे ढोल नृत्य स्पर्धा चालू असतात. दिवाळीच्या दरम्यान भाऊबीजेदिवशी पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रुई येथे बाबीर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात भरते. यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. या यात्रेचे खास आकर्षण असते ती पारंपारिक गजेढोल नृत्य स्पर्धा. मागील 26 वर्षापासून बाबीर देवाच्या यात्रेच्या निमित्ताने बाबीर गडावर आयोजक अमोल भिसे यांच्या नेतृत्वाखाली गजेढोल नृत्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. या यात्रेनिमित्त राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभेचे अध्यक्ष राम शिंदे, माजी मंत्री महादेव जानकार, आमदार गोपीचंद पडळकर हे भेट देऊन बाबीर देवाचे दर्शन घेत असतात.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 23, 2025 14:08:43
Dhule, Maharashtra:झी २४ तासने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रबरी दुधाची बातमी दाखवल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खळखळून जागा झालं आहे. झी24तास च्या बातमीची दखल घेत जळगावहून विशेष पथकाने शिरपूर शहरात दाखल होत संबंधित डेअरीवरनं दुधाचे नमुने घेतले आहेत. निकषात न बसणारा दूध गटारीमध्ये फेकण्याय आले आहे. या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये अहवाल येईल, त्या अनुरूप कारवाई केली जाईल असा आश्वासन अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या मदतीने अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने संबंधित दुध डेअरीवर तपासणी केली. शिरपूर येथील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल नंतर शिरपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून संयुक्त ही कार्यवाही केली आहे. शिरपूर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाचे संपूर्ण टीमने शिरपूर मधील त्या दुध विक्री दुकानातील दुधाचे नमुने घेतले. संयुक्त कारवाईदरम्यान जवळपास 500 हून अधिक लिटर दूध गटारीत फेकन्याय आले. संबंधित दुकान मालकाचे आणखी अन्य ठिकाणी असलेल्या गोडाऊन मधील दुधाची तपासणी करण्यात आली. या दुधामध्ये भेसळ असल्याचा संशय असल्याकारणाने या दुधाने कोणाला शारीरिक इजा पोहोचू नये यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून उर्वरित दूध फेकन्याय आले.
3
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 23, 2025 14:01:28
Baramati, Maharashtra:इंदापुरात कृषिमंत्री भरणे यांनी वाजवला गजेढोल..... बाबीर देवाच्या दर्शनाला गेल्यावर गावकऱ्यांनी मंत्री भरणेंना घेतलं खांद्यावर.... ANCHOR धनगर समाजाच श्रद्धास्थान असलेल्या इंदापूर तालुक्यातील बाबीर देवाची यात्रा पार पडत असून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाबीर देवाचे दर्शन घेतलेय. बाबीर देवाच्या दर्शनासाठी गेल्यावर गावकऱ्यांनी मंत्री भरणे यांना अक्षरशः स्वतःच्या खांद्यावरती उचलून घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात गजे ढोल स्पर्धा पार पडते.दत्तात्रय भरणे यांनी यात सहभागी होत गजे ढोल वाजवण्याचा आनंद घेतलाय.गेल्या 26 वर्षापासून बाबीर देवाच्या यात्रेच्या निमित्ताने बाबीर गडावर गजे ढोल नृत्य स्पर्धा घेतल्या जातात,अमोल भिसे यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा पार पडते....
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 23, 2025 13:36:16
Pandharpur, Maharashtra:भाऊबीज निमित्त पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान केले श्री विठ्ठलास सोने पगडी, बालाजी नाम, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, शिरपेच लहान १० लोलक असलेला, तोडे जोड, तुळशीची माळ १ पदरी, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, लक्ष्मी पेंडल लॉकेट, तांदळया हार ७ पदरी, अष्टपैलू मण्याची कंठी ८ पदरी, सोन्याचे पैंजण जोड, इ. अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत. श्री रुक्मिणी मातेस सोने मुकुट, मण्यां मोत्याच्या पाटल्या, मस्त्य जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, सोन्या मोत्याच्या तानवड जोड, सूर्य, मोत्याचा कंठा, मोत्याचे मंगळसूत्र, रूळ जोड, चिंचपेटी हिरवी, पैंजण जोड, बाजीराव गरसोळी, नवरत्नाचा हार, जडावाचा हार, पाचूची गरसोळी, खड्याची वेणी, कालमाडी सोन्याचे बाजूबंद जोड, जडावाचा बाजूबंद जोड, तन्मणी मोठ, मद्राशी कंठा, इत्यादी अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 23, 2025 13:30:59
Jalna, Maharashtra:जालना : फक्त लढ म्हणा गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यामुळे 4 एकरावरील पिकांचं नुकसान, 11 वीत शिकणाऱ्या यशश्री सवासेला तुमच्या मदतीची गरज अँकर यंदा जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गोदावरी नदीला आलेल्या महापूराचा फटका जालन्यातील साष्टपिंपळगावच्या यशश्री सवासे या विद्यार्थिनीला बसलाय.11 वीत शिकणाऱ्या यशश्रीचा पुढील शिक्षणासाठी संघर्ष सुरु झालाय. गोदावरी नदीला आलेल्या महापुराचं पाणी जालन्यातील साष्टपिंपळगावात राहणाऱ्या यशश्री सवासे हिच्या वडिलांच्या 4 एकर शेतात शिरलं. आणि कापसाच्या हिरव्यागार कैऱ्या झाडालाच जळून खाक झाल्या. या कपाशी पिकातून चांगलं उत्पन्न होईल आणि मुलीच्या पुढील शिक्षणासाठी मदत होईल असं यशश्रीच्या वडिलांना वाटलं होतं. पण अतिवृष्टीमुळे हिरवी गार असलेलं कपाशी पीक 8 दिवसातच जळून खाक झालं. या कपाशीतून एकही रुपया यशश्रीच्या वडिलांच्या हाती लागणार नाहीय. त्यामुळे कधी शेती कामात तर कधी अभ्यासात मग्न असलेल्या यशश्री समोर पुढील शिक्षण कसं पूर्ण होणार याची चिंता लागलीय. सध्या यशश्री अंबडच्या मत्स्योदरी महाविद्यालयात 11 वी सायन्स मध्ये शिकत असून सीईटीची तयारी करते.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 23, 2025 13:04:06
Kolhapur, Maharashtra:लोकराजा राजर्षी शाहू महाराज लोकोत्सव समितीच्या वतीने दिवाळी सणाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्यासोबत फराळाचे आयोजन केले आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सन एकोप्याचा दिवाळी फराळ आपुलकीचा असं कार्यक्रमाला नाव देण्यात आलं आहे. शाहू महाराजांनी सर्वधर्म समतेचा विचार कोल्हापूरमध्ये रुजवला आहे तो संपूर्ण देशभर अंमलात आणला जातो. त्यामुळेच आज देखील कोल्हापुरात दिवाळी सण सर्व धर्मीयांच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह मोठ्या संख्येने सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 23, 2025 13:02:03
Beed, Maharashtra:बीड:जय भगवान महासंघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार, मुंडे भावंडांना मराठवाड्यातून आव्हान..? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार आहे. मराठवाड्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार असल्याचं जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले. जो कोणी ओबीसींचा विचार करेल असंच नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हान दिले आहे.. या निवडणुकीत मराठा समाज बांधवांना देखील सोबत घेणार असल्याचा दावा सानप यांनी केला. या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी जातीवाद संपला पाहिजे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता मराठवाड्यातील किती ठिकाणी जय भगवान महासंघ आपले उमेदवार उभे करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.. तर दुसरीकडे जय भगवान महासंघ निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळे मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांना एक प्रकारे आव्हान आहे.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top