Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

महूर में अवैध बालू तस्करों ने पुलिसकर्मियों पर धक्काबुक्की की

SMSATISH MOHITE
Mar 03, 2026 08:15:19
Nanded, Maharashtra
रॉयल्टीची पावती मागणाऱ्या पोलिसांना मस्तवाल वाळू माफियानी धक्काबुक्की केली. नांदेड जिल्ह्यातील माहूर मध्ये ही घटना घडली. अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाला पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईनवाड यांनी विचारणा केली. टिप्पर चालकाने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. टिप्पर चालक आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस उपनिरीक्षकासोबत वाद घालत धक्काबुक्की केली. वाळूची तस्करी करणारे राहुल मुसळे, शक्ती ठाकूर, एकनाथ मानकर, अमित पावलबुद्धे चौघावर माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 03, 2026 09:46:23
Jalna, Maharashtra:जालना : माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली रंगपंचमी साजरी.. भोकरदन येथे निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंग उधळत रंगपंचमी.. उध्दव, राज ठाकरेंसह संजय राऊत आणि अब्दुल सत्तारांवर केली टिका आज संपूर्ण देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर जालनाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी जालन्यातील भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे, यावेळी दानवेंनी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली आहे. तसेच सर्व देशवासीयांना रंगपंचमीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्यात. यावेळी दानवेंनी संजय राऊत यांच्यासह उध्दव ठाकरे,राज ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टिका केलीय.उद्धव ठाकरे हे हिरव्या रंगात जाऊन बसले असून त्यांना आता हिरवा रंगच शोभून दिसतो असं म्हणत संजय राऊत सकाळी कोंबड्यासारखे ओरडतात अशी टिका दानवेंनी केली.अब्दुल सत्तरांनी सिल्लोडमध्ये दंगल घडवून आणली असूनते हिरव्या रंगात जन्मले अशी टिका दानवेंनी केली
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 03, 2026 09:30:14
Kolhapur, Maharashtra:सगळीकडे होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. रंग, जल्लोष आणि पारंपरिक होळी दहन ही या सणाची ओळख आहे. मात्र होळी पेटवताना मोठ्या प्रमाणात शेणी आणि लाकडांचा वापर केला जातो. पर्यावरणाचा विचार करता हा मुद्दा गंभीर ठरतो. यालाच सकारात्मक पर्याय देत पुरोगामी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक स्तुत्य उपक्रम राबवला जाण्यात आला. शहरातील विविध तालीम संस्था आणि तरुण मंडळांकडून ‘शेणीदान’ हा उपक्रम सातत्याने राबवला जातो. या उपक्रमांतर्गत अनेक मंडळे होळी दहनासाठी प्रतीकात्मक स्वरूपात केवळ पाच शेणींचा वापर करतात आणि उर्वरित शेणी दान स्वरूपात देतात. या शेणी थेट पंचगंगा स्मशानभूमी येथे पाठवण्यात येतात. अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा स्मशानभूमीला दरवर्षी सरासरी सुमारे 35 लाख शेणींची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन होळीच्या निमित्ताने समाजोपयोगी काम करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जातो. यंदा होळी निमित्ताने तब्बल 6 लाख शेणी जमा झाल्या असून, हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरकच नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श ठरत आहे. सण साजरा करतानाच समाजकार्याची जोड देताना हा कोल्हापूरचा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 03, 2026 09:02:03
Kolhapur, Maharashtra:दुबईमध्ये तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेला कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील २५ जणांचा ग्रुप आज सकाळी सुखरूप मायदेशी परतला आहे. दोन विमानांद्वारे आखाती देशांतून भारतात आणण्यात आलेल्या प्रवाशांपैकी एका विमानात हा संपूर्ण ग्रुप होता. दुबईतील तणावग्रस्त भागात या ग्रुपचे वास्तव्य होते. त्यांनी राहिलेल्या हॉटेलच्या परिसरात हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जीव मुठीत घेऊन या सर्वांनी दुबईहून अबुधाबीपर्यंत रस्तामार्गे प्रवास केला. सुदैवाने भारतासाठी निघालेल्या दोन विमानांपैकी एका विमानाचे तिकीट या ग्रुपला मिळाले आणि त्यांची सुखरूप सुटका झाली. भारतात पोहोचल्यानंतर आणि कोल्हापूरमध्ये घरी परतताच कुटुंबीयांनी मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत केले. यावेळी घरातील वडीलधाऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना पाहायला मिळाले. काही काळ भीतीच्या छायेत राहिलेल्या या कुटुंबांसाठी हा क्षण दिलासा देणारा ठरला. दरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दिलगिरी व्यक्त करत दुबई प्रशासनाकडून प्रत्येक प्रवाशाला सुमारे २५ हजार रुपयांचे गिफ्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांनी दुबईतील हल्ल्यांचे दृश्य, विमानतळावरील तणावपूर्ण स्थिती आणि आकाशातून झालेल्या हल्ल्यानंतर उठलेले धुराचे लोट प्रत्यक्ष अनुभवल्याचे सांगितले. मात्र सुदैवाने सर्वजण सुरक्षितपणे मायदेशी परतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 03, 2026 07:45:36
Kalyan, Maharashtra:कल्याणात विद्यार्थी सुरक्षा ,उपयोजना मार्गदर्शन शिबिर. सुरक्षित विद्यार्थी ,सुरक्षित शाळा,सुरक्षित प्रवास. ठाणे पोलीस आयुक्तालय ,परिमंडळ 3 आणि प्रादेशिक परिवहन मंडळ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आली या बैठीकीला कल्याण डोंबिवलीतील शाळांचे प्रतिनिधी,बस मालक, रिक्षा चालक,आर टी ओ अधिकारी ,वाहतुक पोलीस उपस्थित होते. कल्याण–डोंबिवली परिसरात विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देत विशेष विद्यार्थी सुरक्षा व उपयोजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कल्याणच्या के सी गांधी शाळेत करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेकडे आणि शाळेतून घरी सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी आवश्यक नियम, खबरदारी आणि कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्कूल बसची तांत्रिक तपासणी, चालकांचे परवाने, वेग मर्यादा, बसमध्ये CCTV, अग्निशामक यंत्रणा, महिला सुरक्षा उपाय अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या वेळी डिसिपी अतुल झेंडे यांनी य नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत, “विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले. नियमभंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 03, 2026 07:22:56
Baramati, Maharashtra:दुबई में दौंड के निवासियों के फंसे के बारे में जानकारी सामने आई है; दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी संपर्क साधला, व्हिडीओ कॉलद्वारे माहिती घेतली गेली. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळित झाल्यामुळे भारतीय पर्यटकांना मोठा फटका बसला असून दौंड तालुक्यातील काही आरोग्य विमा प्रतिनिधी सध्या दुबईत अडकले आहेत; युद्धाच्या सावटाखाली अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने भारतात परतणे कठीण झाले आहे. दुबईतील हॉलिडे इन हॉटेलमध्ये थांबलेल्या संपत बनकर व इतरांशी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. दुबईस्थिती जाणून घेऊन त्यांनी सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलण्याचे विचार व्यक्त केले.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 03, 2026 07:22:29
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 03, 2026 07:22:17
Satara, Maharashtra:सातारा - चंद्रग्रहणासंबधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी...आज तीन मार्च बुधवार रोजी या वर्षातले पहिले चंद्रग्रहण होणार आहे...ग्रहण हि एक खगोल शास्त्रीय घटना असून त्याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही असे असतानেও सोशल मिडिया मधून त्याच्या विषयी अनेक अतिरंजित दावे केले जात आहेत. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एकाच जागेवर बसावे, पाणी पिऊ नये, तसेच मलमूत्र विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जात होते. या पार्श्वभूमीवर ग्रहण विषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींच्या आणि संस्थांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ हमीद दाभोळकर यांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 03, 2026 07:21:59
Baramati, Maharashtra:पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेलीत जैविक निविष्ठा प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले असून याच वेळी द्राक्ष शेतीत निवड पद्धतीने नवा वाण निर्माण करण्यात आला असून अजित सीडलेस असं या नव्या वाणाचं नामांकरण करण्यात आले आहे. निवड पद्धतीनं निर्माणलेल्या या नव्या द्राक्षाच्या वाणाला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देऊन अजितदादांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉक्टर कौशिक बॅनर्जी, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डॉक्टर राजीव मराठे, सिडकोचे सह संचालक दिलीप ढोले,श्रीराज भरणे आणि महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र वाघमोडे यांची उपस्थिती होती. हा वाण रोगास कमी बळी पडतो,निर्यातक्षम द्राक्षे निर्माण होतात,तिन्ही हंगामात हा वाण चांगले उत्पादन देतो.पाच वर्षे या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हा वाणाचे घड 300 ग्रॅम पेक्षा अधिक निघतात,आखाती देशात याला मागणी देखील आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 03, 2026 06:35:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय... कायम कर्मचाऱ्यांचा 2025 चा दिवाळीचा बोनस मिळालेला नाही तो मिळावा, वेतनबदलातील फरक कर्मचाऱ्यांना वेतनासोबत अदा करण्यात यावा, वेतनासोबत ईपीएफ, एलआयसी, कामगार सोसायटी वेतनातील कपातीचे चेक उशिरा दिले जातात किंवा दिलेले नाहीत या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कामगार सोसायटीचा व्याजाचा वाढीव भुर्दंड पडलेला आहे. कपातींचे चेक देय वेतनासोबतच अदा करावेत, कर्मचाऱ्यांना मासिक वेतन महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अदा करावे अशा विविध मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय...जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण आंदोलन सुरूच राहील आणि आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 03, 2026 06:35:17
Beed, Maharashtra:बीड़ जिले के विडा गांव में रंगपंचमी के मौके पर जावयाला गाढवावर बैठवून उसकी मिरवणूक निकाली जाती है। यह प्रथा लगभग 90 वर्षों से चले आ रहे है और जावयांची धुलिवंदन के दिन गाढवावर बैठने की परंपरा निभाई जाती है। गावकऱ्यांची आठवणींनुसार, जावयाला मिरवण्याची तयारी पूर्वापेक्षेने दोन दिवस आधी सुरू होते आणि पोलिसी तपासणी सुद्धा घेतली जाते. धुलिवंदन के दिन गावकऱ्यांचा उत्साह होता असून यात गावची संपूर्ण लोकसंख्या सहभागी होते. 5 तासांची मिरवणूक मारुतीच्या मंदिराजवळ येऊन जावयाला नवीन कपड्यांचा आहेर देऊन संपते. गाढवावर बसलेला जावया याला पुन्हा बसविण्यात येत नाही. गावातल्या मंडळींचे म्हणणे आहे की ही विडा गावातील परंपरा देशात एकमेव आहे. महेंद्रकुमार मुधोळकर
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top