Back
नवरदेव लापता: शादी से पहले का रोमहर्षक रहस्य, दोनों ही पुलिसकर्मी
SMSATISH MOHITE
Feb 05, 2026 11:33:17
Nanded, Maharashtra
बोहल्यावर चढण्याच्या काही तास पूर्वी पोलीस कर्मचारी असलेला नवरदेव चक्क पसार झाला. नांदेड जिल्ह्यातील ही घटना आहे. हा नवरदेव लग्नाच्या आदल्या दिवशी वऱ्हाड घेऊन वधूच्या घरी पोहचला. हळदीच्या कार्यक्रमात रात्री नवरदेवाने नवरीसोबत डीजेवर मनसोक्त डान्स देखील केला, पण लग्नाच्या काही तासापूर्वीच भलतच घडलं. बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव सकाळी बेपत्ता झाला. विशेष म्हणजे वर आणि वधू हे दोघेही पोलीस दलात कार्यरत आहेत. या प्रकरणी किनवट पोलीसांनी मीसिंग दाखल करत बेपत्ता झालेल्या योगेश दत्ता घुगे या नवरदेवाचा शोध सुरु केलाय. योगेश दत्ता घुगे हा किनवट तालुक्यातील नागेशवाडी येथील रहिवासी आहे. तर मुलगी ही तालुक्यातील मदनापूर येथे राहत होते. दोघेजन विदर्भातील चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात शिपाईपदी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी त्यांची ओळख झाली. वर्ष भरापूर्वी दोन्ही कुटुंबांनी आपसात चर्चा करून लग्न ठरविले. मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी ११.५४ वाजता किनवटच्या मदनापूर येथे वधूमंडपी त्या पोलीस उपवधू-वराचा विवाह थाटात संपन्न होणार होता. सोमवारी मांडव तसेच हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वऱ्हाडी मंडळी घेऊन नवरदेव हा नवरीच्या घरी गेला. यावेळी हळदीच्या कार्यक्रमात रात्री एक वाजेपर्यंत नवरी नवरदेवाने एकत्र डान्सदेखील केला. रात्री उशिरा सर्व वऱ्हाडी झोपी गेले. इकडे लग्नघरात विवाहाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र मंगळवारी पहाटे नियोजित वर बोहल्यावर चढण्यापूर्वीच बेपत्ता झाला. सकाळी नातेवाईक दत्ता कुठे आहे अस एकमेकांना विचारणा करत होते, मात्र तो कुठे गेला हे कोणालाच माहिती नव्हत. नातेवाईकांनी अनेक वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण मोबाईल बंद येतं असल्याने धाकधूक वाढली. इकडे वधूला नवरदेव बेपत्ता झाल्याची माहिती समजताच धक्का बसला. नातेवाईकांनी शोधाशोध करूनही त्याचा सुगावा न लागल्याने अखेर कुटुंबियांनी किनवट पोलिस ठाणे गाठत वर बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मिसिंगची नोंद करून बेपत्ता असलेल्या नवरदेवाचा शोध सुरू केलाय. नवरदेव बेपत्ता होण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र विविध चर्चेला उधाण आलं होतं. या घटनेने किनवट तालुक्यात खळबळ उडाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:17:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:350
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:170
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:15:59Oros, Maharashtra:रत्नागिरी आमदार किरण सामंत यांनी सपत्नीक जिल्हा परिषद आदर्श विद्यमंदिर पाली १ या ठिकाणी बजावला मतदानाचा हक्क
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:440
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:190
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 07, 2026 15:33:190
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 07, 2026 14:45:400
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 07, 2026 14:01:060
Report
PNPratap Naik1
FollowFeb 07, 2026 13:47:460
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 13:30:390
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:16:520
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 07, 2026 13:16:060
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:06:580
Report