Back
युति-आघाडी के निर्णय में देरी से नगरपालिका चुनाव में उम्मीदवार असमंजस
SMSATISH MOHITE
Nov 13, 2025 10:42:09
Nanded, Maharashtra
नगरपालिकेच्या निवडनुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीसही सुरुवात झाली असताना अजूनही उमेदवारी दाखल होण्यास विलंब होतोय. त्याचे कारण म्हणजे युती और आघाडीचा निर्णय होण्यास विलंब होतोय. त्या ठिकाणाची परिस्थिती आघाडी होणार असे नेतेमंडळी सांगताहेत. इकडे मात्र स्थानिक स्तरावरही निर्णय होत नसाल्याने कोणता झेंडा घेऊ हाती या संभ्रमात उमेदवार सापडले आहेत. युती, आघाडीचा पेच कायम असताना दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची किचकट ऑनलाईन प्रक्रिया आणि सोबत जोडावे लागणारे प्रमाणपत्र यामुळेही कागदपत्रे जमवण्यात उमेदवारांची दमछाक होतेय. अगदी घरात शौच्छालय असल्याचे प्रमाणपत्र, निवडणुकीसाठी बँकेचे नवीन खाते, विविध बेबाकी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायचे आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची त्रेधातिरिपीट उडालीये.
नांदेड - एकूण नगर परिषद / नगर पंचायत 13 - कालपर्यंत अर्ज भरले एकूण = 02
छ. संभाजीनगर एकूण 7 नगर परिषद / नगर पंचायत - कालपर्यंत अर्ज भरले एकूण = 04
जालना - एकूण 3 नगर परिषद - कालपर्यंत अर्ज भरले एकूण - 0 निरंक
धाराशिव - एकूण नगर परिषद / नगरपालिका 8 - कालपर्यंत अर्ज भरले एकूण - 03
परभणी - एकूण नगर परिषद / नगरपालिका 7 - कालपर्यंत उमेदवारी अर्ज भरले कुल = 16
बीड - एकूण नगर परिषद / नगरपालिका 5 - कालपर्यंत उमेदवारी अर्ज भरले कुल = 07
लातूर - एकूण नगर परिषद / नगरपालिका 5 - कालपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले एकूण = 2
अनेक नगर परिषदेत अजून एकही अर्ज भरण्यात आला नाही.
मराठवड्यात एकूण 53 नगर पालिकांसाठी निवडणूक असताना उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसात केवळ 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. युती आघाडीचा निर्णय न झाल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे नेतेमंडळीही मान्य करताहेत.
निवडणुकीच्या तयारीसाठी जास्त वेळ दिला नाही असा आरोप नेतेमंडळी करत असतात. पण निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही युती, आघाडीच्या निर्णयाचे काय करायचे. स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा की राज्यपातळीवर यात नेयेमंडळी गुरफलटली आहेत. इकडे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक उमेदवारांना मात्र काही मार्ग सुचेना अशी अवस्था झालीये. या सगळ्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसात उडी पडेल असे चित्र दिसत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 10, 2025 16:32:500
Report
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 14:15:580
Report
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 14:00:310
Report
JMJAVED MULANI
FollowDec 10, 2025 13:36:050
Report
MAMILIND ANDE
FollowDec 10, 2025 13:09:530
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 10, 2025 13:09:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 10, 2025 12:04:010
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 10, 2025 11:50:080
Report
SKShubham Koli
FollowDec 10, 2025 11:49:450
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 10, 2025 11:31:080
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 10, 2025 11:20:530
Report
ABATISH BHOIR
FollowDec 10, 2025 11:02:440
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 10, 2025 10:56:270
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 10:45:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 10, 2025 10:42:170
Report