Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

देगलुर में बहन की छेड़छाड़ पर 16 वर्षीय की हत्या

SMSATISH MOHITE
Sept 30, 2025 03:31:10
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Murder Feed on - 2C ---------------------------- Anchor - बहिणीची छेड काढल्याच्या रागातून एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 28 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात 28 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. शेळगाव येथील संतोष माटलवार याने गावातील एका मुलीची छेड काढली होती. आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मुलीच्या भावाने संतोष माटलवार याच्यावर प्राणघातक हल्ला केला. संतोष आपला भाऊ आणि मित्रांसोबत ग्रामपंचायत परिसरात गप्पा मारत बसला होता. तेव्हा मुलीचा भाऊ आला आणि त्याने काही कळण्याच्या आत संतोषच्या मानेवर आणि पाठीत चाकूने वार केले. जखमी अवस्थेत संतोष याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 16 वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे. Byte - नरहरी फड - पोलीस उपनिरीक्षक, देगलूर ठाणे -------------------------------------
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Sept 30, 2025 05:17:28
Nashik, Maharashtra:Nashik Godavari flood story *नाशिक मध्ये काल पासून पाऊस थांबल्याने मोठा दिलासा, गोदावरी नदीला आलेला पूर देखील पूर्णपणे ओसरला* Anchor नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रात कालपासून पूर्णपणे पाऊस थांबल्याने गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला आहे... पाऊस थांबल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने गोदावरी नदीचा पूर पूर्णपणे ओसरला आहे... गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खूप मोठा फटका नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बसला होता त्याच पद्धतीने शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते... कालपासून आता पाऊस थांबल्याने नाशिकच नव्हे तर मराठवाड्याला देखील दिलासा मिळाला आहे,कारण नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीच्या दिशेने जात होता... पाऊस थांबल्याने जायकवाडीच्या दिशेने सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 30, 2025 05:01:23
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशीव DHARA_WKT धाराशिवला ऊन – बळीराजाची काढणीला सुरुवात!" "आठ दिवसांच्या पावसानंतर दिलासा, शिवारात पुन्हा लगबग" "सोयाबीन काढणीला सुरुवात – उरलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड" धाराशिव जिल्ह्यात ऊन, शिवारात पुन्हा आशेचा किरण" "पावसाला ब्रेक, शेतकऱ्यांची काढणीला धावपळ" धाराशिव – आठ दिवसांच्या मुसळधार पावसानंतर अखेर दिलासा! कालपासून पाऊस थांबला, आज सकाळपासून ऊन पडल्याने शेतशिवारात पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. बळीराजा सोयाबीन काढणीला लागला असून शिवारात लगबग दिसतेय. उरलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.दिलासादायक चित्र निर्माण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. शेतशिवरात कामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 30, 2025 04:47:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - कारागृहातून सुटका होताच कारागृहाबाहेरच रील काढणे पडले महागात, पोलिसांची 16 जणांवर कारवाई - कारागृहातून जामिनावर सुटका करून घेतलेल्या तरुणाला कारागृहाबाहेर रील काढणे पडले महागात - सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी डोलारे खुनाच्या प्रयत्नात 2022 पासून होता सोलापूर जेलमध्ये - गुन्हेगाराचा जामीन होताच सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात गुन्हेगारांसोबत रील काढून सोशल माध्यमात प्रसारित करणाऱ्या 16 जणांवर कारवाई - सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सर्व गुन्हेगारांना दिली चांगलीच समज - जेलरोड पोलिसांनी 16 आरोपींना ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सुरू आहे बाईट - शिवाजी राऊत ( पोलीस निरीक्षक, जेलरोड पोलीस ठाणे )
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 30, 2025 04:47:06
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्क्रिप्ट ::- 1993 च्या किल्लारी येथील भूकंपाला आज 32 वर्ष पूर्ण... भूकंपात मृत्यू पावलेल्यांना शासकीय इतमामात आदरांजली… किल्लारी येथील स्मृती स्तंभावर आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पुष्पचक्र अर्पण… पोलिसांकडून हवेत फेरी झाडून शोकसलामी… ग्रामस्थ, नागरिक व बाजारपेठ बंद ठेवून काळा दिवस पाळला…  AC ::- 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भीषण भूकंपाला आज 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. लातूर-धाराशिव जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या या भूकंपात सर्वाधिक जीवितहानी किल्लारी येथे झाली होती. त्या दुःखद घटनेच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आज किल्लारीतील स्मृती स्तंभावर शासकीय इतमामात आदरांजली वाहण्यात आली. पोलिसांकडून हवेत फेरी झाडून शोकसलामी देण्यात आली. शासनाच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार व जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. बाईट ::- वर्षा ठाकूर घुगे ( जिल्हाधिकारी लातूर )
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 30, 2025 04:46:49
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- शहरातील तणाव शांत wkt फीड 2C Anc:- अहिल्यानगर शहरामध्ये काल मुस्लिम धर्मगुरू च्या नावाची रांगोळी काढून विटंबना करण्याचा प्रकार घडला त्या नंतर कोठला परिसरामध्ये नगर छत्रपती संभाजी नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जमावाला पांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाने लाठी चार्ज केला... त्यानंतर या ठिकाणी तणाव निर्माण झाला आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत असून या ठिकाणची व्यवहार देखील सध्या सुरू झाले आहेत अहिल्या नगर शहरातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी wkt:- लैलेश
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 30, 2025 04:46:34
Pimpri-Chinchwad, Maharashtra:निळ्या पूररेषेत १,६८६ अनधिकृत बांधकामे! खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका; महापालिकेचे आवाहन pimpri illegal kailas puri Pune 30-9-25 feed by 2c Anchor - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्राच्या निळ्या पूररेषेत एक हजार ६८६ अनधिकृत बांधकामे आढळली आहेत. त्यामध्ये दुकाने, घरे, पत्राशेड, आरसीसी बांधकामे, कच्च्या विटांची घरे, तसेच भंगार दुकानांचा समावेश आहे. या बांधकामांची यादी महापालिकेने दुय्यम निबंधक कार्यालयाला सादर केली आहे. अनधिकृत बांधकामांबाबत कोणतेही खरेदी-विक्री व्यवहार करू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातून पवना नदी २४.४ किलाेमीटर, इंद्रायणी २०.६, तर मुळा नदी १२.४ किलाेमीटर अंतर वाहते. या नद्यांच्या काठी पूररेषेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. चिखलीत इंद्रायणी नदीच्या काठी उभारलेल्या आलिशान बंगल्यांवर महापालिकेने कारवाई केली. त्यानंतर तिन्ही नद्यांच्या पूररेषेत येणाऱ्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण महापालिकेने केले. आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्फे सखोल पाहणी करण्यात आली. त्यामध्ये एक हजार ६८६ अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 30, 2025 04:45:38
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 30, 2025 04:45:24
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Snake Feed on - 2C ------------------------------ Anchor - शासकीय रुग्णालयाच्या शौच्छालयात भला मोठा साप निघाल्याने खळबळ उडाली. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या शौच्छालयात साप निघाला. या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भोकर मुदखेड रोडवर हे शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र आहे. या आरोग्य केंद्रातील बाथरूम मध्ये भला मोठा साप आढळुन आल्यामुळे रुग्णालयात मोठी धावपळ उडाली होती. दोन दिवसापूर्वी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मात्र वेळीच कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळला. रुग्णालय परिसरात झाडीझूडपे वाढली आहेत. या रुग्णालयात कुठल्याही सुविधा उपलब्ध नसून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. -----------------------------
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 30, 2025 04:32:09
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 30, 2025 04:31:39
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Dam Feed on - 2C ------------------------------ Anchor - नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडे असून त्यातून 2 लाख 40 हजार क्यूसेस प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जायकवाडी धरणाचे पाणी सायंकाळी विष्णुपुरी प्रकल्पापर्यंत पोहोचणार आहे. पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने काळजी घेतली आहे. गेल्या सहा दिवसापासून विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 2006 नंतर पहिल्यांदाच एकूण 18 पैकी 17 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जातोय. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीला पुर आलाय. गेल्या सहा दिवसापासून ही पुर परिस्थिती कायम आहे. मागील दोन दिवसापासून पाऊस नसल्याने थोडासा दिलासा मिळालाय. दरम्यान जायकवाडी धरणाचे पाणी येणार असल्याने विसर्ग सुरूच राहणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. -------
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 30, 2025 04:17:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात दोन गावठी पिस्तुलांसह दहा काडतुसे जप्त, सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई - सोलापुरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक - आरोपींकडून दोन गावठी पिस्तुलासह दहा काडतुसे जप्त - सोलापूर शहर गुन्हे शाखेची आरोपींवर फिल्मी स्टाईल कारवाई - सदर प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश धुळा सध्या फरार असून हा आरोपी तब्बल आठ वर्षे जेलमध्ये शिक्षा भोगल्याचे समोर - गावठी पिस्तूल काढत असे यासह कार आणि दुचाकी असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त - फरार आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेची विविध पथके रवाना बाईट - एम. राजकुमार ( पोलीस आयुक्त, सोलापूर शहर )
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 30, 2025 04:17:33
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Monkey Feed on - 2C ---------------------------------- Anchor - पुराचा फटका नागरिकांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही बसतोय. नांदेड मध्ये गेल्या चार दिवसापासून वानरांचा एक कळप पुरामुळे झाडावर अडकून पडला आहे. गोदावरी नदीला चार दिवसापासून पुर असल्याने नायगाव तालुक्यातील बरबडा येथील नदीकाठचा परिसर पाण्याखाली गेला आहे. जवळपास पंधरा वानरे झाडांवर अडकून पडली आहेत. खाली पुराचे पाणी असल्याने त्यांना खाली उतरता येत नाही. चार दिवसापासून वानरे उपाशी असल्याची पाहून गावातील आनंदा भंडरवाड आणि दिगंबर जंगेवाड या दोन युवकांनी तरफ्यावर जाऊन झाडांवर केळी लटकवली. युवकांच्या या कृतीचे कौतुक केले जात आहे. -------------------
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top