Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001

नागपुर के पास मिहान क्षेत्र में बिबटियों का विचरण, वन विभाग अलर्ट

AKAMAR KANE
Oct 08, 2025 02:32:15
Nagpur, Maharashtra
------ नागपूर शहरालगतच्या मिहानच्या परिसरामध्ये बिबट्याचा संचार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.. गाडीत बसलेल्या तरुणांनी हा व्हिडिओ घेतल्या असल्याचे दिसून येतेय.. यापूर्वी या परिसरामध्येच वाघाचाही वावर आढळून आला होता. त्यावेळेस वनविभागाच्या यशस्वी प्रयत्न नंतर तो माघारी जंगलाच्या दिशेने निघून गेला होता... दरम्यान नागपूर शहरालगतच्या भागांमध्ये वन्य प्राण्यांचा वाढलेला संचार मानव- वन्यजीव संघर्ष वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Oct 08, 2025 07:01:13
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 08, 2025 07:00:54
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 07:00:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जरांगे पीसी पॉइंटर भुजबळ बावचाळला आहे, मराठ्यांना आता तो शत्रू समाजतोय, मराठ्यांचा वाटोळं करण्यासाठी तो काम करतोय, आता त्याला महत्व देणार नाही, तो हतबल झालं आहे , त्याला वेड लागू शकते मी पितो तर तू पण ये प्यायला माझ्या सोबत, काहीही बोलते, म्हातारा येड्या सारख करतोय मराठे आणि छोट्या छोट्या जाती संबंध खराब करण्याचे पाप भुजबळ करतोय, आमच्या जीआर मूळ तो पिसाळलेल्या कुत्र्या सारखा झालाय, पूरते पागल झाला आहे फक्त आम्हाला धोका बसला तर सरकार वर आम्ही घसरणार आज मी सुट्टी घेतोय, मला भेटायला रोज येऊ नाका शनिवार रविवार या फक्त, तो महत्व द्यायचा लायकीचा राहिला नाही, इतक्या नीच विचारांचा आहे तो असला माणूस कुठल्याच जातीत जन्मू नये.. विनाकारण मराठ्यांच्या विरोधात टोळी निर्मान केलीय.. त्यामुळं मराठ्यांना आरक्षण साठी लढावे लागणार आहे शेती तर अडचणीत आली तर पगार वाचवेल, नोकरी वाचवेल म्हणून आपल्याला आरक्षण ची गरज आहे 2029 ला मराठा आरक्षण विरोधी नेते आठवणीने पाडायचे लातूर बोगस आत्महत्या ; कुणाच्या भावनेशी आम्ही खेळत नाही कोण काय डाव खेळेल कठीण आहे, मी समर्थन करत नाही मात्र इतक्या खालच्या थरावर गेले सगळे, आत्महायातय असल्या तरी खोट्या दाखवायचा, कुणबी प्रमाणपत्रात खाडाखोड आहे म्हणतात, अधिकाऱ्यांवर दडपण आणले जाते... खरे आणि खोटे हे कोण ठरवणार, पोलिसांचा तपास दबाव पोटी असू शकतात.. याला काहो ओबीसी नेते मुद्दाम करताय असे दिसते, खास भुजबळ करतो... अजित दादा काहीही म्हटले तरी सगळे त्याचेच आहे अजित दादा सावध व्हा, आधी ही सांगितले आता ही सांगतो, अजित पवार भुजबळ नाराजी खूप मोठं षडयंत्र यांनी रचले आहे, अजित दादांचा पक्ष बदनाम होणार का, बोलणारे सगळे त्यांचेच आहे परळी टोळी आहे, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही अजित पावर संपवायचा असे हे षडयंत्र आहे... अजित दादा च गोड बोलून काम सुरू आहे... दोन्ही पवार ( काका पुतण्या ) त्यांना म्हटले आम्ही अरक्षन दिले मराठ्यांना तू गप्प बसा तर हे गप्प बसणार नाही का.. हे मोकळे सोडतात म्हणून हे सुरुय... दोन्ही पवारांना ओबीसी मराठा दोन्ही पाहिजे तर थेट बोला ना, भुजबळ सारखे छप्पन आले तरी यांची जिरवेल... डोकड्या सारखे दिसतात हे नेते तू आदेश द्यायला कोण आहे कलेक्टर आहे का कोण आहे, लै वळवळ करतो तू.. ( भुजबळ ) जे लै वटवट करतात यांचा बुडबुडा फोडावा लागेल मराठा नेत्यांनी या साठी एकत्र यावे... काही ओबीसी चे लोक मराठ्यांना टार्गेट करताय, अधिकारी टार्गेट करताय, कारण नसताना निलंबित करताय वडेट्टीवार तुम्ही गोलाई देवीचे पुजारी होते का, पाहिले गुटगुटीत दिसत होता गोट्या आता पिसाळलेल्या कुत्र्या सारखे झाले.. त्यांच्यात स्पर्धा आहे नेता कोण याची... पिवर येडे झाले ते... भुजबळ यांनी नक्कल केलीय पाटलांनी Beed सभा बाबत : जातीयवाद करेल, दंगल करवून आणेल, पुन्हा घडवून आणले जाइल, हे सगळं परळी ची टोळी घडवून आणत आहे तू औरंगजेब होऊन इथेच मर पण तुझं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 08, 2025 06:31:56
Pimpri-Chinchwad, Maharashtra:ANCHO R - मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे १९ बालके दगावल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, FDA ने पुण्यात मोठी कारवाई करत रेडनेक्स फार्मसिटिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादित केलेल्या खोकल्यावरील रेसपिफ्रेश टी आर या औषधाचा मोठा साठा जप्त केला आहे. FDA कडून कंपन्यांची तपासणी बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर, मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी रुग्णालयांमधून खोकल्याच्या औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी गोळा केले जात आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली. हुकरे यांनी हे देखील स्पष्ट केले की, मध्य प्रदेशात ज्या औषधाच्या सेवनाने बालके दगावल्याचा संशय आहे, त्या औषधाचा साठा सध्या महाराष्ट्र राज्यात उपलब्ध नाही. दोन वर्षांखालील लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरपदिले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत असही हुकरे म्हणाले. यामुळे पालकांनी आणि डॉक्टरांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सध्या अन्न आणि औषध प्रशासनाची ही मोहीम राज्यभर सुरू असून, खोकल्याच्या औषधांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे. BYTE- गिरीश हुकरे ( सह आयुक्त , औषध प्रशासन विभाग )
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 08, 2025 06:31:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:इस्लामपूर येथील रेठरे सह 4 ठिकाणी चोरीचा प्रकार, 44 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास. इस्लामपूर येथील रेठरेसह चार ठिकाणी चोरी घडला आहे. चार ठिकाणी चोरी करत 44 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास करण्यात आली आहे. रेठरे येथील एका माजी सैनिकाच्या घराचे कुलूप तोडून तिजोरीतील 27 तोळे सोने आणि रोख रक्कम 92 हजार रुपये लंपास करण्यात आले, त्यानंतर चोरट्यांच्या टोळीने रेठरे गावातील आणखी एका घरासह मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक या परिसरातील दोन घरात चोरी करत जवळपास 17 तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 08, 2025 06:20:24
Nashik, Maharashtra:*आओ दिखाऊ तुम्ही नाशिक मे खड्डा...* ठाकरेंच्या शिवसेनेकडून शहरातील खड्ड्यांवर गाणं अँकर : नाशिक शहरातील रस्त्यांची झालेल्या दुरवस्थेनंतर मोठ्या प्रमाणात खड्डेमेय रस्त्यातून नाशिककरांना प्रवास करावा लागतोय... मात्र या खड्ड्यांवर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने विडंबनगीत तयार केलंय... शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश बडवे यांनी गायलेलं हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय... उद्धव सेनेच्या उपरोधिक गीत आंदोलनानंतर आता नाशिक शहरातील खड्ड्यांवरून पुन्हा पालिका प्रशासनाला नाशिककरांच्या वतीने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.*आओ दिखाऊ तुम्ही नाशिक मे खड्डा...* असे हे उपरोधिकगीत सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे... सत्तेस असलेले शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील महापालिकेत जाऊन खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन केले तर थेट ठाकरेंच्या शिवसेनेने खड्ड्यांवर गाणेच गायले आहेत .. यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नाशिककरांच्या पसंतीला पडलाय....
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 08, 2025 06:17:14
Shirdi, Maharashtra:राज्यातील नगरपालिकांसह नगरपरिषद आणि नगरपंचायतींचं आरक्षण जाहीर झालं आहे. या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरलं आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यानं स्थानिक राजकारणात हलचल माजली आहे. सार्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डी नगरपरिषदेसाठी आरक्षण जाहीर झालं. नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यानं खुल्या वर्गातील अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला. दोन दिवसांपूर्वी आरक्षण जाहीर होताच शिर्डीच्या प्रवेशव्दारावर विखे समर्थकांचा फ्लेक्स झळकला. हा फ्लेक्स नाराजीचा होता की पाठिंब्याचा, यावरून शिर्डीच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या. दरम्यान , आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि अभय शेळके यांनी सावध भूमिका घेतली. इच्छुकांची संख्या मोठी होती हे दोघांनीही मान्य केलं, मात्र फ्लेक्सविषयी कोणतीही भूमिका न घेता त्यांनी तो विषय लावणाऱ्यावरच सोपवला. विशेष म्हणजे हा चर्चेत आलेला फ्लेक्स लावणारे आहेत कैलास कोते — शिर्डी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष. त्यांच्या फ्लेक्समुळे शिर्डीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. नेमका हा फ्लेक्स सुजय विखे यांना डीवचण्यासाठी लावला होता का असा प्रश्न आता समोर येतो आहे..आता या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचे आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमोर मोठ आव्हान आहे. इच्छुकांची वाढती संख्या आणि अंतर्गत शिर्डी शहरातील पुढाऱ्यांची नाराजी यावर मार्ग कसा काढणार , याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मात्र त्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगराध्यक्षांच्या पदरी निराशा पडल्याचं चित्र शिर्डीत दिसत आहे. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर उत्तर नगर - अ.क्र. नगरपरिषद / नगरपंचायत प्रवर्गाचे नाव आरक्षणाचे स्वरूप 1) संगमनेर खुला (Open) महिला 2) श्रीरामपूर खुला (Open) सर्वसाधारण 3) कोपरगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) सर्वसाधारण 4) राहाता नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) सर्वसाधारण 5) अकोले (नगरपंचायत) नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) (आरक्षणाचे स्वरूप दिलेले नाही) 6) राहुरी अनुसूचित जमाती (ST) सर्वसाधारण 7) नेवासा खुला (Open) सर्वसाधारण 8) शिर्डी अनुसूचित जाती (SC)
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 08, 2025 05:46:24
Beed, Maharashtra:बीड हादरलं; शेतीच्या वादातून महिलेला मारहाण, पाय तोडण्याचा प्रयत्न, आरोपींच्या थरकाप उडवणाऱ्या कृत्याने संताप महिलेची प्रकृती गंभीर, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.. एका धक्कादायक घटनेने बीड पुन्हा एकदा हादरले आहे.. शेतीच्या वादातून थरकाप उडवणारी घटना समोर आली असून नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात भावकीतील चार जणांनी एका महिलेला निर्दयपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केलाय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली पीडिता आश्विनी येडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. इतर महिलेला मारहाण करतानाचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे. महिलांना अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा आहे. बीड जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर या प्रकरणाचा नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या विकृत प्रकरणामुळे पीडिता आणि कुटुंब मोठ्या दहशतीत असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आरोपींना जेरबंद करा अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 08, 2025 05:01:44
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 08, 2025 04:36:47
Washim, Maharashtra:वाशिम जिले में चार नगर परिषद और नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत सोमवारी पार पडली. या सोडतीत कारंजा व मानोरा दोन्ही ठिकाणी महिलाराज राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशांवर पाणी फिरले आहे. दरम्यान, आज प्रभागांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया होणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षपदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर now विविध पक्षांच्या बैठका, गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला अधिक गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. दिवाळीनंतर स्थानिक राजकारणात ‘फटाके फुटतील’ अशी चर्चा सुरू झाली असून, या सोडतीकडे सर्व राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 08, 2025 04:32:21
0
comment0
Report
Advertisement
Back to top