Back
शिर्डी नगरपरिषद में अनुसूचित जाति महिला के लिए नगराध्यक्ष पद आरक्षित
KJKunal Jamdade
Oct 08, 2025 06:17:14
Shirdi, Maharashtra
राज्यातील नगरपालिकांसह नगरपरिषद आणि नगरपंचायतींचं आरक्षण जाहीर झालं आहे. या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरलं आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यानं स्थानिक राजकारणात हलचल माजली आहे.
सार्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डी नगरपरिषदेसाठी आरक्षण जाहीर झालं. नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यानं खुल्या वर्गातील अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला. दोन दिवसांपूर्वी आरक्षण जाहीर होताच शिर्डीच्या प्रवेशव्दारावर विखे समर्थकांचा फ्लेक्स झळकला. हा फ्लेक्स नाराजीचा होता की पाठिंब्याचा, यावरून शिर्डीच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या.
दरम्यान , आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि अभय शेळके यांनी सावध भूमिका घेतली. इच्छुकांची संख्या मोठी होती हे दोघांनीही मान्य केलं, मात्र फ्लेक्सविषयी कोणतीही भूमिका न घेता त्यांनी तो विषय लावणाऱ्यावरच सोपवला.
विशेष म्हणजे हा चर्चेत आलेला फ्लेक्स लावणारे आहेत कैलास कोते — शिर्डी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष. त्यांच्या फ्लेक्समुळे शिर्डीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. नेमका हा फ्लेक्स सुजय विखे यांना डीवचण्यासाठी लावला होता का असा प्रश्न आता समोर येतो आहे..आता या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचे आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमोर मोठ आव्हान आहे. इच्छुकांची वाढती संख्या आणि अंतर्गत शिर्डी शहरातील पुढाऱ्यांची नाराजी यावर मार्ग कसा काढणार , याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मात्र त्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगराध्यक्षांच्या पदरी निराशा पडल्याचं चित्र शिर्डीत दिसत आहे. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
उत्तर नगर - अ.क्र. नगरपरिषद / नगरपंचायत प्रवर्गाचे नाव आरक्षणाचे स्वरूप
1) संगमनेर खुला (Open) महिला
2) श्रीरामपूर खुला (Open) सर्वसाधारण
3) कोपरगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) सर्वसाधारण
4) राहाता नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) सर्वसाधारण
5) अकोले (नगरपंचायत) नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) (आरक्षणाचे स्वरूप दिलेले नाही)
6) राहुरी अनुसूचित जमाती (ST) सर्वसाधारण
7) नेवासा खुला (Open) सर्वसाधारण
8) शिर्डी अनुसूचित जाती (SC)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowOct 08, 2025 08:35:370
Report
SNSWATI NAIK
FollowOct 08, 2025 07:50:090
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 08, 2025 07:49:350
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 08, 2025 07:46:580
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 08, 2025 07:34:100
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 08, 2025 07:31:520
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 08, 2025 07:01:130
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 08, 2025 07:00:540
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 08, 2025 07:00:320
Report
KPKAILAS PURI
FollowOct 08, 2025 06:31:560
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 08, 2025 06:31:270
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 08, 2025 06:20:240
Report
KJKunal Jamdade
FollowOct 08, 2025 06:16:500
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 08, 2025 05:46:420
Report