Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001

महाराष्ट्र में 72 घंटे की बिजली कर्मी हड़ताल से आपूर्ति प्रभावित

AKAMAR KANE
Oct 09, 2025 02:16:43
Nagpur, Maharashtra
नागपूर राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप रात्री बारापासून सुरू झाला आहे...महावितरण, महानिर्मिती आणि महापरीक्षण या तिन वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यातील विज कर्मचाऱ्यांचा हा 72 तासांचा संप पुकारला आहे. दरम्यान या तीन दिवसांच्या संपाच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणाने आपातकालीन नियोजन केले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे..संपामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम मेस्मा लागू केलाय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Oct 09, 2025 04:38:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शेतकऱ्याचा सोयाबीन विकलेला 4 लाखांचा चेक राष्ट्रीयकृत बँकेतून गेला चोरीला, चेकवरील पैसे दुसऱ्याच्याच नावाने वटल्याचा अजब कारभार समोर - सोलापुरात राष्ट्रीयकृत बँकेचा भोंगळ कारभार समोर - शेतकऱ्याचे सोयाबीनचे बिल म्हणून मिळालेला चेक राष्ट्रीयकृत बँकेतून गेला चोरीला - मूळचे बार्शीतील असलेल्या उत्तम दत्तात्रय जाधव या शेतकऱ्यासमोर नवे संकट - शेतकऱ्याच्या नावाचा तब्बल 4 लाख रुपयांचा चेक त्याच्याच खात्यावर जमा होणे अपेक्षित असताना अनोळखी माणसाच्या नावावर जमा झाल्याने शेतकऱ्याचा संताप - गेल्या सात ते आठ दिवसापासून संबंधित राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्याला टोलवाटोलवी - जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे अतिवृष्टी आणि महापुराचा सामना करत असताना दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकेच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्याला मनस्ताप - शेतकऱ्याशी संबधीत शेतकरी उत्तम जाधव यांनी यासंदर्भात पोलिसांकडे केली तक्रार - मात्र दिवाळी आणि मुलाचे लग्न हे तोंडावर असल्याने लवकरात लवकर पैसे मिळण्याची केली कळकळीची मागणी
1
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 09, 2025 04:38:18
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 09, 2025 04:37:49
Chakan, Maharashtra:चाकण / पुणे अँकर - चाकण औद्याेगिक पट्ट्यासह चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, कचरा प्रश्न, एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चाकण कृती समितीतर्फे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येत आहे. चाकण येथील संग्राम दुर्ग किल्ल्यातून हा मोर्चा निघणार असून निगडीतील भक्ती-शक्ती चौकामध्ये आंदाेलक माेटारीने येणार आहेत. तेथून हे आंदाेलक पायी आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालयावर धडकणार आहेत. या पायी मोर्चात खासदार अामोळ काळे, आमदार बाबाजी काळे यांच्यासह उद्योजक, कामगार, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि चाकण परिसरातील त्रस्त नागरिक सहभागी होणार आहेत,याचाच चाकण चौकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 09, 2025 04:36:34
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील निकृष्ट कामांसंदर्भात लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचारी देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अधिरिक्त पदे भरा, अधिकचा कार्यभार काढून घ्या अन्यथा सामुदायिक राजनामा देणार असल्याचा इशारा महानगरपालिका अभियंत्यांनी दिला आहे. महापालिका कर्मचारी संघाकडून आयुक्तांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनात सध्या अभियंता वर्गातील 167 पैकी 130 पदे रिक्त आहेत, यामध्ये सार्वजनिक बांधकामचे, प्रकल्प व वाहतूकचे 31, नगररचनाचे 16, शहर पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागामधील 10 पदे रिक्त आहेत. शिवाय सहाय्यक, भूमापक, आरेखन अशी तब्बल 62 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने सध्या कार्यरत अभियंत्यांवर अधिकचा कारभार आहे, तो काढून घेऊन रिक्त पदे तातडीने भरा अन्यथा सामुदायिक राजनामा देऊ असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 09, 2025 04:16:53
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 09, 2025 04:15:22
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या पद भरतीला सहकार विभागाच्या अवर सचिवांनी तात्पुरती स्थगिती दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगूळकर व माजी नगराध्यक्ष संतोष बोरले यांनी याबाबत नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीत न्यायालयाने बेकायदेशीर भरती प्रकरणासह गैरव्यवहाराची चौकशी १० दिवसांत करण्याचे आदेश सहकार सचिवांना दिले, जिल्हा निबंधकांच्या लेखापरीक्षण अहवालात बँकेत ५१६.६७५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला आहे, या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या परिस्थितीत नवीन १३३ पदांसाठी पदभरती केल्यास बैंक डबघाईस येऊ शकते. त्यामुळे बँकेच्या हजारो ठेवीदारांना आर्थिक फटका बसेल. करिता, पदभरती रद्द करणे आणि या अवैध पदभरतीची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. बाईट : बाळासाहेब मांगुळकर :आमदार संतोष बोरले : माजी नगराध्यक्ष
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 04:04:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभাজीनगर शहरात आता प्राण्यांसाठी स्मशानभूमी तयार करण्यात आली आहे. महापालिकेेकडून जागा निश्चित करण्यात झाली. मृत प्राण्यांना उघड्यावर किंवा नाल्यात टाकण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छतेचे पर्यावरणाच्या रक्षणासाठी शहरात आता मृत प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी महापालिकेकडून स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यासाठी नक्षत्रवाडीतील जागा निश्चित करण्यात आली आहे. शहरातील मृत प्राण्यांना उघड्यावर, नाल्यात टाकण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. त्यामुळे दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच पर्यावरणासाठी ते घातक ठरत आहे. त्यामुळे मृत प्राण्यांची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी पर्यावरण प्रेमीसह प्राणीमित्राकडून करण्यात येत होती. यावर महापालाकेने स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 04:03:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अतिवृष्टीग्रस्तांसाठी दोन चिमुकल्यांचा मदतीचा हात ANC : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील सिनिअर केजीचे विद्यार्थी अभिज्ञा म्हस्के आणि कबीर उगले पुढे आले आहेत. या दोघांनी साठवलेल्या आपल्या गल्ल्यातील बचत केलेले पैसे पूरग्रस्तांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला असून ते चिमुकले गेल्या काही दिवसांपासून वाळूज, बजाजनगर आणि सिडको भागात स्वतः फिरून देणगी गोळा करत आहेत. त्यांच्या या कृतीचं नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. या चिमुकल्यांनी गोळा केलेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्धार केला आहे。
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 09, 2025 03:52:10
Nashik, Maharashtra:शहरात बिबट्या आल्याचे AI निर्मित फोटो व्हायरल प्रकरणी वन विभागाकडून पोलिसांकडे तक्रार. वन विभागाने सायबर क्राइम पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल. काही खोडसाळ लोकांकडून बिबट्या शहरात घुसल्याचे AI निर्मित फोटो केले गेले व्हायरल. आधीच नागरीवस्ती कडे बिबट्याच्या वाढलेल्या वावरमुळे त्रस्त असलेले नागरिकांना या प्रकारामुळे अधिकचा मनस्ताप. शहरातील देवळाली, नाशिक रोड, उपनगर ल,सिडको या भागात AI करून काढलेले फोटो viral करत बिबट्याक घुसल्याचे sms झाले होते वायरल. नागरिकांनी खातरजमा करून मगच पोस्ट व्हviral करण्याची वनविभागाकडून आवाहन. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 4 जणांचा झालाय मृत्यू तर काही जण जखमी. आतापर्यंत नाशिक आणि परिसरात 5 बिबट्यांना देखील वनविभागाने केले आहे जेरबंद.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 09, 2025 03:51:08
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीने अक्षरशः कळस गाठला आहे. विशेषतः रिसोड तालुक्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रिसोड शहरातील एका चार चाकी गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाडीत क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी गाडीच्या टपावर बसवून प्रवास सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांकडून अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार केल्या जात असतानाही आरटीओ आणि जिल्हा वाहतूक विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन करत धोकादायक प्रवास सुरू असून, प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून अशा अवैध वाहतुकीवर अंकुश आणावा,अशी मागणी होतं आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 09, 2025 03:50:55
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 09, 2025 03:50:45
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बांधाच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमधला वाद विकोपाला , रागातून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याची तब्बल 200 केळीची झाडे केली उध्वस्त - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या बांधावरून निर्माण झालेला वाद विकोपाला - श्रीपतपिंपरी गावात बांधाच्या कारणावरून झालेली बाचाबाची डोक्यात ठेवत सागर घुगे युवा शेतकऱ्याची तब्बल 200 केळीची झाडे उध्वस्त - रागाच्या भरात केळीची झाडे उध्वस्त करणाऱाऱ्या संतोष घुगे शेतकऱ्याच्या विरोधात बार्शी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल - केळीचे झाडे उध्वस्त करणाऱ्यााऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी बाईट - सागर घुगे ( केळीची झाडे उध्वस्त झालेला शेतकरी )
0
comment0
Report
Advertisement
Back to top