Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर महापालिका में सत्ता पलट, पानी-रास्ते और स्वच्छता मुद्दे चुनाव के केंद्र

VBVAIBHAV BALKUNDE
Dec 28, 2025 04:34:11
Latur, Maharashtra
लातूर महानगरपालिका हवा कुणाची PKG AC :- लातूर… एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला… विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाने घडलेलं शहर… पण आज राजकारण बदललंय, राजकारणातील समीकरणं हि बदललीत आणि मुद्देही बदललेत. महानगरपालिकेत सत्ता आली, गेली, पुन्हा आली… कधी भाजपने झेंडा रोवला, तर कधी काँग्रेसने राजकीय खेळी केली. नगरसेवक फुटले, पक्षांतरं झाली… पण या सगळ्यात एक प्रश्न मात्र कायम—लातूरकरांना मूलभूत सुविधा कधी मिळणार? पाणीटंचाई, अर्धवट रस्ते, खड्डे, कचऱ्याचा हैदोस आणि विकासाचा गोंधळ… याच असंतोषाच्या पार्श्वभूमीवर यंदाची मनपा निवडणूक सर्वात चुरशीची ठरण्याचे संकेत आहेत..... यावेळी मतदान करताना उमेदवारांचा पक्ष नव्हे, तर काम आणि विकास पाहूनच निर्णय घेणार, असा निर्धार लातूरकरांनी केल्याचे बोलून दाखवलाय. लातूरला स्मार्ट सिटी म्हणून ओळख दिली गेली… येथे मात्र वास्तव वेगळंच आहे. शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, अनेक भागात रस्ते अर्धवट आहेत, तर अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. वेळेवर कचरा उचलला जात नाही, त्यामुळे शहरातील अनेक भागात अस्वच्छता आणि दुर्गंधी वाढतेय. याच कारणामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे यावेळी मतदान करताना उमेदवारांचा पक्ष नव्हे, तर काम आणि विकास पाहूनच निर्णय घेणार, असा निर्धार लातूरकरांनी केल्याचे बोलून दाखवलाय. लातूर महानगरपालिकेत सत्ता बदलाचे प्रयोग, पक्षांतराच्या राजकीय भूकंपाच्या हालचाली आणि मूलभूत नागरी सुविधांचा वाढता असंतोष… या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदाची मनपा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता आणि विकास हे मुद्दे मतदारांच्या केंद्रस्थानी आहेत. शहराच्या विकासाच्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या, पण समस्या मात्र कायमच आहेत. त्यामुळे यावेळी मतदारांचा कौल नेमका कुणाला ? जातो हे मात्र पाहावं लागणार आहे. लातूर महानगरपालिकूत कुणाचा झेंडा फडकणार याकडे फक्त लातूर नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.... P2C :- वैभव बालकुंदे रिपोर्टर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Dec 28, 2025 05:52:17
Amravati, Maharashtra:सन्मानजनक जागा दिल्या तरच युतीत लढू, शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांची भूमिका; आज युतीचा फैसला होण्याची शक्यता अँकर : अमरावती महापालिका में युती संदर्भात भाजप और शिंदे यांच्या शिवसेनेच्या नागपूर और अमरावतीत अनेक बैठका पार पडल्या आहे. मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असल्याने युतीची घोषणा होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे. अशातच शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी युतीच्या प्रस्तावावर भाष्य केलं असून आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या तरच युतीत लढू अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे आता युती होते ही युतीत बिघाडी होते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. दरम्यान आज महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूर येथे भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये युतीची अंतिम बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो आणि युतीची घोषणा होते का याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 28, 2025 05:50:27
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 28, 2025 05:35:05
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... चाकूर तालुक्यातील नायगाव शिवारात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बार मालक दुकान बंद करत असतानाच, तिघे दारूच्या नशेत बारमध्ये आले आणि दारू तसेच सिगारेट देण्याचा आग्रह करू लागले. बार मालकाने ते देण्यास नकार दिल्यानंतर सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणातच हाणामारीत बदलला. तिघांनी मिळून बार मालकाला बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. गजानन कासले असं मृत बार मालकाचे नाव आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 28, 2025 05:34:21
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 28, 2025 05:19:27
kolhapur, Maharashtra:नागपूर शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांच्यावर गुन्हा दाखल सावकारी अधिनियम, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये सुरज गोजे आणि त्याचे वडील मोहन गोजे यांच्या विरोधात गुन्हे दाखल महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलाच्या शिक्षणासाठी तक्रारदार महिलेने य 2020 मध्ये 111 ग्राम सोन्याचे विविध दागिने मोहन गोजे यांच्याकडे दरमहा 1.5 टक्के व्याजाने 3 लाख रुपयांत गहाण ठेवले होते व्याजासह मुद्दल रक्कम परत केल्यावरही गोजे पिता-पुत्र दागिने देण्यास नकार देत होते अखेर तक्रारदार महिलेने पोलीस स्टेशन गाठून गोजे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज गोजे आणि त्याचे वडील मोहन गोजे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत मनपा निवडणुकीच्या तोंडावर सुरज गोजे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मध्य नागपूर विधानसभेतील प्रभाग क्रमांक 20 मधून शिंदेंच्या शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहेत
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 28, 2025 05:18:23
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिक शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडवलेणी परिसरात टाकलेल्या छाप्यात आठ बांगलादेशी महिला-पुरुष आढळून आले असून, कोणताही पासपोर्ट, व्हिसा किंवा अधिकृत परवानगी नसताना ते नाशिकमध्ये राहत होते. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली असून, चौकशीत या बांगलादेशी नागरिकांना स्थानिक व्यक्तींनी बेकायदेशीर वास्तव्य करण्यास मदत केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परदेशी नागरिक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 28, 2025 05:17:53
kolhapur, Maharashtra:नागपूर - बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते काँग्रेस-वंचित आघाडी - - चर्चा अंतिम टप्प्यात आहे, ते सगळं एकदा झालं की नंतर बोलू पण आमची भूमिका वंचितलाही सोबत घेऊन जाण्याची तयारी आहे - प्रदेशाध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत चर्चा केली एक ताकदवर आघाडी म्हणून पुढे येईल - मजबूत पर्याय म्हणून आम्ही पुढे येऊ आणि नक्कीच काँग्रेस आणि वंचित आघाडी झाले तर महापौर हा याच आघाडीचा असेल तिथे दुसऱ्याला कुठेही स्कोप असणार नाही असं वाटतं - चर्चा अंतिम टप्प्यात आहे दोन दिवस नॉमिनेशन आहे आज उशिरा का होईना आज हे सगळा चर्चा संपवावी लागेल - आम्ही युतीची चर्चा कुठेही थांबवली नाही, यापूर्वी मनसे आणि उद्धवजी बरोबर जाण्याची त्यांची चर्चा सुरू होती, त्या संदर्भात ते पुढे जात होते आणि आमचा विषय नव्हता, मनसे बरोबर उद्धव सेने सोबत जाण्याचा त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे - जर पवार साहेबांना आमच्या आघाडीत यायचं असेल तर कुठेही काही प्रॉब्लेम नाही, काँग्रेस वंचित आणि पवार साहेब या संदर्भात प्रदेशाध्यक्षांकडे जबाबदारी आहे निर्णय घेण्याचा - राज्यात आज काय चाललय कायदा सोबत त्याचा कुठे चाललाय रत्नागिरी जिल्ह्यात काळोखे नावाच्या खून होतो तेथील आमदार आणि मंत्री सुद्धा यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचा नाव घेतात - जिल्हाध्यक्षांचा नाव घेतल्यावर ही कारवाई होत नाही राजकीय पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या जवळचा आहेत म्हणून कारवाई होत नाही - हे राज्याचे दुर्दैव आहे कारण मंत्र्यांनी सांगितला आहे की राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे तरीपण सरकार थातूरमातूर कारवाई करून पुढे जात आहे - वाशिम मध्ये सुद्धा भाजपच्या निवडणुंक प्रमुखांकडे नकली नोटा संदर्भात एफ आय आर दाखल झाला तरी पण कारवाई होत नाही - सत्ताधारी नेत्यांनी ठरवलं तर कारवाई होत नाही नकली नोटा बाजारात आणू दे, खून करू देत, काही केलं तरी सत्ताधाऱ्यांवर कारवाई होणार नाही असा मला वाटतं, की लिखित आदेशात सरकारने काढला पाहिजे की आमच्या तीनही पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर कितीही कायदा सुव्यवस्था अडचणीची असली कायदा संस्थेचा वाटोळ झाला तरी सत्ताधारी पक्षावर कारवाई करूच नये अशी भूमिका सरकारने स्वीकारले पाहिजे आणि तसा आदेशच पोलीस विभागाला दिला पाहिजे - पोलिसांचा वापर सत्ता टिकवण्यासाठी होत आहे - राजू पाटील याच्यावर खोटे नोटा संदर्भात दाखल करता तर पुढची कारवाई का करत नाही, हा सगळा विचित्रपणा चाललेला आहे - सोलापुरात दोन देशमुख एकत्र येऊन पालकमंत्र्यांना धमकी देत आहेत, त्यांचा तो अंतर्गत वाद आहे त्यामध्ये आम्हाला पडायचं नाही, परंतु एकूणच राज्यातील परिस्थिती बघता राज्यात दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्था आहे शिल्लकच नाही राज्यात अशा प्रकारची गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण होत आहे - सगळे सत्ताधारी पैसे कमावण्यात भ्रष्टाचारी करण्यात व्यस्त आहेत कोणाचा कुणावर कंट्रोल राहिलेला नाही सगळ्यांचे पाय होणार आहेत On योगेश बहल पिंपरी चिंचवड - - जर गोव्यात बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, तेलंगणात बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यात तर या सरकारला का भीती वाटते - राज्याला पुढे नेलं आहे, विकास केला आहे अशा बोंबा मारतात तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या - यांना ईव्हीएमच्या भरोशावरच निवडणुका जिंकायचे आहेत या महानगरपालिका निवडणुकीत त्या पद्धतीचा काम सुरू केलेलं असेल तिथे प्रचंड मार्जिन आहे तिथे हे काही करू शकत नाही परंतु जिथे कमी मार्जिन आहे तिथे निकाल फिरवले जातात असा सगळ्यांचा आरोप आहे तसेच आरोप योगेश यांनी केला आहे - ईव्हीएम हॅक केला जातो असं म्हणत असताना सरकारने एकदा पारदर्शकता दाखवावी On मारवाडी जैन मुनी इशारा - - सगळे एकमेकांना इशारे देत आहेत, ओबीसी मराठ्यांना-मराठा आरक्षण मारवाड्यांना हे धमकी, यातून कायदा सुव्यवस्था म्हणजे कोण कोणाला इशारा देईल कोण कोणाला भोसकून मारेल यावर आता सरकारचा कंट्रोल राहिलेला नाही - जे मारवाडी व्यवसाय करणारे रस्त्यावरून धमक्या देत असतील तर या सगळ्यात सरकार म्हणून कसं बघतो सरकारची भूमिका काय ते सरकारने जाहीर करावा
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 28, 2025 05:05:25
Parbhani, Maharashtra:अँकर- अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमधून बाहेर पडून लढणे ही भाजपवाल्यांची हुशारी होय,मुस्लिम मते एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या पारड्यात जाऊ नये यासाठी अजित पवारांना वेगळं लढण्याची भूमिका घायला सांगितली,म्हणूनच अजित पवार नवाब मालिकांच्या नेतृत्वात निवडणुका लढायलेत, भाजपवाल्यांना विधानसभेला नवाब मलिक जमले,त्यांची कन्या जमली,आता नगर पालिकांच्या निवडणुकीत तुम्हाला नवाब जमनत की काय असा सवाल करीत शिवसेना युबीटीचे उपनेते तथा परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भाजपच्या खेळीवर भाष्य केले,लोक आता एवढे दूधखुळे राहिले नसून तुमची हुशारी आता लोकांना कळायला लागलीय.मांजरीलाच वाटतेय मला कुणी दूध पितांना बघत नाहीये, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आता भ्रमात राहू नये यावेळी लोक तुनहाला दणका दिल्या शिवाय राहणार नाहीत असंही ही खासदार जाधव यांनी केले,परभणीत अजित पवारांची राष्ट्रवादी एकला चलोरे च्या भूमिकेत दिसत असून शिवसेना आणि भाजप युती करणार आहे,तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत... जर भारतीय जनता पार्टीला मुस्लिम मतांची गरज आहे तर भारतीय जनता पार्टीने सतत मुस्लिमांचा द्वेष करणं थांबवावं. देशात तुम्ही लोकसभेला बटेंगे तो कंटेंगे म्हणालात,शेवटी मुस्लिम भारतीय आहेत,तांना काय तुम्ही देशा बाहेर काढून देणार आहेत का,तुम्हाला मुस्लिम मतदान करीत नाहीत म्हणून तुमच्या पोटात त्यांच्या विषयी द्वेष आहे,मुस्लिम असे तसे म्हणून तुम्ही लोकांना भीती घालून हिंदूंना एकत्र करण्याची तुमची स्ट्रेटर्जी आहे. तर मग आता तुम्हाला मुस्लिम मतांची सुद्धा गरज वाटतेय,तर मग तुम्ही मुस्लिमांना वेगळ्या अँगलने बघू तरी नका असे आवाहन खासदार जाधव यांनी भाजपला केलेय... नगर पालिकांच्या सगळ्या निवडणुका पैश्याच्या जोरावर झाल्यात,महापालिका ही काही वेगळ्या होतील अश्यातल काही नाहीये,भारतीय जनता पार्टी अघोरी संपत्तीचा वापर करून अघोरी कृत्य करतेय, देशातली,राज्यातली सत्ता त्यांच्याकडे असतांना स्थानिक स्वराज्य संस्था ही त्यांनाच पाहिजेत म्हणजे हे सगळं अघोरी झालंय, शेवटी या देशावर मोगलांनी इंग्रजानी,कन्ग्रेसने ही राज्य केलंय,आता तुमची बारी आहे. तुम्ही कस वागायचं हे तुम्ही ठरवायचं आहे,ततुम्ही जर अस अघोरी वागू लागले तर आज ना उद्या तुम्हाला ही जावं लागणार आहे. मोगलांना इंग्रजांना कधी वाटलं नव्हतं आपल्याला सोडून जाव लागेल. तुम्हाला जरी वाटत असल आम्ही जाणार नाही,पण आज ना उद्या तुम्हाला जावं लागेल,कारण लोकच तुम्हाला खाली करतील,आज ज्या तुम्ही हवेत आहेत,लोकच तुम्हाला पंचर केल्याशिवाय राहणार नाही असा शिवसेना उपनेते तथा परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भाजपला सूचक ईशारा दिलाय...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 28, 2025 04:37:47
Jalna, Maharashtra:जालना : महायुतीकडून बैठकीतील निर्णयांची कमालीची गुप्तता, बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांकडून गुप्तता जालना महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू झाली आहे. महायुती होण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. महायुती होते की नाही, झाली तर कुणाला किती जागा मिळतात, महापौर कुणाकडे असणार आहे याकडे लक्ष लागून आहे. महायुती झाल्यास अनेक कार्यकर्ते महाविकास आघाडी, त्यांच्या घटकपक्षांमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवण्याचेही नियोजन आहे. परंतु, कार्यकर्त्यांची बंडखोरी टाळण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून युतीबाबतच्या निर्णयाबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. युतीबाबत काहीच स्पष्टता नसल्याने कार्यकत्यांची मात्र गणिते बिघडू लगली आहेत. जालना महापालिका निवडणुकीत युती होण्यासाठी मागिल काही दिवसांपासून भाजप-शिवसेनाच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. गुरुवारपासून बैठकांचे सत्र वाढले आहे. दरम्यान, शनिवारी अंतिम बैठक होऊन युती करण्यासह कुणाला किती जागा द्यायच्या याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. परंतु, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडूनही चांगल्या जागा मिळाव्या या अटीवर नेते जोर धरून आहेत. यामुळे मागिल काही दिवसांपासून महायुती केवळ कागदोपत्रीच राहत आहे. दरम्यान, शनिवारी मंठा रोडवरील एका हॉटेलमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही बैठक पाच तास सुरू होती.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 28, 2025 04:36:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीर नगरच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय ठरणारी अत्यंत महत्त्वाकांक्षी जायकवाडी-नक्षत्रवाडी पाणीपुरवठा योजना अखेर निर्णायक टप्प्यावर आली आहे. तब्बल २० वर्षांपासून रखडलेल्या या योजनेतील ३९ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत याची चाचणी सुरू होणार आहे. सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात केवळ मुख्य जलवाहिनीसाठी ६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. २०२२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर हैदराबाद येथील कंपनीने तीन ते साडेतीन वर्षांत हे काम फत्ते केले आहे. मात्र, ही चाचणी थेट महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने शहरात राजकीय चचांना उधाण आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top