Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर ब्रेकिंग: रामदास आठवले ने बाबासाहेब आंबेडकर को एक साथ लाने का आह्वान किया

VBVAIBHAV BALKUNDE
Feb 27, 2026 01:30:28
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग: रामदास आठवले यांची बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र येण्याची खुली साद.... भविष्यकाळात बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र आलो, तर आमची राजकीय ताकद वाढणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी एकत्र यायला पाहिजे. सर्व गटतट बाजूला सारून आपण बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू, असं म्हणत रामदास आठवले यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र येण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील एका कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकर यांना साद घातली आहे。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Feb 27, 2026 03:30:11
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने ‘माझं शहर माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत महास्वच्छता मोहिमेचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. महापौर रूपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेचे उद्घाटन शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील तावडे हॉटेल परिसरात झाले. महापौर रूपाराणी निकम आणि महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ही महास्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून, नागरिकांनीही ‘माझं शहर माझी जबाबदारी’ या भावनेतून सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 27, 2026 03:17:05
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - तांत्रिक कारणामुळे सोलापूर ते मुंबई विमानसेवा मार्चमध्ये सात दिवस राहणार बंद - स्टार एअरच्या तांत्रिक कारणांमुळे सोलापूर ते मुंबई विमानसेवा मार्च महिन्यामध्ये सात दिवस राहणार बंद - तांत्रिक कारणास्तव मार्च महिन्यातील 2,9,11,16,18,23 आणि 25 या तारखेची सेवा विस्कळीत - सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाल्याच्या पहिल्या चार महिन्यात 90% पेक्षा जास्त प्रतिसाद - मात्र चालू महिन्यात हे प्रमाण 30 ते 40 टक्क्यांपर्यंत खाली तर घसरणी मागे विमानाची वेळ चुकीची असल्याचे आले निदर्शनास - त्यामुळे सोलापूर ते मुंबई विमानसेवेची वेळ ही सकाळची करून सेवापूर्ववत करण्याची सोलापूरकरांची मागणी
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 27, 2026 03:16:52
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले के चामोर्शी स्थित अगरबत्ती प्रकल्प के नाम पर महिलाओं को धोखाधड़ी करने वाले पिपरे दंपत्ति को तुरंत गिरफ्तार करने की मांग के लिए पीड़ित महिलाएं जिलाधिकारी कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू किया है। चार दिनों के इस आंदोलान के दौरान चार महिलाओं की हालत बिगड़ने पर उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया है। आशिष अरुण पिपरे नगरसेवक और पत्नी सोनाली आशिष पिपरे ने खोखे कंपनियों के जरिए महिलाओं को धोखा दिया है। प्रशासन की कथित ढीली जांच के कारण गरीब किसान-श्रमिक महिलाएं इस आंदोलन में आ गई हैं। वर्ष 2020 में प्रधानमंत्री रोजगार निर्माण योजना के जरिए आशिष अरुण पिपरे व सोनाली पिपरे ने गरीब शेतमजूर महिलाओं को अपने घर बुलाकर योजना की जानकारी दे कर बैंक से मिलकर घोटाला किया, उनके नाम पर लाखों रुपये कर्ज लिए गए। वे घर पर अगरबत्ती प्रकल्प चलाते रहे। परिणामस्वरूप पैसा मिलना बंद हो गया, बैंक ने नोटिस देना शुरू किया। इस बात पर आशिष पिपरे ने महिलाओं को नजरअंदाज किया। पिपरे के राजनीतिक दबाव के कारण अधिकारी इस मामले को दबाने का प्रयास कर रहे हैं, जो महिलाएं बोलने या जाँच कराने को तैयार नहीं, उन्होंने समाज में खुलेआम घूमने का आरोप लगाया है।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 27, 2026 03:03:10
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 03:02:52
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 27, 2026 03:02:13
Amravati, Maharashtra:मेळघाट यात्रेपूर्वी बच्चू कडूंनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मांडली मेळघाटची व्यथा; बच्चू कडूंनी दाखवलं मेळघाटातील बालमजुरीचा भयान वास्तविक बालमजुरीवर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर विटा ठेवू बच्चू कडू यांचा इशारा या पोस्ट मधून बच्चू कडू यांनी मेळघाटातील बालमजुरीचा भयान वास्तविक दाखवला आहे. ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तक असायला हवी होती त्या वयात मुलांच्या डोक्यावर विटा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यामुळे यात्रेपूर्वी बच्चू कडू यांच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील मेळघाटातील अनेक गावांपर्यंत मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती अत्यंत वेदनादायक आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पिण्याचे पाणी या प्राथमिक गरजांपासून आजही येथील नागरिक वंचित आहेत. याहूनही मन सुन्न करणारी बाब म्हणजे ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तके असायला हवीत, स्वप्नं असायला हवीत, त्या कोवळ्या वयात हीच लेकरं विटभट्ट्यांवर कष्ट करताना दिसत आहेत. मेळघाट संघर्ष व कर्जमाफी आठवण यात्रा प्रचारादरम्यान आमच्या कार्यकर्त्यांनी पाहिलेली ही दृश्यं केवळ हृदयद्रावक नाहीत, तर आपल्या विकासाच्या दाव्यांवर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत. ही केवळ काही मुलांची कथा नाही तर ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान बालमजुरी वर प्रशासनाने लक्ष दिले नाही तर याच विटा जिल्हाधिकारीांच्या डोक्यावर ठेव असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 03:01:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागात जागेअभावी मातांना जमिनीवर गाद्या टाकून उपचार घ्यावे लागत असल्याचे तक्रारी पुढे येत आहे. तर, दूध डेअरी भागातील २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि २०० खाटांच्या 'एमसीएच विंग' वीज, पाणी, यंत्रसामुग्री आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत रेंगाळले आहे. त्यामुळं एका बाजूला नव्या जन्मासाठी जागा अपुरी पडत आहे आणि दुसऱ्या बाजूला नव्या रुग्णालयाचा 'पाळणा' हलण्याआधीच ते प्रशासनिक प्रक्रियेत अडकून बसले आहे ..दूध डेअरी येथील जागेतील ४०० खाटांच्या रुग्णालयासाठी सर्व प्रकारच्या एकूण ३६० पदांची आवश्यकता आहे. मात्र, रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे असताना अद्यापही पदनिर्मिती झालेली नाही.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 03:01:27
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 03:00:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कंत्राटदाराने प्रयत्न केल्यास पुढील २ आठवड्यात जॅकवेलमधून २०० एमएलडी पाणी उपसा सुरू होऊ शकतो. त्यापैकी १७६ एमएलडी पाणी महापालिकेला मिळेल. त्यातून ८० टक्के शहराला २ दिवसांआड पाणी पुरवठा करता येईल, असे निवेदन छत्रपती संभाजी नगर महापालिका मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी केले. हा प्रकल्प २०० एमएलडीपुरता मर्यादित न ठेवता, तो ३९२ एमएलडीपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी मिळेपर्यंत 'पूर्ण' मानला जाऊ नये, अशी विनंती आयुक्तांनी पाणी पुरवठा योजनेच्या 'जनहित याचिकेवरील' सुनावणीवेळी केली. मनपा आयुक्तांनी ६ मार्च रोजी एमजेपीच्या मुख्य अभियंते, कंत्राटदार व संबंधितांसह पुन्हा 'जॅकवेल'ला भेट द्यावी. त्यांनी सादर केलेल्या अहवालापैकी किती कामे पूर्ण झाली, याचा आढावा घ्यावा. त्याचा अहवाल तयार करावा. पाणी उपशासाठी कशाची आवश्यकता आहे, ते नमूद करावे, असा आदेश खंडपीठाने दिला आहे..
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 27, 2026 02:46:04
Beed, Maharashtra:बीड मधील पृथ्वीराज भाऊसाहेब राणे या बाल वैज्ञानिकाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेचा मानला जाणारा डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अँड इनोवेशन हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. संपूर्ण देशभरात केवळ दहा विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आता. याच देशभरातील 10 विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीराज हा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. दरवर्षी इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर आयडिया स्पर्धा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आयोजित केली जाते. यात देशभरातील विद्यार्थी आपला सहभाग नोंदवितात. यामध्येच बीडच्या राजस्थानी विद्यालयात दहावीत शिक्षण घेत असलेल्या पृथ्वीराजने सहभाग घेतला होता. पृथ्वीराजचे वडील भाऊसाहेब राणे राज्य पुरस्कार प्राप्त विज्ञान शिक्षक असून त्यांचं सहकार्य पृथ्वीराजला लाभले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हास्तरातून पृथ्वीराजचे कौतुक केले जाते आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 02:45:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहागंज परिसरात अतिक्रमण विरुद्ध मोठी कारवाई करत महापालिकेने ३५ अतिक्रमण निष्कासित केले तर ३० हातगाड्यांचे साहित्य जप्त करण्यात आले... दुकानदार समोर लावलेले अनधिकृत शेड ज्याच्यामुळे वाहतुकीला व नागरिकांना जाण्यासाठी अडथळा निर्माण होत होता अशा 35 अतिक्रमण धारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. एकूण 30 हातगाडया विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. चार फळ विक्रेत्यांनी दहा बाय दहाचे ओटे करून व त्यावर कच्चे पक्के बांधकाम करून दुकाने मांडले होते ते जेसीबीच्या साह्याने मोडण्यात आले...शहागंज भागात आज ही ही कारवाई सुरू राहणार आहे...
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 26, 2026 17:15:47
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ-वाशिम लोकसभेचे शिवसेना युबीटी चे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला टिप्पर ने मागून धडक दिली असून या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. दिग्रस मार्गावरील साखरा गावाजवळ रेल्वे कामावरील टिप्परने त्यांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात खासदारांच्या वाहनाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. दिग्रस येथील मात्रे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या वाहनातील काही कर्मचारी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report
Advertisement
Back to top