Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील ने किसानों के भावनाओं को ठेस पहुंचाने पर माफी मांगी

VBVAIBHAV BALKUNDE
Oct 10, 2025 07:32:56
Latur, Maharashtra
लातूर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे . माझा हेतू शेतकऱ्याच्या भावना दुखवण्यासारखा नव्हता . जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Oct 10, 2025 13:20:56
Thane, Maharashtra:भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार शहरात होत असलेल्या अंतर्गत रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर पालिका प्रशासनडकडून मोठी कारवाई करण्यात आली. भिवंडीतील तीन बत्ती बाजारपेठ परिसरात रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या उभे करण्यात आलेले हात गाड्या आणि रस्त्यावरील दुकाने महानगरपालिकेच्या पथकाद्वारे हातोडा चालवत हटविण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या पथकाने अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला आहे. या कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईची दहशत अतिक्रमण करणारे फेरीवाले यांना बसली आहे. या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायला होतं आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 10, 2025 13:08:23
Baramati, Maharashtra:दौंड तालुक्यातील बोरीऐंदी गावात यवत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 27 लाख 97 हजार 624 रुपयांचा गुटखा पानमसाला आणि तंबाखूचा अवैध साठा जप्त केला आहे. आरोपी नवनाथ रतन झुरंगे याने आपल्या घरासमोरील पत्र्याच्या खोलीत आरएमडी डायरेक्टर स्पेशल शॉट 999 विमल आणि व्ही-1 टोबॅको या विविध ब्रँडचा मोठा साठा साठवला होता. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार अशा गुटखा पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या साठा विक्री आणि वितरणावर बंदी असून आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून.. ही कारवाई यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 10, 2025 13:00:21
Nanded, Maharashtra:अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने विशेष पॅकेज ची घोषणा केली. पण काल काढलेल्या जीआर मध्ये नांदेड जिल्ह्याचेच नाव वगळण्यात आले. राज्यात सर्वाधिक 6 लाख 48 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झालेले असताना नांदेडचा समावेश नसल्याचा प्रकार झी 24 तासाने लावून धरला. नांदेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यांनंतर सरकारला जाग आली. नांदेडचे नाव टाकून सुधारित जीआर आजच निघेल असे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितले होते. त्यानुसार सुधारित जीआर काढून त्यामध्ये नांदेड चा समावेश करण्यात आला. नांदेड सह इतर दोन जिल्ह्याचाही नव्याने समावेश करण्यात आलाय. कालच्या जीआर मध्ये एकूण 31 जिल्ह्याची नावे होती. आजच्या जीआर मध्ये एकूण 34 जिल्ह्याची नावे आहेत.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 10, 2025 12:20:34
Mumbai, Maharashtra:घाटकोपर पंतनगर पोलिसांनी ७३,५४,७०० किमतींचा गुटखा केला जप्त ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील घाटकोपर येथील कामराजनगर याठिकाणी १३,४४,९००/- किंमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला व यात मोहमद फिरोज कमरूजमा शेख, वय २६ वर्षे या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले व माल कुठून आणला याचा तपास केला असता नमूद गुन्ह्यातील यापूर्वी अटक केलेला आरोपी फिरोज शेख याने तपासादरम्यान त्याने गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित गुटखा हा कुठून आणला याबाबत माहिती दिली असता स्थानिक नारपोली पोलीस ठाणे, जिल्हा-ठाणे येथील पोलीस मदत घेऊन गेलो असता, त्या ठिकाणी असलेल्या दोन गोडाउन वर छापा पोलिसांनी टाकत कारवाई केली व तेथील चालक, सुपरवायझर व हमाल हे वाहनांमध्ये प्रतिबंधित गुटखा भरत असताना मिळून आले. सदर कारवाई दरम्यान एकुण ७३,५४,७००/- रू किंमतीचा गुटखा, ०४ वाहने, ०६ मोबाईल व इतर असा एकुण किं. १,१४,६०,१५०/- रूपये किंमतीचा मु‌द्देमाल जप्त करून, एकुण ०८ इसमांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अधिक तपास पंतनगर पोलिस करत आहे
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 10, 2025 12:11:48
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके शासनाच्या मदतीपासून वगळल्याने शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिल्लर पैसे आणी नोटा फेकल्या. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर यूनायटेड फोरम आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आंदोलन केले असून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिल्लर पैसे आणी नोटा फेकत राज्य सरकारचा निषेध केला आहे. अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके शासनाच्या मदतीपासून वगळल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील सर्व 14 तालुके अतिवृष्टीग्रस्त घोषित करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 10, 2025 12:10:42
Jalna, Maharashtra:जालना जिले के अंतरवाली सराटी के प्रवीण अनिल सुरासे का बचपन से ही वडिलों का सहारा नहीं रहा। उनकी माँ ने मेहनत कर उन्हें पढ़ाया, ताकि वे 11वीं तक पढ़ सकें। इस साल अतिवृष्टि से 5 एकड़ कपाशी जोखिम में पड़ गई है; बुवाई से पहले ही पाणि जमा हो गया और कपाशी सड़ने लगी, जिससे उनकी पढ़ाई की चिंता बढ़ गई है। प्रवीण अभी अंबड़ के मत्स्योदरी महाविद्यालय में 12वीं कर रहा है और मर्चंट नेवी में शामिल होना उसका सपना है, पर अतिवृष्टि ने उसके आर्थिक अवसरों पर आ घात किया है। दो महीनों से 5 एकड़ कपाशी पानी में डूबी है और ढोए हुए कापसें भी मुश्किल से निकल रहे हैं; पिता का सपनों का सहारा अभी भी छूट गया है। माँ ने घर चलाने के लिए मोलमजूरी की और अब आय के कमी से प्रवीण की 12वीं की पढ़ाई भी खतरे में है। इस खबर में आगे बताया गया है कि प्रवीण और उनकी परिवार की आर्थिक मदद के लिए नागरिक सहायता और दान की आवश्यकता है, ताकि वह अपने शिक्षा के रास्ते पर ठोस कदम उठा सके।
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 10, 2025 12:04:19
Kalyan, Maharashtra:कल्याण ज़ोन तीन पुलिस की बड़ी कार्रवाई! अतुल झेंडे के मार्गदर्शनाखाली ड्रग्स तस्करां की टोळी पर 'मोक्का' लागू करना ठाणे पुलिस की बड़ी सफलता है। कल्याण ज़ोन तीन के अतुल झेंडे के मार्गदर्शनानुसार, खडकपाडा पुलिसांनी तब्बल १७ ड्रग्ज तस्करांच्या आंतरराज्यीय टोळीवर 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई केली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयातील अमली पदार्थांच्या गुन्ह्यात मोक्का लावण्याचीही ही पहिली कारवाई ठरली. kalyaanमधील खडकपाडा पोलिसांनी ही अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या कारवाईत विशाखापट्टणम ते कल्याणपर्यंत चालणारे अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाले असून, या टोळीने महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूरसह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथेही ड्रग्ज तस्करीचा व्यवसाय चालवला होता. पोलिसांनी एकूण ११५ किलोग्रॅम गांजा, गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या २ मोटार कार, १ बुलेट, १ रिक्षा, १ अॅक्टिव्हा अशा गाड्या, तसेच १ पिस्तुल, २ जिवंत काडतुसे आणि २ वॉकी-टॉकी संचासह सुमारे ७० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कल्याणजवळील टिटवाळा, बeniली गावात राहणाऱ्या गुफरान हन्नान शेख या टोळीच्या म्होरक्यासह एकूण १७ आरोपींवर ही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपासातून हे उघड झाले आहे की, हे आरोपी मागील तीन वर्षांपासून बेकायदेशीर आर्थिक लाभासाठी अमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि तस्करीचा संघटित व्यवसाय करत होते. अतुल झेंडे Dcp Zone 3
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 10, 2025 12:01:34
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी फक्त मुर्तिजापूर आणि अकोला हे दोन तालुके नैसर्गिक आपत्तीच्या शासन निर्णयातील मदत पॅकेजमधून वगळण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जुलै ते सप्टेंबर या काळात झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना क्रांतिकारी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मुर्तीजापूर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलेल्या विशेष पॅकेजमध्ये मुर्तीजापूर तालुक्याचा तातडीने समावेश करावा, अन्यथा येणारी दिवाळी तहसील कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात साजरी करू, असा इशारा दिला.सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान मुर्तीजापूर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्याचे नाव यादीत चुकून वगळले गेले असल्याचे सांगितले. तसेच पुढील दोन दिवसांत मुर्तीजापूर तालुक्याचा समावेश अतिवृष्टीग्रस्त यादीत करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 10, 2025 12:00:29
Beed, Maharashtra:बीड:मंत्री छगन भुजबळांच्या महाएल्गार सभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची पहिली बैठक मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह प्रमुख ओबीसी नेतेयांना निमंत्रण; लक्ष्मण हाके यांच्यासबाबत स्पष्टता नाही येत्या 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी आजच्या बैठकीसह महाएल्गार सभेतून केली जाणार आहे. मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांना महाएल्गार सभेचं निमंत्रण देण्यात आले. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत आयोजकांनी स्पष्टता दिली नाही. मागील महिन्यात महाएल्गार सभा होणार होती. मात्र शेतकऱ्यांवरील संकट पाहता सभा रद्द करण्यात आली. आता 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेचं जोरदार नियोजन बीडमध्ये केले जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन या सभेत सहभागी व्हावे अन्यथा सभा उधळून लावू असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला होता. मात्र सभा उधळण्याची भाषा कोणी करू नये, नसता तुमचे धंदे काय हे आम्हाला शोधावे लागतील असा सूचक इशारा आयोजक सुभाष राऊत यांनी काळकुटे यांना दिला..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 10, 2025 11:47:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:रिक्षा व्यवसायिकांच्या विविध मागण्यासाठी परिवहन कार्यालयासमोर रिक्षा चालकांचे धरणे आंदोलन रिक्षा व्यवसायिकांच्या विविध मागण्यासाठी सांगलीमध्ये राष्ट्रीय ऑटो रिक्षा ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले.परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर रिक्षा चालक-मालकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यसभेच्या वतीने टू व्हीलर रॅपिड टॅक्सी सर्विस ला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात यावी 2017 नंतरचे फ्री रिक्षा परवाना बंद करावा, तसेच धर्मवीर आनंद दिघे रिक्षा कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी आणि बांधकाम कामगारांच्या धरतीवर रिक्षा चालकांना लाभ द्यावेत अशी मागणी,यावेळी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top