Back
पुणे पदवीधर सीट पर महायुती में उम्मीदवार चयन को लेकर बड़ा तनाव
PNPratap Naik1
Nov 03, 2025 07:01:13
Kolhapur, Maharashtra
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उमेदवार कोण असणार यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्री यांना पटवून सांगू असं म्हणत लाड यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केलाय. पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून महायुतीत तीव्र मतभेद. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांनाच उमेदवारी मिळेल असे संकेत देताच मंत्री मुश्रीफानी यांनी केला तीव्र विरोध. शरद लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडू असं म्हणत मुश्रीफांनी शरद लाड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय. महायुतीमध्ये बेबनाव दर्शवणारी वक्तव्य केल्याने महायुतीतच वादाची किनार असल्याचे समोर. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अजूनही एक वर्षाचा अवकाश आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाडच असतील असं सांगून टाकलं. त्यामुळेच महायुतीमध्ये पुणे पदवीधर मतदार संघ उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडली. दादांच्या या भूमिके नंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने प्रतिक्रिया देऊन शरद लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्र्यांसमोर बैठकीत मांडू असं सांगून टाकलं. एक प्रकारे हसन मुश्रीफ यांनी शरद लाड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केल्याचे दिसून आलं. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. कारण राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड हे पुणे पदवीधर मतदार संघातून निवडून आल्याने हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी मुश्रीफ याचे कट्टर कार्यकर्ते भैय्या माने जोरदार तयारी केली आहे. त्याला हसन मुश्रीफ यांची देखील साथ आहे. एक वर्षानंतर होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण याबाबत महायुतीमध्ये संभ्रम आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेले सांगली मधील वक्तव्य आणि मंत्री मुश्रीफ यांनी दिलेली तातडीची प्रतिक्रिया यावरून पुणे पदवीधर मतदारसंघावरून महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्यासारखे नाही. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मी उमेदवारी देत नाही, आमच्याकडे त्याची समिती असते, माझ्या विधानाचा अर्थ न कळण्याइतके मुश्रीफ कच्चे राजकारणी नक्कीच नाहीत असे स्पष्टीकरण दिलंय. चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी महायुतीमध्ये सगळं काही अलबेला आहे असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी आम्हालाच मिळेल या भूमिकेतून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जोरदार बैठक काढत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 03, 2025 13:31:040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 13:21:280
Report
AKAMAR KANE
FollowNov 03, 2025 13:21:08Nagpur, Maharashtra:बाईट असाइन्मेंट नंबर वर पाठवला आहे
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 03, 2025 13:20:430
Report
SKShubham Koli
FollowNov 03, 2025 13:01:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 03, 2025 12:49:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 03, 2025 12:48:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 03, 2025 12:38:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 03, 2025 12:33:300
Report
ABATISH BHOIR
FollowNov 03, 2025 12:33:070
Report
ABATISH BHOIR
FollowNov 03, 2025 12:20:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 03, 2025 11:55:030
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 03, 2025 11:54:07Chendhare, Alibag, Maharashtra:राज्य में महायुति में रिपब्लिकन पार्टी को उचित हिस्सा मिलना चाहिए—केंद्रीय मंत्री रामदास आठवले की मांग है कि अनुसूचित जाति के आरक्षण वाले स्थान हमें दिए जाएँ. आगामी चुनाव हम महायुति के तौर पर लड़ेंगे, पर जहाँ महायुति नहीं बनेगी, वहां हम भाजपा के साथ रहेंगे.
0
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 11:45:140
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 03, 2025 11:44:580
Report