Back
मराठवाडा में घरेलू गैस सिलेंडर टंचाई, प्रशासन के दावे जाँच के घेरे में
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 12:00:29
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर | गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, घरघुती गॅसची टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा फोल?(पॅकेज)
मराठवाड्यात घरघुती गॅस सिलेंडरचा व्यवसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी,
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मराठवाड्यात 88 पथकं स्थापन,5 जिल्ह्यातून आतापर्यंत 170 गॅस सिलेंडर जप्त
अँकर : छत्रपती संभाजीनगरसह जालना,नांदेड जिल्ह्यात घरघुती गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना रांगा लावूनही तासंतास गॅस सिलेंडर मिळत नाहीय.तर दुसरीकडे मराठवाडयातील 5 जिल्ह्यातून व्यवसायासाठी वापरले जाणारे 170 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत. एका बाजूला प्रशासन घरगुती गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा करत असताना दुसऱ्या बाजूला नागरीकांना रांगा लावूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं प्रशासनाचा मुबलक गॅस साठा असल्याचा दावा फोल ठरताना दिसून येतोय.बघूया मराठवाड्यातील गॅस टंचाई वरचा हा स्पेशल रिपोर्ट.
व्हिओ:१: एक गॅस सिलेंडर आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील हे चित्र पहा.महिला,पुरुष सकाळी 7 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत भर उन्हात उभे आहेत.गॅस एजन्सीने आणलेला गॅसचा साथ संपवून जाईल या भीतीने हे नागरीक नाश्ता जेवण न करताच सकाळी घरातून बाहेर पडले पण दुपारपर्यंत रणरणत्या उन्हात उभे राहूनही त्यांच्या नशिबात गॅस सिलेंडर पडत नाहीय.यामुळे नागरीक हतबल तर झालेच पण भावनिक देखील झालेत.हे चित्र नुसतं छत्रपती संभाजीनगर शहरात नाहीय.जालना,बिड,नांदेड शहरात देखील अशाच रांगा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लागल्या आहेत.त्यामुळे घरघुती गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरल्यात जमा आहे.
वाक थ्रू +चौपाल नितेश महाजन विथ नागरीक
बाईट : नागरीक(नांदेडच्या फिडमध्ये हे बाईट आहेत)
व्हिओ:०२: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गॅसच्या टाकी साठी नागरिकांची सुरू असल्याची घालमेल तुम्ही पाहिली.पण घरघुती गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचं जिल्हाधिकारी म्हणतायत.ज्याप्रमाणे टंचाईच्या काळात पाणी जपून वापरलं तशीच युद्धाची परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत गॅस जपून वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
बाईट: दिलीप स्वामी,जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर(कोट वर असलेले,2C फिडमध्ये हा बाईट आहे)
व्हिओ :०३: हे चित्र झालं घरघुती गॅस मिळवताना सर्वसामान्य नागरिकांचं.पण दुसरीकडे सर्वसामान्यांना घरघुती गॅस मिळत नसताना व्यवसायासाठी मात्र गॅस चोरून लपून मिळत असल्याच समोर आलंय.कारण घरघुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्या प्रतिष्ठानांवर भरारी पथकाने कारवाई करत मराठवाडयातील 5 जिल्ह्यातून 170 गॅस सिलेंडर जप्त केलेत.
मराठवाडयातील कोणत्या जिल्ह्यात किती भरारी पथकं स्थापन करण्यात येऊन किती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले यावर एक नजर टाकूयात
●छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचंड गॅस टंचाई असताना 11 भरारी पथकं स्थापन करूनही अजून एकही गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेला नाही.
●जालना जिल्ह्यात 8 पथकं स्थापन करण्यात आहेत.आतापर्यंत 59 सिलेंडर जप्त झालेत.
●बिड जिल्ह्यात 19 भरारी पथकं स्थापन ,3 हॉटेलवर फौजदारी कारवाई करण्यात आली. 203 ठिकाणच्या छापेमारीत 28 सिलेंडर जप्त झाले
●परभणी जिल्ह्यात 9 पथकं स्थापन,एका कारवाईत 68 सिलेंडर जप्त करण्यात आलेत.
●लातूर जिल्ह्यात 10 भरारी पथक आहेत.7 हॉटेलमधून 8 सिलेंडर जप्त झाले
●धाराशिव जिल्ह्यात 8 पथक आहेत.81 हॉटेलची तपासणी करत या पथकाने 7 सिलेंडर जप्त केलेत. तर हिंगोलीत 7,नांदेडमध्ये 16, भरारी पथकाची स्थापना करण्यात येऊनही अजून एकही सिलेंडर जप्त झालेला नसला तरी 5 जिल्ह्यातून एकूण 170 सिलेंडर आतापर्यंत या पथकाने जप्त केलेत.त्यामुळे सामान्यांना न मिळणारा गॅस व्यावसायासाठी मिळतो कसा असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान घरघुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा ईशारा ठिकठिकाणच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलाय.
बाईट : सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना(माझ्या 2c फिडमध्ये हा बाईट आहे)
बाईट : डॉ जगदीश बारदेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी,नांदेड (सतीशने नांदेड हुन पाठवलेल्या 2c फिडमध्ये हा बाईट आहे)
व्हिओ:४:एका बाजूला प्रशासन घरघुती गॅस सिलेंडर उपलब्ध असल्याचा दावा करत असलं तरीही प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे.त्यामुळे प्रशासनाने भरारी पथकामार्फत व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर कारवाई सुरू केलेली असताना अशाच पद्धतीने कारवाई घरघुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठी एजन्सी चालकांवर करण्याची हिंमत दाखवली तर सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर लवकर मिळेल हे नक्की
नितेश महाजन,झी-२४ तास,छत्रपती संभाजीनगर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CFChandrakant Funde
FollowMar 14, 2026 13:19:31146
Report
SNSWATI NAIK
FollowMar 14, 2026 13:00:40191
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 14, 2026 12:47:38127
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 12:35:00128
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 12:16:50203
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:15:39269
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 14, 2026 12:07:52159
Report
ABATISH BHOIR
FollowMar 14, 2026 12:01:31187
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 11:45:24159
Report
UJUmesh Jadhav
FollowMar 14, 2026 11:32:02156
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 14, 2026 11:07:55160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 11:07:13101
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 11:05:20122
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 10:49:51143
Report