Back
जालना महापालिका प्रारूप मतदाता सूचियों में गड़बड़, कई नाम दूसरे विभागों में, हजारों मतदाता प्रभावित
NMNITESH MAHAJAN
Dec 04, 2025 02:30:23
Jalna, Maharashtra
जालना : महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ,वडील मुलासह, सासू, सुनांची मतदान करण्यासाठी जाताना होणार ताटातूट,
1 हजार 969 आक्षेप आणि हरकती दाखल
जालना महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. काही प्रभागांतील हजारो मतदार गायब आहेत, तर काही ठिकाणी दुसऱ्या प्रभागातील नावे घुसवली गेली आहेत. काही प्रभागांत एकाच कुटुंम्बातील व्यक्तींच्या नावांची फोडाफोड होऊन ती नावे दुसऱ्या प्रभागांत गेली आहेत. यामुळे वडील-मुलाची आणि सासू-सुनांची मतदान करायला जाण्यासाठी ताटातूट झाली आहे. आलेल्या आक्षेपांनुसार जवळपास 4 हजार मतदारांच्या नावांचा हा गोंधळ उडाला आहे. राहायला एका प्रभागात असूनही नाव 4 किलोमीटर अंतरावरील प्रभागांत आले आहे. सामाजिक कार्यकत्यांसह जवळपास सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून यावर आक्षेप दाखल झाले आहेत.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 16 प्रभागांतील प्रारूप मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. परंतु, या याद्यांमध्ये एकाच कुटुंबातील मतदारांचीही ताटातूट झाली आहे. दरम्यान, 3 डिसेंबरपर्यंत हरकती, आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत होती. यामुळे आतापर्यंत आक्षेप, हरकती प्राप्त झाल्या आहेत. यात सर्वाधिक प्रमाण हे प्रभाग बदलल्याचे आहेत. काही आक्षेपांमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे इतर प्रभागांत गेली आहेत.घरी बसूनच मतदार याद्या केल्याने हा गोंधळ उडाल्याचा आरोप आहे.
मतदार याद्यांची सीमांनुसार फोड करणे, प्रभागांच्या सीमा निश्चितीनुसार मतदारांची नावे टाकणे, काढणे हे काम पारदर्शक झाले नाही, अनेक कर्मचाऱ्यांनी घरी बसूनच ही कामे केल्याने गोंधळ उडाला आहे. याबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. आज प्रत्यंत 1 हजार 969 हरकती प्राप्त झाले आहेत. 10 डिसेंबर पूर्वी सर्व हरकतीची पडताळणी करून यादी 10 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowDec 04, 2025 03:04:08188
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 04, 2025 03:03:08151
Report
PNPratap Naik1
FollowDec 04, 2025 03:00:1282
Report
PNPratap Naik1
FollowDec 04, 2025 02:48:29117
Report
PNPratap Naik1
FollowDec 04, 2025 02:36:08154
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 02:35:5595
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 02:32:17120
Report
SNSWATI NAIK
FollowDec 04, 2025 02:31:32159
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 02:30:41189
Report
KPKAILAS PURI
FollowDec 04, 2025 02:17:52128
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 02:16:37177
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 04, 2025 02:15:42115
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 04, 2025 02:00:22215
Report
KPKAILAS PURI
FollowDec 04, 2025 01:32:03102
Report